रिओ ऑलिंपिक्स - २०१६ सुरुवात

Submitted by Adm on 22 April, 2016 - 16:16

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा ब्राझिलमधल्या रिओ-द-जॅनिरो मध्ये भरणार आहेत. सात वर्षांपूर्वी अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी स्वत: लक्ष घालून तसेच निवडीच्या बैठकीला हजेरी लावूनही रिओ शहराने शिकागोला हरवून यजमानपद खेचून घेतले. त्यानंतर त्यांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही यजमानपद मिळवून, यशस्वी आयोजनही करून दाखवले. पण ब्राझिलमधली राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचार, ह्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत होणारा देशांतर्गत विरोध ह्यामुळे रिओचं यजमानपद नेहमीच चर्चेत राहिलं आणि ते खरच यजमानपद भुषवू शकतील का असे प्रश्न उपस्थित झाले.
ह्या सगळ्या चर्चा चालू असताना स्पर्चर्चाआणि खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. ऑलिंपिक आता उण्यापुर्‍या शंभर दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

ऑलिंपिकचे उगमस्थान असलेल्या ग्रीसमध्ये काल ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेनुसार सुर्यकिरणांद्वारे हे ज्योत पेटवली गेली. आता ती बर्‍याच ठिकाणी प्रवास करून रिओला येईल.

http://edition.cnn.com/2016/04/21/sport/rio-2016-olympic-torch-lit/

ह्या सोहळ्यापासून येंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांचे औपचारीक 'काऊंटडाऊन' सुरू झाले. तर त्या मुहुर्तावर हा धागा!

ही स्पर्धेची वेबसाईट : http://www.rio2016.com/en

भारतात ईएअपीइन स्टार वर तर अमेरिकेत एनबीसीवर सामने दाखवले जातील.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_2016_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाटे साडेचारला ओपनिंग सेरेमनी असेल .. बाकीचे सगळे खेळ तिकडच्या सकाळी आणि दुपारी त्यामुळे आपल्याकडे रात्रीच..

आजची फूटबॉलची मॅच रात्री ९:३० ला आहे..

वाडानी नरसिंगला क्लिनचीट दिली! >>> वाडानी नाही जागतिक महासंघाचीही नरसिंगला "क्‍लीन चिट'

इ-सकाळ मधुन
जागतिक महासंघाचीही नरसिंगला "क्‍लीन चिट'
- -
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:04 AM IST

नवी दिल्ली - उत्तेजक सेवन प्रकरणातून राष्ट्रीय उत्तेजक संस्थेने (नाडा) मुक्त केलेल्या कुस्तीगीर नरसिंग यादवला बुधवारी युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) म्हणजेच जागतिक कुस्ती महासंघानेदेखील "क्‍लीन चिट‘ दिली. या निर्णयामुळे नरसिंगच्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याच्या आशांना बळकटी मिळाली. आता नरसिंगचा प्रवेश जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या (वाडा) भूमिकेवर अवलंबून असेल.

"नाडा‘ने उत्तेजक सेवनाच्या आरोपातून मुक्त केल्यावर भारतीय कुस्तीगीर महासंघाने जागतिक संस्थेकडे त्याच्या समावेशाविषयी विनंती केली होती. भारताने त्यापूर्वी कोटा टिकविण्यासाठी प्रवीण राणाची पाठवणी केली होती. मात्र, जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या विनंतीचा विचार करून नरसिंगच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले, ""नाडाकडून मुक्तता झाल्यावर आम्ही लगेचच जागतिक महासंघाला नरसिंगचा विचार करण्याची विनंती केली होती. त्यांनीदेखील आमच्या अर्जाचा फेरविचार करून नरसिंगच्या प्रवेशास परवानगी दिली.‘‘
जागतिक कुस्ती महासंघाने नरसिंगच्या प्रवेशास परवानगी दिली असली, तरी त्याचा ऑलिंपिकमधील समावेश आता सर्वस्वी "वाडा‘च्या भूमिकेवर अवलंबून असेल. "वाडा‘ने नरसिंगच्या उत्तेजक सेवन चाचणीच्या अहवालाची आणि चौकशीची फाईल मागून घेतली असून, त्यावर आता त्यांची चर्चा होईल. ही फाईल अभ्यासल्यानंतर "वाडा‘ने क्रीडा लवादाकडे अपील केल्यास नरसिंगच्या समावेशास अडचणी येणार आहेत.

"वाडा‘ने मात्र या अपिलावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केल्यास याविषयी निर्णय लागू शकतो; पण त्यासाठी नरसिंगला आणखी काही दिवस थांबावे लागेल. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाने नरसिंगचे नाव पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

थोडक्‍यात नरसिंग वाद
-नाडाकडून उत्तेजक सेवन प्रकरणातून नरसिंग मुक्त
-भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगच्या समावेशासाठी जागतिक कुस्ती महासंघाला विनंती
-जागतिक कुस्ती महासंघाकडून देखील नरसिंगला "क्‍लीन चिट‘
-आता "वाडा‘च्या भूमिकेवरच नरसिंगचे ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न अवलंबून

रिपीट टेलिकास्टच्या वेळा, च्यानलं शोधायची आहेत. ही शोधाशोध करून वेळेचं गणित बसेपर्यंत स्विमिंग अर्धंअधिक संपून जातं. Sad

रिओ ऑलिंपिकचं अ‍ॅप आहे. छान वाटतय.
रियो ऑलिंपिक ऑफिशियल अ‍ॅप अस नाव आहे. त्यात आपल्या देशाची टाईमलाईन सेट केली की आपल्याकडच्या वेळा दिसतात. आवडता संघ, देश, प्लेअर , खेळ सगळं सेट करता येतय. स्पर्धा सुरु झाल्या की कळेल नकी किती चालतय ते.
त्यानुसार आज मेन्स ( १७:३० भारतीय वेळ ) आणि विमेन्स ( २१:३० भारतीय वेळ) आर्चरी रँकिंग आहे .
भारताचा अतानु दास, दिपिका कुमारी, मांझी, देवी आहेत टिम मधे.

सगळ्या खेळांचा एकत्र आढावा आणि टाइमटेबल
https://www.rio2016.com/en/schedule-and-results

दिल्लीचं १९८२चं एशियाड, ज्याला मिनी ऑलिंपिक म्हणतां येईल, तें आम्ही तीन मित्रानी व्यवस्थित योजना आंखून पाहिलं. त्या अनुभवावरून एक टीप द्यावीशी वाटते - ऑलिंपिक म्हणजे खास शेफनी बनवलेल्या अगणित पदार्थांची सप्ततारांकीत हॉटेलमधली बूफे सर्व्हिसच ! खरा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या खास आवडीचे पदार्थ निवडून प्रथम आपल्या प्लेटमधे घ्यावे. गाजलेल्या नाविन्यपूर्ण पदार्थांची चवही मग अगत्याने चाखून बघावी. माझ्या आवडीनुसार, मीं हॉकी, टेबल-टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल या सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे व जिम्नॅस्टिक्स, डायव्हींग, ट्रॅक इव्हेंटस [ विशेषतः १०० मीटर्स, बोल्टसाठी ] व भारतीय स्पर्धक असलेल्या खेळांनाही खास महत्व देणार आहे. बाकी जाणकार ' बघितलंच पाहिजे' असं सांगतील तीं इव्हेंटस !!

आणि प्रत्यक्ष खेळातील पुढचा प्रकार सुरु झाला आहे.. तिरंदाजी.. भारताला यंदा पुरुषांच्या स्पर्धेत तरी फारश्या आशा नाहीयेत... आत्ता सुरुवातीला तरी आतनू दास तिसरा आहे..

आतिशबाजी ३डी लायटींग इ. दिमाखदार होते. परंतू बिजिंग लंडन ऑलंपिक आणि दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा सारखे व्यवस्थापन रिओ मधे झाले नाही.
प्रत्येक देशाचा स्कॉड मैदानात आल्यानंतर एके ठिकाणी जाऊन विखुरला जात होता. एरिअल व्ह्यू मधे सगळीकडे जत्रेसारखी गर्दी मैदानात दिसत होती.
तसेच ध्वज घेऊन जाणार्‍यांना ध्वजाच्या दांड्याला सपोर्ट देणारे "गळ्यात अडकवायचे पाकिट" सुध्दा दिले नाही. इतका वेळ ध्वज घेऊन मार्च करणे आणि कंटीन्यु उभे राहणे इ. विचार करण्यात्च आला नाही.

Darshana१५ ही रिओस्थित माबोकर रिओ ऑलिंपिकमध्ये व्हॉलंटिअरिंग करणार आहे.
प्री-ऑलिंपिक / कर्टन-रेझर म्हणून इथे काहीबाही अपडेट्स टाकण्याबद्दल तिला मेसेज केला आहे. >>
मस्तच की ! + १००
वॉव ....खरंच!

रेफ्युजी ऑलिंपिक टीमबद्दल वाचण्यात आलं. त्याचे १० सदस्य आहेत.
युसरा मार्दिनी ही सिरियाची स्विमर आहे त्यात. वय फक्त १८. गेल्या वर्षी ती आणि तिचं कुटुंब सिरियातून सुटका करून घेऊन समुद्रामार्गे युरोपात आलं. ते ज्या बोटीत होते त्याची क्षमता फक्त ६ जणांची होती आणि त्यात १५-२० जण बसले होते. मध्येच ती बोट उलटायच्या बेतात होती. तर युसरा आणि तिची मोठी बहीण दोघींनी पाण्यात उड्या मारल्या आणि बोट जवळपास ढकलत किनार्‍यावर आणली.

http://time.com/4435933/syria-swimmer-yusra-mardini-refugee-rio/

मला हे वाचून साष्टांग दंडवत घालावासा वाटला त्यांना. त्या टीममधल्या प्रत्येकाची काही ना काही कहाणी असणार. ही माणसं कुठून एवढी प्रेरणा मिळवतात...!!

युसरा १०० मी. फ्रीस्टाईल आणि १०० मी. बटरफ्लाय शर्यतीत भाग घेणार आहे.

अनुमोदन उदय
सुरूवातीचं अमेझॉन जंगल, पोर्तुगिजांचम आगमन, आधुनिक ब्राझिल ईवगैरे सिक्वेन्स मस्त होता. एकदम सुरेख रंगसंगती होती. ग्लोबल वॉर्मिंग, त्याकरता झाडं देणं वगैरे थीम पण चांगली होती. परेड त्यामानाने बरीच विस्कळीत होती. प्रत्येक टीमच्या पुढे असलेल्या सायकली मस्त होत्या. पण एकदा टीम मैदानावर आली की त्यांची उभं रहायची जागा वगैरे अजिबात नीट नव्हती. सगळा सावळा गोंधळ होता.
सिडनी, एथेन्स, लंडन वगैरेंनी ज्योत पेटवायचा कार्यक्रम पण खूपच कल्पक पद्धतीने केला होता, जो इथे फारच साधा झाला.
सगळीकडे हे दाखवत होते की नाही माहीत नाही, पण टीम युएसएअ मैदानावर आल्यानंतर फार दंगा करत होती!!! (बाकीच्या टीम येत असताना).
भारतीय चमू नेहमीप्रमाणे एकदम शिस्तीत होता. Happy पुरूषांना भारतीय पोषाख द्यायला हवा होता असं वाटलं, तसच महिला हल्ली साड्यांवर ब्लेझर का घालतात काय माहीत!

ललिता, रेफ्युजी टीमबद्दल ऐकलं परेड दरम्यान आणि वरची लिंक पण वाचली. त्या सगळ्यांनी मानसिक ताकद किती जास्त असेल!!!

रेफ्युजी टीम प्रमाणे जे खेळाडू स्वतंत्रपणे ऑलंपिक मधे भाग घेतात त्यांच्यासाठी ऑलंपिक ध्वजाखाली पण एक टीम बहुदा असते.

मला पण भारतीय स्त्रियांचा गणवेष अजिबात आवडला नाही. काहीतरीच रंगसंगती होती साड्यांची. त्यापेक्षा एलेगन्ट व्हाइट/ ऑफव्हाइट आणि डार्कबॉर्डर अशा काहीतरी असत्या तर मस्त दिसल्या असत्या. त्यावर ब्लेझर्स तर अगदीच मिसमॅच. सलवार कमीझ पण छान दिसले असते. पुरुषांना जोधपुरी चांगले दिसले असते.

पहिलं गोल्डमेडल अमेरीकन महिलेला जाहीर झालं. शुटींगमध्ये. चिनी बाई दुसरी आली. शेवटच्या शॉटमध्ये १०.४ / १०.१ असा फरक झाला.
बीच व्हॉलिबॉलच्या मॅचेस पहातो आहे. मघाशी इटालियन टीम मस्त खेळली. आत्ता ब्राझीलची टीम त्यापेक्षा भारी खेळते आहे. ते नंबर १ आहेत.

मी ऐकलं की परेड झाल्यानंतर (ठराविक रस्ता संपल्यानंतर) सर्व खेळाडूंनां मैदानात कुठेही जाण्याची मुभा होती सोशलाइज करण्याकरता.

फ्लॅग बेअररर्स ची काही गैरसोय होत होती असं बघून तरी वाटत नव्हतं.

भारताचा हॉकीअ पहिला विजय! ३-२ विरूद्ध आयर्लंड.
चौथ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडने जोरदार प्रयत्न केले. एक गोल करुन पिछाडी कमी केली. पण वेळ कमी पडला त्यांना. पेनल्टी कॉर्नर घेताना आपली बचावफळी जरा घोळ घालत होती असं वाटलं.

हॉकी - आयर्लंड सारख्या संघाविरुद्ध जरी ३-२ हा कमी फरकाचा विजय असला तरीही भारताची बचावफळी व फॉर्वर्डस पुढील सामन्यांत याहूनही खूप बरी कामगिरी करतीलच असा विश्वास देणारा आजचा त्यांचा खेळ होता. सामना रंगतदार झाला. फिल्ड गोलचा अभाव मात्र खटकला.
स्टार स्पोर्टस वरची सामन्याची कॉमेंटरी फारच आवडली.

स्विमिंग हीट्स सुरू आहेत. ४०० मिटर इंडीव्हिजुअल मेड्लेमध्ये अमेरीकेच्या चेसने शेवटच्या पन्नास मिटरमध्ये जोरदार मुसंडी मारत पहिला नंबर पटकावला. संध्याकाळच्या फायनल्समध्ये तो सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे. त्याने जागतिक स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवलं होतं.

बघताय का कोणी ?
पुरूषांच्या १० मिटर एअर पिस्टोलची फायनल भारी झाली. व्हिएटनाम आणि ब्राझिलच्या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस!
व्हिएटनामी खेळाडूने सलग चार शॉट १० च्या खाली मारले आणि ब्राझिलचा वू पहिल्यानंबरवर गेला. पण व्हिएटनामी होंग ने शेवटच्या शॉटला तब्बल १०.७ पॉईंट मिळवून पिछाडी भरून काढली आणि सुवर्णा पदक मिळवलं.
वू ने शेवटचे बरेच शॉट सलग १०.२ च्या वर मारले. हार्ड लक वू ! Happy

भारताचा राज आठवा आला.

पुरूषांच्या रोडबाईकिंग मध्येही बेल्जियन खेळाडूने शेवटच्या किलोमिटरमध्ये जोरदार मुसंडी मारत डॅनिश खेळाडूला मागे टाकून सुवर्णपदक मिळवलं.

लंडन ऑलिंपिच्यावेळी टाईमझोन सगळ्यांना सुटेबल होता बहुतेक. किमान काही तासतरी सगळीकडची लोकं (मायबोलीवरची) अ‍ॅक्टीव्ह असायची, त्यामुळे मजा यायची.. पुढच्यावेळी होस्ट सिटी निवडताना हा पण एक क्रायटेरीया ठेवायला सांगूया. Wink

Pages