रिओ ऑलिंपिक्स - २०१६ सुरुवात

Submitted by Adm on 22 April, 2016 - 16:16

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा ब्राझिलमधल्या रिओ-द-जॅनिरो मध्ये भरणार आहेत. सात वर्षांपूर्वी अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी स्वत: लक्ष घालून तसेच निवडीच्या बैठकीला हजेरी लावूनही रिओ शहराने शिकागोला हरवून यजमानपद खेचून घेतले. त्यानंतर त्यांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही यजमानपद मिळवून, यशस्वी आयोजनही करून दाखवले. पण ब्राझिलमधली राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचार, ह्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत होणारा देशांतर्गत विरोध ह्यामुळे रिओचं यजमानपद नेहमीच चर्चेत राहिलं आणि ते खरच यजमानपद भुषवू शकतील का असे प्रश्न उपस्थित झाले.
ह्या सगळ्या चर्चा चालू असताना स्पर्चर्चाआणि खेळाडूंची तयारी मात्र जोरात सुरू आहे. ऑलिंपिक आता उण्यापुर्‍या शंभर दिवसांवर येऊन ठेपलं आहे.

ऑलिंपिकचे उगमस्थान असलेल्या ग्रीसमध्ये काल ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला. परंपरेनुसार सुर्यकिरणांद्वारे हे ज्योत पेटवली गेली. आता ती बर्‍याच ठिकाणी प्रवास करून रिओला येईल.

http://edition.cnn.com/2016/04/21/sport/rio-2016-olympic-torch-lit/

ह्या सोहळ्यापासून येंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांचे औपचारीक 'काऊंटडाऊन' सुरू झाले. तर त्या मुहुर्तावर हा धागा!

ही स्पर्धेची वेबसाईट : http://www.rio2016.com/en

भारतात ईएअपीइन स्टार वर तर अमेरिकेत एनबीसीवर सामने दाखवले जातील.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_2016_Summer_Olympics_broadcasters

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या, nbc वर बघतो आहेस का? मी स्लिंग टीवी घेतलाय पण नेमका इथे nbc नाहीये या टेरिटरीत. Nbc sport cnbc msnbc आहे. पण त्यावर मेन इव्हेंट दाखवत नाहीयेत. त्यामुळे रग्बी अन घोडेस्वारी बघतोय

हो.. टिव्हीवर एक इव्हेंट आणि लॅपटॉपवर बाकीचे.
पुरूषांच्या जिमनॅस्टीक्सची रोटेशन्स सुरू आहेत आत्ता.
६:३० ला मिर्झा, ठोंबरे पहिल्या राऊंडची मॅच आहे आणि रात्री ९:३० ला स्विमिंग फायनल्स.
स्विमिंगच्या हीट्स बघून मी एकदम "पेटके उठलो" आणि स्विमिंग करून आलो. Proud

आम्ही बास्केटबॉल बघतोय. मेन्स - युएस वि. चायना! युएस टीम मधे एनबीए स्टार्स कारमेलो अ‍ॅन्थनी आणि केविन ड्युरॅन्ट , (तरी स्टेफ करी आणि लेब्रॉन ने विदड्रॉ केले.) त्यामुळे टोटली डोमिनेटिंग. चायनाचे अगदीच काहीच आव्हान नाही त्यांना . ८०-४० वगैरे आहे अत्ता.
त्याआधी वीमेन्स बास्केटबॉल पाहिला ट्रकी आणि कॅनडा. आपल्या NCAA प्लेयर्स यापेक्षा खूप छान खेळतात असे वाटले.

टेबलटेनिस मध्ये सकाळी अमेरिकेचा कनक झा (फ्रॉम मिलपिटास, कॅलिफॉर्निया) आणि एका इरेनियन माणसाची मॅच होती.

कनक हरला तरी इट फेल्ट ग्रेट टू वॉच हिम. Happy

मिर्झा-ठोंबरे पण हरल्या. Sad
स्विमिंग पाहिलं का ?
४ x १०० फ्रिस्टाईल रिलेमध्ये ऑस्ट्रेलियन बायांनी अमेरिकन बायांना मागे टाकून गोल्ड मेडल मिळवलं. वर्ल्ड रेकॉर्डही मोडलं.
महिलांच्या ४ बाय १०० मेडलेमध्ये हंगेरीयन हॉसझूने वर्ल्ड रेकॉर्ड तब्बल ४ सेकंदांनी मोडला !!
पुरूषांच्या ४ बाय १००मध्ये अमेरिकन चेसने परत ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाईलमध्ये जोर लावून रौप्य पदक खेचलं. पहिल्या जपान्याला काही मागे टाकता आलं नाही त्याला.

आज दिवसभर एव्हड्या मॅचेस पाहूनच मी दमलो !!

टेनिसमध्ये फक्त मिक्स्ड डबल्समध्ये काही आशा आहे.
बोपन्ना-पेस (बोपन्ना मुद्दामच आधी लिहिलंय) यांनी जितका वेळ भांडणात घालवला, तितका सरावाला दिला असता, तर आणखी एक दोन राउंड खेळले असते अशी कमेंट आताच ऐकली.
बातम्यांत ऐकलं की स्वीमिंगमध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला आणि मोडणारीला त्याचा पत्ताच नव्हता.

समहाउ या वेळी ऑलिंपिक पाहायचा अजिबात उत्साह नाही. रात्री हॉकीच्या मॅचेस चालल्या होत्या. ऑसी वि.किवी होते बहुतेक. त्यांचे खेळाडू वयाने खूपच लहान वाटत होते.

आज भारताच्या महिला तीरंदाज, शूटर हीना संधू (कधी वर्ल्ड नं १ आणि रेकॉर्ड होल्डर) .

जलतरणात चक्क एक नेपाळी खेळाडू आहे आणि ती या ऑलिंपिकमधली सगळ्यात लहान अ‍ॅथलीट आहे.

रिओ ऑलिंपिक्स - २०१६ असा नवीन ग्रूप सुरु करून तिथे हा धागा हलवला आहे म्हणजे सगळे एकाच धाग्यावर लिहण्याऐवजी वेगवेगळे धागे काढता येतील.

पेस व बोपन्ना मध्ये आधीपासूनच वाद सुरू होते. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा ना के बराबर होती.
हॉकीची मॅच मी पाहिली . मस्त खेळली भारतीय टीम . आर्यलडची टीमने पण तोडीस तोड उत्तर दिले.
मौमादास बाहेर पडलीये

कोणी रोइंगच्या मॅचेस पाहत नाही का ? आर्मीचा दत्ता भोकनाळ उपांत्य फेरीत पोचलाय. त्याच्यावर एक लेख आला होता मध्यतंरी .

पिस्तुल शूटिंग ( नेमका प्रकार आठवत नाहीये ) मध्ये जितू रायाने 6व स्थान पटकावून उपांत्य फेरीतलं स्थान पक्के केलेय

दीपा कर्माकरने जिम्नॅटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकलं हे खरं आहे का ? फेसबुकवर एकाने शेअर केलीये बातमी . पण बाकी कुठेच दिसली नाहीये Uhoh

स्विमिंगमधे एकाने वेळेच्या आधीच पाण्यात उडी मारली. तो रडत रडत बाहेर आला. ( स्पर्धेतून बाद झाला का तो ? )
मला या यावेळेस सर्वच स्टेडीयम मधे असलेली निळ्या हिरव्या रंगाची सजावट फार आवडली.

नायजेरीयाचा एक स्पर्धक सलग सातव्या ऑलिंपिक मधे भाग घेतोय !

स्विमिंगमधे एकाने वेळेच्या आधीच पाण्यात उडी मारली. तो रडत रडत बाहेर आला>>>>>> हो तो डिस्कॉलिफाईड झालेला संपुर्ण स्पर्धेतून परंतू त्याला पुन्हा संधी देण्यात आली. पण कामगिरी खालवल्याने तो पुढच्या राऊंडला क्लॉलिफाईड झाला नाही

लेडिज जिमनॅस्टीक्स अजुन सुरुच झाले नाहीये तर दिपा कर्माकरला गोल्ड कसे मिळेल.. बातमी बघून निदान ऑलिपिकची साईट तरी चेक करावी की..

पग्या गेम्स फॉलो तर करत आहोतच रे. पण रात्रीचे असल्यामुळे ऑनलाईन नसणार.. त्यामुळे सगळ्या कमेंट्स दुसर्‍या दिवशी टाकणार...

काल भारतीय वेट लिफ्टर मेडल जिंकण्याची संधी असणारी होती पण क्लीन अँड जर्क मधे तिन्ही प्रयत्न वाया गेले.. गोल्डचा प्रयत्न करण्यात बाकीची मेडल्स पण दुरावली..

नायजेरीयाचा एक स्पर्धक सलग सातव्या ऑलिंपिक मधे भाग घेतोय !>>>> वा , मस्त .

मला धावण्याच्या शर्यतीबद्दलही उत्सुकता आहे

<< नायजेरीयाचा एक स्पर्धक सलग सातव्या ऑलिंपिक मधे भाग घेतोय !>>>> वा , मस्त . >> अहो, आपल्या लिअँडर पेसची पण ही सलग सातवी ऑलिंपिक स्पर्धा आहे !

भारताच्या महिला हॉकी संघाने जापानला छान लढत दिली; दोन गोल्सने पिछाडीवर असूनही २-२ असा सामना अनिर्णित ठेवून एक पॉइंट मिळवला. जपान व विशेषतः भारताची गोलकीपर [सविता] या दोघानीही गोलकिपींगचं उत्तम प्रदर्शन घडवलं. महिला संघाला पुढच्या कठीण सामन्यांसाठी शुभेच्छा.
दिपा कर्माकार आज रात्री १०.५५ वाजतां आपली कमाल दाखवेल, असं आत्ता हॉकी समालोचकाने सांगितलं. पहाणं आलंच !

Deepa karmakar ne changla score kelay..
15 mins madhe women archery chi quarter final ahe. Russia cha viruddha. Keeping fingers crossed!!

http://m.sportskeeda.com/live/rio-2016-womens-artistic-gymnastics-qualif...
दीपानी व्हॉल्ट्समधये सहावा रँक मिळवून फायनलसाठी क्वालिफाय केलंय म्हणे. पण सगळ्या जिम्नास्ट्सची ही फेरी पूर्ण झाली का? रँक फायनल का? अन इव्हन बार्स सध्या ३८ वी.

रिओची वेबसाइट भारीये.

धन्यवाद वेमा. Happy

मंडळी, मी वेगवेगळ्या स्पर्धांचे धागे उघडून इथल्या पोस्टी तिथे हलवल्या आहेत. जेव्हा नवीन खेळाबद्दल लिहाल तेव्हा धागा काढा.

समहाउ या वेळी ऑलिंपिक पाहायचा अजिबात उत्साह नाही. >>>>> मयेकर, सरकार बदलून झाली आता २ वर्ष. किती दिवस असे वैराग्यात घालवणार? या की माणसात आता.. Wink Light 1

सहस्रबुद्धे, अरेरे! प्रत्येक पोस्टीत तुम्हाला हेच अर्थ दिसत असतील तर (अगदी दिवा दिला असला तरी) तर तुम्हाला ट्रम्पराज्यासाठी शुभेच्छा! मग बैलराज्यात परत याल का?

Pages