अशी कबुतरे येती...

Submitted by अत्रुप्त आत्मा on 12 March, 2016 - 08:13

सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती. पहावं तिथे ह्यांची हागी पडलेली,आणि त्यात ती मेली म्हणे ऑक्साइडं असतात..त्यानी ग्यालरीच्या लादीची पुरती वाट लागते,किंवा वाळत टाकलेल्या कपड्यांवर जर "ती" पडली,तर ते वाटेला लागतात. (ह्या हागी शब्दावरूनच ल्हान मुलांच्या डायपर नामक वाळून योग्य जागी कडक-होणार्‍या वस्त्रास 'हागीज' असे उत्-प्रेरक नाव पडले असावे काय!? Wink ) असो!

अशी कबुतरे येती आणिक हागी सोडूनी जाती
दोन शिटे ती सांडत सांडत,ग्यालरी रंगवूनी जाती॥धृ॥

वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला
जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती

हकलून देता पुन्हा आले, जिथे बसावे तिथे(च्च!) बैसले
धुतले नंतर तरि निरंतर बाधित झाली लादी

पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला
वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती

किती करावी? यांस हकाटी, हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करोनी फिरवूनि काठी
त्या भरल्या कठड्यांच्या गाथा, याद अजुनही देती
=======================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

तुमच्या गॅलरीत शी करुन तरी जातात आमच्या घरात दुसरंच काहीतरी करायला येतात! बघावं तेव्हा जोडीनं चार-पाच कबुतरं टपलेलीच असतात घरात यायला! Wink

कबुतरांची बारीक जाळी मिळते ती बसवून घ्या. कबुतरे स्लो poisoning करतात. श्वसनाचे विकार जडू शकतात. तुमच्या आजूबाजूला कोणी धर्मार्थ कबुतर दानापाणी करत असेल तर ते थांबवा. आणि कबुतर मारायची संधी मिळत असेल तर ती बिनदिक्कत वापरा. पाप लागणार नाही तर पुण्य मिळेल. शहरांमध्ये कबुतरांना आता कोणी शत्रू उरलेले नाहीत, मित्र भरपूर झालेत आणि हे आपल्याला धोकादायक आहे.

Lol
वैताग आहेत ही कबुतरं..२-३ महिन्याआधी एक बाळंतीण होती किचनच्या खिडकीत Angry .. अजिबात खिडकी उघडता आली नाही .. नंतर परत आली नाही पण वरच्या सज्ज्यावर असतातच फडफ्ड करत!

मी आता ग्यालारीत जे पत्र्याच कव्हर करतोय, त्याला विजेचा बारीक करंट सोडणारे. आली कबुतर कि सोड करंट !
मरु देत मेली तर!

करंट नका सोडू. चुकून दुसर्‍याच कुणाला लागायचा. कबुतरांची जाळी मिळते षटकोनी. ती लावून घ्या आणि सुखाने राहा.

कबुतर मारायची संधी मिळत असेल तर ती बिनदिक्कत वापरा.>>>>

आली कबुतर कि सोड करंट !
मरु देत मेली तर!>>>>>>

हे वाचुन बापरे झालं पण तुमच्या त्रासाची कल्पनाही आली. इतका टोकाचा विचार म्हणजे कबुतरं किती त्रासदायक असतील हे कळलं.