तो गातो .. त्याच्यावर जळणारे त्याच्यावर नाकात गाण्याचा आरोप करतात.. तरी ही तो त्यांना पुरून उरत गातो..
तो मुजिक देतो .. ते देखील हिट आणि हिटच मुजिक देतो.. त्याच्यावर जळणारे आरोप करतात की त्याच्या संगीताला दर्जा नसतो.. पण हनीसिंगच्या गाण्यावर माना डोलावणार्यांना काय संगीताचा दर्जा कळणार ..
तो काय नाय करत..
तो म्युजिक देतो, गाणी गातो, स्वताच्याच गाण्यांवर नाचतो...
तो पिक्चर काढतो..
तो स्वताच दिग्दर्शन करतो..
त्यात तो स्वत:च अभिनय करतो.
आणि रिलीज झाल्यावर स्वताच ते बघतो
अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे..
आणि तरीही त्याचा नवीन चित्रपट येऊ घातलाय..
आजच व्हॉटसपवर एक फॉर्वर्डेड मेसेज वाचला.. त्याच्या आगामी पिक्चरच्या तारीफमध्ये लिहिलेला..
So much pain and agony in this World. Crimes, Corruption, Kidnaps, Politics etc.
And just when you think world has suffered enough,
Himesh Reshammiya releases his Movie.
आज एक पंच मी सुद्धा मारला. नशीब पण माझे केवढे बेकार बघा. शेजारची मुलगी कधी नव्हे ते आमच्या घरी आली. कधी नव्हे ते तिने आमचा टीव्ही चालू करत गाणी लावली. आणि नेमके हिमेश रेशमिया समोर दिसला. याला हिरोईन कोण देतो असा प्रश्न माझ्या मनात येतच होता तेवढ्यात मैत्रीणीने माहिती पुरवली, ही कतरीनाची बहीण आहे..
पुढच्याच द्रुश्यात हिमेश उघडा बंब डोल्लेशोल्ले दाखवत होता.. मी चटकन म्हणालो हो, आणि हा सलमानचा भाऊ आहे
असो,
कोणाचीही अशी टिंगल उडवणे चुकीचेच. त्यातही पब्लिक फोरमवर उडवणे आणखी चुकीचे कारण तो कोणाचीतरी आवडही असू शकतो. एखाद्याच्या आवडीची टिंगल उडवण्यासारखा अपराध नाही.. पण ज्यांनी हिमेसला आपली आवड बनवून स्वताच स्वताची टिंगल उडवली असेल त्यांची टिंगल उडवणारे आपण कोण
- एक चित्रपटप्रेमी
#bas_aur_nahi
……… ……… ………
धागा ईथेच संपत नाही ...
हे सर्व मान्य आहे. मस्करी उडवायला मलाही मजा येते. थोडासा टवाळ मी सुद्धा आहेच. पण तरीही का? बहुतांश लोकांना त्याची टिंगल उडवावीशी का वाटते? तो आवडत नाही, त्याच्याकडे दर्जा नाही, तो ओवर एक्टींग करतो, हिरो म्हणून सहनही होत नाही वगैरे वगैरे सारे मान्य केले तरीही चिडवावेसे का वाटते? त्याने जे काही छोटेमोठे स्थान कमावले आहे ते स्वताच्या मेहनतीवर कमावले आहे हे लक्षात का घेतले जात नाही.
तळटीप - ज्यांना यावर विचार करावासा वाटत नाही त्यांच्यासाठी धागा वरंच संपला आहे. चिडवा बिनधास्त. तसेही मी काही त्याचा फॅन नाहीए.. तेरा तेरा तेराss सुरूsर ..
बुंदीच्या लाडवासारखा
बुंदीच्या लाडवासारखा पिया?
म्हणजे गोल की तुपकट की नारिंगी?
दक्षिणा ती बै अमिषा पटेल आहे.
Pages