तो गातो .. त्याच्यावर जळणारे त्याच्यावर नाकात गाण्याचा आरोप करतात.. तरी ही तो त्यांना पुरून उरत गातो..
तो मुजिक देतो .. ते देखील हिट आणि हिटच मुजिक देतो.. त्याच्यावर जळणारे आरोप करतात की त्याच्या संगीताला दर्जा नसतो.. पण हनीसिंगच्या गाण्यावर माना डोलावणार्यांना काय संगीताचा दर्जा कळणार ..
तो काय नाय करत..
तो म्युजिक देतो, गाणी गातो, स्वताच्याच गाण्यांवर नाचतो...
तो पिक्चर काढतो..
तो स्वताच दिग्दर्शन करतो..
त्यात तो स्वत:च अभिनय करतो.
आणि रिलीज झाल्यावर स्वताच ते बघतो
अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे..
आणि तरीही त्याचा नवीन चित्रपट येऊ घातलाय..
आजच व्हॉटसपवर एक फॉर्वर्डेड मेसेज वाचला.. त्याच्या आगामी पिक्चरच्या तारीफमध्ये लिहिलेला..
So much pain and agony in this World. Crimes, Corruption, Kidnaps, Politics etc.
And just when you think world has suffered enough,
Himesh Reshammiya releases his Movie.
आज एक पंच मी सुद्धा मारला. नशीब पण माझे केवढे बेकार बघा. शेजारची मुलगी कधी नव्हे ते आमच्या घरी आली. कधी नव्हे ते तिने आमचा टीव्ही चालू करत गाणी लावली. आणि नेमके हिमेश रेशमिया समोर दिसला. याला हिरोईन कोण देतो असा प्रश्न माझ्या मनात येतच होता तेवढ्यात मैत्रीणीने माहिती पुरवली, ही कतरीनाची बहीण आहे..
पुढच्याच द्रुश्यात हिमेश उघडा बंब डोल्लेशोल्ले दाखवत होता.. मी चटकन म्हणालो हो, आणि हा सलमानचा भाऊ आहे
असो,
कोणाचीही अशी टिंगल उडवणे चुकीचेच. त्यातही पब्लिक फोरमवर उडवणे आणखी चुकीचे कारण तो कोणाचीतरी आवडही असू शकतो. एखाद्याच्या आवडीची टिंगल उडवण्यासारखा अपराध नाही.. पण ज्यांनी हिमेसला आपली आवड बनवून स्वताच स्वताची टिंगल उडवली असेल त्यांची टिंगल उडवणारे आपण कोण
- एक चित्रपटप्रेमी
#bas_aur_nahi
……… ……… ………
धागा ईथेच संपत नाही ...
हे सर्व मान्य आहे. मस्करी उडवायला मलाही मजा येते. थोडासा टवाळ मी सुद्धा आहेच. पण तरीही का? बहुतांश लोकांना त्याची टिंगल उडवावीशी का वाटते? तो आवडत नाही, त्याच्याकडे दर्जा नाही, तो ओवर एक्टींग करतो, हिरो म्हणून सहनही होत नाही वगैरे वगैरे सारे मान्य केले तरीही चिडवावेसे का वाटते? त्याने जे काही छोटेमोठे स्थान कमावले आहे ते स्वताच्या मेहनतीवर कमावले आहे हे लक्षात का घेतले जात नाही.
तळटीप - ज्यांना यावर विचार करावासा वाटत नाही त्यांच्यासाठी धागा वरंच संपला आहे. चिडवा बिनधास्त. तसेही मी काही त्याचा फॅन नाहीए.. तेरा तेरा तेराss सुरूsर ..
आजिबात चिडवायचं नाही आणि
आजिबात चिडवायचं नाही आणि मस्करी करायची नाही हिमेश ची.
मुझिक नेहमी चांगलंच देतो तो.
नमस्ते लंडन मधलं बस याद साथ है आणि ये वीरानीया ऐक जाउन. ते ऐकुन झालं की सांग मग दुसरी सांगते गाणी.
मला पण हिमेश ची आधी ची गाणी
मला पण हिमेश ची आधी ची गाणी आवडायची. (त्याने अंदाज नावाच्या सुदेश बेरी,कवलजीत्,पूनम धिल्लो,नवनीत निशान वगैरे बिग शॉट्स असलेल्या मालिकेला आणि 'बोले दिल आहा किंवा नुसते आहा' नाव असलेल्या पांचट सिरीयल ला संगीत दिले होते तेव्हापासून नाव लक्षात आहे.) नमस्ते लंडन ची गाणी छानच आहेत.'यही होता प्यार है क्या' खूप सूदिंग अहे ऐकायला. 'नाम त्तेरा त्तेरा' हे सुरुवातीच्या अल्बम मधलं गाणं, 'झलक दिखलाँ जाँ', 'हम कों दिवाँनाँ कर गयें' मधली गाणी पण आवडतात. इमरान किस्मी ला त्याचा आवाज बराच सूट करायचा.
कर्झ्झ्झ आणि आप का सुरुर न पाहिल्याने माझी आवड अद्याप कायम आहे.
'शेजारच्या घरातली मुलगी' हे
'शेजारच्या घरातली मुलगी' हे अजूनही काल्पनिक पात्रच आहे का?
अजूनही मी त्या महान आत्माच्या
अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे.. >>>
तुझा शोध संपला मित्रा. तुझा शोध संपला. माझ्या चरणकमलाचा फोटो काढून आपल्याला पाठवण्यात येत आहे.
आमच्या नातेवाईकांनी कर्झ्झ
आमच्या नातेवाईकांनी कर्झ्झ अॅडव्हान्सड तिकीट काढून जोडप्याने पाहिलाय.त्यांना विचारुन पायांचे फोटो पाठवते
'शेजारच्या घरातली मुलगी' हे
'शेजारच्या घरातली मुलगी' हे अजूनही काल्पनिक पात्रच आहे का?
हे वाचलं तेव्हाच "ती त्याच्यावर लट्टु अहे, पण त्याला आधीच गर्लफ्रेंड आहे, आणि तो गर्लफ्रेंडव्रत्या असल्याने या लट्टु मुलीला दाद देत नाही" असे चित्र उभे राहिले.
ही शे मु मला वाटतं लहानगी
ही शे मु मला वाटतं लहानगी आहे. हो ना ऋ?
(No subject)
सस्मित, ऋ च्या लहानपणी ती
सस्मित, ऋ च्या लहानपणी ती लहानगी होती.
ऋ मोठा झाला (असेल) तर ती ही मोठी होईलच ना?
दिवाँनाँ <<< याचा उच्चार कसा
दिवाँनाँ <<< याचा उच्चार कसा केला जातो हे ऐकण्यासाठी ते गाणे ऐकायला हवे.
गजानन, नाक बोटांनी दाबून
गजानन, नाक बोटांनी दाबून धरायचे आणि म्हणायचे. जमते.
त्याने जमलेच असे नाही. तोंड न
त्याने जमलेच असे नाही.
तोंड न उघाडता म्हणुन बघायचे. असा प्रयत्न करताना घशात आणि नाकात आवाज कसा घुमतो हे लक्षात येते.
मग तोंड उघडुन तसाच आवाज घुमवून म्हणायचे.
झंलक दिखलाँ जाँ ऐका, अभ्यास
झंलक दिखलाँ जाँ ऐका, अभ्यास होईल.
नाक बोटांनी दाबून धरायचे आणि
नाक बोटांनी दाबून धरायचे आणि म्हणायचे. जमते.>>>>
पण त्याने एकापाठोपाठ २५-३०
पण त्याने एकापाठोपाठ २५-३० गाणी सुपरहिट दिली होती. हे ही विसरू नये. भले नाकाने का गायली असेल
ती त्याची स्टाईल आहे, श्वेता
ती त्याची स्टाईल आहे, श्वेता शेट्टी,शुभा मुद्गल ला किंवा उषा उथ्थुप ला वेगळ्या आवजाबद्दल कोणी चिडवत नाही मग याला का त्रास द्यायचा.ऑब्जेक्शन याने गाणे किंवा संगीत देण्याबद्दल नसून चित्रपटात काम करण्याबद्दल आहे.
तो नाकात गातो वगैरे ठीक आहे
तो नाकात गातो वगैरे ठीक आहे पण खर तर त्याची बरीचशी गाणी मला फार आवडतात. 'तेरे नाम', हमको दिवाना कर गये' नमस्ते लंडन', 'कही प्यार न हो जाये', 'प्रेम रतन धन पायो' आणि बरीच. (ऐकायला फार छान वाटतात.)
बरोबर आहे मी_अनु. नाकातून
बरोबर आहे मी_अनु. नाकातून आवाज हा टिकेचा विषय नसावा.
त्याच्या चित्रपटात काम
त्याच्या चित्रपटात काम करण्याकरिता तरी का घ्यावे ऑब्जेक्शन? चित्रपट काढणारा आणि तो बघायला जाणार्यांना ऑब्जेक्शन नाही तर आपल्याला त्याचे काय?
फक्त प्राईम टाईमला टीव्हीवर दाखवण्यासाठी ऑब्जेक्शन घेता येईल.
ऑब्जेक्शन याने गाणे किंवा
ऑब्जेक्शन याने गाणे किंवा संगीत देण्याबद्दल नसून चित्रपटात काम करण्याबद्दल आहे.>>> ऑब्जेक्शन डीस्मीस. करुदेत की बिचर्याला. आता येणार्या चित्रपटात बघा कसले सिक्स पॅक बनवलेत. मेहनती आहे. करुदेत की त्याला आवडतं ते. बघणं न बघण्याचा ऑप्शन आपल्याला आहेच की.:-)
प्राईम टाईमला त्या डोक्याला
प्राईम टाईमला त्या डोक्याला शॉट सीरीयली चालतात तेव्हा आपण ऑब्जेक्शन घेउ शकत नसलो तर ह्यला का बरं ऑब्जेक्शन?
सस्मित, त्या शॉट
सस्मित, त्या शॉट सिरियलींपासून सुटका म्हणून चित्रपट पाहायला जायचो आणि आपणच शॉट व्हायचो म्हणून म्हटलं तसं.
यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट !
यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट !
(No subject)
यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट
यूह नीड ए सायकिअॅट्रीस्ट !
who Runmesh or Himesh ?
आशू तुने मेरे मन की बात
आशू तुने मेरे मन की बात छिनली....
हिमेस अगदीच वाईट नक्कीच नाहीये.. त्याच्या बाबतीत either you hate him or you love him ह्या दोन गोष्टी घडतात.. येस ओर नो.. तिसरा ऑप्शन नाही...
येस ओर नो.. तिसरा ऑप्शन
येस ओर नो.. तिसरा ऑप्शन नाही...>>.असं का? मी तर त्याला हेटत पण नाही नी प्रेमत पण नाही.
हिम्सकूल तुम्ही हिमेशला
हिम्सकूल तुम्ही हिमेशला शाहरूख बनवत आहात
हेट लव दूरची गोष्ट आहे. काल घडलेल्या किस्स्याने मला त्याचे अस्तित्व लक्षात आले अन्यथा विस्मरणात होता.
साती ती शेजारची मुलगी
साती ती शेजारची मुलगी काल्पनिकच होती. ही शेजारची खरी आहे पण शेजारच्या बिल्डींगमधील. म्हणून म्हणालो कधी नाही ते घरी आली..
अजूनही मी त्या महान आत्माच्या
अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे..>>>> मी पाहिलाय रादर पाहावा लागला. माझी एक मैत्रिण हिमेसभायची (हो हो त्याला हिमेस म्हणतात ब्वा ) मोठी फॅन होती . तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिक्चरचा प्लॅन ठरला तेव्हा तिने मला हिमेसचाच कर्ज बघायचा आहे म्हणून सांगितलं . ( कुठून हा प्लॅन ठरवला अस वाटलं तेव्हा )
समजावून सांगितलं तरीही तोच हेका म्हणून गेलो आख्ख तिकीट काढून . अगागाया !!! काय तो मूव्ही होता . फारेंडाने विडंबन कस केलं नाही कुणास ठाऊक अजून
त्यातला उर्मिला कारमधून उतरून डायरेक्ट हेलिकॉप्टर चालावयला जाते तो प्रसंग हहपुवा आहे तो पिक्चर बघून मैत्रिणीची हौस फिटली . नंतर काही तिने हिमेसच नाव काढलं नाही .
पण त्याची गाणी खरच छान आहेत . नमस्ते लंडन मधलं यही होता प्यार , तेरे नाम वगैरे गाणी चांगली दिलीत त्याने
Pages