द ग्रेट मुजिकल ऑलराऊंडर - हिमेस रेसमिया " ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2016 - 16:58

तो गातो .. त्याच्यावर जळणारे त्याच्यावर नाकात गाण्याचा आरोप करतात.. तरी ही तो त्यांना पुरून उरत गातो..

तो मुजिक देतो .. ते देखील हिट आणि हिटच मुजिक देतो.. त्याच्यावर जळणारे आरोप करतात की त्याच्या संगीताला दर्जा नसतो.. पण हनीसिंगच्या गाण्यावर माना डोलावणार्यांना काय संगीताचा दर्जा कळणार ..

तो काय नाय करत..

तो म्युजिक देतो, गाणी गातो, स्वताच्याच गाण्यांवर नाचतो...

तो पिक्चर काढतो..
तो स्वताच दिग्दर्शन करतो..
त्यात तो स्वत:च अभिनय करतो.
आणि रिलीज झाल्यावर स्वताच ते बघतो Proud

अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे..

आणि तरीही त्याचा नवीन चित्रपट येऊ घातलाय..

आजच व्हॉटसपवर एक फॉर्वर्डेड मेसेज वाचला.. त्याच्या आगामी पिक्चरच्या तारीफमध्ये लिहिलेला..

So much pain and agony in this World. Crimes, Corruption, Kidnaps, Politics etc.

And just when you think world has suffered enough,

Himesh Reshammiya releases his Movie. Lol

आज एक पंच मी सुद्धा मारला. नशीब पण माझे केवढे बेकार बघा. शेजारची मुलगी कधी नव्हे ते आमच्या घरी आली. कधी नव्हे ते तिने आमचा टीव्ही चालू करत गाणी लावली. आणि नेमके हिमेश रेशमिया समोर दिसला. याला हिरोईन कोण देतो असा प्रश्न माझ्या मनात येतच होता तेवढ्यात मैत्रीणीने माहिती पुरवली, ही कतरीनाची बहीण आहे..
पुढच्याच द्रुश्यात हिमेश उघडा बंब डोल्लेशोल्ले दाखवत होता.. मी चटकन म्हणालो हो, आणि हा सलमानचा भाऊ आहे Happy

असो,
कोणाचीही अशी टिंगल उडवणे चुकीचेच. त्यातही पब्लिक फोरमवर उडवणे आणखी चुकीचे कारण तो कोणाचीतरी आवडही असू शकतो. एखाद्याच्या आवडीची टिंगल उडवण्यासारखा अपराध नाही.. पण ज्यांनी हिमेसला आपली आवड बनवून स्वताच स्वताची टिंगल उडवली असेल त्यांची टिंगल उडवणारे आपण कोण Happy

- एक चित्रपटप्रेमी

#bas_aur_nahi

……… ……… ………

धागा ईथेच संपत नाही ...

हे सर्व मान्य आहे. मस्करी उडवायला मलाही मजा येते. थोडासा टवाळ मी सुद्धा आहेच. पण तरीही का? बहुतांश लोकांना त्याची टिंगल उडवावीशी का वाटते? तो आवडत नाही, त्याच्याकडे दर्जा नाही, तो ओवर एक्टींग करतो, हिरो म्हणून सहनही होत नाही वगैरे वगैरे सारे मान्य केले तरीही चिडवावेसे का वाटते? त्याने जे काही छोटेमोठे स्थान कमावले आहे ते स्वताच्या मेहनतीवर कमावले आहे हे लक्षात का घेतले जात नाही.

तळटीप - ज्यांना यावर विचार करावासा वाटत नाही त्यांच्यासाठी धागा वरंच संपला आहे. चिडवा बिनधास्त. तसेही मी काही त्याचा फॅन नाहीए.. तेरा तेरा तेराss सुरूsर ..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यही होता प्यार है क्या, अक्षय चं लंडन च्या थंड हवेत एकटं दु:खी फिरणं, कटरिनाचं स्वतःच्या निर्णयाबद्दल साशंक असणं सगळं वातावरणात जाणवतं हे गाणं ऐकताना.
रफ्ता रफ्ता पण मस्त गाणं आहे.

हिमेस नुसते म्युझिक द्यायचा तोपर्यंत खूपच सुसह्य होता....

ऐतराज, इक्बाल, हमराझ वगैरे चांगले होते म्युझिक..इव्हन मला आशिक बनाया आपने ची काही गाणी पण आवडली होती, पण ते हुडहुडी भरल्यासारखा त्याचा आवाज आणि नंतर भयाण अभिनय यामुळे डायरेक्ट फुली मारली.

हिमेस अगदीच वाईट नक्कीच नाहीये.. त्याच्या बाबतीत either you hate him or you love him ह्या दोन गोष्टी घडतात.. येस ओर नो.. तिसरा ऑप्शन नाही...>>>
इग्नोरास्त्राला (तिसरा ऑप्शन) कसे काय विसरलात???
हिमेस नुसते म्युझिक द्यायचा तोपर्यंत खूपच सुसह्य होता....>>
आशुचँपशी सहमत..

हनीसिंगच्या गाण्यावर माना डोलावणार्यांना काय संगीताचा दर्जा कळणार>>>
ह्रुन्म्या, हनीसिंगचा आणि हिमेशचा एकच दर्जा आहे 'डोक्यात जाण्याचा'

मिल्या, लै झाक विडंबन Happy

अजूनही मी त्या महान आत्माच्या शोधात आहे ज्याने त्याचा एक तरी चित्रपट पुर्ण पाहिला आहे..
>>>
शोध संपला तुझा. मुक्ति मिळणार बघ आता.

कर्झ्झ्झ, रेडिओ अन् द एक्सपोझ तीन्ही पाहिलेत.
झालंच तर खिलाडी ७८६ मधला त्याचा छोटा रोल पकडलास तर साडेतीन.

His acting is SOOOOO BAD that Its GHUUUDD…!!!

देवा! या बाबाजीला सापडुन कोण सापडला तर हिमेस. जुन्या माबोवर कुणीतरी लिहीले होते की हिमेस अमेरीकेत गायला आला तर त्याची सुपारी देईन, नाहीतर त्याला २ वाट्या शेन्दूर खायला घालेन.:फिदी:

काही वर्षा पूर्वी त्याचे झलक दिखलाजा अफाट गाजले होते. राजस्थान मध्ये एका विवाह समारम्भात या गाण्यावर तिथले लोक म्हणे इतके नाचले की दमल्यावर अख्खे जेवण सम्पले. नवरीकडच्याना काहीच उरले नाही.:फिदी: मग तिकडे या गाण्यावर त्यानी बॅन आणला.

हे पण वाचा.:फिदी:

http://www.topix.com/forum/who/himesh-reshammiya/T7BDKR387FSAT4PAE

हिमेश इतका वाईट गात नाही..शेंदूर खाऊ घालून लेड पॉयझनिंग करु नका बिचार्‍याला. Happy
आम्ही हिमेश च्या गाण्यांवर ४-५ तासांचे कार प्रवास केलेले आहेत त्या काळात. जरा लाईव्ह माहोल राहतो.नाहीतर जगजीत सिंग, पोहनकर वगैरे ऐकले की मस्त गाढ झोप येते.

काल फिर हेराफेरी लागला होता.त्यातलं रेशामिया चं जुम्मे रात आणि कितने अरमाण माण माण माण ऐकले. परत बर्‍याच वर्षानी दिल खुष.
रेशमिया आता टाटा स्काय वर जाहिरात करतो.सिक्स पॅक्स वगैरे आणले आहेत.त्यामुळे तसा क्युट दिसतो.अभिनय(!!) कसा करतो हल्ली हे अजून पाहिले नाही.

तितके आठवत नाही गं, टाटा स्काय ऑन करून योग्य चॅनेल लावेपर्यंत च्या वेळात पाहिले.शर्ट उघडा असावा.आता मी सिक्स पॅक केले आहेत माझा नवा लुक पाहायला या असे काहीसे म्हणत होता.तसा त्याचा चेहरा आणि लहान मुलासारखी हेयर स्टाईल यामुळे दाढी मिशा नसल्या तर तो क्यूट आहेच.

काल फिर हेराफेरी लागला होता.त्यातलं रेशामिया चं जुम्मे रात <<<< हे माझं अतिशय आवडतं गाणं आहे. त्यात परेश रावलने धम्माल उडवली आहे.

ते गाणंच भन्नाट आहे. त्यातल्या त्या दोन हिरोंच्या ठोकळ्याच्या अ‍ॅक्शन काय, घुंगरुचे गोळे वाजवणार्‍या गुलाबी कपड्यातल्या हिरॉइनी काय आणि मधून धावणारा परेश्रावल काय..फिर हेराफेरी हा पण हेराफेरी इतकाच मस्त आहे.

हिमेसची हिट गाणी शोधायला गेल्यास चिक्कार मिळतील. पण त्याची गाणी ऑल टाईम हिटच्या लिस्टीत नाही जायची. कारण अपवाद वगळता त्या दर्जाची नसायची किंवा मेलोडी मिसिंग असल्याने अ॑वीट गोडीची नसायची

तो मुजिक देतो .. ते देखील हिट आणि हिटच मुजिक देतो >>
बरोबरच आहे. आता जर हिट ' मुजिक ' वरुन धून उचलली असेल तर हिटच ' मुजिक ' दिले जाईल ना!
उदा. आशिक बनाया आपने मधील
१) दिल्लगी = अलि जफरचे रंगीन (अल्बम हुक्का पानी), २) मरजावां = फाकिरचे मरजावां (अल्बम आतिश)
आणि सर्वात फेमस चोरी
तेरी मेरी प्रेम कहानी (बॉडीगार्ड) = ला बेतलीम कोलो न् जोस (La Betleem Colo n Jos), रोमानियन गाणे (https://www.youtube.com/watch?v=WkkJQHPUwDg)

म्युजिक चोरी कित्येक संगीतकार करतात. एखादा रेहमान अपवाद असेल. मागे कुठेतरी एक लिंक पाहिलेली ज्यात प्रत्येक संगीतकाराच्या अश्या चोरींची लिस्ट होती. कित्येक दिग्गजही होते त्यात जे त्यांना मानणार्‍या कोणाच्या भावनाही दुखावतील. शोधायला हवी ती लिंक. त्या लिंकमध्ये एआर रेहमान यांचे नाव मला सापडले नव्हते म्हणून वर त्यांना अपवाद म्हटलेय.

बापरे आर डी बर्मन यांचीही ४७ गाणी आहेत त्या लिस्टीत.. अनू मलिक उगाच एकटा बदनाम आहे .. रेहमानसाहेबही आहेत की त्यात.. ऐकायला हवीत ती गाणी यात कितपत तथ्य आहे हे बघायला

पायस प्लीज तुम्हीही नक्की बघा Happy

मी आधीच बघितली आहे Happy
काही गाण्यांबाबतीत चर्चा होऊ शकते कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जाणवतो - इथे प्रेरणा घेतली हा शब्दप्रयोग कदाचित वापरता येऊ शकतो. हिमेश किंवा प्रीतम अगदी जसेच्या तसे गाणे उचलतात तेव्हा मात्र चिडचिड झाल्याशिवाय राहवत नाही.

हो जसेच्य तसे चोरणे आणि प्रेरणा घेणे फरक आहे, हलकासा.
म्हणून म्हटले गाणी ऐकायला हवी ती निवांत आणि मग आपले आपणच ठरवायला हवे.
पण तरीही जसेच्या तसे उचलण्याला मर्डर बोलू शकतो तर प्रेरणा घेण्याला हाल्फ मड्डर तर बोलू शकतो Happy

हिमेश गायक म्हणून कसाही असो, संगितकार म्हणून उत्तमच आहे.
त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्याचा पहिला चित्रपट मला वाटतंय 'हमराज' बॉबी, अक्षय आणि ती पडेल नटी पटेल.. (लांब केस वाली, नावच विसरले :()
एक से एक गाणी होती ती सर्व. काही चित्रपट तर गाण्यांमुळेच गाजले त्याचे.
चाँदी की डाल पर सोने का मोर त्याचंच होतं आणि किती वाजलं आजूबाजूला त्याची गणती नाही,
उडत्या चालीच्या गाण्यांची ट्रेंड त्याने जोमात सुरू केली.

रेडिओ ९ नावाचा एक सिनेमा कधी काळी आला होता त्यातलं त्याने गायलेलं 'पिया जैसे लाडू मोतीचूर वाला' कुणी ऐकलंय की नाही माहित नाही. पण जरूर ऐका... त्याचा नाकातला आवाज नसेल आवडत तर इग्नोर करा पण ओव्हरऑल संगित उत्तम आहे....

बाकी दिड वर्षाच्या ब्रेकनंतर त्याने पुन्हा प्रवेश घेतला आणि बॉडिगार्ड सारख्या सिनेमाचं संगित हिट झालं.

मला तरी हिमेश आवडतो... Happy

Pages