कडाह प्रशाद

Submitted by देवीका on 1 March, 2016 - 20:42
kadah prasad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो जाडी कणीक; इथे रवाळ कणीकच अपेक्षित आहे. बारीक रवा नाही.
पाव किलो साजूक तूप. ते सुद्धा ताजं असेल तर उत्तम
पाव किलो साखर. मी रॉ ब्रॉउन शुगर घेतलीय. मला आवडते म्हणून.
कणीकेच्या तिप्पट पाणी मोजून घ्या.

फक्त तीन पदार्थ घेवूनच करायचे आहे. इथे कौशलय ढवळण्याचे आणि किती धीर आहे तुम्हाला त्यावर आहे.
सगळं छान जमले तर मस्त मऊ लुसलुशीत होतो. नाहितर कितीही तूप टाकले आणि नाहि भाजले तर चिकट, तूपकट आणि गोड मिट्ट गोळा होतो.

क्रमवार पाककृती: 

हा प्रसाद मला खूपच आवडतो. गुरुद्वारत गेले की, मूठभर प्रसाद पटकन खालला जातोच.
हि पाककृती एका पंजाबी मैत्रीणीच्या कृपेने गुरुद्वारा किचन मध्ये जावून बघायला मिळाली गेलया आठवड्यात. ज्यांना डायटची चिंता असेल त्यांनी पुढे वाचू नये. Happy

प्रसादाचा शिरा जसा वेगळाच लागतो तसेच इथे गुरुद्वारा मधला कडा हा एकदमच चवीष्ट लागतो. ती चव आणि सात्विकता येत नसली तरी आपण पुर्ण मनाने, कोणाशी न भांडता बनवावा. Wink

सुरुवातीला पातेले ठेवले की गुरु मंत्र म्हटला जातो. किंवा तो म्हणतच कडा बनवला जातो. आता सगळ्या गुरुद्वारात म्हणतात का? असाच कडा बनवतात का? ह्याची उत्तर नाहियेत. पण हि मी बघितलेली आहे तशी देतेय.
------------------------------------------------------
आम्ही (खाणारी चौकडी) 'हावरट' असलयाने, मंत्र वगैरे न म्हणता, सरळ कामाला लागले.

तर अशी कृती,
१) एका पातेलयात कणीकेच्या तिप्पट घेतलेले पाणी उकळायला ठेवावे. उकळी आली की आच मंद करून चालू असू द्या.
२) दुसर्‍या पातेलयात, साखर वितळवायला घ्यावी. ती जशी पुर्ण वितळली की गॅस बंद करून ,त्यात बाजूच्या पातेलयातले अर्धे उकळते पाणी घालावे.
३) एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. रंग हा गव्हाळ आला पाहिजे. जसे कच्चे गहू दिसतात. अजिबात करपवू नका.
४) खमंग वास सुटला की, आच कमी करा. आता आधी साखरेचे पाणी एक डाव घालून ढवळावे. मग नुसतेच गरम पाणी घालून ढवळावे. मग परत साखरेचे पाणी. परत गरम पाणी. परत साखरेचे पाणी
असे दर दोन तीन मिनिटाने करत रहावे. मात्र कालथा हा वरून खाली, खालून वर मग गोल गोल फिरत राहिला पाहिजे. पाण्याचा गॅस हा मंद चालूच पाहिजे. असे करत पुर्ण साखरेचे पाणी व साधे पाणी संपेपर्यंत ढवळत रहावे. एकेक दाणा फुलवत ढवळ्त रहावे.
५) गॅस बंद करून झाकण ठेवून दहा एक मिनिटाने खायला घ्यावा.

वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु का खालसा!

खाण्याची घाई असलयाने फोटो नाही. पण घरी परत केला तर काढेनच फोटो.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

-साखर कमी आवडत असेल तर तशी आवडीप्रमाणे घ्या.
-पाणी एकदम ओतू नये. कणीक गोळा होइल. पाणी उकळतं घ्या.
-जितकी ज्यास्त खमंग परताल, तितकी ती मोकळी शिजेल.
-आपलया शिर्‍यासारखे ह्यात वेलची वगैरे नसते. पण तुमची आवड असेल तर वेलची, बदाम काप टाका.
-तूपाची कंजूषी नको. Happy
-जाडसर कणीक नसेल तर पाणी कमी लागेल, नाहितर चिकट गोळा होइल. नाहिच मिळाली जाडी कणीक तर, पाणी कणीकेच्या ३/४ घ्या. पण तूपाची कंजूषी नकोच(पुन्हा सांगतेय). Happy
-पाणी कमीही नको आणि ज्यास्त सुद्धा. चिकट पेस्ट नाही होण्याकरताच हळू हळू साखर-पाणी व पाणी क्रम टाकावा. हेच कौशलय. आधी पातळ वाटेल व जरा वेळाने निवलयावर मस्त सरसरीत, मोकळा लागेल. नाहितर चिकट, तूपकट गोड मिट्ट बुळबुळीत गोळा होइल जर कणीक नीट भाजली नाही आणि ढवळले नाही तर.

जाडी कणीक - कणीक एक वाटी असेल तर, पाणी (तीच वाटी वापरून) तीन वाटी
बारीक कणीक(चपातीची कणीक) - एक वाटी कणीक, अडीच वाटी पाणी.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नवरात्रीत एक दिवस केला होता हा पदार्थ, अप्रतिम झाला होता, लिटरली एक एक दाणा फुलतो!
श्रेय सगळं रेसिपी बारकाईने लिहीणारीला
थॅंक्यू देवीका, ग्रेट रेसिपी

श्रेय सगळं रेसिपी बारकाईने लिहीणारीला >> हो हो !
मी बनवला तेव्हा ही चवीला छान झाला .
पण ते साखर वितळवून गरम पाणी ओतणं काही जमलं नाही Sad
वितळलेल्या साखरेची खडी साखर झाली , त्यामुळे कदाचीत गोड कमी झाला .
पण तोंडात अक्षरशः विरघळत होता .

नुसतचं गरम पाण्यात साखर विरघळवली तर काय फरक पडेल ??

मला खुप आवडतो, पण गहू आणि साखर सोडल्याने, घरी हा प्रकार करीन करीन म्हणून केलाच नाही.
केला कि खाल्ला जाणारच तेव्हा नुस्त नेत्रसुख.

स्वस्ति, मस्त दिसतोय, वाडगाभर खाल्ला असता मी....

कालच ह्याची आठवण आलीवती म्हणून हा धागा सगळा वाचून काढला होता. आणि आज धागा वर आला. स्वस्ति मस्तच दिसतोय. रंग छान आलाय.
मला ही करावासा वाटतोय पण सध्या नाही करणारे. तूप आहे घरात पण ह्यासाठी नाही वापरणार. काहीच मिळालं नाही तर गूळ तूप पोळी वैगरे खाता येईल. सुरळीत झालं सगळं की करीन.

धन्यवाद . Happy
काल नवर्याने हट्ट केला म्हणून बनवला . अगदी लुसलुशीत , तोंडात विरघळणारा झाला होता .
गेल्यावेळी केला होता तेन्व्हा फार गोड बनला होता म्हणून आता साखर आणि तूप मी एक वाटीपेक्षा कमीच घेते.
पण ते साखर वितळवू घ्यायच टेक्निक अजून काही जमत नाहीये. प्रत्येकवेळी काहीतरी बिघडतयं . कधी खडीसाखर , कधी कॅरमलाईझ्ड पत्रा असा प्रकार चालू आहे .
कॅरेमलाईझ्ड साखर घट्ट झाली की ती ठंड पाण्यात विरघळवून ते पाणी उकळवायचं असा विचार करतेय . परत कधी बनवला तर तसा प्रयत्न करेन .
पण या शिराच्या प्रेमात पडलेय मी.
शेगावला गूळातला शिरा असतो भोजनालयात , आता एकदा गूळ घालून बनवायचा आहे .
कोणी केला असेल तर काय करावं ते सांगाल का ?

IMG-3457 3.jpg
मी ही आज करून पाहिला. पाणी थोडं जास्त टाकलं त्यामुळे थोडा चिकट झाला होता. पण बाकी चव छान होती. गोड खाणार्यांनी साखर वाढवली तरी चालेल.

आज केला होता .रेसिपी तंतोतंत फॉलो केली. ह्या वेळची माझी कणिक थोडी सरबरीत आहे (silver coin brand ) त्यामुळे मस्तच झाला . मंद गॅस वर साखर वितळवून घेतली आणि मंद गॅस वर कणिक भाजली.
मऊ मोकळा, लुसलुशीत, तोंडात विरघळणारा कडाह प्रसाद तयार.
देवीका थँकू ह्या बारकाव्या सहित च्या रेसिपी साठी.

हा फोटो

IMG_20200531_105031270~2_0.jpg

मस्तच ममो.
मी भयानक प्रेमात पडलेय याच्या.
आमच्या कडची कणिक मऊ असते. एकदा जाडसर आणून करून बघायचा आहे

Pages