कडाह प्रशाद

Submitted by देवीका on 1 March, 2016 - 20:42
kadah prasad
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो जाडी कणीक; इथे रवाळ कणीकच अपेक्षित आहे. बारीक रवा नाही.
पाव किलो साजूक तूप. ते सुद्धा ताजं असेल तर उत्तम
पाव किलो साखर. मी रॉ ब्रॉउन शुगर घेतलीय. मला आवडते म्हणून.
कणीकेच्या तिप्पट पाणी मोजून घ्या.

फक्त तीन पदार्थ घेवूनच करायचे आहे. इथे कौशलय ढवळण्याचे आणि किती धीर आहे तुम्हाला त्यावर आहे.
सगळं छान जमले तर मस्त मऊ लुसलुशीत होतो. नाहितर कितीही तूप टाकले आणि नाहि भाजले तर चिकट, तूपकट आणि गोड मिट्ट गोळा होतो.

क्रमवार पाककृती: 

हा प्रसाद मला खूपच आवडतो. गुरुद्वारत गेले की, मूठभर प्रसाद पटकन खालला जातोच.
हि पाककृती एका पंजाबी मैत्रीणीच्या कृपेने गुरुद्वारा किचन मध्ये जावून बघायला मिळाली गेलया आठवड्यात. ज्यांना डायटची चिंता असेल त्यांनी पुढे वाचू नये. Happy

प्रसादाचा शिरा जसा वेगळाच लागतो तसेच इथे गुरुद्वारा मधला कडा हा एकदमच चवीष्ट लागतो. ती चव आणि सात्विकता येत नसली तरी आपण पुर्ण मनाने, कोणाशी न भांडता बनवावा. Wink

सुरुवातीला पातेले ठेवले की गुरु मंत्र म्हटला जातो. किंवा तो म्हणतच कडा बनवला जातो. आता सगळ्या गुरुद्वारात म्हणतात का? असाच कडा बनवतात का? ह्याची उत्तर नाहियेत. पण हि मी बघितलेली आहे तशी देतेय.
------------------------------------------------------
आम्ही (खाणारी चौकडी) 'हावरट' असलयाने, मंत्र वगैरे न म्हणता, सरळ कामाला लागले.

तर अशी कृती,
१) एका पातेलयात कणीकेच्या तिप्पट घेतलेले पाणी उकळायला ठेवावे. उकळी आली की आच मंद करून चालू असू द्या.
२) दुसर्‍या पातेलयात, साखर वितळवायला घ्यावी. ती जशी पुर्ण वितळली की गॅस बंद करून ,त्यात बाजूच्या पातेलयातले अर्धे उकळते पाणी घालावे.
३) एका पसरट परातीत, तूप टाकून वितळले की कणीक घाला. एकदम मध्यम आचेवर ती सतत परतत रहावी. रंग हा गव्हाळ आला पाहिजे. जसे कच्चे गहू दिसतात. अजिबात करपवू नका.
४) खमंग वास सुटला की, आच कमी करा. आता आधी साखरेचे पाणी एक डाव घालून ढवळावे. मग नुसतेच गरम पाणी घालून ढवळावे. मग परत साखरेचे पाणी. परत गरम पाणी. परत साखरेचे पाणी
असे दर दोन तीन मिनिटाने करत रहावे. मात्र कालथा हा वरून खाली, खालून वर मग गोल गोल फिरत राहिला पाहिजे. पाण्याचा गॅस हा मंद चालूच पाहिजे. असे करत पुर्ण साखरेचे पाणी व साधे पाणी संपेपर्यंत ढवळत रहावे. एकेक दाणा फुलवत ढवळ्त रहावे.
५) गॅस बंद करून झाकण ठेवून दहा एक मिनिटाने खायला घ्यावा.

वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु का खालसा!

खाण्याची घाई असलयाने फोटो नाही. पण घरी परत केला तर काढेनच फोटो.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे.
अधिक टिपा: 

-साखर कमी आवडत असेल तर तशी आवडीप्रमाणे घ्या.
-पाणी एकदम ओतू नये. कणीक गोळा होइल. पाणी उकळतं घ्या.
-जितकी ज्यास्त खमंग परताल, तितकी ती मोकळी शिजेल.
-आपलया शिर्‍यासारखे ह्यात वेलची वगैरे नसते. पण तुमची आवड असेल तर वेलची, बदाम काप टाका.
-तूपाची कंजूषी नको. Happy
-जाडसर कणीक नसेल तर पाणी कमी लागेल, नाहितर चिकट गोळा होइल. नाहिच मिळाली जाडी कणीक तर, पाणी कणीकेच्या ३/४ घ्या. पण तूपाची कंजूषी नकोच(पुन्हा सांगतेय). Happy
-पाणी कमीही नको आणि ज्यास्त सुद्धा. चिकट पेस्ट नाही होण्याकरताच हळू हळू साखर-पाणी व पाणी क्रम टाकावा. हेच कौशलय. आधी पातळ वाटेल व जरा वेळाने निवलयावर मस्त सरसरीत, मोकळा लागेल. नाहितर चिकट, तूपकट गोड मिट्ट बुळबुळीत गोळा होइल जर कणीक नीट भाजली नाही आणि ढवळले नाही तर.

जाडी कणीक - कणीक एक वाटी असेल तर, पाणी (तीच वाटी वापरून) तीन वाटी
बारीक कणीक(चपातीची कणीक) - एक वाटी कणीक, अडीच वाटी पाणी.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हां ते जागोजाग लावलेले लंगर एक मस्त प्रकरण असतं. वर्षातून २-४ वेळा असले लंगर असतात. गुरुपुरबच्या वेळी असतो, त्याशिवाय अजूनही काही स्पेसिफिक दिवशी असतात असे लंगर. प्रत्येक ठिकाणचा मेन्यु वेगळा असतो. बर्‍याचदा तर अगदी १०-१५ पावलांच्या अंतरावर दुसरा लंगर असतो. कुठे कडा, कुठे आलु-पुरी, कुठे दाल -रोटी, कुठे राजमा-चावल..ज्या ठिकाणचा मेन्यु आवडतो तिथे गाडी थांबवा. शहरात पण असे पावला-पावलांवर लंगर असतात काही ठराविक दिवस.. त्यादिवशी लंगरच्या पंडालांनी रस्ते भरलेले असतात म्हणून थोडा ट्राफिक जाम पण लागतो.
आणखी एक म्हणजे हिवाळ्यात फक्त चहा-बिस्किटांचा लंगर किंव उन्हाळ्यात शिकंजी /रुह अफ्जा देणारे मंडप.. (हे उन्हाळ्यातले शिकंजी / रुह अफ्जा दुध वाले मंडप मी सरदार आणि हिंदू दोन्ही प्रकारच्या पंजाब्यांना लावताना बघितलेत.)

शिवाय पंजाबात बर्‍याच देवळांमध्ये आणि पीर-फकिरांच्या देवळात /दर्ग्यांमध्ये पण लंगर असतो. काही ठिकाणी रोज असतो तर काही ठिकाणी फक्त एखाद्या वारी असतो. एकदा एका देवळात आम्ही गेलो असताना तिथल्या पुजार्‍याने आम्हाला कणिक मळून द्या आणि रोट्या(१००+) बनवून द्या म्हणून सांगितलं होतं लंगर खाऊन निघताना. तेवढं तर करणं जमलंच नसतं, पण किमान कणीक मळून देवूया म्हणून पीठ मागायला गेलो तर म्हणे संध्याकाळसाठी हवंय..अजून २-३ तासांनी द्या. मग म्हटलं, बाबा आम्हाला तासाभरात घरी पोचायचंय. आत्ता काही करायचं असेल तर करून देतो. मग दुसर एकजण आला आणि म्हणे नाही काही नाही करायचंय. Happy

सोन्याबापू, मनिमाऊ, अल्पना अशा अनेकांच्या पोस्ट्सने डोळ्यांच्या कडा ओलावल्या ...... ग्रेट ....

सत श्री अकाल ...

वाहे गुरु की फतेह, वाहे गुरु का खालसा!

चंदीगढ ते हिमाचल बाय रोड केलेला प्रवास हा अ‍ॅमेझिंग अनुभव होता. निसर्ग, पंजाब कंट्रीसाइड, हॅन्ड्सम सरदार्स डोळा मारा

ह्याच रूट वर कीरतपुर साहीब गुरुद्वारा आहे !!! (वीर झारा मधे दाखवलाय) गुरुद्वार्याच्या शेजारुन बियास का सतलजचा कालवा जातो त्याला कल्पकपणे फ़िरवले आहे गुरुद्वार्याभोवताली प्रदक्षिणा काढल्यासारखे , पांढरा शुभ्र गुरुद्वारा वेड लावतो तो!

उच्चा दर बाबे नानकदा...
मै सोबा सुनके आया..
उच अपार बेअंतस्वामी
कौण जाणे गुण तेरे
उचा दर बाबे नानकदा...
सतनाम सतनाम सतनाम जी
वाहे गुरु , वाहे गुरु, वाहे गुरु जी...

सरदार दिलदार असतातच बहुतेक वेळा.

इथे युनिवरसिटी मध्ये असताना पण पंजाबी मित्राकडे कधी गेलो तर जेवण म्हणजे १०-१२ सहज जेवतील इतकं बनवायचे कायमच. थोडं थोडक वगैरे माहितच नसत त्यांना.
इतर सगळ पण एकदम राजेशाही प्रकरण, अगदी स्टुडन्ट असताना सुद्धा.

दुसरा एक सहज अनुभव इथला असा की पंजाबी ग्रोसरी मध्ये गेलो आणि स्वीट चव बघू म्हणून मागितल तर आख्खा बुंदी चा मोतीचूर लाडू हातावर ठेवणार. इतर दुकाना मध्ये असा अनुभव कधीच नाही आलेला.

kada prasad_0.jpg

केलाच काल. अगदी मस्त मऊसूद लुसलुशीत झालाय. तोंडात टाकताच अगदी आऽहाऽऽ झालं. चव कितीतरी वेळ रेंगाळते.

मी १००-१०० ग्राम जिन्नस घेऊन केलाय. = १०० ग्राम कणीक एक मेझरिंग कप भरली.
साखर वितवळतानाच पहिली अडचण झाली.साखरेचा एक कडक पातळ पत्राच तयार झाला. मग उकळलेल्या पाण्यातले पाणी ओतून पुन्हा गॅसवर ठेवून ते विरघळवून घेतले.

प्रसाद करायला भाकरीचा खोलगट तवा वापरला. कॅरॅमल-पाण्याचे मिश्रण टाकताच कणकेचा रंग जादू झाल्यासारखा बदलला.

प्रचंड पेशन्सचं काम आहे. शिवाय शेवटी शेवटी तो गोळा जड लागायला लागतो. किलो किलोची सामग्री घेऊन हे असलं काहीतरी करणं सरदार लोकच करू जाणे.

रेसिपीबद्दल धन्यवाद.

20160305_103616-640x360.jpg

आज मी पण केला. मस्त झाला आहे. एक वाटीच्या प्रमाणात केला. चार माणसान्ना जेवणात पुरेसा झाला. मी अर्धी वाटी गूळ पावडर आणि अर्धी वाटी साखर घेतली. ते गरम करण्याचा अनुभव अगदी भरत मयेकरांसारखाच. चव जरा कमी गोड वाटली. पुढच्या वेळी साखरेचं प्रमाण वाढवायला हवं आणि तूपाचं प्रमाण अर्थातच कमी करणार Wink

देवीका, रेसिपीसाठी धन्यवाद. सोन्याबापूंची पोस्ट आवडली. काही वैयक्तिक कटु आठवणींच्या पार्श्वभूमीवर अल्पना यांचाही गोतलचा अनुभव आवडला.
बाकी, सरदार दिलदार आणि प्रेमळ असतात हे अनुभवले आहे. वडिलांचे बिल्डिंग व्यवसायातले तसेच सुतारकाम करणारे काही सरदार मित्र होते आणि त्यांचे आमच्याकडे येणेजाणेही होते. गुरूद्वारात जाण्याचा योग मात्र आला नाही अजून.

मस्त! खूपदा खाल्लाय हा कडाह प्रसाद. द्रोणात वाढलेला साजूक तुपात थबथबलेला गरमागरम प्रसाद खाताना जी काही समाधी लागते तिचे वर्णन करताच येत नाही. गार झाल्यावरही खमंग लागतो. वाहे गुरू की खालसा, वाहे गुरू की फतेह!

ममो, लाडू करण्यासाठी जाड कणीक (टेस्ट फॉर लाईफचा पंजाबी आटा) आणली आहे, त्याचाच कडाह प्रशाद केला.

सुमेधा, अगं गूळपावडरीमुळे तसा रंग आलाय.

सगळ्यंच्या आठवणी मस्त. इथे फिरकायला वेळ मिळाला नाही.

भरत मयेकर आणि मंजूडी ह्यांचे खास आभार. इथे फोटो टाकलयबद्दल. मी प्रशाद परत करण्याचा विचारच करत होते, खास फोटो टाकायला.

मस्त फोटो आहेत दोन्ही.

घरी वगैरे करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा, मी सरळ गुरुद्वारात गेले इतक्या वर्षांनी आणि खावून आले.
लाजेने परत परत प्रसाद मागत नाही, तितकेच कमी कॅलरीज पोटात.

मंजुडी, आहाहा खतरनाक दिसतोय :लाळ गाळणारी बाहुली:

अगं गूळपावडरीमुळे तसा रंग आलाय. >>> पण त्यामुळे जास्त टेम्टींग दिसतोय.

मस्त रेसीपी देवीका.
लहान वाटीच्या प्रमाणात करुन बघेन.
मंजुडीच्या फोटोत रंग फारच सुंदर टेम्प्टिंग आलाय.
मी कधीही गुरुद्वारात गेले नव्हते. अगदी जवळ असुनही.
पण ह्या प्रसादाबद्दल आणि लंगर बद्दल ऐकुन होते.
माझी कडाहप्रशाद आणि लंगर ची इच्छा डायरेक्ट अमरितसरला सुवर्ण्मंदिरातच पुर्ण झाली. Happy

Pages