CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN : Pink Chaddi Campaign!!!!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN

What is the Pink Chaddi Campaign?

The Pink Chaddi Campaign kicked off on 5 February 2009 to oppose the Sri Ram Sena. The campaign is growing exponentially (4,500 at this point in the life of our Consortium of Pub-going, Loose and Forward Women) and that is not surprising. Most women in this country have enough curbs on their lives without a whole new franchise cashing in with their bully-boy tactics. Of course, a lot of men have joined the group as well.

Here is we want to do with the Pink Chaddi Campaign. Join in. Be imaginative, have fun and fight back ......

read more: http://thepinkchaddicampaign.blogspot.com/
(i say send it to shiv sena, ABVP and all those who think they can decide how women should behave in Indian culture!!!)

प्रकार: 

LOL स्लार्ट्या, चाबूक! तोडलंस! >> लिहायला लागला कि ऐकत नाहि बघ हा Happy

प्रश्न अस्थानी असल्यास क्षमस्व, :p, पण 'सबगोलंकार' म्हणजे काय? oval का?

मॄण्मयी तुमच्या प्रश्नामूळे आता आमच्या डोळ्यासमोर गोलंकार चड्ड्या यायल्या लागल्यात. असे भलतच लिहू नका हो. Happy

संस्कृती रक्षणापेक्षा आहे रे/नाही रे मधली वाढत जाणारी दरी आणि तिचा भयावह वेग हे असे काम करण्यासाठी उपलब्द असलेल्या मनुष्यबळाचे खरे कारण आहे. ह्याचा फायदा अगदी सुमार दर्जाचा राजकारणी सुद्धा घेइल.>>
ट्ण्या, एकदम मान्य.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

वरील सर्व चर्चा वाचली. एक सहज गेल्या दोन त्तीन दिवसात घडलेला किस्सा.

मी गेले सात वर्षे घराबाहेर राहतेय. पत्रकारिता, कार्पोरेट आणि आता अत्यंत ग्लॅमरस असे पब्लिक रीलेशन्स या फिल्डमधे आहे. माझ्यासारख्या भरपूर मुली असतात ज्या मुंबईमधे नोकरीला येतात.

माझ्या एका ज्युनिअरला मुंबईमधे रहायची सोय हवी होती. मी तिला मी आधी राहत असलेल्या हॉस्टेलचा पत्ता दिला. तर ती तिथे गेली सुद्धा नाही. उलट रात्री अपरात्री कुठल्याशा ब्रोकरबरोबर फिरून तिने अंधेरीमधे एक पीएंग गेस्ट रूम शोधली. भाडे सहा हजार. एका रूममधे तीन मुली. अशा त्या फ्लॅटमधे बारा मुली. ती तिथे शिफ्ट झाल्यावर दोन की तीन दिवसानी तिने "सहज" मला सांगितले, की तिचा घरमालक (जो बाजूच्या फ्लॅटमधे राहतो) "क्रेझी" आहे. परवा तो दारू पिऊन आमच्या फ्लॅटचे दार वाजवत होता. आणि काल तर मी घरात नसताना माझ्या रूममधे शिरून माझे कपडे धुंडाळत होता.

यामधे तिला चुकीचे काहीच वटले नाही, माझ्या बॉसने हे सर्व ऐकले आनी तिला ताबडतोब रूम सोडायला सांगितले. तिला सर्वानी हॉस्टेलमधए जायला सांगितले तर तिला नको झालय. हॉस्टेलमधे तिच्या "फ्रीडम" वरती बंधने येतात. रात्री पबमधे, लाऊंजमधे फिरता येत नाही. मित्राबरोबर भटकता येत नाही. या फ्रीडमच्या बदल्यात ती थोडीफार रिस्क घ्यायला तयार आहे!!!!

मला वाटते की मी आता म्हातारी होत चाललेये. मी पण पबमधे जायचे. मित्राबरोबर भटकायचे. पण त्याचबरोबर अशी रिस्क कधीच घेतली नाही. Happy

मला का कुणास ठाऊक हे पिंक चडी कॅपेन एखाद्या राजकीय नेत्याची कट कारस्थान वाटतय. *असा पक्ष ज्याला तरूणाचे मते मिळवायला आवडेल.

--------------
नंदिनी
--------------

व्हॅलेंटाइन प्रेमींविरुद्ध शिवसेनेचे 'इमोशनल अत्याचार'
14 Feb 2009, 1501 hrs IST
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनमुळे भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्यांचं आक्रमण होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने आज राज्यात ठिकठिकाणी तरुण प्रेमी युगुलांवर ‘ इमोशनल अत्याचार ’ केले... पुण्यामध्ये काही जोडप्यांची प्रतिकात्मक लग्ने लावण्यात आली, तर औरंगाबादमध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात जोडप्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. मिरजमध्ये तर एका तरुणाचे चक्क गाढवाबरोबर लग्न लावण्यात आले.

दरम्यान, व्हॅलेंटाइन डेला विरोध करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज बीडमध्ये बोलताना व्यक्त केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेने विरोध दर्शवला होता. जी प्रेमी जोडपी सार्वजनिक ठिकाणी प्रेम करताना आढळतील त्यांची जागच्या जागीच लग्न लावून देऊ, अशी धमकीही देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई-ठाण्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

परंतु पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली व मिरज भागात व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याचे प्रकार घडले. याठिकाणी शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे घेत मिरवणुका काढल्या. रस्त्यावर फिरणा-या प्रेमी युगुलांना दमदाटी करत त्यांच्या हातातील व्हॅलेंटाइन कार्डस् फाडण्यात आली, तर गुलाबाची फुलांचा चेंदामेंदा करण्यात आला.

पुण्याच्या सिंहगड रोड भागात खडकवासला धरणाकडे जाणा-या रस्त्यावरही सकाळपासूनच शिवसैनिकांनी फिल्डिंग लावली होती. या भागात बाईकवरुन आलेल्या काही जोडप्यांना त्यांनी वाटेत अडवले. त्यांच्या गळ्यात माळा घालून आणि डोक्याला मुंडावळ्या बांधून त्यांनी जबरदस्तीने त्यांचे प्रतिकात्मक लग्न लावून दिले. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात काही तरुणांच्या तोंडाला काळे फासण्याचे प्रकार घडले. गंमत म्हणजे मिरज येथे शिवसैनिकांनी एका तरुणाचे गाढवाशी लग्न लावून व्हॅलेंटाइन डे साजरा न करण्याची धमकी प्रेमी जोडप्यांना दिली.
-----------------------------------------------------------
THIS ELECTION DO NOT VOTE FOR SHIV SENA / MNS / BJP
-----------------------------------------------------------

त्या मायकल जॅक्सनला भारतात येऊन गायला नाचायला कोणी आमंत्रण दिलं होतं? आठवा पाहू! तेव्हा नाही संस्कृती बुडाली? आता मारे व्हॅलेंटाइन डे च्या नावानं बोंबा मारत फिरताहेत सगळिकडे!!!

हिंदू तालिबान..

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

<<हिंदू तालिबान..>>
दुसरे नावच नाही याला.

कदाचित् निवडणूका आल्या की लोकांच्या समोर, आपण किती संस्कृति संरक्षणाचे काम करतो आहे हे दाखवायला! नंतर रात्री हेच लोक वाटल्यास दारू पीत नाच्या मुली बघत बारमधे बसतील. संस्कृति म्हणे! ढोंगी.

भारत म्हणजे नुसते वाटेल त्या कारणाने दंगा, मार्‍यामार्‍या करणार्‍या लोकांचा देश! कायद्याचे बंधन कुणालाहि नाही! इतके दिवस नुसती लाचलुचपत होती, आता जोडीला हे! धमाल आहे नि काय.

बरे झाले या वेळी तीनच आठवडे रहाणार भारतात. मी तर मृत्युपत्र तयार करून ठेवले आहे. काहि खात्री नाही गुंडांच्या देशात. मी असे करतो, एखाद्या उंच्यापुर्‍या, धष्टपुष्ट, पिस्तुलधारी अमेरिकन माणसाला बरोबर घेऊन येतो. कुठे असे काही दिसले की मार गोळ्या! पकडू शकले पोलीस तर इंस्पेक्टरला लाच नाहीतर धमकी!

भारत म्हणजे नुसता विनोद! धमाल करण्याचा देश. त्याबद्दल जगात कुणालाहि काही आदर वाटण्याचा संबंधच नाही!

well said tanyabedekar and slarti . other posts sound very prejudiced. Anyway cant help ……

>त्या मायकल जॅक्सनला भारतात येऊन गायला नाचायला कोणी आमंत्रण दिलं होतं? आठवा पाहू! तेव्हा नाही संस्कृती बुडाली? आता मारे व्हॅलेंटाइन डे च्या नावानं बोंबा मारत फिरताहेत सगळिकडे!!!
अगदी....
या अशा उलट बोंबा आता निवडणुका जवळ आल्या की आणखीनच वाढतील.. काल अडवाणीजी पुन्हा रामजन्मभूमी अन राम मंदीराबद्दल बरळले म्हणे. आम्ही निवडून आलो तर मंदीर होणारच वगैरे. काय म्हणावे? "भ्रमिष्ठ"... Sad

सगळ्यात वाईट वाटतं ते देशाकरता आपल्यां सर्वस्वाची होळी करणार्‍या जवानांचं..
त्यांत स्वातंत्र्यपूर्व काळातले वीरही आले तसेच सद्ध्याच्या घडीला प्राणपणाने लढणारे जवानही.
त्यांनी सांडलेल्या रक्ताचा, त्यांच्या अलौकिक त्यागाचा 'फायदा' ही माकडं घेताहेत याचाच .. प्रचंड राग येतो.
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

Pages