CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN : Pink Chaddi Campaign!!!!
CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN
What is the Pink Chaddi Campaign?
The Pink Chaddi Campaign kicked off on 5 February 2009 to oppose the Sri Ram Sena. The campaign is growing exponentially (4,500 at this point in the life of our Consortium of Pub-going, Loose and Forward Women) and that is not surprising. Most women in this country have enough curbs on their lives without a whole new franchise cashing in with their bully-boy tactics. Of course, a lot of men have joined the group as well.
Here is we want to do with the Pink Chaddi Campaign. Join in. Be imaginative, have fun and fight back ......
read more: http://thepinkchaddicampaign.blogspot.com/
(i say send it to shiv sena, ABVP and all those who think they can decide how women should behave in Indian culture!!!)
खलास
खलास प्रकार आहे रे हा. आजच rediff वर पण मुलाखत वाचली.
खलास? sorry पण
खलास?
sorry पण हा campaign आणि त्याला प्रतिसादात्मक असे campaign.. शुध्ध मूर्खपणा आहे. त्यापेक्षा जे गरीब अन वस्त्रहीन आहेत त्यांन्ना पाठवा चड्ड्या अन साड्या.. i am sure they won't care about the color either ways..
अरे अरे
अरे अरे योग अर्थ लक्षात न घेता म्हणताय तुम्ही हे!
पेशवा, गुलाबी चड्डी नाहीये माझ्याकडे
बरं मग
बरं मग समजावून सांगा ना अर्थ...
sorry पण हा campaign
sorry पण हा campaign आणि त्याला प्रतिसादात्मक असे campaign.. शुध्ध मूर्खपणा आहे >> अनुमोदन.
अशीच एक घटना मला आठवत आहे. सातार्यात जेंव्हा महिलांनी एका गुत्त्यावर जाऊन हाणामारी करुन तो गुत्ता बंद पाडला होता ती.
त्या घटनेला उलट महिलांनी केले म्हणून प्रसिद्धी दिली होती व त्यांची वाहवा केली होती. ती घटना आणि त्या मुर्ख सेनेने केलेली घटना तुलनात्मक मला सारखीच वाटते. (दोन्ही कडे मारामारी, आणी बळजबरी होती). फक्त इकडे महिला म्हणून त्यांची वाहवा केली गेली.
आहेच कोण ती श्री राम सेना? च्यायला, त्यांना रामप्रभूंची वारुणीचा आस्वाद घ्यायला मान्यता होती हे सांगा. असल्या पिंक चड्ड्या पाठवून काय होणार? काहीही नाही. उलट त्या प्रमुखाला प्रसीद्धी मिळतेय. ते ही फुकटात. (दॅट विल हेल्प हिज फालतू कॉज).
say send it to shiv sena, ABVP >> विथ ड्यु रिस्पेक्ट टू युर ओपीनियन, आय वुड लाइ़क टु पॉईंट आउट ABVP इज नॉट लाईक दॅट. कधी कूठल्या घटना एक दोन घडल्या, त्या ह्या त्या व्यक्तींनी केलेल्या आहेत, संघवाल्यांनी वा ABVP वाल्यांनी नाही.
खालील लिंक मध्ये इव्हन बजरंग दलासारखी गुंड संघटना पण ह्या घटनेचा निषेध करते.
http://www.rediff.com/news/2009/jan/27inter-shri-ram-sena-is-confused-or...
उगीच ह्या विषयामध्ये जिथे तिथे सर्वच हिंदू संघटना आणल्याच पाहिजेत असे नाही. त्यामूळे विषयाचे गांभिर्य नष्ट होऊन चर्चा विषय हिंदू संघटना हा होतो. सरसकट संघटना एकाच पारड्यात तोलू नयेत.
CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN
मला तर ह्या टायटल मध्येच गोची वाटतेय
थोडासा विषय बदल - ही आयडीया एखाद्या चड्ड्या ( आता दुसरे चांगले नावही देउ शकलो असतो, पण नावच पिंक चड्डी ठेवले त्यामूळे ..) बनवनार्या कंपनीच्या मालकाने सोडलेली वाटते.
(तालिबानी संस्कॄती विरोधी) केदार
CONSORTIUM OF PUBGOING,
CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN
मला तर ह्या टायटल मध्येच गोची वाटतेय >>
अगदी खरंय केदार. मला पण ते नाव पटलं नाही. स्वतःच पब गोइंग अन लूझ म्हणवून घ्यायचं स्वतःला यात काय अर्थ ?
हे
हे उपहासात्मक आहे असं वाटलं.
शोनू, हो ना,
शोनू, हो ना, आणि 'forward' पण..
Being forward is like being a lady. If you have to tell you are, you aren't ना!
केदार, ते सातार्याचे नक्की काय आहे? कष्टकरी समाजातल्या बायकांनी गुत्त्यामुळे संसाराची वाट लागत असेल तेव्हा सगळे उपाय थकल्यावर तो मार्ग निवडला असेल. तसे असेल तर तुलना चूक आहे.
त्या
त्या गुत्ताचा त्रास होताच. तोच गुत्ता त्यांना तेथील पेताड लोकांना अचानक हल्ला करुन न मारता (काही लोक आयसीयू मध्ये होती म्हणे), पोलीस घेउन जाऊन,कोर्टात खटला दाखल करुन, निकालाची वाट पाहून, वैगरेही करताच आला असता की. (कायदा हातात न घेता). करन्याची प्रक्रिया सेम आहे म्हणून तुलना करतोय.
असे गुत्ते बंद पाडले पाहिजे असेच लोक म्हणतात, ( मी ही, कधीकधी) पण मग तेच पब बाबतीत का लागू होत नाही? की पब मध्ये सुशिक्षीत स्त्रीया व पुरुष जातात, विदेशी मद्याच्या आस्वाद घेतात म्हणून का? मग त्याच न्यायाने सर्वच दारु बंद पडली पाहिजे. तिथे पुरुषांनी मारले म्हणून वाईट, स्त्री ने मारले म्हणून चांगले असे नको. त्यां स्त्रियांना स्त्री शक्ती म्हणून गौरविले गेले म्हणून तो फरक फक्त सांगायचा होता बाकी काही नाही.
(मलाही त्यांचा बद्दल नितांत आदर आहे. राम सेनेच्या गुंडांशी सहानुभूती अजिबात नाही. त्यांना कातडे सोलल्याजाईल इतके मारले तरी हरकत नाही. )
"सगळे उपाय
"सगळे उपाय थकल्यावर" असं आहे रे वर. पुन्हा "गुत्त्यामुळे संसाराची वाट लागत असेल" असंही आहे. मग तोच न्याय कसा?
तोच गुत्ता
तोच गुत्ता त्यांना तेथील पेताड लोकांना अचानक हल्ला करुन न मारता (काही लोक आयसीयू मध्ये होती म्हणे), पोलीस घेउन जाऊन,कोर्टात खटला दाखल करुन, निकालाची वाट पाहून, वैगरेही करताच आला असता की. (कायदा हातात न घेता). >>>
sorry for digression, पण हे व्हायला किती वर्षं गेली असती? पोलीस असे सहज मदतीला येतात का? केदार, परवा त्या चिन्याच्या गांधी बीबीवर तु हिंसेचं (kind of) समर्थन करत होतास असं वाटलं पण मग आताचं हे मत पटलं नाही ..
पण हे
पण हे व्हायला किती वर्षं गेली असती? पोलीस असे सहज मदतीला येतात का?
>>
ऍक्सॅटली सशल. जिथे साध्य चांगले आहे तिथे मी स्वतः ही मारामारी केलीच असती. पण ते साध्य 'व्यक्तीगत' आणी 'मास' पातळीवर एकच असावे लागते.
दोन घटनेत एक समानता आहे व एक विषमता. साध्य जरी 'विषम' वाटत असले तरी 'साधन' एकच होते. आणी त्या साधनावर ही चर्चा चालू आहे, साध्यावर नाही. त्या श्री राम ( हे श्री राम येथ लिहायला नकोच) सेनेचे साध्य तर 'साध्य' ह्या व्याखेतच मोडत नाही. वाटत असेल का लिहीले तर त्यामूळे त्या पुरुषांचे दारु पिणे काही कालावधी साठी लांबेल. (पुर्ण बंद होणार नाही). आणी म्हणूनच मला त्या बायकांनी केल्याचा आनंद झाला. हे झाल व्यक्तीगत पातळीवर.
पण न्यायालयीन प्रक्रियेत दोघांचे साधन एकच आहे. (साध्य वेगळे असले तरी). आणि इथे मी फक्त न्यायलयनीत पातळीवरच तुलना केली. कारण ती व्ह्यायला पाहीजे होती म्हणून. म्हणूनच प्रक्रिया हा शब्द वापरला.
व्यक्तीगत पातळीवर तू आणी लालू जे म्हणत आहात त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. ते व्हायला हवेच होते, भले मग काही बायका जेल मध्ये गेल्या तरी बेहतर. कारण प्रश्न इथे संसाराचा होता.
माझ्या तुलनेच्या मुद्द्याने पिंक चड्डीचा मुद्दा भरकटायला नको, त्यामुळे मी माझी तुलना 'तशी' चुक आहे हे मान्य करतो.
केदार,
केदार, तुझं explanation मला आवडलं पण मग या campaign ला 'मुर्खपणा' म्हणण्यामागचं तुझं प्रयोजन कळत नाही ..
म्हणजे त्या सातार्याच्या बायकांनी केलं ते योग्य, पण ती कोण सेना आहे त्यांनी केलेलं ते अयोग्य हेच म्हणतो आहेस ना तू? आणि हे campaign' तर 'गांधीगिरी' सारखं वाटतंय मला .. मग हे 'साधन' अयोग्य असं तू का म्हणतो आहेस, हे कळत नाही मला ..
अगदीच
अगदीच मुर्खपणा नाही पण डोके न लावता उगीच स्वातत्र्यांचा नावावर काहीतरी काढले असे वाटते.
'गांधीगिरी' सारखं वाटतंय >>. माझाही विरोध ती गांधीगिरी वाटत आहे म्हणूनच. गांधींनी त्यांची अहिंसा अशी पबभरो आंदोलन काढून नक्कीच वापरली नसती. . ती त्यांनी त्या सेनेच्या लोकांना सामोरे जाऊन दाखवीली असती.
त्यांना चड्ड्या पाठवा, सिंगापुर, अमेरिका, मुंबई ब्ला ब्ला येथील पब भरा आणी त्याचे रिपोर्ट पाठवा त्यामूळे काय साध्य होणार? की तुम्ही स्त्रीया त्या सेनेला घाबरत नाही म्हणून? आणि घाबरत नसाल तर हे करायची काय गरज? त्यामुळे ती लोक दबतील असे वाटते का? ( हां फारतर ते पब मात्र त्या दिवशी भरपुर चालतील व चड्डी व्यावसायिकांना चांगले दिवस येतील) मग परत दुसर्या दिवशी काय? अन तिसर्या? अन पाचव्या, सहाव्या? सगळेजन रोज पब वर जाणार का? एकट्याने गाठनारी चतुर सेना आहे ती. त्या गुंडांना फुलाची भाषा कळत नाही. कायद्याची व लाठीची कळते.
वाट्टेल ते झाले तरी त्या पब मध्ये जाणारच हे ठाम ठरवावे ती खरी गांधीगिरी. गांधीगिरी म्हणजे प्रतिवाद न करने. पण हवे ते करणे. त्यामूळे ह्याला कोणी गांधीगिरी म्हणत असेल तर गांधींनी दिलेल्या शिकवनीचा विसर पडने आहे. (मूळात गांधी देखील दारुपान विरोधी होते.) आणि गांधीनी नक्कीच स्त्रियांच्या चड्ड्या त्या गुंडांना भेट दिल्या नसत्या. (हा फक्त मुन्नाभाई पाहिल्याचा परिणाम)
म्हणून हे साधन माझ्यासाठी तात्विक दृष्ट्या योग्य नाही. त्याला गांधींच्या अहिंसेत बसविने तर त्याहून योग्य नाही.
स्त्रीयांना तिथे जायचे असेलच तर त्यांनी ह्या लोकांच्या विरोधात कायद्याच्याच वापर करावा.
त्यांचा विरोध कसा करायचा हा प्रश्न उरतोच. विचार करुन लिहीतो. कारण त्यात सेनेनी 'भारतीय संस्कॄती' की काय ते उगीच आणले आहे. त्यासाठी सोल्यूशन जालिम पण विचारपुर्वकच असायला हवे. ही लोक म्हणजे अवघड जागचे दुखने आहेत. इग्नोर केले की जास्त वाढनार, लक्ष दिले तर प्रसिद्धी मिळून वाढनार असे काहीसे.
म्हणजे, हा
म्हणजे, हा मार्ग तूला पटत नाहीये .. हे acceptable आहे .. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद ..
माझाही विरोध ती गांधीगिरी वाटत आहे म्हणूनच. गांधींनी त्यांची अहिंसा अशी पबभरो आंदोलन काढून नक्कीच वापरली नसती. >> म्हणूनच मी त्याला 'गांधीगिरी' म्हंटलं, गांधीवादी नाही ..
(No subject)
>>कारण
>>कारण त्यात सेनेनी 'भारतीय संस्कॄती' की काय ते उगीच आणले आहे.
केदार,
अगदीच
अगदीच मुर्खपणा नाही पण डोके न लावता उगीच स्वातत्र्यांचा नावावर काहीतरी काढले असे वाटते. >> असे तुला वाटते, पण प्रत्येकाचा निषेध व्यक्त करायचा मार्ग वेगळा असू शकतो. ही campaign मला वाटते ज्यांनी काढली आहे नि ज्यां घटने विरुद्ध काढली आहे (राम सेने वाल्या mutaalik चा -नक्की नाव आठवत नाही - interview वाचला कि title चा अर्थ हि नीट कळतो) त्यासाठी आणखी समर्पक कल्पना नसेल. Its simply reaction of contempt.
हा प्रकार बरोबर आहे कि चुक आहे, ह्यापेक्षा दुसरा परीणामकारक मार्ग असता का etc हे प्रश्न अलहिदा. त्यांना काहितरी सुचले (नि इतरांचे नुकसान होउ न देता) त्यांनी काहितरी लक्षवेधक असे "वेळेत" केलेय (किंवा करताहेत) ह्याला काहि महत्व नसावे ? "त्यांचा विरोध कसा करायचा हा प्रश्न उरतोच. विचार करुन लिहीतो." हा विचार करत नाहियेत ह्याचे पूर्ण मार्क campaign वाल्यांचे आहेत. माझ्या तुटपुंज्या माहितीप्रमाणे feminist movement च्या सुरूवातीला सुद्धा अशा प्रकारच्या movements झाल्या होत्या. परत त्या निशा सुसान ने म्हटलय ना कि "We need to go beyond reaction". ते होईल कि नाही माहित नाही पण तयारी तरी दिसतेय.
CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN हे उपहासात्मक आहे हे समजावून सांगावे लागते ?
>>हे
>>हे उपहासात्मक आहे हे समजावून सांगावे लागते ?
चार सहा पोस्टांपूर्वी हेच बोंबलले!
पबगोइंग
पबगोइंग म्हणजे लूझ हे ओघानं आलंच या समीकरणाला माझा विरोध आहे. उपहासात सुद्धा मी असं म्हणणार नाही. उपहासात्मक(च) असेल अशी आशा आहे
वरच्या
वरच्या काही पोस्ट्सच्या अनुषंगाने -
२००३ साली केलेल्या कायद्यानुसार जर गावातील / शहरातील २५% किंवा त्याहून अधिक महिलांचा विरोध असेल तर दारूचे दुकान ताबडतोब बंद केले जाते. तसंच दवाखाना, प्रार्थनास्थळे व शाळा यांच्या १०० मी.च्या हद्दीतही ही दुकाने असता कामा नयेत. या नियमांच्या आधारे अनेक गावांत दारूची दुकाने बंद झाली आहेत. मात्र पैशाच्या बळावर ही कार्यवाही केली जात नाही, आणि मग कायदा हातात घेण्याची वेळ येते. माझ्या वाचनात अशा बातम्या आल्या आहेत.
आज त्या मुतालिकचं एक विधान वाचलं. 'बहुसंख्य भारतीय स्त्रिया या भरकटत असून त्यांना भारतीय संस्कृतीची जाण करून देणं हे आमचं कर्तव्य आहे', असं काहीसं तो म्हणाला. बहुतेक DNA मध्ये आहे ही बातमी. या देशात पब्स असू नयेत, असा कोणताही कायदा नाही. तिथे स्त्रियांनी जाऊ नये असाही कायदा नाही. त्यामुळे खरंतर या गुंडांना आधी तुरुंगात टाकायला हवं. पण निवडणूका जवळ आल्यानं अनेक मुख्यमंत्रीही या मूर्खपणात सामील झाले आहेत. या घटनेचा किंवा मनोवृत्तीचा निषेध अहिंसक पद्धतीने कसा करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
>>> राम सेने
>>> राम सेने वाल्या mutaalik चा interview वाचला कि title चा अर्थ हि नीट कळतो
कुठला हा interview? लिंक द्या कोणीतरी.
मलाही हा मार्ग पटलेला नाही, पण मुळात त्या कुठल्या सेनेची कृती निंदनीय होती यात वादच नाही.
बाकी 'भारतीय संस्कृती' हे दोन्ही शब्द न समजणारे लोकच त्या संस्कृतीचा मक्ता घेतल्यासारखे मिरवतात यासारखा दैवदुर्विलास नाही!
आजकाल
आजकाल कुणीही कुठलीही 'सेना' सुरु करतो, आणि त्याच्या नावावर 'भारतीय संस्कृती' रक्षण..
पिंक चड्डी आंदोलन हे एक मस्त उत्तर आहे या सेनावाल्यांसाठी.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
या पिंक
या पिंक चड्ड्या पाठवणार्या प्रत्येकीला या सेनेतर्फे एकेक साडी पाठवली जाणार आहे..
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
अरे वा! पण
अरे वा!
पण कसली? नऊवारी का? रंगाचा चॉइस आहे का?
खादीची!
खादीची! खादी सिल्क असेल तर जास्त छान! त्याचा इव्हिनिंग गाऊन तरी शिवता येईल!
मला राणी कलर नको! बाकी नऊवार, पाचवार कुठलीही चालेल.
नो चॉईस.
नो चॉईस. गुलाबी चड्डी म्हणून साडीही गुलाबी.
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
पबगोइंग
पबगोइंग म्हणजे लूझ हे ओघानं आलंच या समीकरणाला माझा विरोध आहे. >> अग तस नाही ग. राम सेनेच्या कार्यकारणीमधल्या लोकांनी त्यांच्या क्रुत्यामागची भूमिका समजावून देताना अशी काही विधाने केली होती त्यातले शब्द वापरून हे title बनवले होते. (हे शक्य आहे कि मुळचे शब्द वेगळे आणी त्याचे interpretation वेगळे असेल, पण भावना त्याच होत्या. फार दूरचे कशाला, मायबोलीवरच्या अशा टाईपच्या रेंगाळत्या चर्चा (?) वाचल्या तरी हेच शब्द वेगळ्या रुपात दिसतील )
साडी
साडी कांचिपुरम असेल तर मला पण चालेल..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
डिल मस्त
डिल मस्त आहे. कोणी लिड घेणार असेल तर आपण एक काम करु.
जोक्स अपार्ट साडीची न्युज खरी आहे का? तसे असेल तर "चड्डी देउन साडी घ्या" ही योजना आपण नेट वर राबवू शकतो व गरजुंना देऊ शकतो. आंदोलन ते आंदोलन, (त्यांचे) फायदा तो फायदा. (गरजूंचा)
आपण ५०० चड्ड्या पाठवू. मग ५०० साड्या मिळतील, त्या गरजुंना देउन टाकू. नंतर त्या गुंडांकडे कोणीतरी जाईल व त्या चड्याही आणेल, त्या मात्र भारतीय संस्कृतीमूळेच देता येणार नाहीत. नाहीतर हलकट म्हणून थोबाडीत बसायची. त्या इकडे गुडविलला देऊ. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले आंदोलन (चड्डी देउन साडी घ्या) यशस्वी होउ शकते. त्यासाठी हवे तर ब्लाग किंवा गृप स्थापण करु.
(मी हे सिरियस लिहीतोय, कोणाला स्वस्तात कपडे मिळत असतील तर त्या दोघांच्या भांडन्याचा लाभ आपण का घेऊ नये)
Pages