कोकणात मुरूड-जंजिरा ट्रिपला जायचा प्लॅन केलाय. बरोबर लहान मुलं असल्याने जंजिर्यावर जायचा विचार नाहीये.
पण मुरूडला नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने काळजीत पाडले आहे. तो समुद्रकिनारा सुरक्षित आहे का?
साधारणपणे बीचवर जातांना काय काळजी घ्यायला हवी? भरती/ओहोटी चे टाईमटेबल आधी कळते का? ऑनलाईन शोधले पण मुंबईचे मिळाले फक्त.
प्लिज टिप्स द्या. पहिल्यांदाच लहान मुलांना घेऊन जात आहे.
********************************************************************************************
खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद लोक्स
प्रतिसादातली शक्य तितकी माहिती खाली अॅड केली आहे. काही राहिले असेल तर सांगा.
भरती - ओहोटीची गणिते:
--------------------------
१. तिथीला ३ ने गुणायचं आणि ४ ने भागायचं. . उदा. पौर्णिमा म्हणजे
१५ * ३ = ४५
४५ / ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी
२. भरती-ओहोटेच्या गणितात (तिथी) * ३ करुन मिनीटे अॅड करतात.
नवमी असेल तर ९ * ३/४ = ६. ७५
यात ६ हा पुर्णांक तास धरायचा, आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनीटे ( एका तासाच्या ०.७५ पट म्हणजे ४५ मिनीटे)
तसेच ९ * ३ = २७ मिनीटे
एकुण मिनीटे : ४५+२७ = ७२ मिनीटे = १ तास १२ मिनीटे
यात आधीचे ६ मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनीटे) = ७ वाजुन १२ मिनीटे ही भरतीची वेळ मिळाली.
३. तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते, उदा. पौर्णिमा- १५, १५+१= १६. १६ ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ ला पूर्ण भरती, नंतर ६ तासांनी पूर्ण ओहोटी.
काही गोल्डन रूल्स:
-----------------------
१. स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे.
२. ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नका. कारण ओहोटी आत खेचून घेते. भरती बाहेर फेकते.
३. काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.
४. पाण्यात उतरताना मद्यपान करू नका.
५. किनार्यावरुन बघितल्यावर पाण्यात आडव्या लांबलचक लाटा तयार होत असतील, व त्या जिथे फुटत असतील, तिथवर उथळ (तरी पुरुषदोन पुरुष उंचीचा) किनारा असतो, तर त्यापेक्षा निम्म्या अंतरापर्यंतच समुद्रात जावे. त्यापुढे जाऊ नये.
६. जर लांबलच़क आडव्या लाटा तयार होत नसतील, त्या रुंदीला फारच छोट्या अस्तील, वा जिथे लाटा तयार होऊन फुटण्याचे प्रमाण इतर जागांपेक्षा तुलनेत नगण्य असते अशा ठिकाणी पाऊलही ठेवू नये.
७. कोणत्याही समुद्र किनार्यावर, विशिष्ट अंतरापर्यंत पुळण असते, तिथवरच कमरेभर पाण्यात धोका कमी असतो. या विशिष्ट अंतराचे पुढे समुद्रकिनारा समुद्रात एकदम उतार पकडुन खोल खोल जातो. ही उतार सुरु होणारी जागा समजायची कशी? तर आमच्या अनुमानाने, जिथे "लाटा फुटताना दिसताहेत" तिथे उथळ किनारा असतो.
८. बीचवर अशा काही अॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या.
धोकादायक समुद्रकिनारे:
---------------------------
१. काल सकाळ मध्ये आल होते की नागाव, किहीम हे बीच सुरक्षीत नाहीत, तिथे गार्ड्स नाहीत. त्यामुळे पाण्यात उतरताना लाम्बवर, अती खोल जाऊ नका.
२. गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. त्यापेक्षा भंडारपुळ्याला जा (दीड दोन किमी अंतरावर आहे) तिथला किनारा सुरक्षित आहे तरीही स्थानिकांना विचारून घ्या.
मांडवी बीच (काळा समुद्र) रत्नागिरी: पाण्यात उतरू नका. अनेक खडक आहेत.
पांढरासमुद्र फार सुरक्षित बीच आहे पण खूप घाण आहे, जाववत नाही असली अवस्था.
भाट्ये बीच (रत्नागिरी) : खेळण्यासाठी खूप चांगला बीच पण चेंजिंग रूम वगैरे सोयी नाहीत. बीचवर काही रीझॉर्ट आहेत तिथे सोयी आहेत. पाण्यात उतरण्यासाठी झरीविनायकापेक्षाही पुलाजवळच्या किनार्यावरून उतरा.
वेळणेश्वरः खेळण्यासाठी चांगला बीच. बर्याच सोईदेखील आहेत.
गणेशगूळे बीचः आमचा आवडता पण गर्दी फार नसते.
३. कोणत्याही बीच च्या लगेच शेजारी लागुनच डोंगर/टेकडी असेल, किनारा खडकाळ असेल, तर तो जास्त उताराचा अरुंद किनारा हमखास धोकादायक असतो. (उदा. गणपतीपुळे/हरिहरेश्वर, हेदवी) इत्यादी.
आंजर्ल्याचा किनारा खरे तर अतिशय सुरक्षित मानला जातो. पण तेथिल दोनही टोकांचे भाग असुरक्षित आहेत, एकीकडे वर म्हणले तसा डोंगर आहे, तर दुसरीकडे नदीचे पात्र येऊन मिळते.
४. अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.
मुलांसाठी बीचवर जातांना जवळ ठेवायच्या वस्तू:
---------------------------------------------------
१. रबरी ट्यूब्ज
२. प्यायचे पाणी
३. सनबर्न/ जळजळ टाळण्यासाठी क्रिम्स, कॅप्स
४. बीच टॉईज
५. कोरडा खाऊ
६.ओले कपडे, मातीने माखलेले टॉवेल ठेवता येतील अशा प्लॅस्टिक पिशव्या
मला वाटते जे झाले ते बरोबर
मला वाटते जे झाले ते बरोबर झाले लोकांनी यातून बोध घेतला तर बरे होईल.
ह्या वाक्याचा तीव्र निषेध. उद्या तुमच्या कुटुम्बातील लोक पण सहलीच्या ठिकाणी बेजबाबदारपणा करू शकतात. थोडी तरी संवेदन्शीलता बाळगा.
उद्या तुमच्या कुटुम्बातील लोक
उद्या तुमच्या कुटुम्बातील लोक पण सहलीच्या ठिकाणी बेजबाबदारपणा करू शकतात.
<<
मुळात असल्या बेजाबाबदार लोकांनी सहलीलाच काय, कुठेही जाऊ नये. आणि बेजबादारी करुन काही नुकसान झालेच तर त्याचा पश्चाताप देखिल करु नये.
नंदीनी, पूर्ण पोस्ट
नंदीनी, पूर्ण पोस्ट पटली.
लिंबूटिंबू, समुद्रातील सुरक्षित अंतर ओळखण्याची युक्ती आवडली. पण माझ्या साठी गुडघाभर पाणी ठिक, कारण पोहता येत नाही.
उद्या तुमच्या कुटुम्बातील लोक
उद्या तुमच्या कुटुम्बातील लोक पण सहलीच्या ठिकाणी बेजबाबदारपणा करू शकतात.>>>
पण असा मूर्खपणा का करावा आणि मझ्या कुटुंबाबद्दल मला पूर्ण खात्री आहे. ते असे करू शकणार नाहीत. जर असे कोणी केले तर मला वाईट सुद्धा वाटणार नाही..
आणि अश्या बेजाबदार लोकांनी का जावे.++१
त्या मुलांबरोबर जे झाले ते
त्या मुलांबरोबर जे झाले ते खुपच वाईट झाले. ज्यांच्यासोबत असे अपघात होतात ते सगळेच बेजबाब्दार नसतात.
बेजबाबदार पणा, किंवा
बेजबाबदार पणा, किंवा वास्तवाचे अज्ञान .... दोन्हीनाही निसर्गात क्षमा नाही.
इतकेच काय, पण अमुक कायदा मला माहितच नव्हता म्हणून माझे हातुन गुन्हा घडला, हा बचाव कोर्टात मान्य होत नाही.
आपण जे करायला चाललो आहोत, त्याचे परिणामांचि आधीच खातरजमा करुन काळजी घेणे हे (कायद्याने सज्ञान) मानवी बुद्धिचे मूळ गृहितक सर्वदूर मान्य केलेले असते.
लिंबूंनी लाटांचे बरोबर
लिंबूंनी लाटांचे बरोबर सांगितले. आम्ही मोठेच असताना जेव्हा कंबरभर पाण्यात लाट झेलत असतो तेव्हा जी लाट फुटत्/फेसाळत नाही त्यापासून जास्त सावध असतो, ती उंच असते आणि बरेचदा बुडवते.
समुद्र म्हणजे स्विमिंग पूल नाही, तुम्ही बुडालात तर थोडा श्वास रोखून पोहून कोणत्यातरी काठावर यायला आणि धरायला निश्चित काठ नसतो. ओहोटीचा काळ म्हणजे आत खेचणारा प्रवाह विचारात घेतला तर माफक पोहणे येणार्यांचे स्किल्स शून्याच्या बरोबरीचे बनतात.
>>>> तर माफक पोहणे
>>>> तर माफक पोहणे येणार्यांचे स्किल्स शून्याच्या बरोबरीचे बनतात. <<<<< अगदी अगदी....
अन पोहोता न येणार्यांचे मायनस......
अगदी नदीच्या पुरात पोहोणारा असला तरी नदीचा पूर/प्रवाह/पाण्यात पोहोणे वेगळे अन समुद्रात "किनार्याजवळ" / खाडीच्या तोंडाशी वगैरे पोहोणे वेगळे. ते सर्वसामान्यांचे/येरागबाळ्यांचे काम नव्हे.
Thank you so much for
Thank you so much for information everyone. It is really helpful while being on beaches. Thanks in loads.
गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या
गणपतीपुळे अति डेंजरस. तिथल्या पाण्यात चुकूनही खेळायला जाऊ नका. >>>> हाच सल्ला मी माझ्या ऑफीसमधल्यांना दिला तेव्हा त्यांनी माझीच अक्कल काढली.. आम्ही कित्ती वेळा गेलोय, काही नाही झाल वै वै, तरी तिथल्या प्रशासनाने बीचवर जाण्याच्या मार्गावरच बुडुन मेलेल्यांची नाव वयासकट लावली आहेत, हे सांगुनही पुन्हा तोच कटाक्ष मिळाला, म्हटल मरा.. जाउन आली मंडळी सुखरूप परत, पण नशिब चांगल होत म्हणुन, पण देव न करो काही झाल असत म्हणजे नशिबाला बोल लावुन काय उपयोग होता का?
अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ
अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.
असं म्हणतात की दर ७ लाटांनंतर
असं म्हणतात की दर ७ लाटांनंतर येणारी सातवी लाट मोठी आणि जोराची असते.
असं म्हणतात की दर ७ लाटांनंतर
असं म्हणतात की दर ७ लाटांनंतर येणारी सातवी लाट मोठी आणि जोराची असते.
<<
७ लाटांनंतर येणारी लाट 'सातवी' कशी असेल?
अजून एक.. याने जीवाला धोका
अजून एक.. याने जीवाला धोका नसला तरी सनबर्न न होण्याची काळजी घेणे.
एकदा सनबर्नने वाईट्ट पोळलोय आम्ही. १३ च्या १३ जण लाल माकड झालो होतो.
सगळ्या बीचेसवर सारखे नियम
सगळ्या बीचेसवर सारखे नियम लावता येणार नाही.
काही बीचेस एकदम खोल होत जातात, काही बीचेस वर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे पण खुप धोकादायक ठरु शकतात.
स्थानिक लोकांकडुन / कर्मचार्यांकडुन माहिती काढुन घ्यावी, कोणती वेळ योग्य, कुठली बाजु आणि कितपत आत जाणे योग्य इत्यादि.
सगळ्यांनी छान माहिती दिलीच
सगळ्यांनी छान माहिती दिलीच आहे. भारतात्ल्या समुद्रकिनार्ञावर जाण्याचे प्रसंग तसे कमी आलेय्त. पण एकदा कोकणातच कुठेतरी आता नाव आठवत नाही बीचचे पण डॉल्फिन बघायला नेणारे मागे लागले होते चला म्हणून. नवरा पण अति उत्साही पण मला त्या छोट्याश्या बोटी बघूनच धडकी भरली त्यात मुलगी लहान आणी मला पोहता येत नाही. नकोच ते डॉल्फिन म्हटलं. इवल्याश्या बोटी डचमळत कशा मध्यावर नेणार होते देवाला माहित. सांगायचा मुद्दा हा की बीचवर अशा काही अॅक्टीवीटी करणार असाल पॅरासेलिंग वगैरे वगैरे तर प्लीज त्यांचे सेफ्टी मेजर्स बघून निर्णय घ्या. स्पेशली लहान मुलं पण आहेत म्हणून.
दुसरे म्हणजे घरचेच लोकं कधीतरी अती उत्साही असतात. त्यांना आवर घालणे कठीण असते. पाण्यात पुढे पुढे नेणे काही होत नाही म्हणत मुलांना ओढणे हे टाळा.
माझे निरिक्षण असे आहे की मुलांना वाळूतच मजा येते जास्त सो त्यांचे बीच टॉईज नक्की न्या. माझा मुलगा पाणी, माती यातच तासन्तास रमतो. कोरडा खाऊ न्या. ज्यात ओले कपडे, मातीने माखलेले टॉवेल ठेवता येतील अशा प्लॅस्टिक पिशव्या न्या. त्या वेगळ्याच ठेवा. इतर सामानात ते कपडे मिक्स झाले की खाण्याच्या सामानाची माती होते
बाकी भरपूर मजा करा.
येस्स.. बीच टॉईज घेईन
येस्स.. बीच टॉईज घेईन बरोबर.
पियू लेकीची स्कीन नाजूक आहे त्यामुळे सनबर्नची आठवण करून दिल्याबद्दल थँक्स.
शक्य तितकी माहिती हेडर मध्ये
शक्य तितकी माहिती हेडर मध्ये टाकली आहे. काही राहिले असेल तर सांगा लोक्स.
डहाणू आणि केळवे चा बीच तसा
डहाणू आणि केळवे चा बीच तसा सेफ आहे.आम्ही लहानपणी अनेकदा गेलोय.
@चैत्रगंधाजी, वरिल लेखात
@चैत्रगंधाजी,
वरिल लेखात टाकलेला हा खालील मुद्दा चुकीचा आहे.
<<
४. अलिबागच्या किल्ल्यातही जाऊ नका असे सांगतात तरी लोक जातात.
<<
संपुर्ण ओहटी असल्यास कुलाबा किल्ल्यात जाऊन येण्यास कोणताही धोका नाही. मात्र ओहटी सुरु होण्याची वेळ आणि भरती येण्याची वेळ या दरम्यान समुद्रात उतरणे धोकादायक आहे.
केळशी बीच खूप सेफ आहे.
केळशी बीच खूप सेफ आहे. बुडण्याचे प्रकार फार कमी ऐकले आहेत.
वेळास, मुरूड, लाडघर तसंच आडे येथील बीचेस पण सेफ आहेत.
(वरील सर्व ठिकाणे दापोली तालुक्यात आहेत)
तरी गुढघा भर पाण्यात खेळणे, त्यापुढे न जाणे हा थम्बरूल ठेवा, याहून सेफ काही नाही
माफ करा विजयजी, पण तिथे धोका
माफ करा विजयजी, पण तिथे धोका आहेच ना.
माझ्या ओळखीतले एक तिथे दगावले होते चुकिच्या वेळी गेल्याने आणि आमच्या एक शिक्शिका होत्या त्यांनी एकदा अनुभव सांगितला होता की, त्या किल्ल्यात अडकल्या होत्या असा काहितरी, डिटेल्स आठवत नाहीत.
मुंबईतला अक्सा बीच धोकादायक
मुंबईतला अक्सा बीच धोकादायक आहे
सेन्सिबल व उपयोगी धागा.
सेन्सिबल व उपयोगी धागा.
कंपनीची ट्रीप चाललीये काशीद
कंपनीची ट्रीप चाललीये काशीद बीचला ६ तारखेला.
एका जवळच्या मित्राने सांगितले की त्याच्या डोळ्यासमोर २ जण बुडाले काशीद बीचवर.
मी ही गोष्ट कंपनीत सांगितली तर जवळजवळ सगळ्यांनीच काशीद बीच सगळ्यात सेफ आहे अस सांगुन माझं बोलणं उडवुन लावलं. मी त्या मित्राला पुन्हा विचारल कि तो काशीद बीचचं होता का तर त्याने हो सांगितलं.
कुणाला आहे का अनुभव काशीद बीचचा ???
जाव कि नको
बीच अनसेफ असला तरी लोक
बीच अनसेफ असला तरी लोक जातातच.अशा लोकांना 'जाऊ नका' म्हटलं तर ते किलजॉय समजतात,
याच्यापेक्षा बेस्ट वे इनडायरेक्ट इम्पॅक्ट चा असतो. त्या बीच बद्दल घडलेल्या बातमीची लिंक सहज म्हणून बर्याच जणांना शेअर करणे. याने बीच वर जाणे टळले नाही तरी लोक वेडी धाडसे करण्याचे टाळतात ऐनवेळी बातमी आठवून.
आता इतकं करुन माज केला तर ते आणि त्यांचे जीव..आपला वाचेल इतकं पाहिलं की झालं.
काशीद सेफ आहे. पाण्यात खड्डा
काशीद सेफ आहे. पाण्यात खड्डा वगैरे नाही. फक्त गुढघा भर पाण्यात खेळणे, त्यापुढे न जाणे हा थम्बरूल वापरा!
शक्यतो ओहोटी असेल तर पाण्यात जाऊ नका..
ओहोटीची वेळ माहिती नसेल तर एक सोप्पी ट्रिक आहे, कोरड्या वाळूपासून लाटा अगदी जवळ (साधारण ३०-४० फूटापर्यंत) असतील तर भरती असते आणि कोरड्या वाळूपासून साधारण १०० फूटापर्यंत ओल्या वाळूचा पट्टा आणि पुढे लाटा असतील तेव्हा ओहोटी सुरू असते.
अंजली१२-- दुसरे म्हणजे घरचेच
अंजली१२--
दुसरे म्हणजे घरचेच लोकं कधीतरी अती उत्साही असतात. त्यांना आवर घालणे कठीण असते.-------हे अगदी अगदी..
गणपती पुळे बीच वर.. मी व लेकीने रुद्रावतार धारण केल्याने आमच्या ह्यानीं माघार घेतली.... निघाले होते पाण्यात खेळायला.
समुद्र म्हणले की आम्ही दोघी आता दुर्ग़ाच होतो.
---------
सगळे च प्रतिसाद..माहिती पुर्ण.
भारतातही आता जेलिफिश दिसू
भारतातही आता जेलिफिश दिसू लागले आहेत. ( मी बांबोलिम, गोवा इथे बघितले आहेत ) पाण्यात असताना ते दिसत नाहीत पण त्यांचा स्पर्शही प्रचंड वेदनादायी असू शकतो. त्यावर औषध उपायही सहसा उपलब्ध नसतात जवळपास. तसेच काही मासेही धोकादायक ठरू शकतात. त्यामूळे किनार्यावरील स्थानिक लोकांचा सल्ला मागणे आणि तो पाळणे याला पर्याय नाही. तसेच हेही लक्षात ठेवायला पाहिजे कि ते पाण्यात शिरताहेत म्हणून आपणही शिरु शकतो, असा विचारही बरोबर नाही. त्यांना अचूक माहिती असते आणि त्यांचे कौशल्य वादातीत असते. त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.
समुद्रकिनार्यावर बीयरच्या बाटल्याही फोडलेल्या असतात. पाण्याबाहेर त्या निदान दिसतात तरी, पाण्यात असतील तर रेतीत रुतलेल्या दिसतही नाहीत. त्यांच्यापासूनही जपायलाच हवे.
आबासाहेब, ते वरचे गोल्डन
आबासाहेब, ते वरचे गोल्डन रूल्स वाचून घ्या सगळे. ते व्यवस्ठित फॉलो केल्यावर काहीही प्रॉब्लेम येणार नाही असा confidence मला आला आहे
Pages