पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता ..

Submitted by विदेश on 26 January, 2016 - 14:27

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह् व्वा...विदेशजी गझल आवडली!

>>>पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता>>>लाजवाब शेर!
शेवटचाही खासंच!