अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिफ्स जिंकल्यापेक्षा महोम्स व चिफ्सनी जो जिगरी खेळ करुन व सुपरबोल जिंकुन नॅशनल मिडियाच्या जी सणसणीत थोबाडात मारली ते मला जास्त आवडले. आम्ही मिडवेस्ट मधले व्हेरी स्मॉल मार्केट असल्यामुळे हे नॅशनल मिडियावाले चिफ्सना कधीच क्रेडिट देत नाहीत. काल सकाळी ९ पासुन प्री गेम शो मधे ९५ टक्के कव्हरेज फिलीजचेच होते. फॉक्स वर एंटायर एन एफ एल पॅनल व त्यांचे एक्सपर्ट पॅनल म्हणाले होते चिफ हॅज झिरो चांस!

झिरो चांस म्हणे! झिरो चांस माय …!

मस्त झाला गेम. महोम्स प्लेड लाइक महोम्स, डिस्पाइट अ‍ॅंकल इंजुरी. ईगल्सच्या चूका महागात पडल्या - एस्पेश्यली शेवटच्या पांच मिनिटातली पेनल्टि. दॅट वाज द लास्ट नेल इन द कॉफिन...

मी काही फूटबॉल फॅन वगैरे नाही पण सुपरबोल बघतो. मजा आली काल. एक प्रेक्षक म्हणून सारखे प्लेज घडून स्कोअरबोर्ड हालत होता ते खुप भारी वाटलं नाहीतर कधी कधी फारच बोअरिंग होतात मॅचेस. जेलन हर्ट्स च्या स्वतःच्या रशेस बघायला मजा आली. महोम्सला मानलं पाहिजे! कसा काय पळाला येवढं दुखत असताना काय माहित.
कडॅरियस टोनीच्या लाँगेस्ट पंट रिटर्नच्या वेळी चिफ्सनी तयार केलेली वॉल भारी वाटली! मी पहिल्यांदाच असा प्ले बघितला (आयॅम शुअर होत असतील बर्‍याच वेळा.. Happy )
सेकंड हाफ मध्ये चीफ्स नी टच डाऊन करुन लीड घेतला तेव्हा पासून त्यांचे प्लेज भारी वाटले. त्या लीड घेतानाच्या टच डाऊनच्या वेळेस सुद्धा राईट साईडला टोनी पुर्ण मोकळा होता आणि आरामात लाईन क्रॉस करुन गेला! Lol
वेरी एक्सायटिंग गेम!

अभिनंदन मुकुंद ! तू नॅशनल मिडीया चे जाऊ दे (तसही तुमची नि इग्लस ची दोन स्टेस वगळता बाकीचा देश फक्त परत यंदा ब्रॅडी नाही ह्याबद्दल खूश असतो Wink ) , तूला कुठे खात्री वाटत होती चीफ्स जिंकायची रे . ते अंडरडॉग्स आहेत असे म्हणाला होतास Happy

तसही महोम्स, महोम्स सारखा खेळला ही आता माझ्यासाठी तरी न्यूज उरली नाही. संपूर्ण गेम मधे कधी तसा खेळेल ह्याचा अंदाज बांढणे ही मजा आहे. फिली डीफेन्स महोम्स वर हार्डली प्रेशर आणू शकला असे वाटले. विशेषतः इंजर्ड झाल्यावर इनफ प्रेशर आणता येणे हे अनाकलनीय होते.

बर आता मला नेफेल मधला कॅच कॅच कधी असतो नि कधी नसतो ते समजाव Wink

असामी, फिलीजच्या डॅलस गोडर्टने बॉबल केलेला पास रेफ्रीजने कसा कंप्लिट ठरवला इज बियाँड मी टु! तसच आमच्या डिफेन्सने दुसरा फंबल रिकव्हरी टच डाउन केला होता तो फिलीजचा पास इंकप्लिट पास कसा ठरवला गेला इज ऑल्सो बियाँड मी! सॉरी आय कांट हेल्प यु Sad

अ‍ॅट द एंड ऑफ द डे, हा सुपरबोल दोन तुल्यबळ संघातला होता. ज्या टीमने कमी चुका केल्या ती टीम जिंकली!

फिलीज च्या जेलन हर्टने एक फंबल/ टर्नओव्हर केला, महोम्स वॉज फ्लॉलेस

चिफ्स ऑफेन्सिव्ह लाइनने एकही सॅक होउ दिला नाही उलट आमच्या डिफेन्सने जेलन हर्टला एकदा सॅक केले,

झालच तर फिलीज ऑफेन्स कित्येक वेळा शॉट क्लॉक व्हायोलेशनअच्या जवळ आले होते( त्यांना डिले ऑफ गेम ची एकदाच पेनल्टी मिळाली पण अ‍ॅट लिस्ट अजुन ४ ते ५ वेळा शॉट क्लॉक झिरो दाखवत असुनही रेफ्रीने डिले ऑफ गेमची व्हिसल वाजवली नाही!)

आमच्या स्पेशल टीमने एक जबरदस्त पंट रिटर्न ( ऑलमोस्ट टच डाउन!) केला, त्यांच्या स्पेशल टीमने तस काहीच केल नाही.

एकुण आमचा डिफेंस, आमचा ऑफेन्स व आमची स्पेशल टीम फिलीजच्या ऑफेन्स, डिफेन्स व स्पेशल टीमपेक्षा काकणभर सरस खेळली व ते " काकणभर" वॉज इनफ फॉर अवर ३८-३५ सुपरबोल विन! Happy

मी काही फूटबॉल फॅन वगैरे नाही पण सुपरबोल बघतो. >>> +१

ही गेम नंतर फिरवली असेल तर २-३ वर्षांपूर्वी फोर्टीनाईनर्स विरूद्ध बहुधा चीफ्सच जिंकले होते तेव्हाही अशीच नंतर फिरवली होती ते आठवले. तेव्हा आम्ही बघत होतो त्या प्रचंड ग्रूप मधे बहुधा मी एकटाच सॅन फ्रान्सिस्को सपोर्टर होतो Happy

चिफ्स ऑर्गनायझेशन व प्लेयर्सनी( इन्क्ल्युडींग महोम्स/ केल्सी) परत एकदा व्हिक्टरी परेडमधे खुले आम रस्त्यावर पब्लिकमधे दारु ढोसुन, ड्रन्क होउन दाखवुन दिले की खेळात् कितीही महान असलात तरी तुम्हाला “क्लास“ असतोच अस नाही! सगळे एकजात सगळे चिफ्स खेळाडु क्लासलेस!

कॅन्सास सिटी मेयरने असे पब्लिकमधे दारु ढोसायला चिफ्स खेळाडुंना मज्जाव का नाही केला याचे मला आश्चर्य वाटते. कॅन्सास सीटीतल्या सगळ्या शाळांना सुपर बोल विजयानिमित्त सुट्टी दिली गेली होती. त्यामुळे परेड बघायला आलेल्या मिलिअन एक बघ्यांमधे हजारो शाळकरी मुले महोम्स व केल्सीला प्रत्यक्षात बघायला आली होती. त्यांच्यासमोर अस खेळाडुंनी दारु ढोसुन तर्र्र होणे मला ३ वर्षापुर्वीही खटकले होते. होप चिफ्स ऑर्गनायझेशन व कॅन्सास सीटी मेयर/ पोलिस चिफ पुढच्या वेळेला याची योग्य दखल घेतील. चिफ्स व्हिक्टरी परेडमधे चिफ्स प्लेयर्स जसे वागले त्याला "एकदम क्लासलेस" शिवाय दुसरा शब्द नाही!

महोम्स स्वतः बराच बॅलॅन्स्ड वाटतो (कदाचित त्याच्या बायको नि भावा पुढे सौम्य वाटत असेल.) म्हणून महोम्सने केले ह्याचे आश्चर्य वाटले - केल्सीने केले ह्याचे नाहि वाटले (त्याचा एकंडर टोन नेहमी तसाच राऊडी असतो)

बिल्स हरले देव पावला. आता पुढे कुत्ता जाने चमडि जाने असे आहे माझे. Happy त्यातही लायन्स नि नायनर्स बर्‍याच वर्षांमधे जिंकले नसल्यामूळे त्यांना अधिक सपोर्ट ह्यापलीकडे जास्त काही लॉजिक नाही. टेक्सन असते तर त्यांना दिला असता - एकदम दिल जीत लिया टाईप्स खेळाले आहेत ते. जिंकण्याची अधिक शक्यता चीफ्स चीच वाटते. महोम्स क्ल्च प्ले करतोय नि टीम मोक्याच्या वेळी फॉर्म मधे आलेली आहे.

आमच्या घरात फुटबॉल-प्रेम फारच वाढत चालल्यानं यंदा कॉलेज फायनल्सच्या आधी बसून सगळे नियम समजून घेतले. सध्या कुणी बघतच असेल तर त्या गोंधळाला नावं न ठेवता अन्डरस्टॅन्डिंग वॅलिडेट करणे इथपर्यंत स्वीकार केला आहे. आता तुम्ही सगळे लगेच लाडात येउन ‘आवडेल हो, आवडेल’ असलं काही म्हणु नका. आवडून घेणार नाही.

त्या गोंधळाला नावं न ठेवता अन्डरस्टॅन्डिंग वॅलिडेट करणे इथपर्यंत स्वीकार केला आहे आता तुम्ही सगळे लगेच लाडात येउन ‘आवडेल हो, आवडेल’ असलं काही म्हणु नका. आवडून घेणार नाही. >> हीच ! हीच ती सुरूवात असते सिंडी Lol

मैत्रेयी क्लिक बेट आर्टीकल आहे ग. पण ह्या वयात कोच म्हणून वैन सुरूवात करायला द्यायला - त्यातही एव्हढे बॅगेज असलेल्या व्यक्तीला - डेअरींग लागणार. जेरी जोन्स च्या ने झाले नाही तर इतरांची काय कथा ! तसही डीफेन्स ला आज्कल कोणी कुत्रा विचारत नाही दुर्दैवाने Sad

सिंडरेला, वेलकम टु द फुटबॉल फ्रॅटर्निटी! मैत्रेयी म्हणते ते खर आहे पण! सुरुवात अशीच होते! Happy

मैत्रेयी, आहे आहे, बघतोय गेम्स. यंदाची सुपरबोल वारी अगदीच अनपेक्षित आहे! रेग्युलर सिझनमधे ज्या भंगार प्रकारे आमचे वाइड रिसिव्हर्स खेळत होते व कॅचेस ड्रॉप्स करत होते ते बघुन मला तर प्लेऑफ्सची पण अपेक्षा नव्हती. बिल्सना व रेव्हन्सना , तेही त्यांच्या घरी जाउन हरवायची बातच सोड!

महोम्स बद्दल वादच नाही! Making it to 6 AFC Championships in a row and making it to the 4 of the last 5 super-bowls is a feat worthy of admiring! पण त्यामुळे आता चिफ्सची टीम अमेरिकेची डार्लिंग टीम न राहता “ टीम टु हेट“ झाली आहे. अमेरिकेत ती रितच आहे! इथे कोणालाच स्पोर्ट्स डायनेस्टी आवडत नाही( मग ती मायकेल जॉर्डनची शिकागो बुल्स टीम असो का टॉम ब्रेडीची न्यु इंग्लंड पॅट्रिअट्स टीम असो!)

असामी, तुला इ मेल केले आहे. अरे नाही रे बाबा, मी काय तुला टीनएजर वाटलो काय “ स्विफ्टी“ व्हायला Happy त्या दोघांच्या प्रेमप्रकरणात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. पण तुला तर अमेरिकन प्रेस कशी आहे ते माहीतच आहे. बिचार्यांच्या प्रेमाची सर्कस झाली आहे.

सुपरबोल चांगला होउ देत हीच माझी नेहमीप्रमाणे इच्छा!

आलास का मुकुंद?! तुझे पोस्ट अजून कसे आले नाही म्हणून चिंताच वाटत होती. Happy
हो चीफ्सनी योग्य वेळी गेम लायनीवर आणलेला दिसतो. मी रेग्युलर सीझन गेम्स नाही पाहिले त्यांचे. पण अर्थातच टेलर स्विफ्ट ने हायजॅक केला आहे हा सीझन.
ओळखीत खूप लोक लायन्स ना सपोर्ट करत होते यावेळी. डिसअपॉइन्ट झालेत आता. लायन्स नी २ वेळा फिल्ड गोल चा चान्स सोडून सुपरबोल ला जायची संधी अक्षरशः फेकून दिल्याचे पाहून अवाक व्हायला झाले. काही झेपली नाही स्ट्रॅटेजी.
नाइनर्स बद्दल काय मत?
३-४ वर्षापूर्वी महोम्स किती यंग आहे असे वाटायचे, मग जॉश अ‍ॅलन, जो बरो किती लहान आहेत असे झाले. आता त्या पर्डी ला बघून याला हायस्कुलातूनच रिक्रुट केले की काय असे वाटले Lol पण छान आहे, यंग क्यूबीज आर ब्रिंगिंग मोर एक्साइटमेन्ट टू द गेम Happy

यंग क्यूबीज आर ब्रिंगिंग मोर एक्साइटमेन्ट टू द गेम Happy >> कोणाचे काय तर कोणाचे काय Lol

यंदाची सुपरबोल वारी अगदीच अनपेक्षित आहे! > कमाल आहे तुझी मुकुंडद. तुझ्यापेक्षा मी काँफिडंट होतो म्हणायचे. रिसीव्हर्सच्या प्रॉब्लेम धरूनही क्लच क्यूबी, कोच नि टाईट अँद्स वर विश्वास नाही तुझा Happy परत तुमच्या डीव्हि़जन मध्ल्या इतर संघांचे (सर्प्राईजिंगली बारा वाजले आहेत . एफ सी जास्तीच काँपीटीटिव्ह झालेय त्यामूळे क्लच प्लेयर्स असलेले संघ जिंकण्याची शक्यता जास्त वाढली आहे. नाईनर्सचा मरतुकड रन डीफेन्स बघता चीफ्स जिंकणे गृहित धरायला हवे. तिसर्‍या क्वार्टर मधे क्लीयर होईल नेहमीप्रमाणे सगळे. नाईनर्स डेफिसीट असला कि डेस्परेट होतात असे वाटते. अशा वेळी डोके थंड ठेवून खेळू शकणारा महोम्स कामाला येणार. परत जर समजा नाईनर्स ची फीयरसम रश महोम्स पर्यंत पोहोचलीच तर पळणार्‍या महोम्स साठी अगदी मोक्याच्या वेळी फीट झालेला नि फॉर्म मधे आलेला केल्सी आहेच कि रे.

यंदा स्ट्राऊड नि लायन्स नी मन जिंकले. काय मस्त खेळले आहेत. अजून एक कॅप्टन कूल क्यूबी आला आहे.

पुढच्या वर्षी केलेब विल्यम्स जर खरचा त्याच्या किर्तीला साजेसा खेळला तर धमाला येईल. ईमॅजिन तो नि महोम्स मधला गेम

“ लायन्स नी २ वेळा फिल्ड गोल चा चान्स सोडून सुपरबोल ला जायची संधी अक्षरशः फेकून दिल्याचे पाहून अवाक व्हायला झाले. काही झेपली नाही स्ट्रॅटेजी.“…

मैत्रेयी, १००% सहमत! माझ्या मते लायन्सचा कोच डॅन कँपबेलने माजोरडेपणा ( ओव्हर कॉन्फिडंस म्हण हव तर!)दाखवला. त्याला वाटले हाफ टाइम पर्यंतचा लिड खुप झाला व ४थ डाउन वर चांस घेउन टच डाउन करुन सॅन फ्रॅन्सिस्कोचे कंबरडेच मोडावे.

आम्ही सुद्धा २ वर्षापुर्वी बेंगल्स विरुद्ध एफ एफ सी चँपिअनशिप गेम मधे असेच हातचे ३ पॉइंट्स सोडुन टच डाउन करायच्या नादात गोल लाइनवर ४थ डाउन कन्व्हर्ट करण्यात फेल झालो( आम्हीही असच १७ पॉइंट्सनी पुढे होतो तेव्हा. बेंगल्सला तिथे ओपनिंग व मोमेंटम मिळाला व तिथुन पुढे मॅच फिरली व शेवटी आम्ही तो गेम असाच ३ पॉइंट्सनी हरलो होतो व सुपरबोल एंट्रीला मुकलो होतो. नाहीतर हा आमचा महोम्स बरोबरचा ५ वा सुपरबोल असला असता!

त्यामुळे डेट्रॉइट्स फॅन्सची हातातली सुपरबोलला जाण्याची संधी हुकल्याची हळहळ व त्यांचा हार्टब्रेक मी समजु शकतो!

झालच तर सॅन फ्रॅन्सिस्कोला त्या “ मिरॅक्युलस” ( का लकी?) रिसेप्शनचा खुप फायदा झाला! बॉल डिफेंडरच्या हेल्मेटवर बाउंस होउन आयुकच्या हातात! त्याला म्हणतात नशीब!

फॉर्टीनायनर्स कडे ओल्व्हरऑल जास्त वेपन्स आहेत पण आमच्याकडे अमेझिंग महोम्स व त्याच्या जोडीला “ फ्रिक“ केल्सी आहे. त्यामुळे आम्ही जरी अंडरडॉग्स असलो तरी हेल्दी महोम्सच्या विरुद्ध बेट न करण्याचे मी आता शिकलो आहे. Happy ( बफेलो बिल्स बरोबरचा २ वर्षापुर्वीचा वाइल्ड डिव्हिजनल प्लेऑफ्स गेम आठवतो का? फक्त १३ सेकंद बाकी असताना आम्हाला बॉल मिळाला व त्या १३ सेकंदात महोम्सने टच डाउन केला व तेव्हाही बिल्स माफियाच्या ह्रुदयांचा या वर्षीसारखाच त्याने चक्काचुर केला होता! व्हॉट अ प्लेयर!)

असामी, अरे तु आमचे रेग्युलर सिझन गेम बघीतलेले दिसत नाहीस बहुतेक… ६० च्या वर ड्रॉप कॅचेस .. मेनी टर्न्ड इनटु इंटरसेप्शन्स! पुअर महोम्स!तरी बर डिफेन्स जबरी आहे या वर्षी आमचा. जर सुपरबोल मधे इफ वुइ होल्ड ऑन टु अवर कॅचेस वुइ मे हॅव्ह अ डिसेंट चांस टु पुल अ‍ॅन अपसेट! लेट्स सी! ( त्या ख्रिस्चिअन मॅकेफरीचा रनींग गेम थोपवता आला पाहीजे मात्र!)

बाकी यंग क्वार्टरबॅक ब्रिगेडबद्दल न बोललेच बरे. जॉश अ‍ॅलन व लमार जॅक्सन मोक्याच्या वेळी नांगी टाकतात. टाइम अँड अगेन दे हॅव्ह फॉल्टर्ड अगेन्स्ट ग्रेट महोम्स. प्रुडी सुपरबोल मधे नर्व्ह्स कसा हँडल करतो ते बघायला मजा येइल. ही इज अ डिसेंट क्वार्टरबॅक कन्सिडरींग ही वॉज २०० थ अँड ओव्हरऑल लास्ट पिक इन हिज् ड्राफ्ट फ्रॉम आयोवा स्टेट युनिव्हर्सीटी.

असामी, सी जे स्ट्राउडचा गेम आय क्यु १८/१००! लुक्स लाइक ही वॉज शिअर लकी धिस यिअर! बिगिनर्स लक यु कॅन से!

चिफ्स बॅक टु बॅक सुपरबोल चँपिअन्स!

महोम्स! काय बोलणार या माणसाबद्दल? हॅट्स ऑफ!

हा त्याच्या पहिल्या ६ वर्षाच्या कारकिर्द्रीचा आढावा:

१: लागोपाठ ६ ए एफ सी चँपिअनशिप गेम्स
२:गेल्या ५ वर्षात ४ सुपरबोल अ‍ॅपीअरन्सेस
३: ३ सुपरबोल चँपिअनशिप्स इन हिज फर्स्ट ६ यिअर्स!
४: ३ सुपरबोल एम व्ही पी ट्रॉफीज
५: २ रेग्युलर सिझन एम व्ही पी ट्रॉफीज

त्याचे पासींग यार्ड्स व टच डाउन्स इन फर्स्ट ६ यिअर्स- मोर दॅन एनिबडी इन द हिस्टरी ऑफ एन एफ एल!

वॉव! सिंपली अमेझिंग!

कालच्या सुपरबोल गेमचा आढावा पुढच्या पोस्टमधे.

(आणी हे लक्षात घ्या की या महोम्सने आम्हाला या वर्षीच्या आमच्या “ डाउन“ यिअर” मधे आम्हाला सुपरबोल जिंकुन दिला आहे! केवळ अविश्वसनिय!)

अभिनंदन मुकुंद! आम्ही पण चीफ्सनाच सपोर्ट करत होतो! काल पहिले २ काय ३ क्वार्टर्स फार बोअर चालले होते. ( इन्क्लुडिंग द लॅकलस्टर हाफ टाइम शो!) पण चौथ्या क्वार्टर आणि एक्स्ट्रा टाइम एकदम पैसा वसूल ! नाइनर्स ना टच डाउन वर ६ पॉइन्ट्स वर रोखणारा तो ब्लॉक, चीफ्स चा ५७ यार्ड वाला रेकॉर्ड ब्रेकिंग फिल्ड गोल, अन अर्थातच शेवटची १० सेकंद असताना टच डाउन या माझ्यामते टर्निंग मोमेन्ट्स होत्या. अजून बारीक बारीक खूप असतील. (मुकुंद लिहीलच Happy )

>>वॉव! सिंपली अमेझिंग!<<
अग्री, धिस गाय इज अमेझिंग. अँड ब्रॉक पर्डी इज ए फोर्स टु बी रेकन विथ..

महोम्स, जो मांटॅनाचा रेकर्ड ब्रेक्र करेल लवकरच, इवेंचुली ब्रेडीचा पण. बाय्दवे, काल मांटॅना नायनर्स्ना चिअयरप कारायला होता कि चिफ्सला? Wink एनीवे, हाफ-टाइम शो वाज स्पेक्टॅकुलर. लि'ल जॉन, लुडक्रस, अशर या त्रयीने सोहोळ्याला चार चांद लावले...

अभिनंदन, मुकुन्द ! तुला शनिवारी जीमेल वर टाकलेले ते बघ बरं Happy

नायनर्स नी फारच मिस्टेक्स केल्या. शेवटी कधी ना कधी तर महोम्स सुटणार हे उघड होते. योगायोग म्हणजे बिल्स नि कालच्या दोन्हीगेमस मधे समोरच्या टीम्मधल्या किकर ने ओपनिंग दिली नि रेस्ट ईज हिस्टरी.

It was fun to watch Bosa and Chase Young restricting Mahomes for most of the time in the game. That was extremely disciplined. Not sure why Niners abandoned that after second half.

सगळ्यांना धन्यवाद!

आता गेमबद्दल.

गेम चांगला झाला का? याचे उत्तर हो पण देता येइल आणी नाही पण.

दोन्ही टीम्सनी भरपुर चुका केल्या. फरक इतकाच की चिफ्सना त्या एवढ्या भोवल्या नाहीत जेवढ्या फॉर्टीनायनर्सना भोवल्या.

त्याचे मुख्य कारण महोम्स मेड देम पे फॉर देअर मिस्टेक्स, ब्रॉक पर्डी कुड नॉट डु दॅट.आणी दुसरा महत्वाचा फरक म्हणजे स्पेशल टीम्स मधला फरक. फॉर्टीनायनर्स किकर मिस्ड एक्स्ट्रा पॉइंट आणी त्यांच्या पंट रिटर्न टीमने चिफ्स च्या पंट रिटर्नच्या वेळेला जो लोचा केला तो अनाकलनिय होता! एकदा त्यांच्याच एका प्लेयर्सच्या पायाला लागुन बॉल जेव्हा रिकोशेट झाला तेव्हा त्यांच्या पंट रिटर्नरने त्या बॉलला पकडण्याऐवजी त्या बॉलवर बॉडी झोकुन द्यायला पाहीजे होती. चिफ्सच्या ज्या स्पेशल टीम प्लेयरने तो बॉल रिकव्हर केला त्याने नेमके तेच केले. पुढच्याच प्ले मधे मग महोम्सने मार्कस व्हाल्डेझ ला टच डाउन पास टाकला. फॉर्टीनायनर्सना ती त्यांच्या स्पेशल टीमची चुक खुपच महागात पडली.

महोम्स काल खुप चांगला खेळला का? मुळीच नाही. पण जेव्हा पाहीजे तेव्हा त्याने त्याचा खेळ उंचावला. खासकरुन चौथ्या क्वार्टरमधे व ओव्हरटाइममधे ही कॅरीड हिज टीम नॉट ओनली ऑन हिज ट्रिमेंडस मॅजिकल आर्म बट ऑल्सो विथ हिज टाइमली रन टू!

आणी शेवटी आमच्या डिफेन्सला सुद्धा कालच्या विजयाचे श्रेय जाते. खर म्हणजे दोन्ही टीम्सच्या डिफेन्सने खुपच चांगला खेळ केला.

व्हॉट अबाउट सुपरबोल मधला लाँगेस्ट फिल्ड रेकॉर्ड जो एका तासात दोनदा मोडला गेला? आमचा किकर हॅरीसन बटकर खरच मिस्टर डिपेंडेबल आहे. हॅट्स ऑफ टु धिस न्यु सुपरबोल रेकॉर्ड होल्डर!

सगळे जण आता चिफ्स डायनेस्टी व महोम्स GOAT इन मेकींग या दोन गोष्टींची चर्चा करत आहेत. पण मला वाटते इट्स टु सून टु हॅव्ह दॅट टॉक. पण सध्याच्या फ्री एजन्सीच्या जमान्यात जिथे एकच टीम दिर्घकाळ एकत्र टिकवुन ठेवणे खुप कठिण असते तश्या जमान्यात ५ वर्षात ३ सुपरबोल जिंकले म्हणुन चिफ्स खरच अभिनंदनास पात्र आहेत!

राज, मी पण तोच विचार करत होतो. पण माँटॅनाने जरी त्याची कारकिर्द्र चिफ्स म्हणुन संपवली तरी त्याने त्याचे चारही सुपरबोल फॉर्टीनायनर्स म्हणुन जिंकले होते. मी तरी त्याला खरा फॉर्टीनायनर्सच मानतो.

असामी, आज उत्तर देतो.

पण मला वाटते इट्स टु सून टु हॅव्ह दॅट टॉक. >> हे पटते. पण अजून सहा वर्षे खेळला तर अजून तीनेक सहज नावावर लागतील महोम्सच्या असे वाटते. केल्सी रीटायर झालयावर खरा कस लागेल. अजून त्याच्या अर्ध्या वर जाईल असा कोणी मिळालेला दिसत नाहि.

हुश्श! चिफ्स.. दोन गेम्स .. २-०, दोन्ही गेम्स एका पॉइंटने ( कसे बसे!) जिंकले!

बघुयात, सुरुवात तर चांगली झाली आहे सिझनची. पण बेंगल्स आणी रेव्हन्स, दोन्ही टीम्सची ०-२ ने सुरुवात. ते अनपेक्षित होते.

महोम्स अगतीच फडतुस खेळत आहे या वर्षी. २ गेम्समधे ऑलरेडी ३ इंटरसेप्शन्स! आणी केल्सीचे काँट्रिब्युशन बिग फॅट झिरो!

Pages