अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही रे असामी, त्या एका सुपरबोलमधे त्याच्या टीमला ब्रेडीने तसे कम फ्रॉम बिहाईंड येउन हरवल्यामुळे राज त्याला हेट करण्याइतका राज नॅरोमाइंडेड नसावा असा माझा अंदाज आहे. तो पण एक स्पोर्ट्सप्रेमी आहे अस मी मानतो. तो डिफ्लेटगेटबद्दल २०१५ पासुन ब्रेडीला रिस्पॉन्सिबल धरत आहे. मला वाटत ब्रेडीने अ‍ॅटलांटा विरुद्ध ३--२८ या स्कोरवरुन ३४-२८ असा ओव्हरटाइम मधे केलेला कमबॅक २०१७ सुपरबोलमधला आहे.

राजच नाही पण माझ्या असे लक्षात आले आहे की अमेरिकेत ब्रेडी हेटर्स खुप आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणाने ही हॅज रब्ड पिपल इन अ राँग वे. आणी नाहीतरी अमेरिकेत बहुतांशी वेळी जनता अंडरडॉगला प्रोत्साहन देते. एखाद्या स्पोर्ट्समधे एकाच खेळाडुने एवढ्या दिर्घकाळ ( २० वर्ष अँड काउंटींग!) प्रभुत्व गाजवलेले बर्‍याच जणांना आवडत नाही. माझे असे निरिक्षण आहे की सुरुवातीला नवे व अंडरडॉग असतात तेव्हा लोकांना ते आवडतात. ते लोकांचे “ डार्लींग“ बनतात. पण तेच नंतर डॉमिनंट होउन दुसर्‍या कोणाला न जिंकु देता मोनॉपोली करतात तेव्हा मग तेच “ डार्लींग “ खेळाडु व्हिलन बनुन जातात. मग तस व्हायला डिफ्लेटगेटच काय , कुठलेही फडतुस कारण पुरेसे असते.

आता ब्रेडी अस्तास जातोय व महोम्स उदयास आला आहे. महोम्सलाही सुरुवातीच्या २-३ वर्षात अमेरिकाभर फॅन्स होते व सपोर्ट होता. आता त्याच्या एफ एफ सी चँपिअनशिपच्या लागोपाठच्या चौथ्या अ‍ॅपिअरन्समुळे व गेल्या दोन सुपरबोलमधे लागोपाठ दोनदा प्रवेश केल्यामुळे( या वर्षी पण म्हणजे लागोपाठ ३ सुपरबोल त्याने खेळायची दाट शक्यता आहे!) नॅशनल मिडिया मधे व नॅशनली लोक त्यालाही ऑलरेडी हेट करायला लागल्याचे दिसुन येत आहे.

हे चक्र असे चालुच राहणार! काल ब्रेडी होता, आज महोम्स आहे, उद्या जो बरो, जॉश अ‍ॅलन किंवा एल ए चार्जर्सचा जस्टीन ह्युबर्ट त्याची जागा घेतील . मग लोक त्यांनाही हेट करत राहतील!

टायगर वुड्स व मायकेल जॉर्डन हे दोघे त्यांच्या त्यांच्या खेळातले “ गोट“ .. त्यांनाही ( ब्रेडी इतके नाही तरी!) अश्या हेटमधुन जावेच लागले होते.

वैद्यबुवा, “ आता गोट्यात भांडणे नको“ Biggrin

<<<मान्य दोन्ही क्वार्टरबॅक्स व दोन्ही टीम्स ज्या पद्धतीने काल खेळल्या त्यावरुन दोन्ही टीम्स हरायला नको होत्या. मला हेही मान्य की जर ते टॉस जिंकले असते तर जॉश अ‍ॅलन व बफेलो बिल्सच जिंकले असते.>>

याच विचाराने मी म्हंटले की जो टोस जिंकेल तो जिंकणार, नि नशिबाने तो चीफ्स नी जिंकला.
महोम्स हा माझा फेव्हरिट आहे. अ‍ॅलनला जास्त पाहिले नाही. ब्रेडी/ग्रॉन्क तर विचारूच नका!
आता परत एकदा चीफ-सान फ्रान होणार का? २०२० सारखे?
क्वार्टरबॅक च्या जोडीला तितकेच जबरदस्त रिसिव्हर नि रनिंग बॅक पण पाहिजे.
जसे टेरि ब्रॅडशॉ-फ्रँको हॅरिस- लिन स्वान, (पिट्स्बर्ग स्टीलर्स, '७४-'७९) मॉन्टॅना- रॉजर क्रेग- जेरी राईस सान फ्रान ४९, '८०-'८५)
केली-थर्मन थॉमस-आंड्रे रीड (बफेलो, बिचारे लागोपाठ चार वेळ सुपरबॉल हरले!)

तो पण एक स्पोर्ट्सप्रेमी आहे अस मी मानतो. तो डिफ्लेटगेटबद्दल २०१५ पासुन ब्रेडीला रिस्पॉन्सिबल धरत आहे. >> मुकुंद ह्या दोन वाक्यांमधेच भयंकर विरोधाभास आहे. सच्च्या स्पोर्ट्सप्रेमी लाडिफ्लेटगेट किती बी. एस. होते हे सांगावे लागणार नाही. म्हणून मी संशयाचा फायदा देत होतो.

तुला वाईट वाटेल पण माझा नाईनर्स ना सपोर्ट आहे. ते व्हिंटेज पॅट्स स्टाईल खेळताहेत. रन गेम्स, स्टाऊट डिफेन्स नि जस्ट ईनफ ऑफेन्स. बेंगाल वि. महोम्स चुरशीचा गेम होवो - मजा येईल.

जाउ दे रे असामी, कोण गोट आहे याची काही फिक्स व्याख्या नसल्यामुळे “ गोट“ प्रकरण एकदम सब्जेक्टिव्ह असत. फक्त मी म्हटले म्हणुन कोणी “ गोट “ होत नाही! मला ब्रेडी “ गोट“ वाटला म्हणुन राजला तो “ गोट “ वाटलाच पाहीजे अशी माझी मुळीच सक्ती नाही. मी फक्त मला तो “ गोट “ का वाटतो त्याची कारण दिली. कोणाला पटोत वा न पटोत!

वैद्यबुवा: अस म्हणुन मी माझ्यापुरता हा “ गोट्यांवरुन“ चालु झालेला वाद थांबवतो! Happy

असामी, तु सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टीनायनर्सना रुट करतो त्याकरता सॉरी म्हणण्याचे कारण नाही! मला वाटत मेजॉरीटी अमेरिकन जनता चिफ्सच्या विरोधातच आहे( कारण मी मागच्या पोस्टमधे दिलेच आहे)
पण लक्षात ठेव! चिफ्स कोच अँडी रीडने महोम्सला सल्ला देउन ठेवला आहे, “व्हेन द थिंग्स आर ग्रिम, बी अ ग्रिमरिपर! Proud

फारेंड, तु मी २ आठवड्यांपुर्वी , इथेच केलेली २ भविष्ये वाचलेली दिसत नाहीत! Happy

पहिले भविष्य होते

“पुढच्या आठ्वड्यात महोम्स-अ‍ॅलन.. फायरवर्क्स गलॉर!”

हे त्या गेमच्या आधी एक आठ्वडा मी केलेले भविष्य!

झाले की नाही ते खरे? अ‍ॅक्च्युअली देअर वॉज फायरवर्क्स गलॉर अँड सम मोर इन दॅट इनक्रेडिबल गेम!

तुम्ही सगळ्यांनी तो गेम बघीतला आहेच. ( ज्यांनी बघीतला नाही ते एका अविस्मरणिय गेमला मुकले).

ज्यांनी तो गेम बघीतला त्यांच्याकरता काही प्रश्न.

१: दोन्ही टिम्सनी, २ मिनीट वॉर्निंग नंतरच्या उरलेल्या २ मिनीटात क्लॉक मॅनेजमेंट चांगले करण्याऐवजी पटकन टचडाउन करण्याची घाइ केली का? त्या २ मिनिटात बफेलोने २ टचडाउन्स केले व चिफ्सनी १ टच डाउन व १ फिल्ड गोल केला( म्हणजे २ मिनीटात २४ पॉइंट्स!) .

२ : फक्त १३ सेकंद बाकी असताना बफेलोने एंड झोनमधे किक( इन्स्टेड ऑफ स्क्विबींग इट) करुन घोड चुक केली का?

३: १ मिनीट १३ सेकंड्स बाकी असताना “ चित्ता” टायरिक हिलने अफलातुन स्पिड दाखवुन केलेला टचडाउन करताना बिल्सचा प्रो बोलर सेफ्टी जॉर्डन पॉयर व लाइन बॅकर मॅट मिलानो यांना त्याच्या स्पिडने बीट केल्यावर दाखवलेली “ पीस“ साइन बघीतली का? डिफेंडर त्याच्या पुढे असुनही टायरिक हिलने त्यांना पास केले व एंड झोनमधे अनटच्ड प्रवेश केला! काय जबरदस्त स्पिडचे प्रात्यक्षिक होते की नाही?

४: फक्त १३ सेकंद बाकी असताना व पराभव समोर दिसताना, न गोंधळता, काम, कुल, कलेक्टेड राहुन महोम्सने ते १३ सेकंद कसे वापरले?( कंपेअर टु डॅलस काउबॉइज अँड डॅक प्रेस्कॉट्स क्लॉक अँड १६ सेकंड टाइम मॅनेजमेंट अ‍ॅट द एंड ऑफ देअर गेम अगेन्स्ट द फॉर्टीनायनर्स)

५: दुसर्‍या क्वार्टरमधे महोम्सने टाकलेला,बिल्स डिफेंसिव्ह एंड ग्रेगरी रुसो च्या अराउंड द बॉडी व अंडर हिज आर्म असा टायरिक हिलला टाकलेला इन्क्रेडिबल साइड आर्म व बेंडी थ्रो तुम्ही पाहीलात का? वॉज इट नॉट अनबिलिव्हेबल अँड एक्स्ट्रिमली डिफिकल्ट थ्रो?

आणी २ आठवड्यापुर्वी मी अजुन एक भविष्य केले होते.

“माझा अंदाज- बफेलो बिल्स- चिफ्स, सिनसिनॅटी बेंगल्स-टेनेसी टायटन्स, मग चिफ्स-बेंगल्स मग बेंगल्स अँड अमेझिंग जो बरो इन सुपरबोल .. आणी बेंगल्स सुपरबोल चँपिअन्स… जो बरो.. सुपरबोल एम व्ही पी!”
मला अस मनापसुन वाटत की हे मी केलेले भविष्य मात्र खोटे ठरावे! Happy

पण ज्यांनी जो बरोला त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासुन खेळताना पाहीले आहे त्यांना कळेल की ही इज अ‍ॅन इन्क्रेडीबल क्वार्टरबॅक! द गाय हॅज प्लेड सम इन्क्रेडिबल गेम्स इन हिज शॉर्ट करिअर इन्क्लुडिंग नॅशनल चँपिअनशिप गेम अगेन्स्ट देन डिफेडींग चँपिअन्स क्लिम्सन टायगर्स व्हिच ही वन!

झालच तर त्याच्या कॉलेज डेजमधे,एल एस यु मधे असताना तो अमेरिकेतल्या खालील जबरदस्त लाउड स्टेडिअममधे जाउन खेळला व तिकडे सातत्याने जिंकला आहे!

१: टेक्सस ए अँड एम काइल फिल्ड , कॉलेज टाउन, टेक्सस( १०२,७३३ कॅपॅसीटी)

२: टेनेसी व्हॉलंटिअर्स नेलंड स्टेडिअम, नॉक्सव्हिल, टेनेसी( १०२,४१५कॅपॅसीटी)

३: ल्युझिआना स्टेट टायगर्स टायगर स्टेडिअम, उर्फ “ डेथ व्हॅली), बॅटन रुज, ल्युझिआना( १०२,३२१ कॅपसीटी)

४: अ‍ॅलाबामा क्रिम्सन टाइड्स ब्रायंट डेनी स्टेडिअम, टस्कलुसा, अ‍ॅलाबामा( १०१,८२१ कॅपॅसॉटी)

५: जॉर्जिया बुलडॉग्स सॅनफर्ड स्टेडिअम उर्फ “ बिटविन द हेजेस“, अथेन्स, जॉर्जिया( ९२,७४६ कॅपॅसीटी)

ही सगळी जबरदस्त लाउड स्टेडिअम्स आहेत. कॉलेज फुटबॉल सिझनमधे या स्टेडिअम्समधे दर शनिवारी, गेम डे ला “ फुल टु राडा“ चालु असतो. ( राजला ते चांगलेच माहीत आहे). फॅन्स जबरदस्त नॉइज करतात.

अश्या स्टेडिअम्समधे जो बरोला खेळण्याची सवय असल्यामुळे तो परवा सहज बोलुन गेला की चिफ्सच्य अ‍ॅरोहेड स्टेडिअमची ( जे सगळ्या अमेरिकेतले लाउडेस्ट एन एफ एल स्टेडिअम आहे!) त्याला बिलकुल भिती वाटत नाही! जो बरो इज राइट! मी स्वतः जॉर्जिया बुलडॉग्सचा गेम जॉर्जियाच्या सॅनफर्ड स्टेडिअममधे बसुन बघीतला आहे! अक्षरशः कानठळ्या बसल्या होत्या माझ्या!

पण तो तस बोलला म्हणुन काही थिन स्किन्ड चिफ्स फॅन्सना त्याच्या त्या “ अ‍ॅरोगंट“ कॉमेंटचा राग आला आहे. पण माझ्या मते तो खर तेच बोलला आहे. पुष्कळांना त्याचे“ डिमीनिअर” अ‍ॅरोगंट वाटते. टु मी दॅट गाय उझेस सुप्रिम कॉन्फिडंस!

एज अ ल्युझिअना स्टेट टायगर्स क्वार्टरबॅक , त्याने नुसती नॅशनल चँपिअनशिपच मिळवली नाही तर बेस्ट कॉलेज फुटबॉल प्लेयरची “ हाइझमन ट्रॉफी “ जिंकताना त्याने ती ट्रॉफी वाइडेस्ट मार्जिनने जिंकुन रेकॉर्ड केला होता. तसच त्याच्या सिनिअर यिअरमधे ७० टचडाउन टाकुन त्याने ऑल टाइम रेकॉर्ड करुन ठेवला आहे. ( इन कंपॅरिझन , महोम्सने टेक्सास टेकचा क्वार्टरबॅक असताना सिनिअर यिअरमधे ४० टचडाउन टाकले होते)

एन एफ ल ड्राफ्टमधे जो बरोला पहिल्या क्रमांकावर सिनसिनॅटी बेंगल्स ने २ वर्षापुर्वी निवडले होते. आणी एन एफ एल मधेही या वर्षी त्याने खळबळ माजवुन टाकली! पास कंप्लिशन्स मधे तो एन एफ एल मधे या वर्षी पहिला आहे. त्याच्यातले व त्यांचा वाइड रिसिव्हर जमार चेसमधले( जमार चेस ल्युझिआना स्टेटचाच आणी त्याला ड्राफ्ट करायला जो बरोनेच सिनसिनॅटी बेंगल्सला भाग पाडले) कनेक्शन जबरदस्त आहे. त्या दोघांनी मिळुन ३ आठवड्यापुर्वीच चिफ्सना त्यांच्या होम ग्राउंडवर( सिनसिनॅटी) हरवले होते.

त्यामुळे चिफ्सना हा गेम लाइटली घेउन चालणार नाही. माझा महोम्स, टायरि़क हिल, केल्सी वर खुप भरवसा आहे. पण चिफ्स डिफेन्सवर अजिबात नाही!

बघुयात, घोडामैदान २ दिवसावरच आले आहे.

मैत्रेयी, असामी, राज, रार, अश्विनी, फारेंड ,वैद्यबुवा,भास्कराचार्य. नंद्या ४३ तुमच्या सगळ्यांचा काय अंदाज?

नंद्या ४३, आमच्याकडेही महोम्सच्या मदतीला टायरिक हिल्स सारखा जबरदस्त डायनॅमिक, स्पिडी वाइड रिसिव्हर आहे. महोम्स व टायरिक हिलमधले डेडली कनेक्शन जगजाहीर आहे! तसच आमच्याकडे सुन टू बी होणारा “ हॉल ऑफ फेम “ कॅलिबरचा टाइट एंड ट्रॅव्हिस केल्सी सुद्धा आहे. त्याच्यातले व महोम्समधले गेल्या ४ वर्षांमधले इन्क्रेडिबल पासेस पाहीले आहेत का तुम्ही? तो टाइट एंड असुनही मोर ऑफन दॅन नॉट चिफ्स त्याचा वाइड रिसिव्हरसारखाच उपयोग करुन घेतात. रनींग बॅकचे म्हणाल तर सध्या रनींग बॅक बाय कमीटी! आमचा क्लाइड एड्वर्ड हिलेअर ( जो ल्युझिआना स्टेट युनिव्हर्सीटीमधे जो बरोचा रनींग बॅक होता) इन्ज्युर्ड नसेल तर तो १९९० मधल्या बिल्सच्या थर्मन थॉमस इतका किंवा १९९० मधल्या डॅलस काउबॉइजच्या एमेट स्मिथ इतका टॅलंटेड नसला तरी चांगल्यापैकी इफेक्टिव्ह रनींगबॅक आहे. तो ग्रेट महोम्सला जास्त इफेक्टिव्ह करायला जस्ट गुड इनफ आहे.

असामी , सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टिनायनर्स व ग्रिन बे पॅकर्स गेममधे जिमी गरॅफिलो व फॉर्टिनायनर्स चा ऑफेन्स वॉज लिटरली नॉन एक्झिस्टंट! गरॅफिलोचे क्वार्टर बॅक रेटींग १३ होते! तसे असुनही ते जिंकले. आणी तिकडे बिचारा जॉश अ‍लन आमच्याविरुद्ध फ्लॉलेस खेळुनही व ऑल्मोस्ट पर्फेक्ट असे १३६ रेटींग असुनही हरला! हाउ ट्रॅजिक!

खर म्हणजे ए एफ सी मधे एकापेक्षा एक सरस क्वार्टरबॅक्स ठासुन भरले आहेत.पॅट्रिक महोम्स,जॉश अ‍ॅलन, जो बरो, जस्टिन ह्युबर्ट वगैरे वगैरे. त्याउलट एन एफ सी मधे ब्रेडी व एरन रॉजर्स हे २ उतरणीला लागलेले क्वार्टरबॅक्स सोडले तर सागळे सबपार क्वार्टरबॅक्स भरले आहेत( विथ द एक्सेप्शन ऑफ सिअ‍ॅटल सिहॉक्स चा रसेल विल्सन मे बी)

हे खुपच अन्यायकारक आहे की जॉश अ‍ॅलनसारखा क्वार्टरबॅक घरी बसला आहे व फडतुस गरॅफिलो अजुन खेळत आहे!

दुसरी गोष्ट म्हणजे तु म्हणतो ती “ व्हिंटेज स्ट्रॅटीजी“ आता आउटडेटेड झाली आहे. १९८५ शिकागो बेअर्स व २००८ न्यु यॉर्क जायंट्स सारख्या टीम्स व त्यांच्यासारखा खेळ आता तुमच्या पदरी सुपरबोल आणणार नाहीत.

खासकरुन ए एफ सी मधे तुमच्याकडे जर ३५-४० पॉइंट्स करुन देणारा गन स्लिंगर क्वार्टर बॅक नसेल तर तुम्ही सुपरबोल मधे जाण्याच स्वप्न बघायचे सोडुनच दिले पाहीजे व तसा क्वार्टरबॅक नसल्यामुळे ए एफ सी मधे तुम्ही पेरिनिअली महोम्स, अ‍ॅलन,बरोज व हर्बर्टच्या मागेच येणार. ( उदाहरणार्थः या वर्षीच्याच न्यु इंग्लंड पॅट्रिअट्स व बफेलो बिल्समधल्या प्ले ऑफ्स गेमचे उदाहरण घे. बिल बिलाचेकने त्याची तु म्हणतो तशी व्हिंटेज स्ट्रॅटीजी बफेलो बिल्स व जॉश अ‍ॅलन बरोबर वापरुन बघीतली. काय झाले? गन स्लिंगर अमेझींग जॉश अ‍ॅलनने पॅट्रिअट्सचा पार धुव्वा उडवुन टाकला. पॅट्रिअट्स कडे मॅक जोन्स सारखा अगदीच सुमार क्वार्टरबॅकअसल्यामुळे त्या व्हिंटेज स्ट्रॅटीजीचा बिल बेलाचेकला शुन्य उपयोग झाला! )

एखाद दुसर्‍या वेळी एन एफ सी मधल्या मिडिअकोर टीम्स ए एफ सी च्या टीम्सचा ऑफेन्स “ मडी अप“ करुन त्यांना हरवु शकतील( जसे गेल्या वर्षीच्या सुपरबोलमधे टँपा बे ने चिफच्या सेकंड लाइन ऑफेन्सिव्ह लाइनबरोबर व इन्ज्युर्ड महोम्स बरोबर केले होते!) पण लवकरच एन एफ सी टीम्सना रेलेव्हंट राहायचे असेल तर त्यांनी कायलर मरे, जेलन हर्ट, डेक प्रेस्कॉट व जिमी गॅरॅफिलो सारख्या सबपार क्वार्टरबॅक्सना हाकलुन देउन लवकरच महोम्स, अ‍ॅलन, जो बरो सारख्या क्वार्टरबॅक्सना भरती केले पाहीजे.

१: दोन्ही टिम्सनी, २ मिनीट वॉर्निंग नंतरच्या उरलेल्या २ मिनीटात क्लॉक मॅनेजमेंट चांगले करण्याऐवजी पटकन टचडाउन करण्याची घाइ केली का? त्या २ मिनिटात बफेलोने २ टचडाउन्स केले व चिफ्सनी १ टच डाउन व १ फिल्ड गोल केला( म्हणजे २ मिनीटात २४ पॉइंट्स!) . >>> ते म्हणजे सवाल आणि बिन्तोड जवाब असे सुरु होते. आता म्हणायला ठीक आहे की क्लॉक मॅनेज करायला हवे होते, पण दोन्ही टीम्स तुल्यबळ आणि असे डायनामिक क्यूबीज असताना जे झाले तेच जास्त पॉसिबल होते. अर्थात ती दोन मिनिटे फुटबॉल फॅन्स साठी निव्वळ ट्रीट होती.

फक्त १३ सेकंद बाकी असताना व पराभव समोर दिसताना, न गोंधळता, काम, कुल, कलेक्टेड राहुन महोम्सने ते १३ सेकंद कसे वापरले? >>> खरं आहे! इतक्या प्रेशर मधे अजिबात जिटरी, इम्पल्सिव न होता ज्या कूलली त्याने ते शेवटचे दोन पासेस टाकले ते अनबिलिव्हेबल होते. अ गोट इन द मेकिंग Happy
माझ्या मते एनेफ्सी चँपियनशिप गेम बोरिंग होणार आहे. बेन्गाल्स आणि चीफ्स ना बघायला एक्साय्टेड आहे मी!

१: दोन्ही टिम्सनी, २ मिनीट वॉर्निंग नंतरच्या उरलेल्या २ मिनीटात क्लॉक मॅनेजमेंट चांगले करण्याऐवजी पटकन टचडाउन करण्याची घाइ केली का? त्या २ मिनिटात बफेलोने २ टचडाउन्स केले व चिफ्सनी १ टच डाउन व १ फिल्ड गोल केला( म्हणजे २ मिनीटात २४ पॉइंट्स!) .
>> बफेलो ला दुसरे काही जमणे अशक्य होते. तू बफेलो चे किती गेम्स बघीतले आहेस मला माहित नाही पण अडचणीत आला कि अ‍ॅलन एक तर धावत सुटतो किंवा भुंगाट थ्रो करतो. मला त्यात काही नवीन वाटले नाही. सॉरी मी त्या बँडवॅगनवर बसणार नाही महोम्स बद्दल त्यात नवीन काही नाही. अँडी रीड फिली मधे असताना त्याचे क्लॉक मॅनेजमेंट पाहिले आहे त्यामूळे महोम ला जे झोपेतही जमणार ते करु देणे शहाणपणाचे होते.

२ : फक्त १३ सेकंद बाकी असताना बफेलोने एंड झोनमधे किक( इन्स्टेड ऑफ स्क्विबींग इट) करुन घोड चुक केली का?
>> आत्याबाई ला मिशा असत्या तर ह्यात शिरण्यात काय पॉईंट रे Happy

हे खुपच अन्यायकारक आहे की जॉश अ‍ॅलनसारखा क्वार्टरबॅक घरी बसला आहे व फडतुस गरॅफिलो अजुन खेळत आहे! >> हे मला पटत नाही. गेममधे एक क्वार्टरबॅक नसतो फक्त. तुझ्यासारख्या व्हिंटेज गेम्स बघितलेल्या माणसाकडून हि कमेंट यावी ह्याचे अजून वाईट वाटले रे. कॉलेज फूटबॉल नि ह्यात काय फरक उरला मग ? नियमावर नियम लावून डिफेन्स ला दुबळे करून प्रोटेक्टेड ऑफेन्स चे भरमसाठ मह्त्व वाढवलय सध्या. त्यामूळे ह्या गन स्लिंगिंग चे कौतुक मला एका लिमिटपुढे खरच वाटत नाही. उद्या क्वार्टरबॅक धावयला लागला कि इव्हरीथिंग इज गेम असा रुल होउ दे मग मजा बघ. दूध का दूध नि पानी का पानी होईल मग. (महोम्स दूध असेल ह्यात मला शंका नाही.) आज काल धावत्या क्वार्टरबॅक ला हात लावायला सुद्धा घाबरतात डीफेंडर . नुसता ऑफेन्स बघायला मला तरी बोअर होते. बॅलन्स गेम्स जास्त धमाल असतात. कॅन्सस सिटी जिंकेल हे माहित असले तरी कंप्लीट टीम जिंकावी अशी माझी इच्छा !

एन एफ सी टीम्सना रेलेव्हंट राहायचे असेल >> ही सायकल असते . आता एन एफ सी टिम्स पहिले ड्राफ्ट पिक करायला लागेल नि त्यांची टीम बिल्डींग सुरू होईल.

मैत्रेयी, आपण जर “ गोट“ हा शब्द जर इथे परत एकदा वापरला तर वैद्यबुवा आपल्याला बदडुनच काढेल बघ! Happy

पण तु म्हणतेस ते बरोबर आहे. शेवटच्या २ मिनिटात जर ते दोघे तसे घाबरुन डिफेन्सिव्ह , वेळकाढु धोरणाने खेळले असते तर ते त्यांच्या नैसर्गीक खेळाला शोभले नसते. ते म्हणजे विव्ह रिचर्ड्सने वन डे मॅचमधे बॉयकॉटसारखे कॉपी बुक स्टाइल टुकु टुकु खेळण्यासारखे झाले असते Proud

असामी, तुझा जरा गैरसमज झाला आहे मी काय म्हणतोय त्याच्याबद्दल.

लेट मी एक्स्प्लेन इन अ डिफरंट वे!

तु म्हणतोस तसा, स्ट्राँग रनींग गेम, सफोकेटींग डिफेन्स व सम मिडिअकोअर ऑफेन्सचा गेम आता उपयोगाचा नाही हे मी का म्हणतो त्याचे कारण जरा लक्षात घे.

माझ्या ऑब्झर्व्हेशन नुसार सध्याचा एन एफ एल ऑफेन्स हा सध्याच्या डिफेन्स पेक्षा जास्त वेगात इव्हॉल्व्ह होत चालला आहे. डिफेन्स अजुन जो माँटॅना, डॅन मरीनो, जिम केली, जॉन एलवे, ट्रॉय एकमन,ब्रेट फार्व्ह, ड्र्यु ब्रिझ, एरन रॉजर्स, बेन रॉथलेसबर्गर, पेटन मॅनींग व टॉम ब्रेडी अश्या यस्टरयिअरच्या ग्रेट क्वार्टरबॅक लोकांच्या खेळावर अडकुन पडला आहे.

ते सगळे मातब्बर क्वार्टरबॅक होते यात किंचीतही संदेह नाही! पण त्या एकजात सगळ्या क्वार्टरबॅक्स मधे एक गोष्ट कुठली कॉमन होती/ आहे? त्यांची पॉकेट मधली मोबीलिटी! ते एकजात सगळे मोस्टली पॉकेट मधे राहुनच त्यांचे थ्रो करत असत. ( जॉन एलवे मे बी त्याला थोडासा अपवाद होता.)मग तश्या त्यांच्या खे़ळाला एक जबरद्स्त स्ट्राँग , गेंड्यासारखा व सांड रनींग बॅकची नितांत आवशक्यता असायची. म्हणुन मग रॉजर क्रेग, थर्मन थॉमस, एमेट स्मिथ , जेरोम बेटीस सारखे रनींग बॅक उदयास आले. त्यांच्या रनींग गेममुळे मग हे सगळे क्वार्टरबॅक्स प्ले अ‍ॅक्शन चा सढळ उपयोग करुन खुप प्रभावी बनु शकत होते. पण त्या सगळ्यांमधे पॉकेट मोबिलिटी फारच लिमिटेड होती व त्याहुनही लिमिटेड( ऑलमोस्ट नॉनएक्झिस्टंटच म्हण ना!) वॉज देअर रनींग थ्रेट!

त्यामुळे सगळा डिफेन्स तश्या प्रेडिक्टेबल क्वार्टरबॅक खेळावर केंद्रित झाला होता. तो एन एफ एल चा व्हिंटेज डिफेन्स अजुन तसाच राहीला आहे.

मिनव्हाइल इथे आता नविन जमान्यातले क्वार्टरबॅक्स एन एफ एल मधे यायला लागले. ते म्हणजे, महोम्स, जॉश अ‍ॅलन, जॉश हर्बर्ट वगैरे. त्यांच्यात व यस्टरयिअर च्या क्वार्टरबॅक्स मधे काय फरक दिसुन येतो आपल्याला? दे आर फिटर अँड स्ट्राँगर दॅन यस्टरयिअर्स क्वार्टरबॅक्स! दे ऑल हॅव्ह रिडिक्युलस आर्म स्ट्रेंग्थ. बट टु मी द मोस्ट इंपॉर्टंट डिफरन्स इज दे आर व्हेरी अजाइल, एक्स्ट्रिमली मोबाइल इन द पॉकेट अँड दे आर अ लेजीटेमेट थ्रेट अ‍ॅज रनर्स! डिफेन्स हॅज टु अकाउंट अ‍ॅण्ड टेक इन्टु कन्सिडरेशन देअर अ‍ॅबीलिटी टु गॉबल अप १०, २०, ३० ईव्हन ४० यार्ड्स रशींग अँड स्कोर टच डाउन विथ देअर रनींग गेम!

तु खर सांग! महोम्स व जॉश अ‍ॅलन ला तु तसे रशींग टच डाउन करताना किती वेळा पाहीले आहेस?

मग अश्या न्यु जनरेशन क्वार्टरबॅक्सना थोपवायला तुझा व्हिंटेज डिफेन्स ( जो जुन्या क्वार्टरबॅक्सच्या स्किल्सवर आधारलेला होता) कसा कामी येइल?

म्हणुन मी वर म्हणालो की डिफेन्स हॅज नॉट इव्हॉल्व्ह्ड टु कंटेन धिस न्यु जनरेशन क्वार्टरबॅक्स! आणी जोपर्यंत डिफेन्स महोम्स/ अ‍ॅलन अँड कंपनीशी कॉट अप होत नाही तोपर्यंत असले नेक्स्ट जेन क्वार्टरबॅक्स डिफेन्सची ऐशी तैशी करत राहणार.

मग जे जुन्या पद्धतींना चिकटुन बसतील त्यांना असच वाटणार की सगळा गेम ऑफेन्स ओरिएंटेड व वन साइडेड झाला आहे. असामी, तु म्हणतोस की डिफेन्सिव्ह बॅक्स या असल्या क्वार्टरबॅक्सना हात लावायला पेनल्टी मिळेल म्हणुन घाबरतात , अरे पण वस्तुस्थिती अशी आहे की या नविन क्वार्टरबॅक्सना त्यांच्या जबरदस्त मोबिलिटी मुळे सॅक किंवा टॅकल करायला डिफेन्सच्या नाकाला फेस येतो! ४ मॅन रश कर का ऑल आउट ब्लिट्झ कर, महोम्स, अ‍ॅलनसारखे क्वार्टरबॅक पॉकेटच्या कधी डावीकडे, मग मागे वळुन परत गोल फिरुन पॉकेटमधे, मग तिथुन पॉकेटच्या उजवीकडे असे डिफेन्सला त्यांच्यामागे पळवत १०-१०, १५-१५ सेकंदाचा टाइम बाय करतात ( इथे घरी आपण सोफ्यावरुन वैतागुन उठुन आपल्या टीमच्या डिफेन्सला ओरडुन ओरडुन बोंबलत असतो, अरे पकडा ना याला! छ्या..कसला भिकार डिफेन्स आहे आपला!) आणी मग तो पर्यंत अफकोर्स वाइड रिसिव्हर्स सहज ४०-५० यार्ड पुढे जाउन वाइड ओपन झालेले असतात आणी मग हे नविन जनरेशन क्वार्टरबॅक त्यांच्याकडे त्यांच्या मासिव्ह आर्म स्ट्रेंग्थने लिलया टच डाउन पास टाकतात व आपण हताश होउन आपल्या डिफेन्सवर( विनाकारण) फ्रस्ट्रेट होउन परत सोफ्यावर चरफडत बसतो!

म्हणुन असामी, सो लाँग कोण “माइचा लाल” इनोव्हेटिव्ह डिफेन्सिव्ह को ऑर्डिनेटर किंवा कोच या नविन जनरेशनच्या क्वार्टरबॅक्सना कसे थोपवायचे याची ब्ल्यु प्रिंट इन्व्हेंट करुन एन एफ एल मधे येत नाही तोपर्यंत पुढची काही वर्षे एन एफ एल विल बी डॉमिनेटेड बाय ऑफेन्स ,ब्लेस्स्ड अँड लेड बाय क्वार्टरबॅक्स लाइक महोम्स अँड जॉश अ‍ॅलन, व्हेदर यु लाइक इट ऑर नॉट माय फ्रेंड!

अरे पण वस्तुस्थिती अशी आहे की या नविन क्वार्टरबॅक्सना त्यांच्या जबरदस्त मोबिलिटी मुळे सॅक किंवा टॅकल करायला डिफेन्सच्या नाकाला फेस येतो! >> कठीण आहे हो जरुर. पण ही नवीन पिढीच नाहीये. रसेल विल्सन, कॅपरनिक, कॅम, ग्रिफिन ज्यु. हे सगळेही तसेच होते किंवा आहेत. तू इतकी वर्षे गेम बघतो आहेस - तुला किती रुल चेंजेस डीफेन्स च्या बाजूने झालेले आठवतात ह्याउलट किती ऑफेन्स च्या ? विशेषतः क्यु.बी ला हात लावण्याबद्दल झालेले नियम बघ. पूर्ण गेम ऑफेन्स साठी बायस्ड केला जात असताना क्वार्टरबॅक्स चे कौतुक होणे साहजिक आहे. सगळा गेम ऑफेन्स ओरिएंटेड व वन साइडेड होणे हे चक्र २००८ पासून सुरू झालेले आहे. पोते भरून अजाईल क्वार्टरबॅक्स हे नवीन आहे एव्हढ्च. "तु म्हणतोस तसा, स्ट्राँग रनींग गेम, सफोकेटींग डिफेन्स व सम मिडिअकोअर ऑफेन्सचा गेम आता उपयोगाचा नाही" हे मलाही माहित आहे हे वर म्हणतोय पण त्याचा अर्थ त्याची आशा धरू नये असे कुठे आहे . बाय द वे, ईट इज मोअर लाईक 'स्ट्राँग रनींग गेम, सफोकेटींग डिफेन्स व डीसेंट ऑफेन्स'

तू जॉश अ‍ॅलन वरून फारच भावूक होतो आहेस म्हणून - प्लेऑफ गेम सोडून त्याचे आधीचे गेम्स बघ. तो किती वेळा टॅकल केला गेला नि कसा हे लक्षात येईल.

>>“ पण राज.. पण अजुनही ब्रेडीवर सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही.. बेस्ड ऑन सर्कमस्टँशिअल एव्हिडन्स ओन्ली! ख खो फक्त ब्रेडीच जाणे!<<
आय्ला मुकुंद, हे तर एव्हढं रामायण झाल्यावरहि रामाची सीता कोण, हे विचारल्या सारखं झालं. ब्रेडिला सस्पेंशन, क्राफ्टला फाइन इ. विसरलास? शिवाय त्या वर्डिक्टला अपील न करता, गपगुमान लाइनीवर आले; आर्मी ऑफ लॉयर्स असुनहि. का बरं? ब्रेडि इनसंट होता म्हणुन?

बाकि, माझा मुद्दा तुला कळला कि नाहि हि शंका उरतेच. परत एकदा सांगतो - वन कॅनाट बि ए गोट विथ ए ब्लडि स्टेन ऑन हिज करियर. पिरियड. बाकिच्यांचं जाउदे, ते तर "जिथे वजन, तिथे भजन" कॅटेगोरीतले आहेत, पण तु सुद्धा बळी पडलास - इज काइंडा डिसअपॉयंटिंग...

मी गेमचा अंदाज करण्याइतका सीझन बघितलेला नाही. ४९नर्स शी जुन्या लॉयल्टीमुळे त्यांना रूट करणार Happy

बाकी फुटबॉलची आवड ही भारतात लहानपणी टेनिसची आवड व माहिती जशी फ्रेंच ओपन ते विम्बल्डन या काळात जागी होत असे व नंतर विरून जात असे, तसे होते माझे Happy

पण आता तो काळ आलाय, त्यामुळे उद्याच्या आणि १३ च्या गेम मधे इंटरेस्ट आहेच.

असामी, लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री. सॉरी टु डिसअ‍ॅपॉइंट यु Sad

राज, लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री. सॉरी टु डिसअ‍ॅपॉइंट यु टु Sad

काय आहे, एका ठराविक लिमिटनंतर वाद आवरता घेता आला पाहीजे. नाहीतर त्याला अंतच नाही.

लेट्स एंजॉय द गेम वुइ ऑल लव्ह! मे द बेस्ट टीम विन! मग क्वार्टरबॅक कोणीपण असु देत, टीम कोणती पण असु देत, त्यांची स्टाइल कोणती पण असु देत!

बाय द वे..ब्रेकीग न्युज! टॉम ब्रेडी रिटायर झाला! Sad

>>राज, लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री. << +१
गुड कॉल...

>>टॉम ब्रेडी रिटायर झाला<<
धिस वन इज ए गुड कॉल टू. सनीपाजी म्हणुन गेले आहेत - रिटायर व्हेन पिपल आस्क व्हाय, रादर दॅन व्हाय नॉट... Wink

असामी, लेट्स अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री. सॉरी टु डिसअ‍ॅपॉइंट यु >> मुकुंद सॉरी कशाला रे ? पिंडे पिंडे मतेर्भिन्ना होणारच. तू ऑफेन्स ओरियेंटेड विचार करतो आहेस हे जाणवते फक्त मला डीफेन्स बद्दल जास्त आत्मियता वाटते एव्हढेच.

गोट ब्रेडी रीटायर नाही झाला रे अजून. त्याने कंफर्म केले नाही. यंदा झाला तर अगदीच फुसकट बार अस म्हणायला लागेल. मला उगाच आपले वाटते कि तो विलफोर्क सारखा रीटायर होईल.

आजच्या गेममधे चिफ्स बरोबर कसे खेळायचे याची ब्ल्यु प्रिंट बफेलोने सिनसिनॅटी बेंगल्सना देउन ठेवली आहे. प्ले ४थ डाउन ऑन एव्हरी पझेशन इफ निडेड!( मला वाटत बिल्स ऑल्मोस्ट प्रत्येक वेळेला ४थ डाउन खेळले होते. त्यांचे २ टच डाउन ४थ डाउन वर झाले होते)

प्ले ४ डाउन ऑन एव्हरी डाउन म्हणजे महोम्सच्या हातात बॉल कमी वेळा येइल. या स्ट्रॅटीजीमधे जुगार जरुर आहे पण नो रिस्क- नो रिवॉर्ड!

मला आश्चर्य वाटणार नाही की जर बेंगल्सचा कोच बेंगल्सच्या ओनरकडे जाउन बोलला असेल की मी प्रत्येक पझेशन मधे ४थ डाउन जाणार आहे इफ निडेड, बॉल कुठेही असु देत! ही स्ट्रॅटीजी गिव्ह्स अस द बेस्ट चांस टु विन अगेन्स्ट चिफ्स टुडे पण त्या स्ट्रॅटीजीमुळे जर आज आपण हरलो तर मला फायर करायचे नाही! Happy

हॅट्स ऑफ टु जो बरो! वेल डन!

अनफॉर्च्युनेटली माझे भविष्य खरे ठरले!

चिफ्सनी खुप चुक केल्या. महोम्सने अन्कॅरेक्टस्टिकली खुप चुका केल्या. चिफ्सचे काही काही निर्णय खुपच अनाकलनिय होते.

बेंगल्स डिझर्व्ह्ड टु विन!

>>हॅट्स ऑफ टु जो बरो! वेल डन!<<
सुरुवातीचा गेम मी मिस केला, यार. (५०+ डिग्री, सनी वेदर, पर्फेक्ट फॉर गॉल्फ), पण शेवटची ५ मिनिटं पाहिली. महोम्स वाज सॅक्ड टु टाइम्स, अँड सेकंड टाइम लकि नॉट टु लूझ ए पझेशन. मॅनेज्ड टु टाय द गेम, बट कुडंट स्कोर डिस्पाय्ट विनिंग द टॉस? चीफ्स डिझर्व्ड द लॉस; आफ्टरऑल, कॉइनटॉस कॅनॉट डिसाय्ड योर फेट...

आज महोम्स आणि चीफ्स ने शेवटचे काही मिनिटे भरपूर ( आणि अनाकलनीय) चुका केल्या त्या अर्थातच निर्णायक ठरल्या. सो सॉरी मुकुंद!
अ‍ॅक्चुअली ओवरटाइम आणि पुन्हा एकदा टॉस जिंकले तेव्हा "फुटबॉल गॉड्स आर वन्स अगेन विथ कॅन्सस" असे म्हणता म्हणता "..... ऑर नॉट!" असे म्हणावे लागले! लागोपाठ दोन गेमस ओवरटाइम मधे जिंकण्याचा पराक्रम झाला नाही.

मैत्रेयी, मी आधीच भाकीत केले होते. फुटबॉल गॉड्स आर विथ जो बरो! तोच सुपरबोल जिंकणार आहे.

एनीवे, आतापर्यंतच्या प्लेऑफ्स गेम्सवरुन एकच सिद्ध होते. तुमच्याकडे महोम्स/ अ‍ॅलन सारखे उबर टॅलंटेड क्वार्टरबॅक्स असोत वा गर्रॅपिलो/ मॅथ्यु स्टॅफर्ड सारखे फाल्तु क्वार्टरबॅक्स असोत, किंवा असामी म्हटतो तस तुमच्याकडे ग्रेट डिफेन्स असो किंवा मी म्हणतो तस ग्रेट ऑफेन्स असो, फुटबॉलमधे तुम्ही लकी असण खुप मह्त्वाच असत. नाहीतर मॅथ्यु स्टॅफर्ड सारखा अतिशय सुमार क्वार्टरबॅक व एल ए रॅम्स सारखी असंख्य चुका करणारी टीम( अन्डिझर्व्ह्ड) टीम सुपरबोलमधे आली नसती.

माझ्या मते बेंगल्स्/रॅम्स पैकी बेंगल्स ही एकच टीम सुपरबोलमधे त्यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर सुपरबोलमधे आली आहे.तीच बाब स्टॅफर्ड व जो बरो बाबत. फक्त जो बरोच त्याच्या अनबिलिव्हेबल पॉइजच्या व खेळाच्या बळावर सुपरबोलमधे आला आहे. मॅथ्यु स्टॅफर्डला मटका लागला म्हणुन तो सुपरबोलमधे आहे. कसला फाल्तु खेळला सबंध एन एफ सी चँपिअनशिप गेम मधे आज तो. कुपर कपला टाकलेले २ टच डाउन पासेस सोडले तर त्याचा बाकीचा गेम म्हणजे ( नेहमीप्रमाणेच)आनंदी आनंदच होता. पण गरॅपिलोचा खेळ तर ( नेहमीप्रमाणे) अजुनच आनंदी आनंद होता. त्याचा तो शेवटचा इंटरसेप्ट झालेला पास किती केविलवाणा होता!

पण त्याचे व एल ए रॅम्सचे लक असच चालु राहीले तर काय सांगता येत नाही ते सुपरबोलही जिंकतील. तस झाल तर आपण मान शेक करत करत सुपरबोल बघायचा! पण मला मनापसुन वाटत की जो बरो व सिनसिनॅटी बेंगल्सने सुपरबोल जिंकावे. माझ्या मते ते सुपरबोलचे हक्काचे दावेदार आहेत.

मी वर जो बरोबद्दल, त्याच्या कॉलेज करीअरबद्दल, त्याच्या सुप्रिम कॉन्फिडंस बद्दल व एकंदरीत त्याच्या खेळाबद्दल आजच्या गेम आधी २-३ दिवस आधी इथे सविस्तर लिहीलेच होते. त्यामुळे त्याने आज आम्हाला अ‍ॅरोहेड मधे येउन हरवले याचे मला बिलकुल नवल वाटले नाही. म्हणुन मैत्रेयी, तुला सॉरी म्हणण्याचे कारण नाही. जो बरो खरोखरच आजच्या त्यांच्या विजयाचा हक्काचा दावेदार होता. पण तरीही थँक्स फॉर स्पेअरींग अ थॉट फॉर मी इन अवर सॅड अँड हार्टब्रेकींग लॉस.

राज, थँक्स फॉर रबींग इट इन!

कालची मॅच आम्ही हरल्यावर थोड्या विचारचिंतनानंतर का हरलो याची मला वाटलेली २ कारणे

१: चिफ्सना व महोम्सला झालेला गर्व त्यातुन निर्माण झालेला हावरटपणा

२: अंडरएस्टिमेटींग अमेझिंग जो बरो!

महोम्स कितीही चांगला क्वार्टरबॅक असला तरी गर्वाचे घर खाली होतेच! पहिल्या हाफमधे हाफटाइमच्या जरा आधी २१-१० असे पुढे असताना व बॉल महोम्सच्या हातात असताना , व बेंगल्सच्या १ यार्ड लाइनवर असताना चिफ्सनी त्यांना मिळालेले चारही मोके फुकट घालवले! अश्या महत्वाच्या मॅचमधे ज्यात सुपरबोलला जाणे लाइनवर असताना , सोप्पे ३ पॉइंट्स मिळत असताना महोम्सला आपण सुपरमॅन आहोत असे वाटुन गर्व झाला. त्याला वाटले गेल्या आठ्वड्यातल्या मॅचचा तो सुपरहिरो होता म्हणुन आजही तो वाट्टेल ते करु शकतो. अश्या गर्वात ३र्ड डाउनवर, फक्त ४ सेकंद्स व टाइम आउट शिल्लक नसताना, एंड झोनमधे टच डाउन पासचा प्रयत्न करायच्या ऐवजी ४ यार्डवर, मागे ,टायरिक हिलकडे , ज्याला डबल टीम केले होते, बॉल फेकुन इसेन्शिअली त्याने तो डाउन रनींग प्ले केला, अर्थातच हिलला तिथल्या तिथे गारद करुन बेंगल्सने मोट्ठा मोमेंटम शिफ्ट होणारा खेळ केला व चिफ्सचे दुसर्‍या हाफमधे झालेले पानीपत तिथुनच सुरु झाले.

पहिला हाफ इतका सोप्पा गेल्यावर चिफ्सच्या ऑफेन्सला धुंदी चढली व ते तसे धुंदीतच खेळले. गेम आपल्या खिशात आहे या नशेत ते महोम्सला प्रोटेक्ट करायचेच विसरुन गेले! बिचारा महोम्स सैरावैरा पळत होता सबंध दुसर्‍या हाफमधे. सॅक्स काय, इंटरसेप्शन काय.. काय वाट्टेल तसे चिफ्स धुंदी चढल्यासारखे खेळु लागले. बेंगल्सच्या डिफेन्सने पहिल्या हाफपेक्षा वेगळा असा काही डिफेन्स दाखवला नव्हता. चिफ्स स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेत होते. नुसत्या महोम्सलाच नाही तर ऑफेन्सिव्ह लाइनलाही गर्व झाला होता की महोम्स म्हणजे साक्षात सुपरमॅन आहे व तो प्रत्येक वेळी , इथे तिथे पळुन पासेस कंप्लिट करेल. त्यामुळे त्यांनी रनींग गेम टाकुनच दिला. महोम्सला प्रोटेक्ट करायचे त्यांचे काम ते विसरुन गेले. त्यांच्या डोक्यात ते ऑलरेडी सोफाय स्टेडिअममधे सुपरबोलला पोहोचले होते.

ओव्हरटाइमधेही महोम्स आणी चिफ्सची नशा काही अजुन उतरली नव्हती. परत एकदा रनींग गेम टाकुन देउन पहिल्या डाउनपासुनच महोम्सने बॉल फेकायला सुरुवात केली. जणु काही परत फक्त १३ सेकंदच बाकी होते! अरे पुर्ण १५ मिनीटे होती त्याच्याकडे टच डाउन करायला! पण नाही! परत एकदा त्याच्या गर्वाने( अनकॅरे़टस्टिक फॉर महोम्स!) डोके वर काढले. ३र्ड डाउनवर , टायरिक हिलला परत एकदा डबल टीम केले असताना , त्याने बळजबरीने त्याच्याकडेच बॉल घुसवायचा इल अ‍ॅड्व्हाइज्ड निर्णय घेतला.

३ आठ्वड्यापुर्वी बेंगल्सनी चिफ्सला जसे हरवले अगदी त्ताचीच पुनरावृत्ती काल झाली. त्या गेमनधेही आम्ही असेच हाफटाइमला पुढे होतो व दुसर्‍या हाफमधे फिझल्ड आउट झालो. तेव्हा वाटले होते आम्ही आमच्या पुअर डिफेन्समुळे हरलो. पण वाटले होते की चिफ्सचे खेळाडु व कोचींग स्टाफ त्यातुन काहीतरी धडा घेतील, शिकतील. पण अँडी रीड आणीत्याचा कोचींग स्टाफ गर्वात गाफील राहीले. गेल्या आठ्वड्यातील मिरॅक्युलस विजयाची त्यांची नशा तशीच राहील्यासारखे ते खेळले.

उलट बेंगल्स कोचींग स्टाफ व जो बरो त्यांच्या गेल्या आठ्वड्यातल्या विजयाने उन्मत्त न होता खेळले. त्यांच्या खेळात परपज होता. कामनेस होता. विश्वास होता. आणी त्या सर्वाला अमेझिंग जो बरो कारणीभुत होता! तो म्हणतो तस त्यांच्या अश्या विजयांना अपसेट न म्हणता “ गेट युस्ड टु इट!”

चिफ्स ,महोम्स व सबंध चिफ्स किंग्डमला अस वाटु लागले होते की लागोपाठ ४ वेळा ए फ सी चँपिअनशिप मधे ते गेल्यामुळे ते न्यु इंग्लंडसारखी डायनॅस्टी बनत चालले आहेत. महोम्सच्या रुपाने दुसरा टॉम ब्रेडी त्यांच्याकडे अवतार घेउन आला आहे. पण सो फार चिफ्स कडे एकच सुपरबोल आहे व आता गेल्या चार वर्षात ते दोन वेळा ए एफ सी चँपिअनशिपमधे हरले आहेत व एकदा सुपरबोलमधे सपाटुन मार खाउन परत आले आहेत! नॉट मच लाइक डायनेस्टी टु मी! हे चिफ्सना जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर ते परत गेमच्या बेसिक्स कडे लक्ष देउन सुपरबोल जिंकुन चांगले रिझल्ट्स मिळवतील. महोम्सकडे खचितच तशी क्षमता आहे.

पण या जो बरो कडे बघुन मात्र वाटते की तो टॉम ब्रेडीचा वारसदार होउ शकतो!

गो बेंगल्स्स! गो जो बरो!

>>राज, थँक्स फॉर रबींग इट इन!<<
डिडंट मीन टु, यार...

एनीवेज, तुझ्या जुन्या शेजार्‍यांना होमफिल्ड अ‍ॅडवांटेज आहे रे, कुछ भी हो सकता है...

बेंगल्सच्या डिफेन्सने पहिल्या हाफपेक्षा वेगळा असा काही डिफेन्स दाखवला नव्हता. >> अरे काय बोलतोस तू मुकुंद. दुसर्‍या हाफमधे त्यांनी मिडफिल्ड कव्हरेज दुप्पट केले नि २-३ लाईन बॅकर वापरून ब्लित्झ केले. महोम्स ला पॉकेट मधे अधिक वेळ राहायला फोर्स केले. जवळजवळ दुप्पट % होते कव्हरेज चे दुसर्‍या हाफमधे. ह्याच प्रकारचा खेळ पॅट्स नी सलग वापरला होता चिफ्स विरुद्ध. सीझनच्या सुरूवातीला महोम्स वि. हेच करत होते संघ त्यावर रीड ने मस्त अ‍ॅडजेस्टमेंट केली रन गेम अधिक वापरून. काल मधेच रन गेम सोडुन फक्त डीप पासेस च्या भरवशावर राहण्याचे कारण नाही कळले. hubris हे तू म्हणतोस ते बरोबर वाटते. रीड ऑफेन्स च्या मह्त्वामधे डीफेन्स कडे दुर्लक्ष करतो असे माझे मत आहे. "गेमच्या बेसिक्स कडे लक्ष देउन " म्हणजे डीफेन्स हा तेव्हढाच मह्त्वाचा भाग आहे. चलता है डीफेन्स मोक्याच्या वेळी फेल जातो. सात मिनिटे शेवटच्या ड्राईव्ह मधे घालवून स्वतःच्या डीफेन्स वर फार भरोसा नाही हे दाखवून केले नि बंगाल डी ने दात घशात घातले. बिल्स डीफेन्स नं. १ होता तो १३ सेकंद उभा राहिला नाही महोम्स पुढे नि बिल्स डीफेन्स जो वाकेन पण मोडणार नाही मधे खेळला तो तीन मह्त्वाच्या वेळी बेबी गोटला हतबुद्ध करून गेला. स्टॅट्स आर सो ओव्हररेटेड Happy

पण या जो बरो कडे बघुन मात्र वाटते की तो टॉम ब्रेडीचा वारसदार होउ शकतो! > +१ एकदम पॉईझ्ड असतो.

Pages