शाळेच्या आठवणी - ज्ञान प्रबोधिनी

Submitted by शब्दाली on 28 November, 2015 - 05:08

गणपतीत आठवणी लिहिताना शाळेच्या गणपती उत्सवाच्या आठवणी निघाल्या आणि वेगळा धागा काढुया असे बोलणे पण झाले. पण नेहमीप्रमाणे, बाकीच्या गडबडीत ते राहुनच जात होते.

काल माहेरी आवरा आवरी करताना ५ वीला प्रवेश मिळाल्याचे नलुताईंच्या स्वाक्षरीचे पत्र सापडले आणि पाठोपाठ काव्यदिंडीत इन्नाने लिहिलेली "Let My Country Awake" ही कविता वाचली आणि परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. मग मात्र आज धागा काढायचाच असा निश्चय केला.

ज्ञान प्रबोधिनीबद्द्ल - शाळा / संस्था - ज्यांना काही अनुभव, आठवणी लिहायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रश्न कशाला विचारतात? आणि तसंही देणगी उकळूनच प्रवेश देतात ना शाळेत? >>
उपाशी बोका , तुम्हाला या शाळेबद्दल , प्रवेश प्रक्रीयेबद्दल आणि देणगी(?)/फी बद्दल खरच माहिती आहे का ? किंवा कोणाकडुन काही कळले आहे का ? तसे असेल तर विस्ताराने लिहु शकता इथे.

अजिबात फोडू नका प्रश्न.... अरे हे प्रश्न पुढे आय आय टी मध्ये आणि नंतर यु पी एस सी ला येतात .... लपवलेलेच बरे Wink

वेटिंग लिस्ट मधून नंबर लागण्याची किती शक्यता आहे?
आमचा पाचवा, म्हणजे शेवटचा नंबर आहे..

नक्की लागेल नंबर. Keep your fingers crossed..
आमचा 6 वा नंबर होता वेटिंग ला आणि प्रचंड इच्छा होती नंबर लागावा अशी. 4 ऍडमिशन कॅन्सल झाल्या आणि वेटिंग मधले पाहिले 3 लोक पण गळाले. त्यामुळे आमचा नंबर लागला तेव्हा भयंकर आनंद झाला होता.
Just keep your will power strong...
खूप शुभेच्छा

सकाळी नऊ म्हणजे ठीक नऊ च्या ठोक्याला विश्रामबाग वाड्याच्या चौकात ज्ञानाप्रबोधिनीच्या "श्री गजाननाचा" रथ लागलेला असतो... प्रबोधिनीचे साधारण 500 विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी असे सर्व मिळून आधीच ठरल्याप्रमाणे आपापल्या जागा घेतात. ढोल ताशा पथक, ध्वजपथक, लेझीम पथक, बरची पथक श्रींना निरोप द्यायला सिद्ध असतात. पथक प्रमुख शेवटच्या सूचना देऊन आपापल्या जागा घेतात. पाचवी ते दहावी च्या मुलांमुलींचा कल्लोळ चालू असतो.
ठीक 9.30 च्या ठोक्याला सावधान ची सूचना येते आणि भर कुमठेकर रस्त्यावर इतका वेळ चाललेला गोंगाट एका क्षणात थांबतो. फक्त एका शिट्ट्टीवर सुमारे 700-800 आजी माजी विद्यार्थी स्तब्ध उभे रहातात. ध्वज उलगडले जातात..
ध्वजनमस्ते 1,2,3.... जोडलेले हात,झुकलेल्या माना
आणि पुढच्या सेकंदाला ताशा, लेझीम आणि बरची यांचा एकत्र गजर....
टचकन डोळ्यात पाणी येतं...
"प्रबोधिनीची शिस्त" असं इतके दिवस नुसतं ऐकून होतो पण आज त्याचा हा असा अनुभव शब्दातीत होता.
त्यापुढचे दोन तास अत्यंत सुरेख,शिस्तबद्ध मिरवणूक पाहिली.लेझीम, बरची, ढोल ताशा यांची सुंदर जुगलबंदी, बाप्पा च्या घोषणा, पुन्हा लहान होऊन नाचणारे माजी विद्यार्थी, जोशपूर्ण ध्वजपथक अशी अत्यंत दिमाखदार मिरवणूक ठरलेल्या वेळेत शाळेजवळ जोंधळे चौकात थांबली. तिथे परत एकदा एका ताला सुरात गणरायाची आरती, मंत्रपुष्पांजली होऊन आणि प्रबोधिनी प्रार्थना होऊन मिरवणुकीची सांगाता झाली.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे लोकमान्य टिळकांना नक्की काय अपेक्षित होतं ते आज पहिल्यांदाच कळलं.
प्रबोधिनीचे सर्व शिक्षक, युवती विभाग, युवक विभागाचे सर्व ताई दादा, पालक संघ आणि सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.
आम्ही प्रबोधिनीचा भाग आहोत याचा आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.
1-2-3-4 गणपतीचा जयजयकार
1-2-3-3-4 प्रबोधिनीचा हा ललकार
बोला गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या

स्मिता तुझा हा प्रतिसाद व्हॉट्सॅप वर आलाय मला एका ग्रुपमधे. खाली नाव असल्यामुळे माबोकर स्मिता श्रीपादच असणार वाटून गेलं अँड आय वॉज राईट Happy छान लिहिलं आहेस. माझं खूप आवडतं पथक. Happy

Pages