Submitted by चित्रा on 25 November, 2015 - 09:05
ट्रीप साठी उदयपूर - द लेक सिटी आणि जवळपासच्या ठिकाणा बद्द्ल माहिति हवी आहे.
पुण्यातून निघणार आहोत.
रैल्वे, बस आणि इतर खर्चाचा अंदाज दिल्यास खूप मदत होईल. साधारण ४ रात्री आणि ५ दिवसाच्या ट्रीप चा प्ल्यान आहे.
धन्यवाद!!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माऊट अबु आणि अमदाबाद ला जाउ
माऊट अबु आणि अमदाबाद ला जाउ शकता. आम्ही पण ६ दिवसात ह्या तीन गोष्टी केल्या होत्या.
मला जाउन ३२ वर्ष झाली त्यामुळे त्यावेळचा खर्चाचा अंदाज उपयोगी येणार नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/54799
http://www.maayboli.com/node/18315
आम्ही जगदिश मंदिराजवळ हॉटेल उदय निवास मधे रहिलो होतो. ८००/- दिवसाला
आम्हाला रुमचा उपयोग फक्त सामान टाकणे आणि रात्री पाठ टेकविणे एवढाच होता. सोबत लहान मुले, वयस्कर कोणी नसल्यास उत्तम पर्याय आहे. आपल्याकडे कोकणात जशा ब्रेड आणि ब्रेकफास्ट साठी सोयी असतात तशाच आहेत.
दिवसाला बहुतेक २७०० रु मधे आम्हाला ईंडिका मिळाली. एक दिवस निवांत कुम्भलगड,मंदिरे पाहिली. दुसर्या दिवशी चित्तोडगड वगैरे. तिसर्या दिवशी सिटी टूर.
तुम्हाला वेळ असेल तर माउंट आबू जवळ दिलवाडा मंदिरे आहेत. नक्की पहा.
एसआरडी,यांचा धागा पहा.
एसआरडी,यांचा धागा पहा.
माझा धागा:
माझा धागा: http://www.maayboli.com/node/45528 स्वतंत्र जाण्याविषयी आहे.मला उदेपुर मधल्या आवडलेल्या न आवडलेल्या जागा लिहिल्या आहेत.इतरांचे तेच मत असेल असे नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
उदयपुरमधील मला आवडलेली
उदयपुरमधील मला आवडलेली ठिकाणे-
१ - पॅलेस
अ. सिटी पॅलेस
ब. लेक पॅलेस
२. गड-
अ. कुंभलगड
ब. चितौडगड
याव्यतिरिक्त एक विंटेज कार्सचा म्युझिअम आहे, तो पहाता येइल. सिटी पॅलेसच्या जवळच आहे.
हळदीघाटला जरुर भेट द्या. तिथे महाराणा प्रताप म्युझिअम आहे. हळदीघाटच्या लढाईचे मॉडेलही आहे्आ म्युझिअम फार आवडला होता मला. महाराणा प्रताप्[ यांची समाधी वेगळ्या ठिकाणी आहे.
माउंट अबुही करता येइल. तिथे 'गुरुशिखर' नामक सर्वोच्च शिखर आहे. चढण्यासाठी पायर्या आहेत. वर दत्तगुरुंच्या पादुका आहेत. वरुन आजुबाजुचा परिसर रमणीय दिसतो. शिल्पकला, स्थाप्त्यकला यांची आवड असल्यास दिलवारा मंदीरही पहाता येइल.
माऊंट आबू - केवळ अप्रतिम-
माऊंट आबू - केवळ अप्रतिम- दिलवाडा मंदिरे तर बघितलीच पाहिजेत पण एका दिवसात नाही होणार सगळे
वा वा.. छान माहिती मिळतिये...
वा वा.. छान माहिती मिळतिये... सगळ्या लिन्क्स ही बघते आहे.
बरोबर २ लहान मुले आणि २ जेष्ठ नागरिक आहेत. त्याना झेपेलसा प्रवास असावा अस वाटतय.
सहेलियों की बाडी म्हणून पण एक
सहेलियों की बाडी म्हणून पण एक जागा आहे.. ती पण छान आहे...
हिम्सकूल > +१ १. सहेलियों की
हिम्सकूल > +१
१. सहेलियों की बाडी - त्या काळच्या राणी आणि दासी परिवार ह्यांना वन परिहार/फिरण्यासाठी म्हणून हि बाग बनवली होती. विविध जातीची फुल-झाडे ह्या भागात आहेत. तसेच संगमरवरी बांधकाम देखील आहे.
२. उदयपूर च्या प्यालेस मध्ये शस्त्रांचा एक संग्रहालय आहे बहुदा ते विना शुल्क आहे. तिकडे गेलाच जर जरूर बघून या.
३. नाथद्वारा : श्रीकृष्णाला (एक अवताराला) समर्पित हे मंदिर आहे.
४. हल्दिघाटी : राणा प्रताप आणि बादशाह अकबर मध्ये झालेल्या भीषण युद्धाची हि समरभूमी आहे. जसं आपल्याला पानिपत तसा राजपुताना हल्दिघाटी आहे. इकडे एक संग्रहालय असून त्या मध्ये राणा प्रताप बद्दल माहिती दिलेली आहे. प्रताप प्रमाणेच दिसणाऱ्या २-३ सेना-प्रमुखांचे चित्र पण आहे. प्रताप आणि त्यांचा घोडा चेतक जखमी झाले तेव्हा प्रताप प्रमाणे दिसणाऱ्या एक सेना- प्रमुखाने राजमुकुट आणि राजचिन्हे स्वतः धारण केली आणि प्रताप ला सुरक्षित ठिकाणी हलवले (प्रतापांचा विरोध असताना).
तसेच अजून एक लोक कथा इथे प्रसिद्ध आहे कि ह्या भीषण युद्धामध्ये दोन्ही बाजूंची मिळून एका दिवसात लाखभर माणसं वीरगतीला प्राप्त झाली आणि त्या रात्री खूप पाऊस झाला आणि पावसाच्या पाण्याने त्या सैनिकांच रक्त त्या भागात पसरलं. ज्या ज्या भागात ते रक्त पसरलं तिथे गुलाबाचं 'पीक' येतं. हा गुलाब लालबुंद असून खूप सुवासिक असतो. तो फक्त आणि फक्त चैत्र महिन्यात येतो म्हणून त्याला 'चैत्री गुलाब' म्हणतात. स्थानिक लोकांच्या मते त्या सैनिकांचा रक्त आणि वीरश्री च प्रतिक आहे हा गुलाब.
इथे प्रतापांचा प्राणप्रिय घोडा चेतक ह्याची पण समाधी आहे.
टीप : वरील माहिती २००३ सालची आहे, काळानुरूप बदल झाले असल्यास खेद आहे
राणकपूर ईथल्या जैन मंदिराला
राणकपूर ईथल्या जैन मंदिराला भेट द्यायला विसरु नका.
"दोन लहान मुले आहेत" -त्यांना
"दोन लहान मुले आहेत" -त्यांना सिटी पॅलेस बोअरिंग ठरेल. शहरातल्याच जगदिशमंदिरजवळा "सज्जन बाग" सकाळच्या वेळी ज्येष्ट नागरिकांना आवडेल.मॅार्निंगवॅाकला लोक तिथे येतात आणि आमच्याशी गप्पाही मारल्या.गेटसमोरच कार म्युझिअम ( रु तिनशे बहुतेक ) आहे. इथेच संध्याकाळी मुलांना आवडेल खुप छान जागा आणि टुअर ओपरेटर मुद्दाम टाळतात.रोप वे ने एका देवळात जाता येते.
सहेलियोंकी बाडीमध्ये नंतर फार गर्दी होते.
सहेलियोंकी बाडीच्या शेजारीच
सहेलियोंकी बाडीच्या शेजारीच सरकारमान्य दुकान आहे. तिथे खरेदी करु शकता. साड्या, बेड शीटस, शोभेच्या वस्तू, दागिने वगैरे.