बाजीराव मस्तानी - पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2015 - 15:19

बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.

इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4

आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)

मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.

असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.

तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,

देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्‍यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)

तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.

त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.

मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.

पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<लोकांना आवडतं म्हणुन पानिपतावर सिनेमा काढला तर हे युद्धाच्या आदल्या रात्री शेकोटी भोवती अब्दाली आणि सदाशीवराव भाऊंची जुगलबंद कव्वालीही दाखवतील.>>>>

मानव पृथ्वीकर +१००.

रार, सायो, सीमतिनि सगळ्यानाच +१००.
वर जी वॉट्सअ‍ॅप पोस्ट टाकलीय त्यातिल प्रत्येक वाक्याशी सहमत. पण बन्दी बाबत फारेण्डचा मुद्दा पटला. त्यातुन काहिही साध्य होणार नाही. भन्साळी च्या आचरटपणाला अन्नुलेख च योग्य उत्तर.

शाहारुख खान (डिरेक्टर कोण ते माहित नाहि) चा 'अस्सोका', गोवारीकर चा 'जोधा अकबर' ह्याच माळेतल हे एक तथ्यहीन रत्न आहे. 'शितावरुन भाताची परीक्षा' एवढाच ह्या गाण्याचा उपयोग.

भन्साळीबाबाचं काय सांगता येत नाही. उद्या शिवाजी महाराजांवर सिनेमा काढला तर जिजाऊंच्या हस्ते त्यांना गाजर हलवा आणि आलूपराठे खायला घालायला कमी करणार नाही. शिवाय दोन नाही तर सात राण्यांचे डान्स बघाय्ला मिळतील >> त्याच्यामधे एवढा दम नाही. त्याने चुकुन माकुन तसे केले तर आत्ता जे लोक त्यात काय एवढे असे म्हणत आहेत तेच भावना दुखावल्या म्हणुन मोर्चे काढतील.

बाकी हिट व हॉट विषय घेऊन गंमत बघणे हाच काही लोकांचा छंद असतो खरच.

रश्मी तै

तुम्ही तर भलत्याच कियेटीव्ह निघाल्या.
युद्धादरम्यान हिंदू मुस्लीम ऐक्य. सदाशिवभाऊ ( हे शक्यतो सचिन खेडेकर दाखवावेत) आणि अब्दाली ( शाहनवाज खान ) यांच्यातलं युद्ध सुरू होण्या आधी असतानाच भाऊंचा धक्का आपला घोडा उधळतो आणि पाण्यात पडतो. रिकिबीत पाय अडकल्याने ते घोड्यासोबत तीर के उस पार अब्दालीच्या छावणीत पोहोचतात. अब्दालीचे सैनिक त्यांना पकडून अब्दालीसमोर उभे करतात. त्या वेळी शाहनवाज खान रेकत रेकत भाऊंना प्रेमभराने मिठी मारतो आणि

"भाऊ, आपके बारे मे काफी सुना था , आज रूबरू होने का मौका मिला . आपको अंदाजा नही होगा कि हम कितने खुश है आज"

यावर भाऊ गोंधळून विचारतात.
"तो क्या आप हमे हाल हाल करके नही मारेंगे ?"

यावर अब्दाली गडगडाटी हास्य करत उद्गारतो
"हमे क्या आलमगीर समझ के रखा है ? ये इस्लाम की राह पर चलने वाला नेक बंदा है, अभी तक जंग का ऐलान हुआ भी नही और आपको दुश्मन समझ के आपकी जान के दुश्मन हम बने ? वैसे भी मुल्क मे शेरों की कमी है , आज आप हमारे मेहमान है "

असा प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला आहे.
असा प्रसंग घडलाच नाही हे इतिहासात आहे काय ?

तथ्यहीन रत्न >> शब्द जबरी आवडला रमा :). खरे आहे. कॉलेजेस च्या 'एथनिक डे' च्या पोषाखांचा जेवढा त्या त्या परंपरांशी अचूक संबंध असतो तेव्हढाच या हिंदी चित्रपटांचा तत्कालीन इतिहासाशी असतो. त्याची टर उडवली जात आहे, आणि ते बरोबरच आहे. त्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही.

या मुळे बाजीराव मस्तानी ची प्रसिद्धी झाली.. >>> करेक्ट, लोक बाकी काही नाही पण इतकी नाव ठेवल गेलेल "पिंगा ग" गाण बघण्यासाठी अख्खा पिक्चर बघणार ते ही थेट्रात जाउन. आणि मग न्हेमीप्रमाणे बाजीराव मस्तानीने गल्ल्यावर किती कोटी जमवुन कुठल्या मुव्हीचा रेकॉर्ड ब्रेक केला याच्या चर्चा होतील... आणि या सगळ्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली धुमाकुळ दाखवुन भन्साळी साहेब गब्बर होणार.

गाणे वाईट नाही पण त्याचा आस्वाद घ्यायला हा १७ व्या शतकातील इतिहासावर चित्रपट आहे हे विसरावे लागते, यातच सारे काही आले. तो नाच मस्तानी काशीबाई यांचा नसून, दिपिका आणि प्रियांका यांचे एक परफर्मन्स आहे असे बघावे लागते - यात दिग्दर्शन जाम मार खातंय असं मला वाटतं.

सहमत.

रमा +१

मानव पृथ्वीकर, पोस्ट आवडली.

कापोचे, पंचेस छान! Proud बाकी तुमच मराठीत कस लिहीयाच, कापोचे की कपोचे?

अ‍ॅक्चुअली मंगळागौरीच्या जागरणात बायका ओठांवर पदर घेऊन काहीबाही म्हणजे फारच भलतेसलते बोलायच्या आणि खुसूखुसू हसायच्या म्हणे. आणि ते होडी, गाठोडे वगैरे खेळ नऊवारीमध्ये फारच .... (आता काय शब्द वापरू? जाउं दे. रोचकच बरा) तर रोचक दिसायचे म्हणे.

व्हॉटसपवर फिरणारा एक बोलका मेसेज,

काही ठराविक लोकांना, पत्रकारांना हाताशी घेऊन संजय लीला भन्साळीनेच ही खेळी खेळली आहे, अर्थातच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ..

असू शकते !

प्रसाद पेशवे नावाच्या एका गृहस्थांनी ( वंशज?) मा. मुख्य मंत्री देवेंद्र फडणीसांना हा आयटम साँग आहे म्हणून बॅन करावा अशा आशयाचे पत्र पाठवले आहे .... ते फेस बूकवर व्हायरल झाले आहे Happy

कुळकर्णी, देशपांडे, देशमुख, पाआहे, सरनौबत, वाकनीस, पागनीस, फडणीस, बसनीस, फडणवीस सुद्धा पदच आहेत. पदांची आडनावं होतातच.

ते माहित आहे.
पेशवे नावाचे एकमेकांशी संबंध नसलेले किती पेशवे महाराष्ट्रात आहेत? या पदाचे आडनाव केविलवाणे वाटते. मुकेश च्या नातवाच्या नावा सारखे.

>>दा व्ह्न्सी मधे येशू ख्रिस्त चक्क विवाहीत असल्याचे आणि कुमारिका म्हणून पूज्य असलेली मेरी ही त्याची पत्नी असल्याचे दाखवले गेले आहे.>>ती मेरी वेगळी हो - ती मेरी मॅगडेलेन , मदर मेरी वेगळी.

भन्साळीच्या पुढच्या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या ७ पत्नी नाचणार आहेत.

इथे तर २ आहेत . ७-७ असल्यावर अजून मज्जा !

कृपया पात्रांसाठी नावे सुचवा ( आणी हे गाणे पण स्वप्नात दाखवता येइल)

दा व्ह्न्सी मधे येशू ख्रिस्त चक्क विवाहीत असल्याचे आणि कुमारिका म्हणून पूज्य असलेली मेरी ही त्याची पत्नी असल्याचे दाखवले गेले आहे. >> कुमारिका म्हणून पूज्य असलेली मेरी म्हणजे मदर मेरी -- ख्रिस्ताची आई. दा विंची मधील मेरी मॅगडेलेन ही ख्रिस्ताची परमभक्त होती.

आता पिंगा गाण्याबद्दल --- रार च्या सगळ्या पोस्टस शी मी सहमत आहे. तरीही गाण्याचा संदर्भ कळल्यावरच ठामपणे मत मांडता येईल.

पिंगा गाणं बघायला एकदम मॉड आहे पण! दोघींच्या केसातली आजकालच्या आयटेम लावणीमधे असतात तशी खोटी लाल गुलाबाची फुले, शिफॉनच्या शिवलेल्या नऊवारी साड्या, जरदोसी डिझाईनचे ब्लाऊज, नव्या फेशनचे डिझायनर दागिने, तसेच दोघींनी घातलेल्या काळ्या लेगिंग्ज!!! त्या व्हिडिओमधे साधारण ०.५२ च्या सुमारास मस्तानी गिरकी घेते तेव्हा तिच्या उजव्या पायातले लेगिंग्ज स्पष्ट दिसतात!! शिफॉन, जरदोसी, लेगिंग्ज पेशवेकाळापासून प्रचलित होतं हे माहीत नव्हतं Happy

भन्साळीबाबुना इतिहास कधी कळलाच नाही. अगदी जुन्या काळापासुन मुस्लिम स्त्रिया अनारकली ड्रेस ( सलवार-कमीज) घालतायत हे त्यान्च्या गावीच नाही.

त्या व्हिडिओमधे साधारण ०.५२ च्या सुमारास मस्तानी गिरकी घेते तेव्हा तिच्या उजव्या पायातले लेगिंग्ज स्पष्ट दिसतात!!>> वाह! कमालीचे निरीक्षण आहे Happy

मला गाणे बघताना मस्तानी कोण आणि काशीबाई कोण हे समजेनासेच झालेले. गूगल करून पुन्हा कास्टींग चेक केले. आणि आता पुन्हा आठवत नाहीये.

यात बाजीराव मस्तानी कावरे कोल्डींक्स मधे जातात असा प्रसंग आहे का ?
नाही म्हणजे मस्तानी आईस्क्रीमचा इतिहास तरी कळाला असता.

Pages