बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्सालीच्या बहुचर्चित सिनेमांतील ‘पिंगा ग्ग पोरी’ हे गाणे नुकतेच यू ट्य़ूब वर झळकले.
इथे ते गाणे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=xz-Vac75to4
आणि बस्स यावरूनच फेसबूक, व्हॉटसप, आणि मराठी सोशलसाईटसवर वाद सुरू झाला.
(खरे तर बाजीराव पेशव्यांच्या भुमिकेसाठी AIB फेम रणवीर सिंगला घेतले तेव्हाच मला खटकले होते, पण ते एक असो)
मुळातच बाजीराव पेशवे हे त्यांच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असण्यापेक्षा बाजीराव मस्तानी या प्रेमप्रकरणासाठीच जास्त प्रसिद्ध. एकाअर्थी हे दुर्दैवीच. पण बरेचदा ईतिहासातील काही जोड्या अश्याच प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ, अकबर राजा काय कोण होता हे माहीत असायच्या आधीच आपल्याला तो “अकबर-बिरबल’ म्हणून समजतो. पुढे त्यावर चित्रपटही ‘जोधा-अकबर’ नावाने निघतो.
असो, या निमित्ताने का होईना, भले बाजीराव मस्तानी यांची प्रेमकथा ही केंद्रस्थानी असली तरी बाजीराव पेशव्यांचा ईतिहास चित्रपटाच्या सशक्त माध्यमातून जगभर पोहोचणार आहे. पण इथे एक प्रश्न उभा राहतो ते त्या ईतिहासाची चीरफाड तर होणार नाही ना. कारण ऐतिहासिक चित्रपट म्हणजे काही ‘देवदास’ नाही जे भन्साली सिनेमॅटीक लिबर्टी वापरून मूळ ईतिहासाशी फारकत घेणारी पटकथा लिहितील. आता हे असे झालेय की नाही हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल. सेन्सॉरची परवानगी मिळाली म्हणजे त्यांच्यामते काही गैर नसावे. अर्थात सेन्सॉर हा मुद्दा लक्षात घेतात की नाही हा आणखी एक चर्चेचा विषय होईल कारण त्यासाठी त्यांना स्वत:ला ईतिहासाचा अभ्यास करावा लागेल आणि त्यातून खराखोटा ईतिहास शोधावा लागेल. जे हल्ली फार कठीण काम झालेय.
तर आता पिंगा ग्ग गाण्याकडे वळूया,
देवदासमध्ये पारो आणि चंद्रमुखी एकत्र नाचताना दाखवल्या होत्या. डोला रे डोला गाणे हिट झाले होते. या गाण्याचा फायदा चित्रपट चर्चेत आणायला आणि हिट करायला झाला. बस्स पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला वापरत भन्सालींनी यात ‘मस्तानी आणि काशीबाई’ यांचे एकत्रित नृत्य ठेवले आहे. बहुधा इतिहासात अश्या नाचाचा संदर्भ असावा असे वाटत नाही. त्यामुळे नक्कीच हे सिनेमेटिक लिबर्टीमध्येच येते. सिनेमा डॉक्युमेंटरी सारखा बनवण्यापेक्षा प्रमोशनसाठी असे एखादे गाणे बनवून त्यात कमर्शिअल फॅक्टर जोडल्यास तो सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, पर्यायाने बाजीराव पेशव्यांचा ईतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असा विचार केल्यास यात फारसे काही चुकीचे वाटत नाही. (आता चित्रपट बनवणार्यांचा हेतू ईतिहास सर्वदूर पोहोचवणे आहे की पैसा कमावणे आहे हे तुर्तास बाजूला ठेऊ. कारण चित्रपट बघायला येणारे प्रेक्षकही ईतिहास बघायला येणार आहेत की प्रियांका, दिपिका आणि भव्यदिव्य सेटस बघायला, हा देखील मग संशोधनाचा विषय होईल.)
तर पिंगा ग्ग पोरी या गाण्यात सिनेमॅटीक लिबर्टी घेत पैसा कमवायच्या नादात पेशवेकालीन संस्कृतीची वाट लावली आहे असा ओरडा गेले दोन दिवस सगळीकडे दिसत आहे. उत्सुकतेने आज वेळ मिळताच मी हे गाणे यूट्यूबवर पाहिले. गाणे सुरू झाले आणि थोड्यावेळासाठी मी विसरून गेलो की मी नक्की कश्यासाठी हे गाणे बघायला आलोय. उत्कृष्ट कोरीओग्राफ केलेले गाणे, दोघींचेही लाजवाब दिसणे आणि तितकेच दिलखेचक नृत्य. सोबत संगीतही चांगले असल्याने गाण्याचा मी पुरेपूर आनंद उचलला. जर यातील पेशवेकालीन संदर्भ क्षणासाठी विसरून गेलो तर त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही, वाटूही नये.
त्यानंतर मग मी उठलेल्या वादाला अनुसरून पुन्हा एकदा ते गाणे पाहिले, पण तरीही काही ठिकाणी जशी टिका वाचून आलेलो की गाणे फार उत्तान झालेय तसे काही आढळले नाही. कदाचित प्रत्येकाचा उत्तानपणाचा बेंचमार्क वेगळा असावा किंवा टिका करणारा पेशवेकालीन संस्कृतीचा बेंचमार्क डोळ्यासमोर ठेवून बोलत असावा. आता त्या गाण्यातील साडी वा दागिने वगैरे त्या काळात मुळी असे घालायचेच नाहीत अश्या वादात मला रस नाही, पण काहीतरी वल्गर, असभ्य, असंस्कृत दाखवल्याच्या आवेशात जी टिका कुठेकुठे पाहिली त्यात तेवढेही तथ्य वाटले नाही.
मी माझे हे प्रामाणिक मत तितक्याच निरागसपणे एके ठिकाणी मांडताच मलाही त्यावर टिका झेलावी लागली. अर्थात कोणाच्या भावना कुठे दुखावतील हे आपण सांगू शकत नसल्याने त्या भावनांचा आदर ठेवत मी मनात कोणाबद्दल राग ठेवला नाही. तसेच कोणाला माझ्या मताचा राग आला असल्यास त्याबद्दल मी देखील क्षमस्व. कदाचित मी पेशवेकालीन संस्कृती आणि तेव्हाची नृत्यसंस्कृती याबद्दल अनभिज्ञ असेल असेही असू शकते. त्याकाळाचा विचार करता खरेच एखाद्याला ते संतापजनक वाटू शकते. मात्र आणखीही चार भिन्न प्रवृत्ती आणि विचारांच्या माणसांची मते जाणून घेऊया म्हणून हा विषय मायबोलीवर आणत आहे.
पिंगा ग्ग पोरी सारख्या गाण्यात किंवा पिंगा ग्ग पोरीच्या निमित्ताने ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टी घेणे कितपत योग्य अयोग्य?
आणि एखाद्या दिग्दर्शकाने ती घेतलीच, तर पुढे काय?
शिवाजीच्या ७ च बायका का बरे?
शिवाजीच्या ७ च बायका का बरे? १६५९ नंतरचा डान्स असणार आहे का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=owMdRQy703I
नुसत बालभारतीच पुस्तक वाचल
नुसत बालभारतीच पुस्तक वाचल असत तरी बराच इतिहास कळला असता.
एक होता राजा एक होती राणी छापाच काहीही नाव देऊ शकला असता ना!!
बाजिराव मस्तानीच का???
रण्णुपेक्षा अन्गद म्हसकर मस्त
रण्णुपेक्षा अन्गद म्हसकर मस्त दिस्लाय बाजीराव म्हणून. आमच्या ऐशुला मस्तानी केली असती तर काय बिघडले अस्तेका त्या भन्साळीचे ? ऑ !
यात बाजीराव मस्तानी कावरे
यात बाजीराव मस्तानी कावरे कोल्डींक्स मधे जातात असा प्रसंग आहे का ?
नाही म्हणजे मस्तानी आईस्क्रीमचा इतिहास तरी कळाला असता.>>>>> मस्तानी सुजाताची आहे, कावरेन्ची नाही.:इश्श:
सुजाता-मस्तानी म्हणजे अकबर
सुजाता-मस्तानी म्हणजे अकबर बिरबल सारखंच झाले...
ही सुजाता कोण? मस्तानीची आई
ही सुजाता कोण? मस्तानीची आई की आज्जी?
आणि हो, त्या दा विन्ची कोडवरूनही वादावादी झाली होती
या गाण्यात मस्तानी कोण आणि
या गाण्यात मस्तानी कोण आणि काशीबाई कोण?
मस्तानी दिपिका प्रियांका
मस्तानी दिपिका
प्रियांका काशीबाई
पण हे गाणे स्वप्नात असेल आणि त्यात उलटे दाखवले असेल तर कल्पना नाही.
ओके. पण हे गाणे स्वप्नात
ओके.
पण हे गाणे स्वप्नात असेल आणि त्यात उलटे दाखवले असेल तर कल्पना नाही.>> पण स्वप्नातच उलटे का दाखवतील?
काशीबाई त्या ज्या काही
काशीबाई त्या ज्या काही फंक्शनमध्ये नाचत असतात त्या फंक्शनला आपल्या लाडक्या सवतीला आमंत्रण नाही असं त्यांच्या लक्षात येतं. ते ही लास्ट मोमेंटला. व्हिडिओ कॅमेरा रोल होऊ लागल्यावर. मग त्या इतर सख्यांना सांगतात की मस्तानीलाही व्हॉट्सअॅपवर 'पिंगा' नाहीतर दाखवीन तुम्हाला इंगा!
इंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा
रच्याकने,
रच्याकने, http://www.huffingtonpost.in/2015/11/16/pinga-bajirao-mastani_n_8573428.... इथे हे वाचलं ....
So what exactly is my problem, you ask? It is the blatant appropriation of two completely different things from Maharashtra and squeezing them together in a song — just 'cuz it's Maharashtrian. Oh, you know, just wear a nath, a nauvari sari, and dance to the beats of a lavani-cum-mangalagauri song. It's a little like penning lyrics to a song in a Disney film that simultaneously celebrates a baptism ceremony as well as a honeymoon.
भन्सालीच्या पिंग्याचं जे व्हर्जन आहे त्याचं वर्णन 'over-enthusiastic neck bobbing' असं केलंय.
मामी भन्साळीची मुघल-ए-आजम ची
मामी
भन्साळीची मुघल-ए-आजम ची व्हर्जन बघायला मजा येइल. प्यार किया तो डरना क्या मधे के आसिफ च्या पेक्षा दहापट जास्त आरसे वगैरे असतीलच, पण मधुबालापेक्षा दहापट कमी सुंदर हीरॉइनही असेल. आधी के आसिफ च्या रंगीत डेकोरेशन मधे पृथ्वीराज कपूरच्या साईजचा माणूस पटकन लोकेट होत नाही. नवीन व्हर्जन मधे अॅनिमिक अकबर त्या आरसे महालातीलच भिंग घेउन शोधावा लागेल. अकबर व सलीम ला हॉल च्या मधे बसवतील हातात ढोल देउन, व एका बाजूने अनारकली व दुसर्या बाजूने जोधा नाचत मध्यावर येतील. इथे त्या एकत्र डोला रे डोला व्हर्जन ३ सादर करतील मुघल सल्तनतीतील आयटेम साँग ला सुटेबल अशा मुघली वेषात. नंतर परदा नहीं जब कोई खुदासे, बंदोंसे परदा करना क्या या वाक्यावर खूष होउन अकबरही सामील होईल नाचात शेवटी, कजरारे मधे अमिताभही सामील होतो तसा.
अनिरुद्ध वैद्य जिला राग तिथेच
अनिरुद्ध वैद्य
जिला राग तिथेच काढावा. इथे जम्मत वाडी चालू आहे. मिठाचे खडे टाकायचे तर टाका..
फा, त्यात राम कपूर ला घेता
फा, त्यात राम कपूर ला घेता येईल अकबर म्हणून. आपलं एक सजेशन
बोमन इराणी. हॅपी न्यू इयर
बोमन इराणी. हॅपी न्यू इयर मुळे त्याला नाचायचे फार ट्रेनिंग ही नाही घ्यावे लागणार. अकबरचा उर्दू अॅक्सेंट पण पटकन उचलेल तो
फाईटिन्ग बास ह आता. चला गाणे
फाईटिन्ग बास ह आता. चला गाणे ऐकुया/ बघुया
बाजीराव मस्तानी मधे खरंतर
बाजीराव मस्तानी मधे खरंतर स्वजो, सता आणि मुक्ता यांना घ्यायला हवं होतं
अजून संस्कृती बालगुडे नको का
अजून संस्कृती बालगुडे नको का
स्वजो नी व्यायाम करून रणवीर चिंग सारखी बॉडी बनवली असती तर आमची हरकत नाही. मुक्ता तर नक्की काशीबाई म्हणून चालेल
संस्कृती बालगुडे हवीच की.
संस्कृती बालगुडे हवीच की. त्याशिवाय संस्कृती बुडणार कशी?
मराठीतलं कास्टिंग अंकुश
मराठीतलं कास्टिंग
अंकुश चौधरी - बाजीराव
अमृता खानविलकर - मस्तानी
मुक्ता बर्वे - काशीबाई
कडाडून विरोध करून हे सारे बंद
कडाडून विरोध करून हे सारे बंद पाडायचे तर लोक फारच लाईटली घेत आहेत.
तमिळ लोक बघा, साधे चित्रपटाच्या नावात मुंबई आले तरी किती गदारोळ झाला होता.
अनिरुद्ध वैद्य = महेश ???
अनिरुद्ध वैद्य = महेश ???
चीकू, मस्तानी साठी सोनाली
चीकू, मस्तानी साठी सोनाली कुलकर्णी (नवी ... ) शोभेल ...
सोकु ( ज्युनीअर) तर शोभेल, पण
सोकु ( ज्युनीअर) तर शोभेल, पण गम्मत म्हणजे दिपाली सय्यद पण शोभेल. घारोळी आणी मादक पण आहे ती. एकदम पर्फेक्टो. दिपाली जूनी आहे पण ये गो मैना मध्ये पण टवका दिसत होती.
रमड, सन्स्कृती अजीब्बात नको.
रमड, सन्स्कृती अजीब्बात नको. तिला पिन्जरा ही सिरीयल सोडली तर अॅक्टिन्ग जमलीच नाही. नुसतीच हसत बसेल ती.:फिदी:
संस्कृती बालगुडे हे नाव
संस्कृती बालगुडे हे नाव ऐकल्यासारखं झालांय.
महेश, भन्साळी त्याला काय
महेश, भन्साळी त्याला काय करायचे ते करुन गन्गेत न्हायलाय. त्यामुळे आता उपयोग नाही. आणी मराठ्यान्ची अस्मिता पानीपता मध्ये बुडली. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बाजीरावचा पराक्रम यातुन ठळक झाला तरी पुरे.
The Honorable Chief Justice
The Honorable Chief Justice of Bombay High Court: Stay Order on Release of 'Bajirao Mastani' - Sign the Petition!
https://www.change.org/p/the-honorable-chief-justice-of-bombay-high-cour...
पिटीशन केलय साईन.
पिटीशन केलय साईन.
Pages