एअर फ्रायर

Submitted by मी अमि on 29 October, 2015 - 06:27

कुणी air fryer वापरतं का? कितपत उपयोगी आहे. पदर्थाला तेल लावून त्यात ठेवतात का?

स्वच्छ करण्यास कटकटीचे आहे का?

रॉबीनहूड | 29 October, 2015 - 06:43
इथे अयर फ्रायरचे सर्व डेमो आहेत आणि तुलनाही..

https://www.youtube.com/results?search_query=air+fryer+demo+

नंदन | 29 October, 2015 - 06:45
हा दुवा उपयोगी पडावा: http://www.misalpav.com/node/33408

Group content visibility: 
Public - accessible to all site users

15 दिवसांपूर्वी Philips चा air fryer घेतला मी...खूपच छान आहे...cooking time थोडा वाढतो...पण taste मस्त असते शिवाय gas आणि तेलाची बचत आणि healthy सुद्धा....

मी सुद्धा घ्यायचा विचार करत आहे कोणाची काही आणखीन अनुभव असतील तर कृपया सांगा. ब्रांड कोणता चांगला ते सांगा.
तसेच नॉनस्टिक मध्ये मिळतो का? बाहेरून गरम वगैरे होतो का? भारतातल्या उन्हाळ्यात कसा परफॉर्मन्स आहे? रोजच्या जेवनातल्या भाज्यांना फोडणी देता येते का? पाच माणसांची भाजी त्यात होईल का?

त्याला खाली भोकं असतात ना? फोडणी कशी देणार? सगळं एकत्र मिसळून एकत्र गरम होणे यालाच फोडणी म्हणणे शक्य असेल तर हो. होईल.
का पार्शमेंट पेपरवर घालून काही करतात लोक तसं काही करणार आहात? इतक्यापेक्षा इंस्टंट पॉट किंवा कढईत बरं नाही पडणार का?

काही भारतीय घरात जसा vaccum cleaner 'धूळ खात' पडलेला असतो, तसेच उत्साहाने घेतलेला airfryer हा नऊ दिवसांनी कोपऱ्यात जातो.

नका घेऊ.

माझा पडून आहे, philips चा. जर transport चे पैसे देणार असला तर फेब्रुवारी मध्ये फुकट पाठवतो.

अमितव, रॉय प्रतिसादाबद्दल आभार.
अमितव , फोडणीबद्दल हेच सर्व जाणून घ्यायाचे होते म्हणजे एअर फ्रायर मध्ये जमते कि नाही.
रॉय, सहमत. मीसुद्धा मायक्रोवेव्ह ओव्हन घेतला होता. नव्याच्या नवलाई नंतर तो वापरला गेला नाही. तो देऊन आता फक्त मायक्रो-वेव्ह घेतला आहे तोसुद्धा फक्त चहा गरम करण्यासाठी वापरात येतो.
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर या एअर फ्रायर च्या कल्पनेने उचल खाल्ली आहे. Happy

आम्ही एअर फ्रायर वापरतो. मायकोव्हेव इतका रोजच्या रोज वापरला गेला नाही तरी धुळ खात वगैरे पडलेला नाही.

फ्राय फिश / चिकन, भाज्या वगैरे गोष्टी चांगल्या होतात. माबोवरचीच ब्रसेल स्प्राऊट्सची रेसिपी नेहमी केली जाते. शिजवलेले ब्रर्स्पा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गार झालेले पदार्थ गरम करायला फार उपयोग होतो. उदा. समोसे, पिझा वगैरे पदार्थ त्याचं टेक्चर तसच राहून गरम होतात.

एक गंमत सांगायची तरः मध्यंतरी भारतातून चकल्या आणल्या तर त्या मऊ पडल्या होत्या. कदाचित गरम असतानाच डब्याचं झाकण बंद केल्याने झालं असावं. त्या एअर फ्रायरमध्ये ३-४ मिनिटे फिरवल्या तर अगदी उत्तम कुरकुरीत झाल्या. Happy अर्थात ही काही नेहमीची युजकेस नाही.

एयर फ्रायर, मायक्रोवेव्ह इ. 'ओव्हन' गोष्टी भारतीय्/मराठी स्वयंपाक करण्याच्या कामाच्या नाहीत.
ओव्हन मधे करायच्या गोष्टी त्यात उत्तम होतात.
तंदूरमधे फोडणी देता येईल का? नाही. कारण ते 'ओव्हन' आहे.

करायचंच असेल तर जुगाड करावा लागतो.
बाहेर भांड्यात कच्च्या भेंडीवर पळीची फोडणी करून ओतून मग ते सगळे कंत्राट एफ्रा मधे भाजणे किंवा आधी भेंडी भाजून/शिजवून मग भांड्यात बाहेर फोडणी देणे. गॅसवर कुरकुरीत भेंडी, कारल्याचे काप, बटाट्याच्या काचर्‍या इ. करणे, 'तळलेला' कांदा तयार करणे या गोष्टी करायला खूप वेळ अन गॅस लागतो. एफ्र मधे या गोष्टी लवकर अन सुंदर होतात.

अलिबाबा +१
परंपरावादी असाल तर मानवणार नाही. वेगवेगळं ट्राय करुन बघायचा उत्साह असेल तर नवं खेळणं मिळेल.

मला तर खूप आवडला air fryer...भाज्या वगैरे नाही बनवत त्यात...पण काही भाजायचे असेल दाणे, थालीपीठ, चकली भाजणी खारमुरे तर उत्तम होते. आमच्याकडे 12 ही महिने चिवडा हवा असतो..तर त्याचे पोहे पण छान कुरकुरीत भाजले जातात...गॅस पेक्षा छान चव...बाकी तळायचे पदार्थ पापड, कुरडी,कोफ्ते, French fries हे सुद्धा मस्त होतात. आधी मी केक gas oven मधे करायची तर पाउण तास लागायचा आता air fryer मध्ये. 20 min होतो...सँडविच 1 min.मध्ये...अजून बरेच काही करते मी air fryer मध्ये..मला तरी पैसा वसूल product वाटला..

पराग अलीबाबा मोक्ष प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मला जाणून घ्यायचे होते की त्यामध्ये दिवाळीच्या चकल्या, करंजा, शंकरपाळी, कांदा भजी, मेदुवडे, पुऱ्या हे पदार्थ बनतात का व छान बनतात का? हे सर्व पदार्थ डीप फ्राय असल्यामुळे खाणे बंद केले आहे. जर एअरफ्राय मध्ये होत असतील तर विचार करावा म्हणतो.

करंज्या आणि शंकरपाळे मस्त बनतात. तळलेल्या चवीत आणी ए.फ्रा. चवीत फरक असतो. पण छान लागतात.

टिक्का सारखे पदार्थ एअरफ्रायरमध्ये खूप सुंदर बनतात.

फ्राईज, वेजेस, चिप्स, खारे दाणे, खारी डाळ, दाणा भजी असे तळणीचे पदार्थ अगदी कमी तेलात आणि चविष्ट बनतात.

दिवाळीच्या चकल्या, करंजा, शंकरपाळी, कांदा भजी, मेदुवडे, पुऱ्या हे पदार्थ बनतात का व छान बनतात का? >>> या पदार्थातील मी फक्त कांदा भजी व मिक्स भजी केली आहे आणि ती खूपच मस्त होते. चालत असेल तर फ्रायरमध्ये ठेवताना ब्रशने तेलाचा पुसटसा हात लावा. अजून ओरीजिनल तळलेल्या भजीचा फील येतो . बाकी दाणे, काजू ,मखाना बदाम इतर अनेक सीड्स छान रोस्ट होतात. गॅस किंवा मायक्रोवेव पेक्षा खमंग लागतात. आणि फ्रोझन सामोसे, कबाब, onion रिंग्स, वगैरे तर बेस्टच होतात. तंदुरी पदार्थ छान होतात . माझ्या मते शंकरपाळी व चकली होईलच.
मी घेऊन बरेच दिवस झाले पण आता आता त्याचा अंदाज यायला लागला आहे. म्हणजे आधी प्री हिट व नंतर किती वेळ ठेवायचे ते कळू लागले आहे. एकदा सुरवातीला पापड भाजायला ठेवला होता. त्याचा पार कोळसा झाला. मग हे प्रकरण आपल्याला जमणार नाही म्हणून सोडून दिले , पण आता एकदम डोळे उघडल्यासारखे झाले आहे आणि फ्रायर सर्वात आवडता झाला आहे .

स्वयंपाकघरात जाऊन तुम्ही स्वतः प्रयोग करत असाल, करणार असाल तर एअर फ्रायर सारखं आशिंबदु उपकरण नाही. एकदम व्हरसेटाईल आहे.
यात खापर पणजी सारखी खमंग होत नाही (चकली, खाप न्हवे) सारखे टोमणे मारणार असाल तर वो ही सही.

मघाशीच एक रिल बघितले. ए फ्रा मध्ये भजी. नेहमी जितके सैल बॅटर करतो त्यापेक्षा जरा दाट होते. चमच्याने ठेवले तरी आकार सोडला नाही.

बरेच जणांनी तेलकट नको लिहिलेय पण त्यांना भजी हवीत. महिन्यातुन एकदा तळण करुन त्या दिवशी एखादा साबुदाणा वडा/कांदा भजी/बटाटा वडा खाला तर खुप मोठे नुकसान होते का?? मी सतत वजन बघत नाही पण महिन्यातुन एकदा भजी तळुन खाते. पुरी वगैरे प्रकार कधी फारसे आवडले नाहीत त्यामुळे ते कधी करत नाही पण भजी करते. तळताना जो वास येतो तो जास्त प्रिय आहे. बाहेर मात्र सहसा टाळते कारण तेल परत परत तेच वापरतात म्हणुन. सहसा लिहिलेय म्हणजे कधी नाईलाजाने खावे लागते.

महिन्यातुन एकदा तळण करुन त्या दिवशी एखादा साबुदाणा वडा/कांदा भजी/बटाटा वडा खाला तर खुप मोठे नुकसान होते का??
<<
यक्दम बरोबर. काहीही होत नाही.

फक्त, तळलेल्या तेलाचे नंतर काय करावे हा प्रॉब्लेम असतो.

तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसले तरी आपण सगळे चवीने खातोच ...पण air fryer सगळ्याच दृष्टीने better option आहे असे मला वाटते...microvave oven वापरायची अज्जिबात इच्छा नव्हती... त्यामुळे नवर्‍याने बरेच वेळा म्हणून सुद्धा मी oven घेतला नाही पण air fryer बद्द्ल ऐकलं,वाचलं आणि लगेच घेतला...आता खूप आवडतोय सुद्धा...
@माबो वाचक: शंकरपाळी, भजी हे सगळे होत़े पण चव तळल्यासारखी नाही लागत...खूपच कोरडे किंवा वाफवल्यासारखे लागते...पुर्‍या तर अजिबात नाही जमल्या मला...शिवाय air fryer मधले पदार्थ थोड्यावेळाने कडक होतात...थोडक्यात सगळेच तळणीचे पदार्थ air fryer मध्ये करता येतीलच असे नाही पण उपयोगी आहे...फक्त microwave oven जसा आरोग्याला हानिकारक आहे..तसं air fryer चं काही असेल तर माहित नाही...कोणाला काही ठोस माहिती असेल तर share करा please

मायक्रोवेव्ह ओव्हन आरोग्याला हानिकारक???
अजिबात नाही. त्यात प्लास्टिक ठेवू नये आणि त्यात अन् इव्हन हिटिंग होऊ शकते ... याशिवाय काही दोष त्यात नाही. आरोग्याला काही बाधा नाही. चुलीवरचे जेवण आरोग्यास सर्वात वाईट, कारण धूर.
असो, दुसरीकडे बोलू. हा धाग्याचा विषय नाही.

फक्त, तळलेल्या तेलाचे नंतर काय करावे हा प्रॉब्लेम असतो>>>

मी तळतानाच कमी तेल घेऊन तळते. छोटे छोटे घाणे काढते. कुटुंब लहान असल्याने मला जमते. उरलेले तेल कागदात मुरवुन कागद फेकुन देते. आमच्या गावात कचरा उचलणारी गाडी नाही पण मोठे रंगीबेरंगी पाईप स्वच्छता अभियानादरम्यात जागोजागी ठेवलेत. त्यात सगळा सुका कचरा टाकयचा व पाईप भरला की कचर्‍याला आग लावायची हा उद्योग मी करते. जाळणेही वाईटच पण पर्याय नाही.

एअर फ्रायर खुप गरम हवा सोडुन पदार्थ शिजवतो. त्याचे व ओटिजीचे काम या बाबतीत सारखेच आहे, ओटिजी अजुन बरेच काम करतो. एअर फ्रायरमध्ये अनसेफ असे काही नाही.

मायक्रोवेव सेफ्टीवर माबोवर चर्चा झालीय, धागा असावा. पदार्थ तापवण्याच्या त्याच्या पद्धतीवर गदारोळ झालेला. पण त्यात फारसे तथ्य आहे असे एकुण वाटत नाही. नीट वापरला नाही तर मांस पुर्ण न शिजता आत कुठेतरी कच्चे राहुन अपायकारक होऊ शकते हाच आक्षेप आता उरला असावा.

सो कुठलेही उपकरण आरामात वापरायला काहीच प्रत्यवाय नसावा.

माझ्याकडे ओटिजी आहे. तो मी शक्य तितका वापरते. तळण कधीतरीच करत असल्याने सरळ तेलातच तळते. आमच्याकडे पापड वगैरे रोज लागत नाहीत.

सर्वांचे प्रतिसाद वाचत आहे.
महिन्यातुन एकदा तळण करुन त्या दिवशी एखादा साबुदाणा वडा/कांदा भजी/बटाटा वडा खाला तर खुप मोठे नुकसान होते का?? >>>> नाही, पण फक्त ते महिन्यातून एकदा असे म्हणून महिन्यातून ३ -४ दा होते . Happy आणि आई वापरलेले तेल मी सांगूनसुद्धा फेकत नाही. ते रोजच्या भाज्यांच्या फोडणीसाठी वापरले जाते. Sad म्हणून हा खटाटोप.

मायक्रोवेव्ह ओव्हन पाण्याच्या रेणूंना उद्दिपीत करून म्हणजे थोडक्यात आत ठेवलेल्या पदार्थातला जो काही पाण्याचा अंश आहे तो तापवतो. त्यामुळे आत ठेवलेला पदार्थ गरम होतो. सुर्याच्या किरणांनी तापवलेला पदार्थ, एल्पीजी गॅसवर गरम केलेला, चुलीवर गरम केलेला आणि मायक्रिवेव्ह मध्ये गरम केलेला यात काहीही फरक नाही. बिन्धास्त वापरा मायक्रोवेव्ह. जे कोणि तुम्हाला माक्रोवेव्ह वापरू नका म्हणुन सांगत आहेत ते अज्ञानातून / अशास्त्रीय कारणांमुळे सांगत आहेत.

एअर फ्रायर - माझा एक फुकट सल्ल. मसाला लॅब नावाचे क्रिस अशोक या लेखकाचे पुस्तक आहे. ते वाचाच. किमान त्यातला विविध प्रकारच्या पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींवरचा चॅप्टर वाचाच. त्यात तव्यावर शेकणे, पाण्यात शिजवणे, तेलात तळणे, तंदूर किंवा भट्टीत भाजणे या विविध पद्धतीत अन्न घटकांवर नेमक्या काय रासायनिक आणि भौतिकी प्रक्रिया होतात ते अगदी सोप्या भाषेत व्यवस्थित समजावून सांगितले आहे. त्याच बरोबर ही नवीन उपकरणे कसे काम करतात ते ही आहे. ते वाचलेत तर नेमके कोणत्या पदार्थांसाठी आणि कसे एखादे उपकरण वापरायचे हे स्पष्ट होईल. साधा प्रेशर कूकर आणि त्यात दोन पेर घातलेले पाणी आणि तीन शिट्ट्या याच्यामागची कहाणी लक्षात येईल.

टवणे सर, हो. दोन पेर गणित वापरायचो पण ते बोलपार्क वाटायचं. ते
उभट वि. पसरट भांड्याला कसं लागू होतं हे वाचून हे आपल्याला का नाही सुचलं असं झालेलं..
पदार्थ कसा शिजतो आणि ब्राउनिंग होतं त्यात काय होतं हा भाग फारच उद्बोधक आहे.

माझ्याकडचा एफ्रा पडून आहे. कारण ओट्यावरची प्राईम जागा अडते.
भजी तळाय्ची नस्तील तर मी आप्पेपात्रात चम्च्याने मिश्रण घालून मंद गॅस्वर खरपूस बनवते. पटकन होतं काम.

Pages