दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा ...........
आपट्याच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात वापर सांगितला आहे
आणि म्हणूनच कदाचित त्याला सोन्याचे झाड असे म्हणत असावेत .
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आपण सोने म्हणून वाटतो. त्यामुळे या झाडाची मोठ्या प्रमाणावर तोड होते. नवीन लागवडीच्या अभावामुळे जंगलातून हि झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपट्याचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्याच कुळातील "कांचन" नावाच्या वनस्पतीची पाने विकली जातात आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी हि पाने विकत घेतात नि खूप मोठी मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात.
हि दोन्ही पाने साधारण सारखी दिसत असली तरी त्यात बराच फरक आहे.
आपट्याची पाने कांचनच्या पानापेक्षा आकाराने लहान असुन ती जाड असतात तर कांचनाची पाने हि पातळ असतात नि आकाराने मोठी असतात. आपट्याच्या पानांची खालची बाजू ( Lobe-कानाच्या पाळीसारखा भाग) हा गोलाकार असतो तर कांचनच्या पानाचा खालचा भाग हा लांबडा असतो जो आपल्या कानाच्या पाळीसारखा दिसतो.
दसऱ्याच्या निमित्ताने आपण या दोन्ही झाडांची माहिती मिळवूयात; वृक्षसाक्षर होऊयात.
यावर्षी आपण आपट्याची पाने न वाटता त्या एवजी आपट्याची रोपे लावलीत तर या बहुमोल अश्या औषधी झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही .
आपणां सर्वांना येणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!
:- भरत लक्ष्मण गोडांबे
वनस्पती अभ्यासक.
ग्रामीण पर्यावरण शाळा. .
पांडवांनी आपली शस्त्रे,
पांडवांनी आपली शस्त्रे, अज्ञातवासात जाताना शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. दसर्याला ती परत घेतली, म्हणून शमीची पाने वाटायची प्रथा पडली. पण शमीचे झाड महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याने, आपटा हा पर्याय ठरला. एकेकाळी आपटा विपुल असावा, आता तोही दुर्मिळ होईल.
शमी म्हणजे गणेशाला वाहतात तीच. क्वचित बाजारात दिसतेही. राजस्थानात जास्त आहेत ही झाडे.
यावर्षी आपण आपट्याची पाने न
यावर्षी आपण आपट्याची पाने न वाटता त्या एवजी आपट्याची रोपे लावलीत तर या बहुमोल अश्या औषधी झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल >> अनुमोदन
आपट्याचे रोप सामाजिक वनीकरण
आपट्याचे रोप सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत, वन विभागाच्या रोपवाटिकेत किंवा जंगली प्रजाती मिळणा-या रोपवाटिकेत उपलब्ध होऊ शकते.
ठाण्यात, डोंबिवलीत पर्यावरण दक्षता मंच या संस्थेत देखील हि रोपे नाममात्र दरात उपलब्ध आहेत.
संपर्क :- ०२२-२५३८०६४८. (सकाळी १० ते ६ )
मस्त लेख भारत आपटा या
मस्त लेख भारत
आपटा या झाडाची ठरवून लागवड होत नसावी. वरवर निरुपद्रवी वाटणारी ही प्रथा एखादे झाड नामशेश करू शकते.>>>>>>>>+१०००
भरत गोडांबे, धन्यवाद
भरत गोडांबे, धन्यवाद
मस्त आहे लेख. मलाही कुंडीत
मस्त आहे लेख. मलाही कुंडीत आपट्याचे रोप लावायला आवडेल. पुण्यात कुठे मिळेल हे रोप? कलम केली तर लागेल का? अमरावतील दिसले होते मागे आपट्याचे तरु.
मस्त आहे लेख. मलाही कुंडीत
मस्त आहे लेख. मलाही कुंडीत आपट्याचे रोप लावायला आवडेल. पुण्यात कुठे मिळेल हे रोप? कलम केली तर लागेल का? अमरावतील दिसले होते मागे आपट्याचे तरु.
पण मला वाटतं जास्तीत जास्त
पण मला वाटतं जास्तीत जास्त आपट्याची झाडे लाऊन मग पाने वाटायला काहीच हरकत नाही.
छानच माहिती भरत
छानच माहिती भरत
लेख आधीच वाचला आणि पटला होता.
लेख आधीच वाचला आणि पटला होता. पण व्हॉटस अप वर याच्या उलट्या बाजूचा पण जोरदार प्रसार चालू आहे(पाने वाटली नाही तरी काय, पानगळीत जाणारच ना?'अमुक पाने वाटणे बंद करा' इ. हिंदू प्रथा बंद करण्याचा कट आहे इ.इ.) त्यामुळे 'आपली बाजू नक्की कोणती असावी' याबद्दल मनात गोंधळ आहे.
बाजारात जी मरतुकडी पाने येतात ती विकत घ्यावीशी वाटत पण नाहीत.मरतुकड्या पानांच्या मोठ्या वाळक्या फांद्या पेक्षा प्रत्येकाला फक्त मोजकी दहा हिरवी पाने असलेले पाकिट विकले फुलवाल्यांनी तर तोड पण कमी होईल.
आता काय परिस्थिती आहे माहिती
आता काय परिस्थिती आहे माहिती नाही पण माझ्या लहाणपणी अगदी कॉजेलात मी असेपर्यंत आमच्याकडे आपट्याच्या डहाळ्या विकत मिळत राम मंदीरासमोर. त्यासोबत चिंचेच्या पानासारखी अजून एक डहाळी असे बहुतेक शमीची पाने असावीत ती पण नक्की माहिती नाही. ह्याच डहाळ्या कलम करुन पेरता येऊ शकतात जर अजूनही अशाच रुपात मिळत असतील तर.
Pages