दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा

Submitted by भरत गोडांबे on 18 October, 2015 - 06:04

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा ...........
आपट्याच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात वापर सांगितला आहे
आणि म्हणूनच कदाचित त्याला सोन्याचे झाड असे म्हणत असावेत .
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने आपण सोने म्हणून वाटतो. त्यामुळे या झाडाची मोठ्या प्रमाणावर तोड होते. नवीन लागवडीच्या अभावामुळे जंगलातून हि झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आपट्याचा तुटवडा भासत असल्यामुळे सध्या बाजारात आपट्याच्याच कुळातील "कांचन" नावाच्या वनस्पतीची पाने विकली जातात आणि अज्ञानापोटी बरीच मंडळी हि पाने विकत घेतात नि खूप मोठी मोठी सोन्याची पाने मिळाली म्हणून आनंदात असतात.
हि दोन्ही पाने साधारण सारखी दिसत असली तरी त्यात बराच फरक आहे.
आपट्याची पाने कांचनच्या पानापेक्षा आकाराने लहान असुन ती जाड असतात तर कांचनाची पाने हि पातळ असतात नि आकाराने मोठी असतात. आपट्याच्या पानांची खालची बाजू ( Lobe-कानाच्या पाळीसारखा भाग) हा गोलाकार असतो तर कांचनच्या पानाचा खालचा भाग हा लांबडा असतो जो आपल्या कानाच्या पाळीसारखा दिसतो. 123.jpg
दसऱ्याच्या निमित्ताने आपण या दोन्ही झाडांची माहिती मिळवूयात; वृक्षसाक्षर होऊयात.
यावर्षी आपण आपट्याची पाने न वाटता त्या एवजी आपट्याची रोपे लावलीत तर या बहुमोल अश्या औषधी झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही .
आपणां सर्वांना येणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!

:- भरत लक्ष्मण गोडांबे
वनस्पती अभ्यासक.
ग्रामीण पर्यावरण शाळा. .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपट्याच्या पानांची खालची बाजू ( Lobe-कानाच्या पाळीसारखा भाग) >> हे नक्की काय गोलाकार असते ते लाल बाण दाखवुन वगैरे सांगितलेत तर अजुन नीट कळेल. खालची बाजु गोलकार मग वरची पण गोलाकार असेल ना?
माहितीबद्दल धन्यवाद.

अज्ञानातच( वृक्षनिरक्षर) होण्यातच सुख होते.

उगाच लोकं खरा आपटा पाहिजे म्हणुन मागणी करायचे आणि करा आपट आणखिन च दुर्मीळ व्हायचा.

यावर्षी आपण आपट्याची पाने न वाटता त्या एवजी आपट्याची रोपे लावलीत तर या बहुमोल अश्या औषधी झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही .<<

हा संदेश आवडला.

भरत खुप छान माहिती. पाने वाटून ती नंतर वाया घालवण्यापेक्षा झाडे वाटून कुंडित वाढवलेले बरे॥

छान माहिती.
आणि तसे असेल तर एका अर्थी बरेच आहे की आपट्यावर धाड न पडता कांचनपाने वापरली जाताहेत.

एक प्रश्न - आपल्या बहुतांश प्रथांमागे काहीतरी शास्त्रीय कारण दडले गेलेले असते. या आपट्याच्या पाने वाटपामागेही तसे काही आहे का? की मूळ प्रथा वा कथा आपट्याच्या संवर्धनासाठी होती पण आता आपण जसे साजरे करतोय त्यात आपट्यांचा नाश होतोय.

म्हणजे गैरसमजुतीने लोक आपट्याएवजी कांचनची पाने वाटतात हे चुकिचे आहे.असे व्हायला नको

अज्ञानातच( वृक्षनिरक्षर) होण्यातच सुख होते.

उगाच लोकं खरा आपटा पाहिजे म्हणुन मागणी करायचे आणि करा आपट आणखिन च दुर्मीळ व्हायचा.
>>>>> +1

यावर्षी आपण आपट्याची पाने न वाटता त्या एवजी आपट्याची रोपे लावलीत तर या बहुमोल अश्या औषधी झाडाचे संवर्धन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही . >>>>> यावर्षी काय दरवर्षी अशी रोपे लावणे गरजेचे आहे ... Happy

सुरेख लेख ....

भरत खुप छान मेसेज. आणि तू नुसते मेसेज नाही पाठवत तर कृती करतोस हे महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे.

छान लिहिले आहेस.. आपट्याची नवीन लागवड झालेलीच नाही बहुतेक, होती तीच झाडे तोडली गेली. मूळात तोही शमीच्या वृक्षाला पर्यायच होता !!

भरत, तुमचा हा धागा १०० जणांनी तरी नक्किच वाचला असणार पण प्रतिक्रिया १२.
कारण वर्षानुवर्षे चालत आलेल्या पंरंपरा सोडायला बदलायला सहजा-सहजी कोणी तयार होत नाही.
उलट असे नविन विचार कोणी मांडले तर तेही त्यांना आवडत नाही.

वनस्पती अभ्यासक व पर्यावरण संरक्षक म्हणुन तुम्ही आमच्या सारख्या निसर्ग प्रेमींसाठी लिहित रहा.

भरत खुप छान मेसेज. आणि तू नुसते मेसेज नाही पाठवत तर कृती करतोस हे महत्वाचे आणि कौतुकास्पद आहे.+१

छान लेख. आपट्याच्या झाडाचे आयुर्वेदात सांगितलेले उपयोग कोणते आहेत?

आपट्याचं रोप कुठे मिळेल?

भरत, तुमचा हा धागा १०० जणांनी तरी नक्किच वाचला असणार पण प्रतिक्रिया १२.
>>>
हे आवडलं नाही.

पटलं तर प्रतिक्रिया द्यावीच किंवा प्रतिक्रिया दिली तरच पटलं हे कोनी ठरवलंय? Uhoh

असो!
लेख फार आवडला. घरासमोरच्या देवळात एक तरी झाडं या दसर्‍याला नक्की लावणार Happy

छान लेख.

प्राथमिक शाळेत असताना कधीतरी आपट्याची पानं वाटलेली आठवतात. झाडावरुन तोडून बराच काळ झालेला असल्याने ती हिरवी असली तरी कुडकुडीत झालेली असायची. ही प्रथा आमच्या पालकांनाच न आवडल्याने नंतर कधीच आणली गेली नाहीत.

कांचनवृक्षाला नाजूक गुलाबी फुलं येतात का ? आमच्या सोसायटीच्या आवारात आहेत दोन तीन कांचनवृक्ष. पाने आपट्यासारखी आहेत पण आपटा नाही एवढे कळले होते. तुमच्या लेखामुळे उलगडा झाला.

छान लेख आणि छान संदेश. आचरणात आणणार.
अजून एक छान गोष्ट म्हणजे हा संदेश/लेख भरत गोडांबे यांच्या नावासहीत व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय.

अतिशय छान लेख. याला खूप प्रसिद्धी मिळायला हवी. आपटा या झाडाची ठरवून लागवड होत नसावी. वरवर निरुपद्रवी वाटणारी ही प्रथा एखादे झाड नामशेश करू शकते.

खूप छान लेख आणि माहिती.. मलाही खुप वाईट वाटते जेव्हा लोक सोनं वाटायच्या निमित्ताने ही पानं तोडतात आणि दसऱ्यानंतर मात्र ती सगळीकडे पडलेली असतात नाही तर केरा च्या बादलीत.तुमचा संदेश आवडला..
ह्या लेखाला खूप प्रसिद्धी मिळायला हवी.. सहमत

आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून बरे वाटले. आभार !
आपट्याची औषधी पाने दसऱ्याच्या निमित्ताने घराघरात पोह्चावीत नि जनसामान्यांनी त्याचा वापर करावा म्हणून कदाचित आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरु झाली असावी असे मला वाटते परंतु याला काही पुरावा नाहीये हा माझा अंदाज आहे हे मी येथे नम्रपणे नमूद करतो.
आपटा या झाडाची आणखी काही माहिती आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी देत आहे.

शास्त्रीय नाव :- बहुनिया रेसिमोसा
कुळ :- सिसालपिनेसी
मराठी नाव :- आपटा, शिद .
प्रकार :- छोटा वृक्ष

औषधी गुणधर्म :-
आपट्याच्या प्रत्येक भागाचा आयुर्वेदात वापर केला जातो . साल, मुळे, पाने, फुले, शेंगा सगळे भाग औषधी आहेत. सालीचा उपयोग मलेरिया आणि जुलबावर होतो. डोकेदुखी, ताप, त्वचारोग, रक्तविकार आणि जुलाब आदी व्याधींवर आपटा गुणकारी आहे.

पांढरा कांचन.

आम्ही कडू करांदे उकडतो तेव्हा ही आपट्याची पाने टाकतो उकडताना त्यात. परंपरेनुसार हे चालू आहे. पण कोणत्या कारणासाठी ते अजुन कळले नाही.

Pages