बाप्पा इन टॉप गिअर- रेयांश-पावणेसहा वर्षे- स्वस्ति

Submitted by स्वस्ति on 19 September, 2015 - 11:41

काल रात्री ११ वाजता रंगरंगोटीचा कार्यक्रम झाला.
चित्र बघताच पहिली प्रतिक्रिया होती " हां हां , बाप्पा स्कूटर चालवतोय Lol "
बहुतेक रंग आपल्याच मनाने भरण्यात आले . झाडाचं शेडिंग मी दूसर्या कागदावर दाखवलं ते कॉपी करण्यात आलं.

chitra.jpg

हा फोटो , कलाकार , कामात असताना :

artist.jpg

गादीवर पालथे पडून काम चालू आहे . आजूबाजूंचा रंगांचा खच बघून कल्पना येईल की आमचा बाप्पा रंगित कद आणि रंगिबेरंगी टोपी घालून ईतक्या कलरफुल स्कूटरवरून का चाललाय Happy .

मी एकावेळी एकच रंग वापरायचा सल्ला दिला होता पण " एकच कलर नाही द्यायचा . त्याला सगळे कलर द्यायचे , तुला कळतं नाही का "ब्युटिफुल" बनवायच ना त्याला , मग ????? " असा सज्जड प्रेमळ दम मिळाला.

हे चित्र रंगवून झाल आणि मग नंतर विचारणा झाली .
"दूसरं आहे का ?"
म्हटलं "दूसर आहे - सेम . वेगळा कलर दे त्याला . "
"नाही . बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे "
(संयोजक , कृपया नोंद घेण्यात यावी Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगकाम मस्त! पालथा पडून चित्रं रंगवणारा रेयांशही मस्त! त्याचे तुकडे पडलेले खडूही मस्त! सगळा पसाराच क्यूट आहे Happy

मस्त रंगवलेय.. प्रिंटेड लूक आलाय..
आणि सोबतची कॉमेंटरी सुद्धा भारी.. बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे Lol
प्राण्यांची खूप आवड दिसतेय, बिचार्‍याला कमीत कमी उंदीर तरी पुरवायचा, तर तिथेही स्कूटर दिलीय. Proud

किती क्यूट पोझ आहे, एकदम नॅचरल.. मन लावून केलेले रंगकाम एकदम सुपर आहे!!!

कमेंट जबरदस्त आहे, विचार करायला लावणारी.. Happy

"नाही . बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे "

>> खूपच छान! कोमेंट्स मस्त Happy

बाकी स्कूटरच्या सीटला रेस्ट वगैरे मस्त! झकास टेकून येणार बाप्पा Happy

सगळ्याना धन्यवाद .

कमेंट जबरदस्त आहे, विचार करायला लावणारी >>> विचार करत होते मी , बाप्पा खाकी कलरची हाफ पॅन्ट आणि फेल्ट हॅट घालून जंगलात फिरताना दिसला Wink .

प्राण्यांची खूप आवड दिसतेय, >> हो रे ऋ . लहानपणापसून हत्ती , सिंह , वाघ , मांजर , कुत्रा वगैरे प्राणी आमच्या पाळीव प्राण्याच्या लिस्ट मध्ये होते. Happy

कसलं मन लावून काम केलय... तरीच इतक भारी दिसतय चित्र Happy ... स्कूटरचा रंग मस्त ..फ्लॅशी एकदम Happy