काल रात्री ११ वाजता रंगरंगोटीचा कार्यक्रम झाला.
चित्र बघताच पहिली प्रतिक्रिया होती " हां हां , बाप्पा स्कूटर चालवतोय "
बहुतेक रंग आपल्याच मनाने भरण्यात आले . झाडाचं शेडिंग मी दूसर्या कागदावर दाखवलं ते कॉपी करण्यात आलं.
हा फोटो , कलाकार , कामात असताना :
गादीवर पालथे पडून काम चालू आहे . आजूबाजूंचा रंगांचा खच बघून कल्पना येईल की आमचा बाप्पा रंगित कद आणि रंगिबेरंगी टोपी घालून ईतक्या कलरफुल स्कूटरवरून का चाललाय .
मी एकावेळी एकच रंग वापरायचा सल्ला दिला होता पण " एकच कलर नाही द्यायचा . त्याला सगळे कलर द्यायचे , तुला कळतं नाही का "ब्युटिफुल" बनवायच ना त्याला , मग ????? " असा सज्जड प्रेमळ दम मिळाला.
हे चित्र रंगवून झाल आणि मग नंतर विचारणा झाली .
"दूसरं आहे का ?"
म्हटलं "दूसर आहे - सेम . वेगळा कलर दे त्याला . "
"नाही . बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे "
(संयोजक , कृपया नोंद घेण्यात यावी )
रेयांश, मस्त रंगवल आहेस चित्र
रेयांश, मस्त रंगवल आहेस चित्र !!!!!
"नाही . बाप्पा जंगलात हवा
"नाही . बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे ">>
हे भारी आहे.
मस्तं रंगवलय. स्कूटरची सीटही
मस्तं रंगवलय. स्कूटरची सीटही वेगळी नीट दिसतेय. व्यग्र हिरो पण मस्तं आणि तुमच्यातले संवादही मस्तं!
मस्त रंगवलय. कलाकार खुप
मस्त रंगवलय. कलाकार खुप गोड.
धन्यवाद .
धन्यवाद
.
रंगकाम मस्त! पालथा पडून
रंगकाम मस्त! पालथा पडून चित्रं रंगवणारा रेयांशही मस्त! त्याचे तुकडे पडलेले खडूही मस्त! सगळा पसाराच क्यूट आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रंगवलेय.. प्रिंटेड लूक
मस्त रंगवलेय.. प्रिंटेड लूक आलाय..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि सोबतची कॉमेंटरी सुद्धा भारी.. बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे
प्राण्यांची खूप आवड दिसतेय, बिचार्याला कमीत कमी उंदीर तरी पुरवायचा, तर तिथेही स्कूटर दिलीय.
किती क्यूट पोझ आहे, एकदम
किती क्यूट पोझ आहे, एकदम नॅचरल.. मन लावून केलेले रंगकाम एकदम सुपर आहे!!!
कमेंट जबरदस्त आहे, विचार करायला लावणारी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.. जंगलातला बाप्पा
मस्त.. जंगलातला बाप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्पा आणि कमेंट दोन्ही धमाल
बाप्पा आणि कमेंट दोन्ही धमाल आहेत.
मस्तच आहे बाप्पा!
मस्तच आहे बाप्पा!
मस्त आहे रंगीबेरंगी बाप्पा
कलाकाराची उस्फूर्त मते आणि घातलेला पसारा सगळंच एकदम गोड प्रकरण आहे.
"नाही . बाप्पा जंगलात हवा
"नाही . बाप्पा जंगलात हवा होता . लायन , टायगर , झेब्रा सगळे हवे "
>> खूपच छान! कोमेंट्स मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी स्कूटरच्या सीटला रेस्ट वगैरे मस्त! झकास टेकून येणार बाप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान!
छान!
मस्त.. मेकिंग ऑफ चा फोटो
मस्त.. मेकिंग ऑफ चा फोटो जास्त आवडला !
सगळ्याना धन्यवाद . कमेंट
सगळ्याना धन्यवाद .
कमेंट जबरदस्त आहे, विचार करायला लावणारी >>> विचार करत होते मी , बाप्पा खाकी कलरची हाफ पॅन्ट आणि फेल्ट हॅट घालून जंगलात फिरताना दिसला
.
प्राण्यांची खूप आवड दिसतेय, >> हो रे ऋ . लहानपणापसून हत्ती , सिंह , वाघ , मांजर , कुत्रा वगैरे प्राणी आमच्या पाळीव प्राण्याच्या लिस्ट मध्ये होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेयांश, मस्तच रंगवला आहेस
रेयांश, मस्तच रंगवला आहेस गणपतीबाप्पा!
मस्त रंगवले आहे चित्र. तुला
मस्त रंगवले आहे चित्र.
तुला कळतं नाही का "ब्युटिफुल" बनवायच ना त्याला >>>> हे मस्तच आहे.
क्युट आहे. रंगीबेरंगी स्कूटर
क्युट आहे. रंगीबेरंगी स्कूटर आणि टोपी.
कलाकाराने भरपूर रंग साठवलेले दिसतात.
कसलं मन लावून काम केलय...
कसलं मन लावून काम केलय... तरीच इतक भारी दिसतय चित्र
... स्कूटरचा रंग मस्त ..फ्लॅशी एकदम ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लै भारी रे रेयांश ......
लै भारी रे रेयांश ......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच !!
छानच !!