बायोस्कोप- नितांत सुंदर काव्यपट

Submitted by मोहन की मीरा on 31 August, 2015 - 01:05

एखाद्या कवीने कविता लिहिताना त्याच्या मनात काही अर्थ अभिप्रेत असतो. समोरचा श्रोता जेन्व्हा ही कविता वाचतो तेंव्हा त्याचा आर्थ आपल्या द्रुष्टीने लावतो. बायोस्कोप हा सिनेमा अशाच चार सिनेमांचे एकत्रीकरण आहे. गुलजार साहेबांची प्रस्तावना ह्या सिनेमाला मिळाली आहे. एक अप्रतिम अनुभव असेच मी ह्या प्रयोगाबद्दल म्हणेन. बायोस्कोप मधे जशी वेगवेगळी चित्र असतात. तसेच ह्या सिनेमात चार शॉर्ट फिल्म्स आहेत. निर्माते अभय शेवडे हा सिनेमा घेवुन सध्या अमेरिकेत आहेत.

पहिली शॉर्ट फिल्म= "दिल-ए-नादान"
कवी = गालिब
दिग्दर्शक = गजेंद्र अहिरे
कलाकार = नीना कुलकर्णी, सुहास पळशिकर

एक नामवंत गायिका , जी आता म्हातारी झालेली आहे. तिची सद्दी संपली आहे. सुवर्णकाळ मागे पडला आहे. तिच्या कडे आहे तो तिचा उतरलेला गळा, असंख्य पाहितोषिकांची भेंडोळी, डागडुजी न केलेलं जुनं घर, आणि तिच्या एवढाच जुना तिचा सारंगीवाला. बस्स... उतार्वयात बदाम विकुन रहाण्याची खंत दोघात आहे. त्यांच्या रंगहीन आयुष्यात खळबळ उडते ती एका पत्राने. नीना कुळकर्णी आपल्या नेहेमीच्या बाजात अभिनय करतात. पण खरी बाजी मारली आहे ती पळशीकरांनी!!! अप्रतिम मुद्राभिनय... सुरेख... ह्या फिल्म मधल्या कलादिग्दर्शनाला १०० मार्क. थोडी संथ वाटली तरी त्या विषयाला साजेशी मांडणी. एका अतिषय गाजलेल्या गजलचा दिग्दर्शकाला लागलेला अर्थ एकदम फिट्ट....

दूसरी शॉर्ट फिल्म = एक होता काऊ
कवी = सौमित्र
दिग्दर्शक = विजू माने
कलाकार = कुशल बद्रिके, स्प्रुहा जोशी, विद्याधर जोशी, संपदा कुलकर्णी

दिसण्याच्या न्युन्गंडाने पछाडलेल्या व्यक्तिची ही कथा आहे. जास्त उलगडुन सांगण्या पेक्षा बघण्याची गोष्ट आहे.
हा न्युनगंड कशा प्रकारे छळु शकतो ह्याचे उत्क्रुष्ट चित्रण. कुशल बद्रिकेने भुमिकेचे सोने केले आहे. केवळ ह्या आणि ह्याच भुमिके साठी त्याचा जन्म होता. नेहेमीची त्याची जी प्रतिमा आहे त्या पेक्षा एकदम हटके, खुप कमी संवाद असलेली भुमिका. प्रेमकथा किती तरल असु शकते ह्याचा जिवंत अनुभव ह्या फिल्म ने मिळाला. स्प्रुहा नेहेमीच समजुन भुमिका करते. छोट्या भुमिकेत विद्याधर जोशींनी कमाल केली आहे.

तीसरी शॉर्ट्फिल्म = बैल
कवी = लोकनाथ यशवंत
दिग्दर्शक = गिरीश मोहिते
कलाकार = मंगेश देसाई, स्मिता तांबे, सागर कारंडे

शेतकर्‍यांच्या आत्माहत्या हा हल्लीचा ज्वलंत विषय. पण ह्या शेतकर्‍याच्या आत्महत्येकडे त्याचा बैल कोणत्या नजरेने पहातो ते ह्या कवितेत थोड्या रांगड्या भाषेत आले आहे. एक कापुस पिकवणारा शेतकरी, जो अ‍ॅग्रेकल्चर ची डिग्री प्राप्त आहे. तरीही स्वतःची जमिन कसण्यात त्याला इंटरेस्ट आहे. त्याचा एकंदर परिस्थीती शी चाललेला झगडा ह्यासिनेमात मांडलेला आहे. मंगेश देसाईने पूर्ण पडदा व्यापुन टाकला आहे. अप्रतिम काम करत ह्या गुणी कलाकाराने आपले नाणे किती खण्खणीत आहे हे दाखवुन दिले आहे. स्मिता तांबेच्या वाट्याला थोडके सीन आहेत पण ती त्या भुमिकेत एकदम फिट्ट. खुप आंगावर येतो हा लघुपट.

चौथी शॉर्ट्फिल्म = मित्रा
कवी = संदिप खरे
दिग्दर्शक = रवी जाधव
कलाकार = वीणा जामकर, संदिप खरे, म्रुण्मयी देशपांडे

रवी जाधव हा स्वतः एक अतिशय प्रयोग्शील माणुस आहे. ही फिल्म पूर्ण्पणे ब्लॅक & व्हाईट मधे चित्रित केलेली आहे. ह्याचा काळ साधारण १९४० च्या सुमाराचा. पूण्यातील चीत्रिकरण अतिशय नेत्रसुखद. समलिंगी संबंधां सारखा बोल्ड विषय तो ही त्या जुनाकाळातला !!!! रवी जाधव ह्यांनी घेतलेली रिस्क फारच यशस्वी झालेली आहे. हा सिनेमा फक्त एक आणि एक व्यक्ती ने भारुन टाकला आहे... वीणा जामकर. बापरे !!! काय टॅलेंट आहे ह्या बाईत... भल्या भल्यांना खाउन टाकायची ताकद आहे. काय मुद्राभिनय !!!! अप्रतिम..... सर्प्राईज पॅकेज होते ते कवी संदीप खरे ह्यांचे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण. संदिप खरे अतिषय गोड दिसला आहे. सगळा सिनेमा सॉफ्ट फोकस प्रकारात चित्रित झाला आहे, त्यामुळे संदिप चा स्वप्नाळु, थोडा भाबडा चेहेरा खुप काही बोलुन जातो. म्रुण्मयी देशपांडे अतिषय सुरेख दिसते.

एक वेगळा प्रयोग करण्याचे धाडस निर्मात्याने केले. त्याला दिग्दर्शकांची साथ मिळाली. आपल्या भरतात झालेला हा एकमेव प्रयोग आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan lihilay.. Mitraachee goHT ase ek naaTak hote, tyaat hi bhumika RohiNee HattangaDeenee kelee hotee.

Mitraachee goHT ase ek naaTak hote >> हो, तेंडूलकरांची कथा आहे 'मित्रा'. तिचंच नाट्यरुपांतर. आणि ही तिच्याचवरची (शॉर्ट)फिल्म.

एक प्रयोग म्हणून 'बायोस्कोप' सिनेम्याचं महत्त्व मोठं आहे. गुलजारच्या आवाजात या चार कविता ऐकणं ही तर पर्वणीच..

चित्रपट बघितला नि खुप आवडला.. पहिली गोष्ट जास्त छान आहे असं म्हणे पर्यंत बाकीच्या गोष्टीही आवडल्या.. Happy

कुशल बद्रिकेचा आरश्यासमोरचा सीन!! .. एकही शब्द न उच्चारता बरचं बोलला आहे अभिनयातुन!

मी नुकताच बघितला हा सिनेमा . यू ट्यूबवर आहे. आवडला .पूर्ण सिनेमाचं मस्त आहे पण मला स्वतःला एक होता काऊ आवडला

कुशल बद्रिकेने मनापासून काम केलंय . हा गुणी अभिनेताने चला हवा येऊ द्या मध्ये काम करून एकसुरी बनवू नये स्वतःला . योग्य त्या संधीच सोने करू शकेल .

हा गुणी अभिनेताने चला हवा येऊ द्या मध्ये काम करून एकसुरी बनवू नये स्वतःला . योग्य त्या संधीच सोने करू शकेल >>>>> अगदी अगदी. झी मराठीची कुठली तरी जुनी सिरियल पाहिली होती अधूनमधून आशिष ( की आशुतोष ? ) कुलकर्णीची. त्यात कुशल बद्रिके चक्क खलनायक होता. चान्गल काम केल होत त्याने त्यात.

सुलू , वादळवाट ?? >>>>> ती सिरियल मी बघितली नाहीये, सो, त्याबद्दल कल्पना नाहीये.