वेळ असल्यास सांग, जरा बोलायचंय तुझ्याशी..
बस्स एक मिनिट हां, एवढा मेसेज टाईप करतो..
माझ्यापेक्षा जास्त ईम्पॉर्टंट आहे का तो?
(चाईला).. एक मिनिट
बस्स एक्कच मिनिट..
हं चल झाला.. बोल आता.. ऐकतोय
तो मोबाईल ठेव आधी बाजूला..
च्च.. ठिकाय, चल बोल आता
आपले फ्युचर प्लान्स काय आहेत?
ओह प्लान.. प्लान काय, फिरायला जाऊया कुठेतरी या विकेंडला. सीफेस. नाहीतर पाऊस असेल तर लॉंग ड्राईव्ह.. लोणावळा? वॉट से..
मी विकेंड प्लान नाही विचारत आहे.. तू आपल्या फ्युचर बद्दल काय विचार केला आहेस?
मी येत्या विकेंडच्या पुढच्या फ्युचरचा विचार कधी करत नाही.
तुला सिरीअसली नाहीच बोलायचे आहे का यावर?
यावर? .. कश्यावर?
लग्नानंतर आपण कुठे सेटल होणार आहोत?
कुठे म्हणजे?
मला अॅब्रोड जायचे आहे. माझे लहानपणापासूनचे ड्रीम आहे ते..
मग जा..
म्हणजे तू नाही येणार..
मी कश्याला, माझे नाही तसले काही ड्रीम..
पण तुला प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या फिल्डला तिथे खूप स्कोपही आहे. रश्मी सांगत होती मला..
कोण रश्मी? तिचा काय संबंध? आणि कुठेय स्कोप?
युएस.. किंवा युके.
अरे व्वाह म्हणजे डिसाईड सुद्धा केले.
येस्स
पण मला नाही ईंटरेस्ट, ईंडिया सोडून जाण्यात.. आणि मला माझ्या आईवडीलांना सोडूनही जायचे नाहीये.
मग त्यांनाही बरोबर घेऊन जाऊया.
काय संबंध? तुझे स्वप्न आहे अॅब्रोड सेटल व्हायचे.. त्यासाठी तू मला नेणार.. आणि सोबत माझ्या आईवडिलांनाही. क्या बात है! वाह..
मुलगी लग्नानंतर सोडतेच ना आपल्या आईवडिलांना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे.
कुठचा विषय कुठे नेतेस. तुला लग्नानंतर तुझ्या आईवडिलांपासून वेगळे राहावे लागणार म्हणून मी सुद्धा राहायचे.. आणि एका शहरात वेगळे राहणे आणि वेगळ्याच देशात राहणे यात फरक आहे. नुसते आईवडिलच नाही तर बहिणभाऊ, मित्र मैत्रीणी, नातेवाईक, सारेच ओळखीच्या लोकांपासून दूर जाणे. जिकडे आपल्या कोणीही ओळखीचा नाही तिकडे जाणे. कोणी सांगितलेय.
तुझ्याकडे काही अॅम्बिशन वगैरे नाही का?
काय अॅम्बिशन? अॅब्रोड सेटल होणे हे अॅम्बिशन असू शकते? अॅम्बिशन करीअरमध्ये असते. जर तुझ्या फिल्डमध्ये तुला आपल्या देशात स्कोप नसेल आणि त्यासाठी अॅब्रोडला जावे लागले तर ते ठिक आहे. त्याला अॅम्बिशन बोलू शकतो. पण अॅब्रोडलाच जायचे हे कसे अॅम्बिशन असू शकते..
माझे आहे
ओके, मग जा..
म्हणजे तू नाही येणार माझ्याबरोबर..
नाही.
...."
ओके हे बघ, तुला जर खरेच असे वाटत असेल की बाहेर जाणे हेच तुझ्या आयुष्याचे ध्येय आहे, आणि नाही गेलीस तर आयुष्यभर तुझी ईथे घुसमट होत राहील, तर या कारणास्तव तू माझ्याशी लग्न नाही केलेस तरी चालेल. आपण आताच वेगळे होऊया. ईटस ओके. आय कॅन अंडरस्टॅंड.
ईटस नॉट ओके..
तू मला एक कारण सांग की तुला का नाही जायचेय, काय प्रॉब्लेम आहे?
प्रॉब्लेम काय त्यात, मी नाहीये कम्फर्टेबल असा दुसर्या देशात, अनोळखी लोकांत जाऊन राहायला. आणि ईथे सारे सुखात चालू असताना मला त्याची गरजही भासत नाही तर का जाऊ?
का उगाच इमोशनल होत आहेस?
इमोशनल नाही, उलट प्रॅक्टीकल बोलतोय. मला तू अशी अट ठेवलीस की तुझ्याशी लग्न करायचे असेल तर बाहेर जावेच लागेल तर सिरीअसली मला पुन्हा विचार करावा लागेल. आणि म्हणून तुलाही सांगतोय तुझ्यासाठीही हा एवढा महत्वाचा इश्यू असेल तर तु सुद्धा पुन्हा विचार कर. लग्नानंतर पुढेमागे माझे विचार बदलतील वा तू माझे मन वळवशील या आशेवर राहू नकोस.
मला माझ्या मुलांना या देशात नाही वाढवायचेय. बाहेर त्यांना चांगल्या फॅसिलिटी मिळतील.
हे तू आता उगाच वादाला वाद घालतेस. आपण ईथेच राहून वाढलो ना. काय वाईट झाले आपले. आणि मुलांचीच काळजी असेल तर त्यांना चॉईस दे ना. लेट देम डिसाईड कुठे राहायचेय. उलट जन्माला यायच्या आधीच तू मुलांपासून त्यांचा देश तोडायला बघतेस.
असा काही देश तुटत नाही. आपण सुट्ट्यांमध्ये इथे येत जात राहणारच.
हो, फक्त पाहुण्यासारखे. मुलांना आपला देश तोच वाटणार जिथे ते राहणार.
अर्थात यात काही चुकीचे नाहीये, पण होणार हे असेच.
असे गरजेचे नाही. आपण त्यांच्यावर तसे संस्कार करायचे.
कसले संस्कार? आपला खरा देश भारत आहे आणि भारतावर पहिले प्रेम करा हे बिंबवणार त्यांच्या मनावर? मग त्यांनी तुला विचारले की तुम्ही तो देश सोडून का इथे आलात तर काय ऊत्तर देणार? माझे अॅम्बिशन होते यूएस युकेमध्ये राहणे.
थोडक्यात तुला माझे ऐकायचे नाहीयेच..
ऐकतोय की, पण पटत नाहीये. आपले विचार या बाबतीत टोटली डिफरन्ट आहेत. सिरीअसली... पुन्हा विचार कर.
......"
- ऋन्मेष
कुठल्या नाटकातला वादसंवाद आहे
कुठल्या नाटकातला वादसंवाद आहे हा ?
तू तिथं मी!
तू तिथं मी!
छानच जमलयं की नाटकं !
छानच जमलयं की नाटकं !
ओ श्री, तुमची टिंब
ओ श्री, तुमची टिंब चुकतायत.
जमलयं नव्हे जमलंय . आणि नाटकं काय?
सातीअम्मा खरचं की , अरेच्चा
सातीअम्मा खरचं की , अरेच्चा एकच नाटक आहे नाही का ?
तुम्ही या प्रवेशापुढची नाटके
तुम्ही या प्रवेशापुढची नाटके पण इम्याजिनली का?
हो मग पारट-१ , पारट-२
हो मग पारट-१ , पारट-२ .
वादसंवाद असा गच्चकनं ब्रेक लावल्यासारखा थांबत नसतो.
भाग दुसरा, दिवस दुसरा. तो-
भाग दुसरा, दिवस दुसरा.
तो- ठरलं मग, मी पण अॅब्रॉड रहायचं पक्कं केलंय.
ती- अय्या खरंच? कुठे?
तो- अगदीच यू एस, यू के नको.
ती- अरे वा, मग काय ऑस्ट्रेलिया /कॅनडा?
तो- नाही गं राणी, नैरोबी किंवा खोबार. माझ्या टॅलेंटला तिथेच खरी किंमत आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
काय हे पार्ट-२ इतका लहान ?
काय हे पार्ट-२ इतका लहान ? आणि डायरेक्ट नैरोबी काय ? जरा अधली-मधली स्टेशनं पण घ्या की !
आणि ते खोबार आहे की खोबरं ?
अर्र मोदींच्या 'मेक इन
अर्र मोदींच्या 'मेक इन इंडीया' घोषणेचा असा अर्थ घेशील वाटले नव्हते.
सीमंतीनी, अशक्य हसलो.
सीमंतीनी, अशक्य हसलो.
मला वाटते, "मला परदेशात
मला वाटते, "मला परदेशात जाण्याची फार इच्छा आहे" असे म्हणायचे असेल. पण ना धड मराठी येत, ना धड इंग्रजी. मग अॅब्रोड सेटल व्हायचे आहे, अँबिशन आहे असले काहीतरी बोलायचे!
जायचे तर जाऊन या परदेशी, चांगले पाच सहा महिने आरामात राहून सगळे काही बघा नि मग सेटल वगैरे रहाण्याच्या गोष्टी करा!! वाटते तितके सोपे किंवा शक्य नाही. काही जणांची मानसिकता त्याला साथ देऊ शकत नाही. मग कशाला अट्टाहास? तेंव्हा ज्याचा अनुभवच नाही त्याचा अनुभव नक्की घेण्याची जबरदस्त इच्छा असणे चांगलेच, पण ती अँबिशन नव्हे!
अर्र मोदींच्या 'मेक इन
अर्र मोदींच्या 'मेक इन इंडीया' घोषणेचा असा अर्थ घेशील वाटले नव्हते. >>
माझ्या आसपास अश्या २-३ जोड्या
माझ्या आसपास अश्या २-३ जोड्या आहेत ज्यात एकाला कायमस्वरूपी परदेशी जायची क्रेझ आहे तर एकाला आपला देश सोडवत नाही. म्हणून हा विषय ईथे घेऊन आलो.
याचा पार्ट टू नाहीये. आलाच तर वेगळ्या विषयावर असेल. दोघांमध्ये तेवढाच संबंध असेल जेवढा रामायण आणि महाभारतामध्ये आहे.
सीमंतिनी,
मला मेक ईन ईंडिया घोषणेच्या अंतर्गत काय येते याची फारशी कल्पना नाही.
बेफिकीर,
धन्यवाद
सीमंतिनी!
सीमंतिनी!
याचा पुढचा पार्ट 'अगं अगं
याचा पुढचा पार्ट 'अगं अगं म्हशी मला कुठं नेशी' असा असतोय.
इंडियात मेक करायची संकल्पना चांगली आहे बघा. काय काय मेकावं लागतं ते लग्नानंतर समजेलच
हाहा सिमंतीनी मला आपल्या
हाहा सिमंतीनी मला आपल्या बोलण्यातील विनोद आता समजला, उशीराबद्दल दिलगीर आहे
कस होणार रे बाबा तुझं छान
कस होणार रे बाबा तुझं छान लिहीतोस.
(पण गोष्ट तुझी असेल तर ब्रेक-अप नको करूस रे बाबा, थोडी नकचढी आहे ही गर्लफ्रेंड पण लई सॉर्टेड आउट पोरगी आहे. )
तर ब्रेक-अप नको करूस रे बाबा
तर ब्रेक-अप नको करूस रे बाबा .. >> प्रश्नच उदभवत नाही..
धन्यवाद
ऋन्मेष, मस्त लिहीलयस रे. इतक
ऋन्मेष, मस्त लिहीलयस रे. इतक की पण मला तर दोन्ही बाजु सारख्याच पटतायत.
ह्मम छान लिहिलेय .मला माझी
ह्मम छान लिहिलेय .मला माझी गोष्ट वाचतीये असे वाटले .... फरक ईतकाच की मला भारतात रहायचेय व नवर्याला ऊसगावात
मनीमोहोर, दोन्ही बाजू जेव्हा
मनीमोहोर,
दोन्ही बाजू जेव्हा आपापल्या जागी बरोबर असतात तेव्हा समजूतदारपणाची खरी कसोटी लागते.
रुन्मेश भाई - नेहमी प्रमाणे
रुन्मेश भाई - नेहमी प्रमाणे तुमच्या बेसिक मधेच लोचा आहे.
संभाषणावरुन एकुणात असे दिसतय की त्या दोघांचे प्रेम वगैरे आहे आणि लग्न पण करायचे नक्की ठरलय. ओळख, प्रेम आणि लग्न करायचे ठरविण्यापर्यंत त्या मुलीला परदेशात सेटल होयचे आहे आणि मुलाला भारतातच रहायचे आहे हे कधी समजलेच नाही?
तुझ्या आसपासचे सगळे लोक असे कसे रे...
गूड पॉईंट टोचाजी, पण बरेच
गूड पॉईंट टोचाजी,
पण बरेच केसेस मध्ये हे वेळीच माहीत असते पण त्यामागचे गांभीर्य समजून घेतले जात नाही. वा लग्नाची, सेटल व्हायची वेळ जेव्हा येते तेव्हाच ते गांभीर्य समजते.
अरेंज मेरेज मध्ये आधीच हे क्लीअरकट नमूद केले जात, कारण तेव्हा थेट लग्नच करायचे असते.
प्रेम मात्र प्रेमासाठीच केले जाते आणि त्यानंतर लग्नाचा टप्पा येतो.
प्रेमात हे कुठल्याही टप्प्यावर समजले तरी फिरून मागे जाणे अवघड ठरते, जेव्हा हा प्रश्न उदभवेल तेव्हाचे तेव्हा बघू म्हणत आपण पुढे पुढे जात राहतो.
<< अरेंज मेरेज मध्ये आधीच हे
<<
अरेंज मेरेज मध्ये आधीच हे क्लीअरकट नमूद केले जात, कारण तेव्हा थेट लग्नच करायचे असते.
प्रेम मात्र प्रेमासाठीच केले जाते आणि त्यानंतर लग्नाचा टप्पा येतो.
प्रेमात हे कुठल्याही टप्प्यावर समजले तरी फिरून मागे जाणे अवघड ठरते, जेव्हा हा प्रश्न उदभवेल तेव्हाचे तेव्हा बघू म्हणत आपण पुढे पुढे जात राहतो.>>
वा!
क्या बात है!
एकदम पटलं!
छान लिहिलंयंस ऋन्मेष.
छान लिहिलंयंस ऋन्मेष.
@ऋन्मेऽऽष छान लिहिला आहेस.
@ऋन्मेऽऽष
छान लिहिला आहेस. शॉर्ट आणि एकदम टू द बुल्ल्स आय
अले वा च्यला, शेवटी पोल्गा
अले वा च्यला, शेवटी पोल्गा मोठा झाला ..
छान लिखाण
ऋन्मेऽऽष, छान लिहिलं आहेस. पण
ऋन्मेऽऽष, छान लिहिलं आहेस. पण मला बोलणार्या दोघांमधील मुलाचा दृष्टीकोन मनात ठेवून लिहिलं आहेस असं वाटलं. म्हणजे संवाद समतोल (बॅलन्स्ड) आहे असं वाटलं नाही. मुलगी तिची ईच्छा मुलावर लादते आहे असाच सूर सुरुवाती पासुन लागला. तुला तसेच लिहायचं असल्यास लेख जमलाय! पण तिचीही बाजु मांडायची असल्यास ते जमलं नाही असं वाटलं.
प्रेमात पडताना जोडीदाराचे त्याच्या आयुष्यात काय ध्येय आहे ह्या बाबतीत बोलणं झालच नाही हे मला पचल नाही. सर्वसाधारणपणे एकमेकांशी विचार जुळण्याच्या प्रक्रियेत तो एक फॅक्टर येणारच. हे मा वै म.
Pages