शेवभाजी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 04:41
shevabhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) शेव २ कप भरून
२) १ मोठा कांदा
३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
४) ८/९ लसूण पाकळ्या
५) अर्धा इंच आले
६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या
७) १ टिस्पून जिरे
८) २ टिस्पून धणे
९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )
१० ) तेल
११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )
१२) कोथिंबीर
१३) मीठ
मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.
Shevbhajee Shev.JPG

क्रमवार पाककृती: 

नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझाच अंदाज .. चव घेतल्यानंतरचा !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून लंच मधे भगत ताराचंद मधे जावून आज शेव टॉमेटो भाजी खाऊन आलो.
.. >> भगत ताराचन्दची शेवभाजी ? ह्या: ...

ऑफिस लंच!! कलिगने इंदौरहून लवंग शेव आणली माझ्यासाठी, तर लगेच तुमची शेव भाजी आठवली!! धन्यवाद दिनेशदा.. मस्त रेसिपी, डब्बा चाटून पुसून संपला Happy

P_20150630_092024.jpg

टण्याच्या रेसिपीत थोडे इंप्रोव्ह करून , बेसन मध्ये पालक आणी थोडेसे तांदळाचे पीठ आणी थोडे मोहन घालून केलेली मायक्रोवेव्ह पालक शेव !
V1.jpg

Fodnichya telat thodi chimutbhar sugar taka....rassyawar mast lal telacha tawang.

जेवण्यापूर्वी नैवेद्य दाखवायचाच राहिला..म्हणुन मग घाईघाईत काढलेले फोटो..
अर्धी सरलेली भाजी Lol गोड मानुन घ्या.. आपल हे तिखट मानुन घ्या Wink
बाजुला आंबा फणसाच लोणचयं.. आई माझ्झी Blush .. आठवणीनं घेऊन आली माझ्यासाठी Happy

अर्धी सरलेली असल्यान हवी तशी तर्री नै दिसताय Sad

WP_20150714_13_12_47_Pro.jpgWP_20150714_13_12_56_Pro.jpg

मस्त झालीय शेवभाजी. तुम्हाला आणि शेवेसाठी टण्याला धन्यवाद Happy

टण्याच्या साबांनी दिलेली मायक्रोवेव्ह शेवेची कृती अत्यंत भारी आहे !! त्यात थोडा सोडा, मोहन, वेगवेगळे मसाले-भाज्या घालून बघण्याचा प्रयोग केला तर नुसती खायला खुसखुशीत शेवही छान होईल असे वाटले. ही लाल शेव जरा कडकच असते तशी ह्या कृतीने परफेक्ट झालीय.

That's the thing दिनेशदा Wink
खुप महिन्यांनी पोळ्या केल्या मी..उष्णतेमुळे हातांना त्रास होतो हे एक कारण आणि कंटाळा पन येतो म्हणुन सहसा या कामासाठी ढकलाढकली करते मी Lol .. पण काल पोळ्याच खायच्या होत्या आणि रुमीला खिचडी म्हणुन मग अपना हात जगन्नाथ कराव लागल ..

अश्विनी मस्त फोटो. ही भाजी पुन्हा खायची ईच्छा होत आहे म्हणून धागा वर काढला. Wink

सोमवार आहे त्यामूळे आज दिनेशदांच्या अजून दोन नविन रेसिपीज येतीलच. Happy

नमस्कार.. मी नवीन सदस्य आहे. पण मला काही काही ठिकाणी रेसीपी दिसतंच नाहियेत. जस ही शेव भाजी ची receipe.. चक्क क्ष वगैरे लिहून येतय. अणि फोटो पण दिसत नाहियेत.
कृपया मदत करावी

नमस्कार.. मी नवीन सदस्य आहे. पण मला काही काही ठिकाणी रेसीपी दिसतंच नाहियेत. जस ही शेव भाजी ची receipe.. चक्क क्ष वगैरे लिहून येतय. अणि फोटो पण दिसत नाहियेत.
कृपया मदत करावी

नवीन Submitted by Chaitali Bhavsar on 10 October, 2018 - 12:53

दिनेशदानी स्वता: त्या रेसीपी काढून टाकल्या आहेत

https://dineshda.blog/

वरिल त्यान्च्या blog वर सर्व रेसीपी सापडतील

Pages