शेवभाजी

Submitted by दिनेश. on 22 June, 2015 - 04:41
shevabhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) शेव २ कप भरून
२) १ मोठा कांदा
३) अर्धी वाटी खोबर्‍याचा किस
४) ८/९ लसूण पाकळ्या
५) अर्धा इंच आले
६) आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा लाल मिरच्या
७) १ टिस्पून जिरे
८) २ टिस्पून धणे
९) १ टिस्पून गरम मसाला ( हा ताजा केला तर चांगले. त्यासाठी मिरी, लवंगा, दालचिनी, वेलची, दगडफूल घ्या. )
१० ) तेल
११) फोडणीचे साहित्य ( हिंग, हळद, मोहरी )
१२) कोथिंबीर
१३) मीठ
मुख्य म्हणजे शेव २ कप भरून. हि शेव जाडी आणि तिखट पाहिजे. भावनगरी शक्यतो नको कारण ती लवकर विरघळते. याच कारणासाठी अगदी बारीक शेवही वापरता येत नाही. आपल्याकडच्या फरसाणच्या दुकानात हि असतेच. दिवाळीच्या पदार्थातली शेवही वापरता येईल. हि शेव ताजी व कुरकुरीत असावी.
Shevbhajee Shev.JPG

क्रमवार पाककृती: 

नाशिक, जळगाव भागात शेवभाजी फार लोकप्रिय आहे. तिथल्या धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.
धाब्यावर अर्थातच तेल व तिखट जास्त वापरलेले असते.
१) लाल मिरच्या घेतल्या असतील तर त्या आणि तर ताजे मसाले खमंग भाजून घ्या. व त्याची पूड करा
२) खोबर्‍याचा किसही भाजून घ्या
३) कांदा उभा चिरून तेलात लालसर परतून घ्या. ( हल्ली वाळवलेला कांदा मिळतो. तो वापरला तर पटकन भाजला जातो. तो २ टेबलस्पून पुरेल )
४) खोबरे, आले, लसूण व कांदा यांचे बारीक वाटण करा. ( मिक्सरमधे आधी खोबरे आणि मग कांदा, आले, लसूण वाटावे लागेल. )
५) या वाटणात मसाला मिसळा.
६) थोड्या तेलाची फोडणी करून त्यात मसाला परतून घ्या. त्यात हवे तेवढे पाणी घालून रस्सा उकळू द्या. बेताचे मीठ व कोथिंबीर घाला. ( शेवेत मीठ असतेच, त्या मानाने मीठ घाला. )

७) पाणी थोडे जास्तच घाला कारण शेव घातल्यावर रस्सा दाट होतो.

८) अगदी खायच्या वेळेला त्यात शेव टाका आणि २/३ मिनिटे उकळा.

९) भाकरी किंवा चपाती सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा रस्सा तिखटच असतो. यात आंबटपणासाठी काहिही ( टोमॅटो, चिंच ) घालत नाहीत. तसेच गूळ वा साखरही घालत नाहीत. हवे तर सोबत कच्चा कांदा आणि लिंबू घ्या.

हा मसाला आधी करुन ठेवता येतो. पाणी न घालता वाटला तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमधे अगदी महिनाभरही टिकेल.

ह्याच मसाल्याचे पाणी उकळून त्यात कच्ची अंडी फोडून घातली तर अंड्याचा रस्सा तयार होईल.

कोथिंबीर फोडणीत, रस्सा उकळताना किंवा वरूनही घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझाच अंदाज .. चव घेतल्यानंतरचा !
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी Happy

मी आज संध्याकाळी करायचा बेत केलाय. Happy

रच्याकने, भताची कशी होती? पंजाबी स्टाईल्ड खानदेशी शेव टामाटो भाजी.

सध्या तळणावर बंदी आहे . जीवघेणे फोटो बघून काल चक्क स्वप्नात शेव भाजी Uhoh
आता प्रिंसेस नी लिहिलेय तशी इंन्स्टंट शेव करुन शेवभाजीचा बेत ! थॅक्स प्रिंसेस Happy

ललिता-प्रीति >> मी बघुनच जीव देणारे आता..
कित्ती म्हणजे कित्ती कंट्रोल ठेवावा लागतोय मला नाही समजु शकणार तुम्ही लोक..त्यात हे असले भाजी भाकरीचे जीवघेणे फोटो टाकता.. भुक लागलीय.. घरात बनलेला मसालेभात कस्काय गोड लागणार आता Sad .. जा बा मी नै..

काल संध्याकाळी घेऊन आले मी शेवभाजी, खानदेशी स्वाद पोळी भाजी केंद्रातून. नवऱ्याला फार आवडत नसल्याने, एकटीसाठी घरी कोण घाट घालणार. मस्तच होती. Happy

सगळे फोटो मस्त आहेत.

आज केली होती. लाल झाली रंगाने आणि जरा खोबरं पण जास्त झालं. मात्र चव मस्त आली होती.

शेव करायला प्रिन्सेसची पद्धत अजून जरा इम्प्रूव्ह केली. झार्‍यावर शेव पाडण्याऐवजी शेवयासारख्या शेव वळल्या त्याचे छोटे छोटे तुकडे केले व १ मिनिट मायक्रोवेव्हमधून काढले. एकदम तळलेल्या शेवेप्रमाणे खुटखुटीत (कुरकुर्‍या) झाले.

shev1.jpg

नो सोडा, नो मोहन,

बेसन + जिरे पावडर + ओवा कुटून + मीठ + लाल तिखट. पाणी घालून गोळा केला आणि हाताला चिकटत होतं म्हणुन तेल लावलं व शेवयांसारखं वळल्या

गैरसमज होईल की हे मला सुचले तर तसे नाही. सासुबाईंनी हे सुचवले.

हे बघून मी काल विकतची शेव आणलीय. आता भाजीचा मुहुर्त काढायचाय.

तेलकट बंद केल्याने बराच विचार करून आणली शेव.

घरी आई मस्त बनवते हि शेव.

बेसन, तांदूळ पीठी, भरडलेला ओवा, लाल तिखट , जीरं भरडून, धणा पूड, हिंग, काला नमक, बडीशेप पूड, काळंमीरं आणि लिंबू रस.

दिनेश.,

तुमची शेव कुठल्या कंपनीची आहे?

एका भुसावळच्या मैत्रिणीकडे खाल्ली होती... हाताचा गरम मसाल्याचा वास दुसर्^या दिवसापर्यंत गेला नव्हता. झणझणीतपणाचा कहर... सू सू करीत... पोळ्या संपल्यावर ब्रेड सोबत चापलेली आठवतेय.
आत्तासुद्धा तोंडाला पाणी सुटलय Happy

भुसावळला बोंडेकडे आणी त्यासाठी
लागणारा मसाला सुद्धा. तशी ही
शेव आख्ख्या खानदेशात वर्ल्डफेमस
आहे.
>>>> आणी फैजपुर येथील धनजी चे तुरकाठी शेव

टण्या मायक्रोवेव्ह शेवेची रेसिपी आणि आयडिया झकास आहे ..

सगळी शेव भाजीत वापरली की कोरडी ठेवली आहे .. थोड्या वेळानंतरही ती खुटखुटीत राहिली का? की वातड किंवा तत्सम अनप्लेझन्ट ट्रान्स्फॉर्मेशन झालं त्याच्या टेक्स्चर चं?

>> गैरसमज होईल की हे मला सुचले तर तसे नाही. सासुबाईंनी हे सुचवले.

Happy

Tanya, mastach idea. Microwave shev !!! Mee vaaparalelee shev suTeech dilee hotee mitraane. Bahutek haldiram chee asel.

टण्या, शेवेची आयडीया मस्तच. करुन बघावीशी वाटतेय.
देवीका, माझ्या एका मित्राने मला ती शेव दिली होती ( तो राजस्थानी आहे ) कदाचित त्याच्या घरची असणार. खरं तर तो गेल्यानंतर मी पार्सल उघडले. विचारता आले नाही.

टण्याची मायक्रोवेव शेव बघून प्रयोग केला. छान खुट्खुटीत शेव झाली .
IMG_5257 (400x300).jpg
हापिसातली कामे लांबल्याने घरी कुणीच जेवायला नाही असे झाले. म्हणून शेव डब्यात भरुन ठेवली . दोन दिवसानंतरही मस्त खुट्खुटीत आहे. टण्या, तुझ्या साबाईंना धन्यवाद.

Pages