आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
बुरुंडीचे विद्यमान
बुरुंडीचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष Nkurunziza ह्यांचा ठावठिकाणा नाही. ते टांझानियात एका समिटसाठी गेले होते. तिथून बुरुंडीत न येता युगाण्डात गेले. तिथून पुढे त्यांचा पत्ता नाही. Nkurunziza ह्यांनी सलग तिसर्या प्रेसिडेंशिअल टर्मसाठी प्रयत्न सुरु केल्यावर बुरुंडी अशांत आहे. तिथल्या मिलिटरीतच ह्यावरून दोन गट पडले आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या विरोधी गटाने डिक्लेअर पण करून टाकलं की Nkurunziza ह्यांचा कार्यकाल संपलेला आहे.
प्रथेप्रमाणे
व्हाईट हाउस मधे बुरुंडीच्या समस्येत मधे पडायची लक्षणे आहेतच. अमेरिकेच्या डिप्लोमॅट ह्याबाबतीतल्या इमर्जंसी मिटिंगसाठी टांझानियातल्या दार-ए-सलामयेथे गेल्या.
http://m.firstpost.com/world/military-attempts-coup-burundi-president-un...
--------
आता येमेन, बुरुन्डीतल्यासारखे वरिष्ठ नेते आपल्या देशातून दुसर्या देशात सुरक्षिततेसाठी लपून राहतात. मग तिथल्या पिचलेल्या सामान्य जनतेने योग्य अयोग्य मार्गाने दुसर्या देशात आश्रय घेतला तर दोष कसा द्यायचा? योग्य मार्गाने त्यांना कुणी नेणार नाही आणि दुसरे देश असे विस्थापितांचे लोंढे तरी किती सहन करतील? "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना", "बळी तो कान पिळी" वगैरे वगैरे....
चिंताजनक ....ISI man who
चिंताजनक ....ISI man who 'sold' Osama a Kashmir hardliner
If indeed the ISI walk-in in the same Brig Usman Khalid, New Delhi will have much to be concerned about his new status as CIA consultant since he is full of toxic and dangerous theories, including the need for Pakistan and Afghanistan to join forces to liberate Kashmir. Khalid is unapologetic about the Pakistan-inspired insurrection in Kashmir and is an Islamist fantasist who believes Partition is an unfinished business and India will break-up further. "
http://m.timesofindia.com/world/pakistan/ISI-man-who-sold-Osama-a-Kashmi...
केश्विनी, अमेरिकेला काश्मिरात
केश्विनी,
अमेरिकेला काश्मिरात घुसायचंय. भारताचं अवसान खच्ची करायला म्हणून असल्या बातम्या प्रकाशित केल्या जातात.
आ.न.,
-गा.पै.
केश्विनी, >> The Vatican
केश्विनी,
>> The Vatican concluded its first treaty that formally recognises the State of Palestine,
मध्ययुगीन पोप जसा राजकीय हस्तक्षे करीत असे अगदी तसाच आजचा पोपही करतो आहे. आणि म्हणे ख्रिश्चन हा धर्म आहे. ती उघड राजकीय चळवळ आहे.
आ.न.,
-गा.पै.
गामा अमेरिकेला काश्मिर मधे का
गामा
अमेरिकेला काश्मिर मधे का घुसायचं आहे?
तिथून रशियावर हेरगिरी करायला
तिथून रशियावर हेरगिरी करायला सोपे जाते, नि चीनवर पण.
भारत तिथे अमेरिकन हवाई अड्डा ठेवायला परवानगी देत नाही.
सध्या तरी भारतीय लोक आय पी एल, सलमान खानचा तुरुंगवास, पाकीस्तान भारत क्रिकेट मॅचेस अश्या गंभीर प्रश्नात गुंतले आहेत. तेंव्हा सारासार विचार करावा की त्या काश्मीरमधे आजकाल हिंदी चित्रपटांचे शूटिंग होत नाही व तिथे क्रिकेटहि नाही. शिवाय तो कुठला कायदा की त्याअन्वये काश्मीरमधे इतर राज्यातल्या लोकांना जमीन विकत घेता येत नाही त्यामुळे ते काश्मीर गेले पाकीस्तानकडे तर कायमची डोकेदुखी मिटेल.
ब्रिटिशांनी "सांभाळला" सगळा मोठा देश, आपल्याला काही जमत नाही. आपण आपले वेगळे वेग़ळे होऊ.
पूर्वी कसे छान होते. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात म्हणे पाचशेहून अधिक स्वतंत्र राज्ये होती, म्हणजे खूप खूप राजे, प्रधान, सगळे स्वतंत्र. आपल्या राज्यात काय वाट्टेल ते करावे, सारखे दिल्लीकडे धावणे नको.
इस्लामिक स्टेट मिलिटंट्स
इस्लामिक स्टेट मिलिटंट्स सिरियाचा संस्कृतिक वारसा असलेल्या Palmyraच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. हे स्थान उध्वस्त केले जाण्याची भीती आहे.
Syria's head of antiquities issued an urgent appeal for international action to save Palmyra, saying extremist militants were less than two kilometres (barely a mile) from the remains of one of the most important cultural centres of the ancient world.
The jihadist advance on the well-preserved remains came as an international conference was under way in Cairo to address destruction already wreaked by IS on the ancient sites of Nimrud and Hatra in Iraq.
http://www.dailymail.co.uk/wires/afp/article-3081310/IS-jihadists-threat...
-------
बामियान बुद्धा उद्ध्वस्त केले गेले होते ती आठवण झाली.
यूरो, >> अमेरिकेला काश्मिर
यूरो,
>> अमेरिकेला काश्मिर मधे का घुसायचं आहे?
मला माहितीयेत ती कारणे देतो.
१. काश्मिरात पाच देशांच्या सीमा एकत्र येतात. भारत, पाक, चीन, अफगाणिस्थान आणि ताझिगीस्थान. काश्मिरातून पाचही देशांवर हेरगिरी/घुसखोरी मार्गे लक्ष ठेवता येतं.
२. मध्य आशियातील तेल व नैसर्गिक वायू हिंदी महासागरात आणायचा त्यातल्यात्यात सोपा मार्ग काश्मिरातून आहे. दुसरा मार्ग इराण मधून आहे पण इराण अमेरिकेचा मित्र नाही.
३. वरील तेल्वायूवाहिन्यांस संरक्षण पुरवायला त्यांच्या बाजूबाजूने रेल्वे मार्ग टाकणं अत्यावश्यक आहे. या वाहिन्या आणि रेल्वे काश्मिरातून जातात. हा भाग भारताच्या ताब्यात असल्याने भारत या वाहिन्यांवर स्वत: वचक ठेवून असेल. मग अमेरिकेस दादागिरी करता येणार नाही. म्हणून काश्मीर भारतापासून पूर्णपणे तोडून त्याजागी अमेरिका घुसायला बघते आहे.
४. काश्मिरात अमेरिकी सेनातळ उभारला की भारताला चांगलंच कोंडीत पकडता येईल.
आ.न.,
-गा.पै.
<<काश्मिरात पाच देशांच्या
<<काश्मिरात पाच देशांच्या सीमा एकत्र येतात. भारत, पाक, चीन, अफगाणिस्थान आणि ताझिगीस्थान. काश्मिरातून पाचही देशांवर हेरगिरी/घुसखोरी मार्गे लक्ष ठेवता येतं.>>
------ जगाच्या प्रत्येक कानाकोपर्यात नाक खुपसायची किम्मत मोजावी लागली आहे, भविष्यात पण मोजावी लागणार आहे. शेवटी मरतात ते गरिब घरातुन आलेले सैन्यामधिल जवान.
अमेरिकेत (तसेच भारतात आणि इतरत्र) कोणत्याही राजकारण्यान्ची पुढची पिढी लढायला सैन्यात दाखल झालेली आहे का ?
नॉर्थ कोरिया मधे रक्षा
नॉर्थ कोरिया मधे रक्षा मन्त्र्याला शेकडो लोकान्च्या समक्ष गोळ्या घालुन ठार मारले.... अपराध काय ? ? अध्यक्ष भाषण देताना झोपले होते म्हणुन ?
का सध्याच्या किम सरकारच्या विरुद्ध बन्ड करणार होते म्हणुन?
http://www.bbc.com/news/world-asia-32716749
गामा कश्मिर भारता पासुन गेगळा
गामा
कश्मिर भारता पासुन गेगळा झाला तरी पाक त्यावर कब्जा करणार त्यामुळे स्वतंत्र काश्मिर मधे अमेरिकेला इटरेस्ट आहे हे काही खरे वाटत नाही.
अत्ताही पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानच्या नियंत्रणात आहे आणि तो भारतच्या नियंत्रणात असलेल्या काश्मिर पेक्षा तुम्ही म्हणता त्या देशांच्या जास्त जवळ आहे. अमेरिका तिथे केव्हाही आपले अस्तित्व दाखवु शकते आणि भुतकाळात दाखवु शकली असती
सध्याचा कराची बंदरा पर्यंत मार्ग चीन बांधत आहे जो पाक व्याप्त काश्मिर मधुन जातो भारतातुन नाही.
भारताला कोड़ीत पकडण्या साठी अमेरिकेला इथे येण्याची गरज नाही. पकिस्तान आणि चीन पुरेसे आहेत.
यूरो, १. >> कश्मिर भारता
यूरो,
१.
>> कश्मिर भारता पासुन गेगळा झाला तरी पाक त्यावर कब्जा करणार त्यामुळे स्वतंत्र काश्मिर मधे अमेरिकेला
>> इटरेस्ट आहे हे काही खरे वाटत नाही.
स्वतंत्र काश्मिरात अमेरिकेस कधीच रस नव्हता. फक्त तसा नारा देऊन भारतापासून तोडायचं बस.
२.
>> अमेरिका तिथे केव्हाही आपले अस्तित्व दाखवु शकते
....
>> सध्याचा कराची बंदरा पर्यंत मार्ग चीन बांधत आहे जो पाक व्याप्त काश्मिर मधुन जातो भारतातुन नाही.
पाकव्याप्त काश्मीर संरक्षणाच्या दृष्टीने कुचकामाचा आहे. चीन जो मार्ग बांधतोय तो सहजपणे भारताच्या मारगिरीच्या टप्प्यात आहे. तो पूर्णपणे सुरक्षित करायचा झाला तर भारताला काश्मिरातून हाकलणं आवश्यक आहे.
३.
>> भारताला कोड़ीत पकडण्या साठी अमेरिकेला इथे येण्याची गरज नाही. पकिस्तान आणि चीन पुरेसे आहेत.
पाकिस्तान विश्वासार्ह नाही. माझ्या अंदाजाने अमेरिकेस काश्मिरात प्रत्यक्ष तळ बांधायलाच लागेल.
आ.न.,
-गा.पै.
रमादी शहर पडले : इराकची
रमादी शहर पडले : इराकची राजधानी बगदादच्या पश्चिमेस १०० किमी वर असलेले रमादी हे मोठे शहर काल रात्री इस्लामिक स्टेटने ताब्यात घेवून तेथील सरकारी इमारतीवर त्यांचा काळा झेंडा उभारला. गेला काही काळ इराकी फोर्सेस व IS मधे रमादी ताब्यात घेण्यावरून संघर्ष चालू आहे. काल ६ आत्मघातकी कार बॉम्बच्या सहाय्याने IS ने पुढे मुसंडी मारली. तरी मिलिटरीचा तळ अजून इराकी फोर्सेसच्या ताब्यात आहे.
इराक सरकारच्या मते - The situation in Ramadi is dire, but the city has not fallen and the battle against criminal Daesh is still ongoing," Anbar governor Sohaib al-Rawi said on Twitter, using an Arabic name for Islamic State.
http://mobile.reuters.com/article/idUSKBN0O013X20150516?irpc=932
Luxembourg Prime Minister
Luxembourg Prime Minister Xavier Bettel married his gay partner on Friday, becoming the first European Union leader to enter into a same-sex union in a symbol of growing social change across the continent.
http://m.timesofindia.com/world/europe/Luxembourg-PM-first-gay-EU-leader...
स्वत:च्या देशात जगण्याजोगी
स्वत:च्या देशात जगण्याजोगी परिस्थिती नसल्यामुळे म्यानमार व बांग्लादेशमधून आग्नेय आशियातील देशांमध्ये स्थलांतरीत होवू पहाणार्या लोकांवर समुद्रातच भुकेल्या, अशक्त, आणि डिहायड्रेटेड अवस्थेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. असे विस्थापितांचे लोंढे येत असल्यामुळे ते देश त्यांना त्यांच्या भूमीवर पाय ठेवू देत नाहित.
More than 1,000 people fleeing persecution in Myanmar and poverty in Bangladesh came ashore around Southeast Asia, describing killings, extortion and near-starvation after surviving a harrowing journey at sea. An increasingly alarmed United Nations warned against “floating coffins” and urged regional leaders to put human lives first. The United States urged governments not to push back new boat arrivals.
लिंकमधील फोटोत मरणासन्न मायग्रंट्सना समुद्रातच ट्रिटमेंट चालू केल्याचे दिसत आहे. ताडपत्रीवर अंगावर एखादंच वस्त्र असलेले लोक निजले आहेत.
http://indianexpress.com/article/world/asia/un-warns-against-floating-co...
Britain's most wanted female
Britain's most wanted female terrorist, dubbed the 'White Widow', has masterminded over 400 deaths including last month's slaughter of 148 people at a university in Kenya, media reports said today.
३२ वर्षांची Samantha Lewthwaite लंडन युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट असून ४ मुलांची आई आहे. लंडन ७/७ सूसाईड बॉम्बर Germaine Lindsay ची विधवा आहे..
She fled UK after the attacks and is rumoured to have changed her looks.
Lewthwaite is believed to have risen through the ranks of Africa-based terror group al-Shabaab, after many of its senior leaders were killed in drone strikes in Somalia.
http://www.outlookindia.com/news/article/uks-most-wanted-female-terroris...
मॅंचेस्टरसह नॉर्थ इंग्लंडचे
मॅंचेस्टरसह नॉर्थ इंग्लंडचे स्कॉटलंडमध्ये सामिल होण्याचे संकेत आहेत. संसदीय निवडणुकांमध्ये स्कॉटलंडमध्ये 'स्कॉटिश नॅशनल पार्टी'ने मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर त्याला जोडून असलेल्या इंग्लंड प्रांतातील मॅंचेस्टर शहरासह काही भागांनी स्कॉटलंड मधे सामिल होण्याची मागणी केली आहे.
लोकहो, इथे मुशर्रफ यांचं एक
लोकहो,
इथे मुशर्रफ यांचं एक वक्तव्य आहे : पाकने भारताचा गळा पकडला होता (कारगिलाचे वेळी)
मुशर्रफांनी केलेलं एक विधान अतिशय महत्त्वाचं आहे :
>> त्यावेळी भारताचा गळा आवळण्याचं काम दुय्यम फळीने केलं. नंतर त्यांना सैन्याचा दर्जा देण्यात आला,
याचा अर्थ असा की पाकिस्तान घुसखोरांना भारतात घुसायला उत्तेजन देतोच शिवाय यशस्वी झाले तर पाकी सैन्यात प्रवेशही देतो. म्हणजेच घुसखोरांच्या नावाआड प्रत्यक्ष पाकिस्तानी सैन्यच घुसत असते. अन्यथा सैनिकभरतीचा हा अचंबित करणारा प्रकार आहे, नाहीका?
आ.न.,
-गा.पै.
भरताला खरा धोका पाकीस्तानी
भरताला खरा धोका पाकीस्तानी संघटित लष्करापेक्षा , मागे ताजमहाल हॉटेलवर हल्ला केला त्यासारखे हल्ले, लोकल मधे बाँब ठेवणारे यांच्यापासून जास्त आहे. त्यांनाहि लष्कराचा पाठिंबा असतो. शिवाय भारतात काय, एखाद्या सिनेनटाच्या घरी ते लोक खुशाल शस्त्रे साठवतात नि जेंव्हा अशांना अटक होते तेंव्हा त्यांची सुटका व्हावी म्हणून सत्यनारायण घालणारे लोक आहेत. घरभेदी, देशापेक्षा धर्माला जास्त महत्व देणारे लोक यांच्यापासूनहि .धोका आहे
जवळ जवळ ४ महिने समुद्रात
जवळ जवळ ४ महिने समुद्रात अडकून पडलेल्या ४३०+ म्यानमार व बांग्लादेशी विस्थापितांना इंडोनेशियन मच्पछीमार बोटींच्या सहाय्याने सोडवून किनार्यावर आणले गेले.
क्वालालंपूर येथे मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड देशांच्या तातडीच्या मिटींगमध्ये मायग्रंट्स च्या प्रश्नांवर चर्चा केली गेली.
http://www.foxnews.com/world/2015/05/20/more-than-430-migrants-have-been...
३० जूनपर्यंत फायनल होणारे
३० जूनपर्यंत फायनल होणारे न्युक्लिअर डील दृष्टीक्षेपात असताना ....इराण/भारत, निगोसिएशन्स, बार्गेनिंग, कॉम्पिटीटर्स, तेल, रेल्वे ट्रॅक्स कॉंट्रॅक्ट्स and so on in detail...
http://af.reuters.com/article/commoditiesNews/idAFL3N0Y53T820150519?page...
पाकिस्तानमधील Axact scam -
पाकिस्तानमधील Axact scam - fake degrees.
http://www.dawn.com/news/1183021/fia-launches-probe-into-fake-degrees-al...
North Korea today cancelled
North Korea today cancelled an invitation to UN chief Ban Ki-moon to visit an industrial zone inside the isolated state, in an abrupt move that Ban deplored as "deeply regrettable".
The decision comes after Ban this week urged North Korea to avoid any actions that might escalate military tensions, after it successfully test-fired a submarine-launched ballistic missile (SLBM).
UN चीफ बान की मून ह्यांची उत्तर कोरीया भेट घडली असती तर तब्बल २० वर्षानंतर एका कम्युनिस्ट देशाला भेट देणारे UN chief ठरले असते.
http://m.economictimes.com/news/international/world-news/north-korea-abr...
इस्लामिक फेमिनिस्ट...? ही काय
इस्लामिक फेमिनिस्ट...? ही काय भानगड आहे? इथे वाचा : http://www.bbc.co.uk/news/magazine-32737703
लेख थोडा लांबलाय, पण वाचनीय आहे. त्यात फेमिनिस्ट हा शब्द पारंपरिक अर्थाने न घेता इस्लामिक संदर्भात योजलेला आहे.
-गा.पै.
गापै, लिंक खूप छान आहे.
गापै, लिंक खूप छान आहे. धन्यवाद.
'अयातुल्लाह' हे पद/पदवी आहे का?
फायनली...IS मिलिटंट्स
फायनली...IS मिलिटंट्स सिरियातील ancient site असलेल्या पल्मायरा मधे घुसले.
As they have swept across Syria and Iraq, the extremists have destroyed or damaged numerous ancient sites and major cultural artifacts, condemning them as idolatry, even as they pillage and sell off more portable items to finance their activities. The militants’ approach to the ruins of ancient Palmyra, with their grand 2,000-year-old colonnades and tombs, has raised fears both locally and internationally that they too may be destroyed.
http://mobile.nytimes.com/2015/05/21/world/middleeast/syria-isis-fighter...
इस्लामिक स्टेटने बुधवारी
इस्लामिक स्टेटने बुधवारी सिरियातील प्रसिद्ध पल्मायरा ताब्यात घेतल्यावर पिंजून काढलं.
Homs-based activist Bebars al-Talawy and an opposition Facebook page said that as many as 280 soldiers and pro-government forces have been killed in Palmyra since it was captured Wednesday.
Al-Talawy said militants abducted soldiers and pro-government gunmen from homes, shops and other places where they had gone to hide. He added thart many were shot dead in the streets.
http://m.hindustantimes.com/world-news/isis-captures-iraqi-town-detains-...
लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियमजवळ
लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियमजवळ अत्यंत धोकादायक स्थितीतला ११०पौंड वजनाचा दुसर्या महायुद्धातील जर्मन मेकचा बॉंब सापडला.
It was dropped on London during German bombing raids in the early 1940s. It was safely removed to be taken away and destroyed in a controlled explosion.
http://m.thestar.com/#/article/news/world/2015/05/22/unexploded-german-b...
युक्रेन रशियाशी संभाव्य
युक्रेन रशियाशी संभाव्य वांध्यात (डीफॉल्ट) : http://russia-insider.com/en/politics/ukraine-falls-default-russia-calls...
रशिया युक्रेनकडे दिलेल्या $३ कोटी कर्जाचे मुदतपूर्व हप्ते (अर्ली रीपेमेंट) मागू शकतो. कारण युक्रेनचे कर्ज उत्पन्नाच्या ६०% हून अधिक झाले आहे. मात्र रशियाने युक्रेनच्या विनंतीवरून अशी मागणी केलेली नाही. परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास रशियाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायची तयारी आहे.
परंतु युक्रेनचे नेते मखलाशी करताहेत की रशियाने दिलेले कर्ज खाजगी आहे. त्यामुळे वांधा लागू पडत नाही.
-गा.पै.
जगभरात अब्जावधी डॉलर्सची
जगभरात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार्या 'सोरोस फंड मॅनेजमेंट'चे प्रमुख जॉर्ज सोरोस ह्यांनी चीनच्या आर्थिक समस्येमुळे तिसरे महायुद्ध भडकेल असा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आयोजित केल्या जाणार्या वार्षिक 'ब्रेटन वूड्स कमिटी'च्या अर्थविषयक बैठकीत बोलताना सोरोस ह्यांनी हा इशारा दिला. पुढच्या काळात चीन जागतिक संघर्षाचं केंद्रस्थान ठरू शकेल. त्यांच्या निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी चीनने योग्य ती धोरणे स्वीकारली नाहीत तर ते सार्या जगावर परिणाम करणारे ठरेल. चीनच्या नेत्यांना आपला देश एकत्र ठेवण्यासाठी दुसर्या देशांबरोबर युद्ध पुकारावे लागेल. हा युद्धाचा धोका टाळण्यासाठी सोरोस ह्यांनी उपाय योजना सुचवल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकन डॉलरसोबत राखीव चलन म्हणून चीनच्या युआनलाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मान्यता द्यावी. कारण तसे झाले तर त्या मोबदल्यात चीनला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करावे लागेल.
अमेरिकेबरोबरील तीव्र मतभेदांमुळे चीन रशियासारख्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी देशाबरोबर आर्थिक व लष्करी सहाय्य व्यापक करून अमेरिकेला अव्हान देईल. सोरोस ह्यांची चिंता निराधार नसल्याचे मत काही पत्रकारांनी दिले.
सद्ध्या साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिका व चीन समोरासमोर उभे ठाकले आहेत व एकमेकांना सज्जड इशारे देत आहेत.
Pages