सिंगापुरातील खाद्यसंस्कृती (भाग-पहिला)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मला इथे सिंगापुरमधे येऊन तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो तो इथे इतके वर्ष होतील असे तेंव्हा जराही वाटले नव्हते. अगदी माझ्या पहिल्याच दिवशी मी भुकेजल्या पोटी अन्न शोधायला बाहेर पडलो आणि समोर दोन मोठी कावसे उलटी टांगलेली होती आणि त्यांच्या तोंडातून काळेकुट्ट लाल लाल भडक रक्त वाहत होते.

मी ते दृश्य बघून खंतावलो. त्यापुढे दोन पाऊले टाकली तर .. इथे माकडाच्या मेंदुचे सुप मिळेल अशी पाटी होती. त्याही पुढे गेलो तर सी-फुड ह्या नावाने परिचित असलेले अनेक जलचर प्राणी मला तिथे भेटले. मी जिथे उभा होता.. अर्थात गोल गोल फिरत होतो त्याला फुडकोर्ट असे नाव होते. सिगांपुरमधे आपल्या भारतातल्यासारखे हॉटेल्स, रेस्टॉरंट ह्यांच्यापेक्षा फुडकोर्ट च जास्त आहेत. आणि, सॅड टु से पण बहुतेक ठिकाणी खायला प्यायला सीफुडच जास्त प्रमाणात मिळते. अशा ह्या देशात तब्बल २० वर्ष राहूनही माझा शाकाहार भ्रष्ट झाला नाही ह्याला कारण म्हणजे मास चाखायची माझी कधीच च च हिम्मत झालेली नाही. माझं आणि मासाहारचं प्रचंड मोठ्ठ द्वंद्व आहे. जे कधीच मिटणार नाही! आमच्यात एक फार मोठी दरी होती, असेल आणि राहील.

माझ्या बालपणी मी आणि माझी बहिण आम्ही एकमेकांचे कान दोन्ही हाताचा डायगोनल करुन धरत .. च्याऊ म्याऊ घुगर्‍या खाऊ. पाळण्या खालच्या घुगर्‍या खाऊ असे काहीतरी म्हणत नंतर खूप जोरात हसायचो. तो खेळच तसा फार फनी होता. माझ्या वाट्याला घुगर्‍या (अख्ख्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजे घुगर्‍या) आल्या नाहीत पण च्याऊ म्याऊ जेवण रोज बघायला मिळतं आणि रोज मला प्रश्न (उत्तर अपेक्षित नसलेला प्रश्न) पडतो की ही लोक हे अन्न कसे खातात!!! म्हणजे मला कुणाच्याही संस्कृतीचा अवमान करायचा नाहीये पण तरीही जे काही चालत फिरत सरपटत ते सगळ चिनी लोकांच्या पोटात जातचं जातं! शाकाहारी अन्नाचा जराही गंध नसलेली रेस म्हणजे चिनी लोक. इथे जे मॉक मीट मिळते ते शाकाहारी असते पण ते बघून असे वाटते की हे मॉक मीट नसून खरेखुरे मास आहे. ह्या लोकांच्या पोटात मॉकमीट मधून भाज्या वगैरे जात असतील पण केवढी ही मानसिकता! (आणि त्यांना दोष देता देता मग मलाही माझे हसायला येते की ते अन्न शाकाहारी दिसत नाही म्हणून मी मॉक मीट ग्रहण करत नाही. शेवटी मग मी आणि ते सारखेच की!)

माझे अनेक मित्र आपण शाकाहारी आहोत म्हणून स्वतःला कमी लेखत लेखत शेवटी मासाहारी बनली. एक मुलगी मेघना तिचे नाव. एके दिवशी मला भेटली. चांगली शाकाहारी होती. आणि म्हणाली आज मी परागला मास खाऊनच दाखवते. खरच तिने डक राईस मागवला आणि तो पुर्ण खाऊन दाखवला. आपण मास खाल्ले म्हणून तिच्या चेहर्‍यावर एक विजयी भाव उमटला होता. आणि मी ह्या कोडयात सापडलो होतो की नक्की काय बाजी मारली हिने ही हिला मास खाल्ले म्हणून इतका आनंद होतो आहे.

सिंगापुरमधे चिनी, मलय, ईंडोनेशियन, जॅपनिज, भारतीय-मुस्लिम, भारतीय-मलय, भारतीय, कोरियन, फिलिपीन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण एकाच ठिकाणी मिळते. ह्यामधे एक भारतीय जेवण बाजूला काढले तर बाकी पद्धतीचे जेवण जवळपास सारखेच दिसते. निदान मला तरी ह्या सगळ्यात सी-फुड असते म्हणून ते सारखेच वाटते. खूप वर्षांपासून मी इथे ईंडोनेशियाचा एक पदार्थ ऐकतो आहे - "मी-गोरे" पण हा मीगोरे नक्की कसा दिसतो हे काही मला अजून कळलेले नाही. मी कित्येकदा फुडकोर्टात गेल्यानंतर कुठे अभारतीय शाकाहारी अन्न कुठे मिळते का म्हणून प्रयास केलेले आहेत पण ह्या लोकांना चिकन पावडर, कुठल्या तरी मासाचा अर्क कमीतकमी हे घातल्याशिवाय त्यांचे अन्न शिजत नाही. वर आपल्याला सांगतात की ह्यात मास नाही पण एक जरी घास तोंडात टाकला की लगेच कळते ह्यात काहीनाकाही घातलेले आहे. माझा भ्रमनिरास चिक्कार वेळी झालेला आहे. आता तर मी वाट्यालाच जाणे सोडले.

हो.. पण इथल्या खीरी माझ्या प्रचंड आवडीच्या आहेत. इथले चायनीज डीझर्ट मला फार प्रिय आहे. मुगाची खीर, रेडबीन्सची खीर, रताळ्याची खीर, नाना प्रकारचे नट्स घालून केलेली खीर. कमळाच्या बिया घालून केलेली खीर. ह्या खीरींमधे नारळाचे दुध घातलेले असते आणि ह्या फार गोड नसतात. शिवाय पौष्टिक असतात.

ह्या पहिल्या भागाचा शेवट गोड केला आहे .. आता बघुया दुसरा भाग लिहायला मुहुर्त कधी उगवतो Happy

बी

प्रकार: 

असं करता येतं? मला माहीत नव्हतं.<<< हो करता येतं.. <<वैयक्तिक संदर्भ असलेली पोस्ट एडिट केली<>>

नताशा, डिप्लोमाला फर्स्ट क्लास नसेल अथवा बारावीनंतर अजून काही कोर्सेस केले असतील आणि मग डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतली असेल.. तसंही तो त्याचा वैयक्तिक मामला आहे, आणि त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही त्यामुळे त्यावर इतके चर्वित चर्वण करायची आवश्यकता नाही असे माझे मत.

नंदिनी, यु आर राइट. आय अ‍ॅम प्लेन क्युरिअस. मी बी यांना बी काका म्हणून मान द्यायला हवा. आतापर्यंत मी हा आयडी आपल्याच वयाचा समजून बरीच चेष्टा मस्करी केलेय. त्याबद्दल आयॅम सॉरी बी काका.

बी

तुझा सात्वीक संताप समजला. मी अमेरिकेमधे सुरुवातीला काही महिने सॅन फ्रंसिस्को मधे रहात होते. तिथे मी कितीदा तरी व्हेज सुप , व्हेज स्टर फ्राय मागवल असेन. तेंव्हा तिथे अंड ( अ‍ॅक्च्युली ते मला वर्ज्य नाही सो फरक पडत नाही) आणि मासे व्हेज म्हणून मला त्यांनी खाउ घातले असतील. व्हेज व्हेज म्हणून मी बहुतेक रोजच मासे रिचवले असतील. हे सुप अस का लागत किंवा सग़ळच अस का लागत ह्याच कोड मला बरच नंतर उमगल. माझ्या ओळखीच्या एकाने मला मी देखिल व्हेजी अस सांगीतल मग आम्ही एकदा डिनर ला गेलो असतना त्याने सी फुड मागवल आणि मी चकित होउन विचारल aren't you vegetarian? तेंव्हा त्याने अभिमानाने हो म्हटल आणि सगळ सी फुड चवीने संपवल तेंव्हा मला ते कोड उमगल. इथे अंड आणी मासे व्हेज समजले जातात. अर्थात आता तीच लोक बरीच शहाणी झाली आहेत. सांगतात व्हेज आहे पण फिश सॉस आहे वगैरे.. भारतीय कस्ट्मर्स जास्त झाल्याचा परिणाम.

प्रत्येक देशाची आपली आपली खाद्यसंस्कृती असते. किंवा श्र म्हणते तस विचारुन घ्यायच किंवा करुन घ्यायच आप्ल्याला हव तस.. किंवा वर कोणीतरी सांगीतले आहे तसे आपला आपला स्वयपाक करायचा. डबा आणायचा.

बी इथे नावावरून तरी तिथली खाद्यसंस्कृती कशी आहे ह्यावर आधारीत लेख आहे असे वाटले होते पण ह्यात फक्त तुमची तुमच्या अनुषंगाने असलेली मते प्रकट होत आहेत.

बी तुझे office कुठे आहे. माझे IBP Jurong मधे होते. तेथे २ फुडकोर्ट मधे तर भारतीय जेवण मिळत होते. (मकान मुंबई). मला जेवणाचा जास्त त्रास नाही झाला (मी पण शाकाहारी). मी दोन वर्षे होतो. पण वास नको वाटायचा इतर जेवणाचा Happy असो.

हो ग जागू बरोबर आहे. मला लिहिताच येत नाही.. पहिल्या भागातच सगळे लिहायला जमले असते तर बरे झाले असते. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया फारच सुंदर आहेत आणि जी लोक चार दिवस इथे पर्यटक म्हणून आले त्यांच्या प्रतिक्रिया वाचून माझी २० वषा व्यर्थ गेलीत असे वाटत आहे Happy

नमस्कार बी.
तुमचे office कुठे आहे? आता सध्या तरी Singapore मध्ये भरपूर options आहेत. प्रत्येक Food Court मध्ये Indian Tamil or Muslim stall असतो. अगदी Tuas मध्ये सुद्धा आहेत. कोमला'ज मधुन मागवा.
घरपोच घरगुति जेवन सुद्धा मिळते. Maharastrians in Singapore च्या Facebook page वर चेक करा.
बाकी इथे Sea Food ची धम्माल आहे. मस्त पदार्थ मिलतात. आता लिहिताना पन तोन्डाला पानी सुटले.

Pages