k14

Submitted by अँन्ड्रोमेडा on 11 February, 2015 - 05:52

सहल

निशा जसजशी पुढच्या वर्गात जात
होती तसा मंजूचा अभ्यासही वाढत चालला. कारण
तिला काही शिकवण किंवा तिचा अभ्यास घेणं फारसं
सोपं नहूतं .आधी मंजूला बरीच मेहनत करावी लागत
होती .अभ्यास करावा लागत होता .पण ती पूर्ण
क्षमतेनुसार प्रयत्न करायची .तिला अनेक
वेळा असही वाटून गेलं कि आपण जर इतका अभ्यास
स्वतः शाळेत असताना केला असता तर आपण
बोर्डात नंबर काढला असता .
अस तर सुखी जीवन चालल होत
त्यांच .निशाला सायकल
चालवायची भारी हौस .सुरभि निशाची फार
गट्टी होती .सुरभि ही शेजारीच राहत होती .त्यामुळं
त्या दोघींच चांगलं जमत
होतं .तिच्या इतरही मैत्रीणी असल्या तरी सुरभि सोबत
तीचं फारच चांगलं जमे. शाळेत दोघीं सोबतच
असायच्या . एकदा त्यांच्या शाळेची सहल जाणार
होती व त्यासाठी निशा आईकडे
जाण्याची परवानगी मागत होती .इतक्या लहान
मुलांना कुठं सहलीला नेणार आहेत व त्यांना काय
कळणार आहे असा विचार मंजू करत
होती .तो तिला कळलं की वेशीजवळच्या बागेतच
जाणार आहे सहल .तेव्हा तिनं
परवानगी दिली .सकाळी जाऊन संध्याकाळी येणार
होते सगळे .सोबत डबा नेणार होते .तो एकच दिवस
पण मंजूला फार काळजी लागून राहिली होती .पण
निशा घरी आली आणि तिच्या सहलीच्या अनुभवांची टकळी जी सुरु
झाली ती काही दोन दिवस
थांबली नाही .मंजूलाही समजत नहूतं हे लोक गेले
काही तासच सहलीला आणि यांचे अनुभव मात्र
किती दिवस झाले सांगून संपतच नाहीत .नंतर
दरवर्षी निशा सहलीला जात होती व
त्या सहलीच्या अनुभवात अनेक महिने जात होते .
......क्रमशः

भाग ३
भाग ५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अँन्ड्रोमेडा,

थोडे मोठे भाग टाका ना प्लिज.
अजुन एक, ह्या चार ही भागात थोडे एडीटींग कराल का ? सगळे पद्यासारखे पेस्ट झाले आहे...
ही कथा आहे ना...मग ती तशी दिसायला नको का ?
बाकी येउ द्या !!