काडेपेटीच्या काट्यावर एक रुपाया होता

Submitted by वैवकु on 13 January, 2015 - 10:56

माझ्यातिल पांथस्थ स्वतःची शोधत छाया होता
आयुष्याचा रोड तुझ्या स्मरणांच्या व्हाया होता

माझ्या नशिबी आनंदांची अत्तरदाणी नव्हती
अश्रूंनी भिजलेला माझा जीवनफाया होता

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे
यासाठीतर हयातभर तो जमवत माया होता

काडेपेटीच्या छाप्यावर कमळ छापले होते
काडेपेटीच्या काट्यावर एक रुपाया होता

पायावर डोके टेकवले की वारी पावावी
इतक्या श्रद्धेने तो माझ्या पडला पाया होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>हॅ गझ्ल वाचताना लगावली व चाल असा काही आकृतीबंध डोकात तयार होईना..<<<

हा गझलवाचनाच्या सरावाचा भाग आहे, गझलेत दोष नाही आहे. (सुटी सोडून)

>>> काउ | 14 January, 2015 - 17:19 नवीन

गझलेत दोष आहे असे माझे म्हणणे नाही.

रेसिपी शास्त्रशुद्ध आहे , पण मला चव आवडली नाही असे होऊ शकते ना ?
<<<

तसे असेल तर सहसा माणूस 'गझल विशेष आवडली नाही' असा प्रतिसाद देतो. तुमचा पहिला प्रतिसाद पुन्हा पेस्ट करत आहे, तो वाचून ठरवा की तुम्ही गझलेत दोष आहे असे म्हणत होतात का तुम्हाला गझल आवडली नाही असे!

>>> काउ | 14 January, 2015 - 14:41 नवीन

हे वृत्त कोणते ? लगावली काय आहे ?

अजिबात गेयता नसलेले हे वृत्त काडी लावण्याच्याच पात्रतेचे दिसते !
<<<

गझल आवडली, आणि गेयतेविषयी चर्चाही.

रुपाया हा शब्द निदान कोल्हापूरच्या आसपास तरी बोलीभाषेत प्रचलित आहे.
(मर्दा रुपायाएवढा डाग पडला भाजून...वगैरे
तसेच लहानपणी क्रिकेटसाठी रुपाया रुपाया पट्टी...म्हणजे वर्गणी...काढून टेनिस बॉल आणत असू) Happy

वैवकु मला गझलेतलं तंत्र वगैरे काही कळत नाही.पण तो रुपयाचा शेर सोडून बाकी सर्व समजले आणि खूप आवडले सुद्धा.:)

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार

काउ >>पण मला चव आवडली नाही असे होऊ शकते ना ?<< हो असे आपण म्हणू शकता पण इथे आपली अभिरुची कमी पडतेय ती अधिक वाढवा असे मी म्हणू शकेन

बाकी रुपाया ह्या तश्या चिल्लर शब्दावरून चर्चा अधिक होते आहे असे वाटते तरी सर्वांच्या भावनांचा आदर आहेच
सर्वांचे पुनश्च धन्यवाद

>>> काउ | 14 January, 2015 - 20:50 नवीन

माझ्या प्रतिसादात मी वृत्त आवडले नाही असेच लिहिले आहे
<<<

कृपया दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करू नका. Happy

कमळावर. आमचा एक शेर पूर्वी झालेला आहे.

अयोध्या बुडाली व सेतू बुडाला
कमळ राम बोलायचे बंद झाले.

( जमिनीचे मालक देवपूरकर .. नभी मेघ हिंडायचे बंद झाले )

Proud

गेयता असेल की मला जमीन ढापणे सोपे जाते.

Proud

गेयता असेल की मला जमीन ढापणे सोपे जाते.<<< काउ तुमचा कावा मी ओळखला होता बरका
हमको उडते हुवे कावळेकेभी पिसं मोजना आता है Wink

अयोध्या बुडाली व सेतू बुडाला
कमळ राम बोलायचे बंद झाले.<< चांगला आठवतोय हा शेर मी त्यावर काही बोललोही होतो हेही आठवते आहे

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे
यासाठीतर हयातभर तो जमवत माया होता

पायावर डोके टेकवले की वारी पावावी
इतक्या श्रद्धेने तो माझ्या पडला पाया होता

अप्रतिम शेर…

जियो.

हुश्श !

१४ गुणिले २ कसं गायचं हे समजले

सबसे प्यारा मेरा यारा राजा ** स्तानी

या ओळीच्या चालीत म्हणावे

धन्यवाद फाटक साहेब

या ओळीच्या चालीत म्हणावे <<<< Rofl भन्नाट मजा आली लैभारी चालय राव !! Happy धन्यवाद काउजी

गझल आणि चर्चा रंगतदार . गेयतेवरून एक अगदीच अलाहिदा आणि फारच रुक्ष गोष्ट आठवली. एक खूप सुप्रसिद्ध आणि प्रथितयश गायक म्हणाले होते, 'पैसे द्या, अंकलिपीसुद्धा गाऊन दाखवेन ! " मी ऐकलंय स्वत:. चाट पडले ऐकून .आणि आपण किती प्रामाणिक वगैरे रहायचा प्रयत्न करतो शब्दांशी इत्यादि इत्यादि Happy

Pages