काडेपेटीच्या काट्यावर एक रुपाया होता

Submitted by वैवकु on 13 January, 2015 - 10:56

माझ्यातिल पांथस्थ स्वतःची शोधत छाया होता
आयुष्याचा रोड तुझ्या स्मरणांच्या व्हाया होता

माझ्या नशिबी आनंदांची अत्तरदाणी नव्हती
अश्रूंनी भिजलेला माझा जीवनफाया होता

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे
यासाठीतर हयातभर तो जमवत माया होता

काडेपेटीच्या छाप्यावर कमळ छापले होते
काडेपेटीच्या काट्यावर एक रुपाया होता

पायावर डोके टेकवले की वारी पावावी
इतक्या श्रद्धेने तो माझ्या पडला पाया होता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे
यासाठीतर हयातभर तो जमवत माया होता

काडेपेटीच्या छाप्यावर कमळ छापले होते
काडेपेटीच्या काट्यावर एक रुपाया होता

पायावर डोके टेकवले की वारी पावावी
इतक्या श्रद्धेने तो माझ्या पडला पाया होता<<< वा वा सुंदर

गझल आवडलीच

आवडली

पायावर डोके टेकवले की वारी पावावी
इतक्या श्रद्धेने तो माझ्या पडला पाया होता >>>> क्या बात है ...

बेफीजी अरविंदजी समीरजी शशांकजी (खूप दिवसांन्नी ? :)) पाटिल साहेब आणि शामजी अंत़:करणपूर्वक आभार

समीरजी ; मुळात हा शेर मला एकेरात्री ४ वाजता मी बसस्टेंडवर सिगारेट प्यायला गेलो असताना सुचला तिथे जी काडेपेटी होती तिचे हे खरेतर हुबेहुब चित्रण आहे . अर्थात शेर झाल्यावर मला कळाले की हा शेर अरविंद केजरीवालांना दिल्ली जिंकून देण्यात मदत करू शकेल म्हणून तो मोलाचा ठरेल म्हणून मी तो इथे दिला आहे (थोडी गम्मत केली बरका :))

काडेपेटीच्या छाप्यावर म्हणजे दर्शनी बाजूस आणि काट्यावर म्हणजे मागील बाजूस
काडेपेटीला छापा-काटा असतो असे म्हणणे हे भाषिक नाविन्य ठरावे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळताना खिशात चाराणेही नसले तर रस्त्यावरचा कागद /चिपटा उचलून त्याचा छापाकाटा करत असू अनेकदा रिकाम्या काडेपेटीच्या छापड्या मिळत .....ते आठवले

कमळ ह्या शब्दामुळे हा शेर भाजपावर घसरवता येतो . आणि सत्ते"मागील" आर्थिक (खासकर गुजराथी ) समीकरणांवर भाष्य वळवता येते

अर्थात ह्या शेराच्या दोनही ओळींची सुरुवात काडेपेटीने होते म्हणून मनातल्यामनात मी ह्याला "ज्वलंत शेर!" म्हणत असतो Happy

असो
धन्यवाद समीरजी

शामजी ; आपला मुद्दा खरोखरच मोलाचा आहे माझ्या तो लक्षातच आला नव्हता . असो आता मी प्रयत्न करीन अर्थ जास्त खुलेल ह्यात शंका नाही पण नवा शब्द शब्द म्हणून मला जास्त आवडला लयीत उच्चारताना जास्त मजा देणारा वाटला तर मी नक्की बदलेन (आणि तत्पूर्वी आपणास कळवीनही ) . कारण माझी शब्दनिवड करण्याची
पद्धत जरा उच्चाराची मजा अनुभवण्याकडे कल राखून असते

असो
धन्यवाद शामजी

सर्वांचे पुनश्च आभार Happy

'रुपया'ला 'रुपाया' केलेलं विशेष आवडलं नाही कारण अजिब्बात पटलं नाही.
मतला आणि पुढचा शेर खूप आवडले.
'हयातभर' तर जबरदस्तच !

-------------------------------------------------

एक शंका -
तखल्लुस नसलेल्या शेवटच्या शेरालाही 'मक्ता' म्हणतात का?

तखल्लुस नसलेल्या शेवटच्या शेरालाही 'मक्ता' म्हणतात का?

काही लोक म्हणतात, काही नाही.
मी म्हटले कारण प्रत्येक वेळेस शेवटचा शेर असं म्हणण्यापेक्षा मक्ता म्हणणं सोईच ठरतं.
ह्यात विशेष असं काही नाही.

>>> काउ | 14 January, 2015 - 14:41 नवीन

हे वृत्त कोणते ? लगावली काय आहे ?

अजिबात गेयता नसलेले हे वृत्त काडी लावण्याच्याच पात्रतेचे दिसते !
<<<

२८ मात्रांच्या ओळी आहेत. १४ वेळा गा असे म्हंटले की लय मिळेल.

इतका आक्रस्ताळा प्रतिसाद देण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. असो.

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे

...

यात कुठे ते गागागा .... १४ वेळा.. . येते ?

गेयता असली की शेर रचणे सोपे जाते व रचनाही सुंदर होते..

रुपाया - मला नक्की माहीत नाही पण काही ठिकाणी रुपाया असे ऐकलेले आहे. अर्थात मी रुपया असेच म्हणतो म्हणताना. लिहिताना रुपाया लिहितात की काय हेही माहीत नाही.

पण ती एक सूट म्हणता येईल वाटल्यास. (म्हणजे रुपाया असा शब्द अजिबातच प्रचलीत नसल्यास).

>>> काउ | 14 January, 2015 - 15:01 नवीन

पत्नी मुलगे मुली सुना सगळ्यांनी धावुन यावे

...

यात कुठे ते गागागा .... १४ वेळा.. . येते ?

गेयता असली की शेर रचणे सोपे जाते व रचनाही सुंदर होते..<<<

गेयता असली की शेर रचणे सोपे जाते व रचनाही सुंदर होते ह्याची मला कल्पना नव्हती. क्षमस्व!

पत्नी - गा गा
मुलगे - गा गा
मुली - लगा
सुना - लगा
मुली + सुना = ६ मात्रा = ३ गा
सगळ्यांनी = गा गा गा
धावुन = गा गा
यावे = गा गा

एकुण १४ गा = २८ मात्रा

>>>गेयता असली की शेर रचणे सोपे जाते व रचनाही सुंदर होते<<<

प्रत्येक (शुद्ध) गझल गेयच असते. गायनानुकुल असते की नाही तो विषय वेगळा आहे. मात्र गझल शुद्ध आहे आणि गेय नाही आहे असे होऊ शकत नाही.

तसेच, गेयता कुठूनतरी आणून मग शेर रचले की शेर रचायला सोपे जाते वगैरे अशी प्रक्रिया नसते शेर रचण्याची. प्रत्येक शुद्ध (जमीनीनुसार असलेला) शेर गेयच असतो. शेर व गझल शुद्ध असतात म्हणून गेय असतात. गेय असतात म्हणून ते अस्तित्त्वात नसतात. ते (शुद्ध स्वरुपात) अस्तित्त्वात असतात म्हणून गेयता अस्तित्त्वात असते. शेर रचणे सोपे जाणे हा विषय वेगळा आहे. रचना सुंदर होणे हा आणखीन वेगळा विषय आहे.

जितू : तुझा आक्षेप लक्ष देण्याजोगा आहे पण मझा प्रॉब्लेम असा आहे की मी प्रमाणभाषा ह्या संकल्पनेला फारसा विचारात न घेणारा आहे . आधी शब्द बोलले जातात मग कालांतराने ते कुठे कोणकडून तरी लिहिताना वापरले जतात आणि कालांतराने 'प्रमाण' बनतात असे मझे मत आहे
अर्थात रुपाया हा शब्द मी तयार केलेला नाहीयेय मी हा शब्द प्रत्यक्षात आजवर ऐकत आलेलो आहे . माझे मत असे आहे की रुपया हा शब्द हिंदी वळणाचा असून रुपाया हाच शब्द जास्त मरठमोळा आहे. रुप्पाया असेही मी ऐकले आहे .
एखादवेळी दुकानदाराला मी विचारले की हे चॉकलेट कितीला तर तो "एक रुपै(रुपय)ला" असा म्हणजे रुपै(रुपय) असा उच्चारही करतो असेही मी पाहिले आहे .

धन्यवाद रे ...

काउ : वृत्तात गेयता शोधयला तुमच्याकडे कोकिळेसारखा गळा वगैरे आहे का ..नाही म्हणजे गेयता सांगीतली तरी आपण कावळ्याच्या गळ्यानेच गुणगुणणार असाल तर मग राहूचदेत की हो Happy

बाकी बेफीजींनी सांगीतलेली लय ह्या मात्रावृत्ताची नेसर्गिक लय आहे . मी लिहिताना /झाल्यावर मात्रा मोजल्या नाहीत पण मला जाणवणारी/गुणगुणता येणारी लय आपल्याला शेर क्र. २ , ४ मध्ये दिसेल बहुतांश ओळी त्या लयीत मलातरी वाचता येत आहेत . काही ओळीत तो यती मी पाळू शकलो नाही पण यतिभंगासोबतही लयीच्या प्रवाहाला अधिकाधिक चुस्त राखणाच्या माझ्या खास पद्धती आहेत त्या मी पाळल्या आहेत. (बोंबला !! ज्या माणसाला लय काय आहे हेच कळत नाही आहे त्याला मी यतिभंगाच्या खास पद्धती वगैरे सारखी संकल्पना सांगू लागलोय ..काय घंटा समजणारय त्या माणसाला? ..असो !!)

असो ! असे वाचा .........

गागा गागा गागा गागा... गागा गागा गागा

उदा :
१) अश्रूंनी भिजलेला माझा .....जीवनफाया होता
२) यासाठीतर हयातभर तो ....जमवत माया होता
३) काडेपेटीच्या काट्यावर ......एक रुपाया होता

रच्याकने : बेफीजी व समीरजी आपण ह्या छोट्या चर्चेत सहभाग घेतल्याबद्दल आपले विशेष आभार Happy

>>>हो. म्हणुनच शंका आली की हे वृत्त कोणते ?<<<

हा मुलामा अनावश्यक आहे. वैवकु स्वतःहून प्रामाणिकपणे (काहीतरी वेगळेच) सांगत आहेत म्हणून तुम्ही सोयीस्कररीत्या 'माझे तेच म्हणणे होते' असे तुमचे मत फिरवत आहात. यती न पाळलेल्या अनेक ओळींच्या गझलांवर आजवर तुम्ही प्रतिसाद दिलेले आहेत किंवा वाचलेल्या आहेत. हे अचानक यतीस्फुरण कुठून आले? त्या गझलांंमध्ये गेयता आहे हे कसे काय जाणवले?

की हे वृत्त कोणते << माफ करा मला वृत्तांची नावे गावे पत्ते वगैरे माहीत नसतात मला ती दिसतात इतकेच मी त्याना ओळखतो शेवटी वृत्त हे एक साधन आहे अर्थात त्यालाही साधना लागतेच हेही खरेच
पण तज्ज्ञ मंडळी आपली नक्की मदत करू शकतील !

धन्यवाद

बेफीजी हा/ ही काउ कोणाचा आहे हे आपल्याला कळळे असल्यास कृपया मला विपूत कळवाल का बघूतरी कोण गम्मत करते आहे ते कळूतरी दे म्हणजे मलाही मजा घेता येइल Happy
बाकी आपले नवे प्रतिसाद आत्ता वाचले . पटले एक विचारू का >>ते (शुद्ध स्वरुपात) अस्तित्त्वात असतात म्हणून गेयता अस्तित्त्वात असते<< येथे >>गेयता साकार रूप धारण करून येते << असा अर्थ काढायचा आहे ना

चुभुद्याघ्या

धन्यवाद सर

वैवकु,

ते जामोप्या आहेत. डॉक्टर जागो मोहन प्यारे

एच आय व्ही बाधित रुग्णांवर उपचार करतात व त्यांचे वाचन बरेच आहे. येथील जुने सदस्य आहेत.

आयला जामोप्या !!!
आयला माबोवर सर्वाधिक ड्यू आय असणारा रेकॉर्डहोल्डर तो जामोप्या !!!!
आयला मा.बो.च्या आकाशातून ज्याचा सूर्य कधीही ढळत नाही तो जामोप्या !!!!!!

आयला !!!आपल्या देवपूर्करांच्या गझलांचे विडंबन शेळी ह्या नावाने करून देवपूर्करांना फेमस करणारा तो जामोप्या !!!!!!

वाह मजा आली

धन्यवाद बेफीजी Happy

>>>क विचारू का >>ते (शुद्ध स्वरुपात) अस्तित्त्वात असतात म्हणून गेयता अस्तित्त्वात असते<< येथे >>गेयता साकार रूप धारण करून येते << असा अर्थ काढायचा आहे ना<<<

नाही. 'गेयता कुठेतरी निसर्गात आधीच अस्तित्त्वात असते आणि आपण योग्य ते शब्द योजले की ती आपसूक त्यात येऊन बसते व एक आकार धारण करते' असे समजण्यात अर्थ नाही. बरेचसे विश्व हे गद्य व रुक्ष आहे. शब्दांना अर्थासहितच नादही असतात. शब्दांचे गणित आणि सुश्राव्यता ह्या दोन गोष्टी आपण जमवू शकलो तर ते शब्द व त्या शब्दांच्या साखळ्या आपोआपच गेय होतात. ह्यामुळेच एखाद्या गायकाने निरर्थक अक्षरे जरी गणितीदृष्ट्या योग्यप्रकारे गुणगुणली तरी ती गेय वाटू लागतात. ह्याच्या उलट तुमच्या वरील गझलेतील कोणत्याही एका ओळीत अठ्ठावीसच्या एकोणतीस किंवा सत्तावीस मात्रा झाल्या तरी लगेच खटकेल. ह्याचाच अर्थ असा की 'गेयता कुठेतरी मुळातच असते आणि ती शुद्ध गझलेत दृष्यमान होते' असे गृहीत धरणे योग्य होणार नाही. शुद्ध गझल किंवा कोणतीही शुद्ध ओळ गेयता निर्माण करते. जिवंत झरा लागला तर विहीर बांधतात. आधी विहीर बांधून मग खोदून पाहात नाहीत, तसेच हेही! निसर्गात फक्त गेयता असती तर गद्य, रुक्ष असे काही अस्तित्त्वातच नसते. प्रत्यक्षात तश्या अनेक गोष्टी असतात निसर्गात! आपण दिवसभरात करतो ते बहुतांशी संवाद गद्य असतात.

म्हणूनच गझलकारांमध्ये गझलतंत्रावरून वाद होताना दिसतात. त्याचे कारण हेच आहे की गझलकाराने पूर्ण शुद्ध गझल लिहिणे अपेक्षित असते. (आशयाचा विषय येथे अभिप्रेत नाही, निव्वळ गझलतंत्राचा विषय अभिप्रेत आहे). जे अशी गझल लिहीत नाहीत त्यांना बाकीचे त्यांच्या चुका दाखवून देऊ लागतात. एक प्रकारे हे सगळे वाद गझल गेय होण्यासाठी आवश्यकच असतात, पण त्यात इगो आड येऊ लागतात व बरेच काही बिनसते. त्यामुळेच अक्षरछंदात गझल नसावी असे भटांनी ठळक शब्दांत सांगितले आहे.

गझलकारानेच जर गेयतेला अटकाव केला तर उरले काय!

जिवंत झरा लागला तर विहीर बांधतात.<<< येस सर आता मला समजलं !!

आछा !! आता मला अजून एक बाब समजली ती डीटेल सांगत नाही पण मला एक गमक लक्षात आले . मी एक ओळ तयार केली तुमच्याच एका ओळीतून >>झरा जिवंत लागलाच तर विहीर बांधतात <<< लगा लगा लगा लगाल .. गाल गाल गाल गाल<<< मी ही बाब लक्षात ठेवीन आपल्या प्रतिसादातील शेवटची ओळ पाठच करीन आता !!

ओक्के पण बेफीजी शब्द सुश्राव्य आहे की नाही कसे ठरते गझलेत शब्दांच्या सुश्राव्यपणाची किती मात्रा (औषधाची मात्रा तसे ) असायला हवी म्हणजे कमाल /किमान दोनही ?? ह्याचा अभ्यास कसा करायचा ?

>>>ओक्के पण बेफीजी शब्द सुश्राव्य आहे की नाही कसे ठरते गझलेत शब्दांच्या सुश्राव्यपणाची किती मात्रा (औषधाची मात्रा तसे ) असायला हवी म्हणजे कमाल /किमान दोनही ?? ह्याचा अभ्यास कसा करायचा ?<<<

एक जुना किस्सा सांगतो. मी चित्तरंजन भटांना माझा एक शेर ऐकवला होता.

माणसाचे मूल्य सांगा काय या धरतीवरी
कावळा शिवण्यासही चीता जळावी लागते

(ह्यातील चीता ह्या शब्दात ची दीर्घ करण्याची सूट घेतली होती तो विषय बाजूला ठेवा)

हा शेर ऐकून चित्तरंजन म्हणाले की 'मूल्य' ऐवजी 'मोल' कसे वाटेल.

दोन्हीचा अर्थ तसा एकच, मात्राही समानच! पण मोल हा शब्द उच्चारताना सहजपणे उच्चारला जातो. ऐकणार्‍याला मूल्यपेक्षा मोल अधिक भावेल. हे माझ्या लक्षात आले. ह्याशिवाय मूल्य हे फारच 'आकडेवारीयुक्त' वाटते तर मोल हे अधिक काव्यमय वाटते हा भाग तर अधिकच महत्वाचा! मग तो शेर ऐकवताना मी 'मोल' हा शब्द वापरू लागलो.

असे अनेकवेळा होते. आभाळ / आकाश, ह्यांच्याही मात्रा समान आहेत. पण आभाळ ह्या शब्दात एक काहीतरी भरून आल्याचा सेन्स आहे तर आकाश ह्या शब्दात पोकळी असल्याचा! (हे एक उदाहरण झाले).

हा सरावाचा व स्वतःतील बिल्ट इन कल्पकतेचा (तसेच संयमाचा) भाग आहे.

संयमाचा = चपखल शब्द मिळत नसेल तर थांबावे हा तो संयम! मी स्वतः तसा थांबत नाही अनेकदा, पण अनेकजण थांबतात.

आता नवा प्रतिसादही वाचला प्रतिसादासाठी धन्स
मीही अनेकदा शब्दांचा असा विचार करत असतो पण नेमका शब्द हाती लागेल तर शपथ !! आणि लागला आहे हे कळेल तरही शपथ !!

मी काल शेर केला >ह्याचसाठी इथे साधना लागते < अशी पहिली ओळ आली दुसरी अशी आली >>पार खच्चून प्या आणि थोडे डुला <<< मग खच्चून हा शब्द आवडेना मग मी अजूनच जोमाचा शब्द वापरला ..खच्च्काटून प्या.. हा शब्द कचकाटून असा असावा आमच्याकडे बोलतात अर्थ खच्चून / कधी कधी खेचून (खींचके थोबाडित लगावणे वगैरे )अश्यासाठी वापरतात मग कळेना दोन्हीपैकी जास्त छान कोणता आणि कसे म्हटले की वेगळेही वाटेल जास्त आतून आल्याचेही कळेल (म्हणजे माझे मला कळेल )
प्लीज मार्गदर्शन कराल का सर

मी स्वतः तसा थांबत नाही << मीतर अजिबातच नै Happy

ग्जल वाचली आण लगावले समजली के डोक्यात चाल तयार होते.. मग त्यातले खयाल वाच्ताना जासत समाधान म्ळते.

हॅ गझ्ल वाचताना लगावली व चाल असा काही आकृतीबंध डोकात तयार होईना..

Pages