☼ युगायुगाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी माता - राजमाता जिजाऊसाहेब. (लेखक - गणेश पावले)

Submitted by गणेश पावले on 8 January, 2015 - 02:12

JIJAU.jpg

पारतंत्र्याच्या भयाण अंधारात, गुलामीत खितपत पडलेला देश, गेल्या अनेक दशकात या काटेरी मुकुटाखालून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. असा प्रयत्न "श्री शहाजीराजे भोसले" यांच्याशिवाय दुसरा कुणीच करत न्हवत. पण त्यांची पत्नी जिजाऊसाहेब यांनी तर ठाम निश्चयच केला होता. कि एक ना एक दिवस या मुसलमानी संकटातून सारा मुलुख मुक्त करेन. स्त्री ने एकदा ठरवलं तर ती अशक्यातली गोष्ठ शक्य करू शकते याच मूर्तिमंत उदाहरण सर्वप्रथम राजमाता जिजाऊसाहेबांनी समाजाला घालून दिल. सूर्यासारखा तेजस्वी, शंकरा सारखा तपस्वी, भीम, अर्जुनासारखा ताकतवान, कृष्णासारखी तल्लख बुद्धिमता, आई जगदंबेचा आशीर्वाद, आणि जिजाऊसारखी माता, सह्याद्रीसारखा पाठीराखा लाभलेला राजा श्री शिवाजी महाराज यांच्या सारखा पुत्र जिजाऊ पोटी जन्माला आला. आणि गुलामीत खितपत पडलेला महाराष्ट्र स्वराज्याची स्वप्न सत्यात पाहू लागला.
जिजाऊसाहेबांना एकूण आठ अपत्ये झाली. पहिल्याचे नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावाप्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर जिजाऊसाहेबांना ४ मुले झाली चार ही दगावली, ७ वर्षाचा काळ निघुन गेला. गेल्या आठ वर्षात जिजाऊ कधी स्वस्त बसल्या न्हवत्या, सगळीकडे होणारा अत्याचार त्यांना स्वस्त बसूच देत न्हवता. आई भवानीकडे त्या एकच मागणे मागत होत्या कि; आई जगदंबे एक शूर पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल. जो या भयाण अंधकारातून सर्वांना मुक्त करेल. एक अस वरदान मला दे ! आई अस वरदान मला दे ! आणि आई भवानी खरोखरच नवसाला पावली, स्वराज्याची ध्येयनिष्ठा असलेली ही कूस उगवली, त्यांनी पोटातल्या गर्भाला गर्भसंस्कार देण सुरु केल, जणू काही उद्याचा अभिमन्यु माझ्या पोटी जन्माला येयील आणि या पातशहांच्या चक्रव्युवाला भेदून त्यांचा सर्वनाश करील. आणि जगाचा छत्रपती म्हणून जाणता राजा घडेल. आणि एके दिवशी शिवनेरीवर अरुणोदय झाला. दिवस होता १९ फेब्रुवारी "फाल्गुन वैद्य तृतीया" सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला.
जिजाऊसाहेबांनी आपल्या मनात असलेली स्वराज्याची संकल्पना साक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा शूरवीर राजाला राजस व सत्वगुणांचे बाळकडू देण्यास सुरवात केली.
स्वधर्म रक्षणाची जबाबदारी, आया बहिणींची होणारी अवहेलना, भर चौकात गायी कापल्या जात होत्या. मुसलमानी सुलतान तर धर्मवेडे होवून जबरदस्ती आपला धर्म लादत होते, हिंदू धर्म बाटत होता. उभा महाराष्ट्र गुलामीच्या छायेत परकियांच्या, बादशाहांच्या, मुसलमानांच्या दरबारी चाकरी करत होता. आपलं इमान गहाण ठेवून पोरीबाळी त्या नराधमांच्या हवाली करत होता. हे सर्व पाहून जिजाऊसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला गेला. तिथे त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. आणि एका सुवर्णयुगाची सुरवात केली.
शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवबा तू लढ ! या समाजाला गुलामीतून मुक्त कर ! त्यांना स्वराज्याचा आनंद दे ! त्यांना मोकळा श्वास दे ! प्राण गेला तरी बेहत्तर पण दृष्टांचा नाश कर ! अन्यायाच्या कुरुशेत्रावर अधर्मीना धडा शिकव ! जणू काही जीजाऊ कुरुक्षेत्रातल्या कृष्णाप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभ्या होत्या. जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद म्हणजे विजय हे समीकरणच जुळलं होत.
अफजलखाना सारख्या पाप्याला वेळीच ठेचला पाहिजे यासाठी शिवाजी महाराजांना ध्येर्य दिले. किती तरी जबरदस्तीने बाटवलेल्या हिंदुना पुन्हा स्वधर्मात आणले. सईबाईंचे बंधू बबाजी निंबाळकर यांना जुलुमाने बाटवण्यात आले होते. त्यांना परत स्वधर्मात आणले. स्वराज्यात घडणारया प्रत्येक छोट्यामोठ्या घडामोडींवर जिजाऊ नेहमीच लक्ष ठेवून होत्या. योग्य वेळी योग्य निर्णय घेत होत्या. राज्यांच्या गैरहजेरीत स्वता राज्यकारभार अगदी कुशलतेने सांभाळीत होत्या.
शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वाघिणीसारखा स्वराज्याचा भार सांभाळला, राजे आग्रा येथे नजरकैदेत असताना राज्यकारभार चालवला. स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरवून जिजाऊसाहेबांनी महाराष्ट्राच्या मातीत, सह्याद्रीच्या कुशीत सुवर्णकाळ आणला. त्या सुवर्णकाळाची गाथा या पृथ्वीतलावर आजही अखंडित चालू आहे अन ती सूर्यासारखी तेजस्वीपणे तळपत राहील.

जिजाऊसाहेबांच्या तेजस्वी कारकीर्दीवर एक काव्य माझ्या कवी मनाला सुचलंय -

[ हुकुमशाही.. जुलमी अत्याचारी गुलामीत स्वाभिमान गहाण ठेवलेल्या समाजाच्या उद्द्धारासाठी, हिरवं निशाण चोहीकडे गुलामीचा नांगर फिरवत असताना, अंगी बळ असूनही षंड झालेल्या समाजाला एक नवी दिशा दाखवणारा पुत्र मला दे ! अशी मागणी आई भवानीमातेकडे, जगदंबेकडे जिजाऊ करत आहेत. त्या काळातील मराठ्यांवर, अखंड हिंदुस्थानवर ओढवलेली परिस्थिती मी या काव्यातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. ]

न झाला.. न होईल कधी असा छत्रपती जनतेचा
अफाट कीर्तीचा महामेरू जाणता राजा जगाचा...
जिजाऊचा बाळ.. छत्रपती रयतेचा...
शिकवण आईची.. भिनली नसानसांत
वारे ही गावू लागले गाणे.. हर हर ललकारी गगनात
माजली होती हुकुमशाही.. जुलमी अत्याचारी
बाटल्या बाया बापुड्या... घोर अन्याय करी
कोण वाचवेल यांना कोण यांचा होईल कैवारी
देव बाटले... मंदिर पडले…. नंग्या नाचत सारे बेजार
प्रजा झाली स्तब्द... कोसळले दुखाचे डोंगर..
असून मर्द एकाहून एक सरस.. कोणी होईना का तारणहार?
कोणी धरीना हात दैत्याचा.. होवून जीवावर उधार
नांगर फिरले गनिमाचे.. संसार पडले वार्यावर..
पेटेना ठिणगी स्वातंत्र्याची.. लाज वाटेना स्वताची
कोणीच उभा ठाकेना लढाया.. अब्रू टांगली वेशीवरती
हिरवं निशाण चहूकडे.. कोसळती जुलमी कडे
भर चौकात कापल्या गायी.. रण चांडाळ सगळीकडे
मुला बाळांचे हाल झाले.. पळविल्या आया बहिणी
रानोमाळ पेटे वणवा.. हालाहाल झाला शेतकरी
माय भवानी शांत बैसली.. जप नामाचा कोणी करी
धाव देवा तूच आता.. तूच आमचा साह्यकरी
जन्म घे पुन्हा एकदा.. उभा ठाक सह्याद्री शिखरावरी..
बांगड्या भरल्या हातामधी.. मिशांवर का ताव मारी
मर्दाची जात हरवली.. जन्म घेईना धर्म रक्षिता उरी
हिंदूंची का ही पोर अशी..? मान खाली ही का झाली ?
मराठ्यांची पोर म्हणविता स्वताला... लाज का नाही उरली?
गंझली तलवारीची पात.. ना जोर कुणाच्या मनगटात
रडला सह्याद्री मनात... का जन्माला याच मातीत
नाही धाडस, नाही करारी बाणा.. येथल्या मर्दाच्या जातीत
एकही असा जन्मना संपवण्या जुलमा.. येथल्या आईच्या कुशीत
खायला मिळना अन्न.. पोरंबाळ मरती उपाशी.
माजले रंक अन राव.. छळती आपल्याच रक्ताशी..
नाही कुणी वाली.. कसे रोखावे जुलामाशी
कुणी करती तपे... साद घालती जगदंबेशी..
घे अवतार पुन्हा.. संहार या दानवांशी
आई जीजावू चिंतेत.. कसं वाचवू रयतेस
अन्याय फार झाला.. कसं सावरू गरिबास
घाली साकड जगदंबेला.. दे असा मला पुत्र
जो तारील धरणीला.. होईल रयतेच छत्र
मातले यौवन तेथे केला उपद्रव सुरु
"तारेल.. जाती धर्मा.. घडवेल हिंदवी स्वराज्याला
अस दे आई जगदंबे मज.. वाघासारख शूर लेकरू"
जे दावेल वाट त्यांची.. त्यांच्याच वाटेवर जावून
शीर धडावेगळ करेल गनिमाचे... अन्यायाला पाहून
दे असा वीरपुत्र मला..!! जो सोडवील या जाचातून
रयतेचा वाली होईल.. छत्रपती राजा शोभेल लाखातून
पाळता भुई कमी करील... या मातल्या यवनांची..
स्वराज्याची आस बाळगेल.. लाज राखेल आया बहिणींची..
दे असा पुत्र मला... जो करेल राज्य या सह्याद्रीत
वाचवेल हिंदवी धर्मा... घेईल शपथ हिंदवी स्वराज्याची
घडवील नवा इतिहास येथे... आनंदात राहील जनता
असा वीर पुत्र दे अंबे जो होयील जाणता राजा
असा शूर पुत्र दे... मला..
व्याकूळ ही माता..
आई व्याकूळ ही माता..

लेखक - गणेश पावले, मुंबई.
९६१९९४३६३७
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान. मुंबई

********************************************************************
मित्रहो,
वरील लेख / काव्य लिहिताना माझ्या अंतर्मनातून आलेल्या शब्दात जिजाऊसाहेबां बद्दलची व्याकुळता, आस्था, आणि गुलामीत खितपत पडलेल्या समाजाबद्दलची चीड, शोकाकुल परीस्थित खंबीरपणे लढा देणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल लिहिलेला आहे.
हा लेख कॉपी करताना. कृपया माझ नाव व संपर्क क्रमांक हि इतरत्र पाठवा. त्यामुळे वाचकांची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहचेल आणि पुढील लिखाणास मला मदत होयील
धन्यवाद -
आपला
गणेश पावले

********************************************************************
ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●ஜ
!! राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ !!
ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬●ஜ

JIJAU.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांनी पोटातल्या गर्भाला गर्भसंस्कार देण सुरु केल, >>>>

संदर्भ द्याल का? का कविकल्पना आहे.
कारण माझ्या माहितीप्रमाणे गर्भसंस्कार वगैरे प्रकार सरसकट सर्वच जमातीत नाहीत. आता आता पुस्तक वगैरे वाचून गर्भसंस्कार असा सुद्धा काही विधी असतो हे मला प्रथमच माहित पडले. उस्तुकता आहे म्हणून विचारतोय.

दादा
गर्भसंस्कार याला तुम्ही आताचा "आधुनिक विचार" लावू नका.

माझ्या माहितीप्रमाणे -
शिवराय जेंव्हा गर्भात असताना, जीजाऊ नेहमी ध्यानस्थ असत, पूजा अर्चा, गीता पठण, शूर- वीरांच्या कथा वाचणे, वीर रसातले पोवाडे ऐकणे याला मी गर्भसंस्कार असा अर्थ लावलाय.

कृपया तुम्ही त्या काळातल्या कोणत्याही आचरणाचा अर्थ आजच्या आधुनिक विचारांशी करू नये.

असो