नमस्कार!
अगदी तीन दिवसांपूर्वी मेक्सिकोला जाऊन आलो.( वर्तकांच्या पुस्तकात 'मेक्सिको' ला खूप माश्या (माश्यांवर बसणार्या हो!) असल्यामुळे 'मक्षिका' म्हटलेलं आहे, पण खरंतर 'डासिका' किंवा 'डासिको' म्ह्णायला हरकत नव्हती! ). मेक्सिकोमधल्या सुप्रसिद्ध ( स्प्रिंग ब्रेक मध्ये कूप्रसिद्ध!) 'कॅनकून' ह्या समुद्राकाठी वसलेल्या ठिकाणी एक आठवडा गेलो होतो. अर्ध्याहून अधिक मेक्सिकोची हवा भारताप्रमाणेच ऊष्ण आहे आणि हा देशही आपल्यप्रमाणेच 'प्रगतीशील'असल्यामुळे एकंदर पर्यट्कांची फसवाफसवी, हुज्जत घालणे, टॅक्सीसाठी बार्गेनिंग, सुमार दर्जाचं अन्न आणि इतर 'growing pains' चा सामना करावा लागला, पण जास्त मूड ऑफ करून घ्यायचा नाही असं ठरवलं आणि बघता बघता मेक्सिको आवडायला लागला.
कॅनकून (Cancun) म्हणजे कॅरिबियन समुद्राकाठी असणारं एक गाव होतं. निळाशार समुद्र,मैलोन् मैल लांबीचा किनारा, हिरवीगार पर्जन्यवनं ( रेन फॉरेस्ट) आणि पूर्वीच्या माया लोकांची वसाहत ह्यामुळे १९७० च्या सुमारास अमेरिकन पर्यटक प्रचंड प्रमाणात या ठिकाणी येऊ लागले आणि ह्या गावाचा गोवा व्हायला वेळ लागला नाही!
कॅनकून हे मेक्सिकोच्या 'किंताना रू' राज्यात जरी असलं तरी ह्या भागाला 'मायन रिव्हीएरा' म्हणतात.(तेवढीच माया लोकांची आठवण!).
From Mexico
प्रचि १: कॅनकून चा प्लाया देलफिनेस ( डॉल्फिन बीच) - ह्या निळ्या रंगानं वेड लावलं!
From Mexico
प्रचि २: कॅनकून चा प्लाया चाक-मूल ( चूल आणि मूल ऐवजी!) - सगळी रिसॉर्ट्स ह्या भागात आहेत! रिसॉर्ट्स् मध्ये बरेच वेळा ऑल-इनक्लूसिव म्हणजे 'अमर्याद खाणं-पिणं' असा विकल्प असतो.
From Mexico
प्रचि ३: मेक्सिको म्हटलं की ह्या टोप्या आल्याच! ह्यांना 'सोम्ब्रेरो' (Sombrero) म्हणतात.
दोन दिवस आरामात घालवल्यावर 'युकातान' राज्यातल्या माया लोकांची पिरॅमिड्स पाहण्यासाठी 'चिचेन इत्झा' ह्या ठिकाणी गेलो. हे ठिकाण म्हणजे साधारण आपल्याकडे जयपूर्/उदयपूर आहे त्याप्रमाणे होतं, म्हणजे पूर्वीच्या काळातली अतिभव्य मंदिरं, राजवाडे, माया लोकांचा दारूण (भयावह) इतिहास इ.इ. आणि त्याचसमोर प्रति़कॄती विकणारे दुकानदार!
From Mexico
प्रचि ४: चिचेन इत्झा मध्ये फिरत्या विक्रेत्यांकडे असणार्या माया राजांच्या प्रति़कॄती
From Mexico
प्रचि५ : चिचेन इत्झा मधलं सर्वात भव्य पिरॅमिड. दंतकथांनुसार सर्वात वरच्या चौथर्यावर धर्मगुरूंनाच प्रवेश असून ते पर्जन्यदेवाशी कन्सलटेशन करत असत आणि प्रत्येक वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी खूप मोठा सोहळा पार पडत असे. ह्या सोहळ्यात नरबळी देण्याची प्रथा होती आणि बरेच वेळा स्वतः बळी पडणं हा सन्मान समजला जात असे!
From Mexico
प्रचि ६: धर्मगुरूंचं घर. ह्या भोवती काही नर्तिकांची खोपटीसुद्धा दिसून येतात. अर्थात, देवाशी बोलणं हे सोपं काम नव्हे!
From Mexico
प्रचि ७: ही वेधशाळा. इथे हवामानाबद्दलचे प्रयोग आणि निष्कर्ष तपासले जात असत. ह्या इमारतीतही नरबळी देण्यासाठी जागा ठेवलेली दिसते.
From Mexico
प्रचि ८: हे 'चाक मूल' म्हणजे पर्जन्यदेवाचं मंदिर. पूर्वी म्ह्णे सगळ्या इमारती लाल रंगानं रंगवल्या होत्या.
इथले अतिप्रचंड फोटो आहेत पण सगळे एका लेखात टाकता येणं शक्य नाही. थोडक्यात मला माया लोकांबद्दल समजलेलं (गाईड्च्या तोंडून ऐकलेलं आणि अवांतर वाचलेलं) म्हणजे: माया लोक साधारण इ.स. १५५० पर्यंत राज्य करत होते आणि नंतर स्पॅनिश लो़कांच्या आक्रमणात मोठ्या भूभागावर असणारं राज्य हळूहळू गमावून बसले. अजूनही माया वंशाचे लोक ह्या लाखोंच्या संख्येनं आहेत पण त्यांच्या भाषेशिवाय पूर्वीचं काहीच शिल्लक नाही. माया संस्कॄती बद्द्ल सांगावं तर त्यांचा इहलोकापेक्षा परलोकावर जास्त विश्वास होता. हा परलोक आकाशात नसून बरेच वेळा पाताळात (Underworld) आहे असं समजलं जात होतं. माया लोकांचे तीन मुख्य विश्वास म्हणजे: पाताळ(ह्याला 'शिबाल्बा' असा शब्द आहे) , मॄत्यूनंतरचं आयुष्य आणि ह्या दोन्हीसाठी केलेलं बलिदान! (Xibalba- Underworld, Death, Honor in sacrificing human life). अजून एक अजब कहाणी म्हणजे ह्या ठिकाणी ' पोक-ता-पोक' नावाचा फुटबॉलसारखा कंबरेनं खेळला जाणारा खेळ पवित्र मानत असत आणि जो संघ जिंकेल त्यातल्या 'मॅन ऑफ द मॅच'ला बळी देत असत! हरणारा खेळाडू नव्हे!
असो, ह्यानंतरची प्रचि ही बर्यापैकी 'सेल्फ- एक्सप्लानेटॉरी' असतील!
From Mexico
प्रचि ९: इस्ला कोंतोय(Isla Contoy) - छोटंसं बेट जिथे असंख्य पक्षी आणि कसवं राहतात. माणसांना मुक्काम करता येत नाही.
From Mexico
प्रचि १०: इस्ला मुहेरेस (Isla Mujeres) नावाच्या बेटावरचा दक्षिणेकडचा भाग- पुंता सूर (Punta Sur)
हे मेक्सिकोच्या पक्ष्यांचं कोलाज! मला ह्यात काही ज्ञान नसल्यानं त्यांची नावं देत नाही पण दिसायला अतिशय सुरेख असल्यामुळे खूप फोटो काढले! खालच्या चित्रातला 'हर्मिट क्रॅब' तेवढा मला ओळखता आला!
From Mexico
प्रचि ११: पक्षी!!
अजून एक हमखास आढळणारा प्राणी म्हणजे इग्वाना (Iguana).
From Mexico
प्रचि १२: इग्वाना
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!! आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
-दैत्य
मस्त फोटोज आणि लेख !
मस्त फोटोज आणि लेख !
फोटोज मस्त आहेत. पण माहिती
फोटोज मस्त आहेत. पण माहिती अजून देता आली असती.
मस्त !!! अजून फोटोज येऊ द्यात
मस्त !!! अजून फोटोज येऊ द्यात !!!
छान फोटो आहेत. मेक्सिकोतील
छान फोटो आहेत. मेक्सिकोतील पिरॅमिड्स, बळी, युकातान (युकॅटॅन) वगैरेंच्या इतिहासाचा उल्लेख ग्रीक मायथॉलॉजीमध्ये असावा.
फोटो मस्तच आहेत. निळा रंग
फोटो मस्तच आहेत. निळा रंग अफाट देखणा दिसतोय.
मायन संस्कृती नष्ट झाली हे खुप वेळा वाचनात आलेय. त्यामुळे त्या वंशाचे लोक अजुनही आहेत हे वाचुन आश्चर्य वाटले.
सुंदर फोटोज!!!!!!!!
सुंदर फोटोज!!!!!!!!
वॉव.. मस्त...
वॉव.. मस्त...
वाह ! सुरेखच फोटो
वाह ! सुरेखच फोटो
Awesome photos
Awesome photos
मस्त फोटो.. आणखी असतील तर येऊ
मस्त फोटो.. आणखी असतील तर येऊ द्यात कि.
मेक्सिको चा व्हीसा ऑन अरायव्हल आहे का ? एकदा जायचे आहे.
फोटो वॉव आहेत.. काही काही तर
फोटो वॉव आहेत.. काही काही तर निव्वळ..
लेख वाचतो आता सावकाशीने
मस्त आहेत फोटो..
मस्त आहेत फोटो..
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुंदर!!!
सुंदर!!!
मस्त फोटोज आणि लेख !
मस्त फोटोज आणि लेख !
फोटो मस्त आहेत. माहिती
फोटो मस्त आहेत. माहिती देण्याची पद्धत पण आवडली.
खूप मस्त!!
खूप मस्त!!
फोटो चांगले आहेत. कॅन्कुन
फोटो चांगले आहेत. कॅन्कुन मधले 'ऑल इन्क्लुसिव्ह' रिसॉर्ट्स चांगले आहेत पण फूड अगदीच बेक्कार.. दोन दिवस खाल्ल्यावर घरच्या जेवणाची आठवण न आल्यास नवल.
अप्रतिम देखणे फोटो! समुद्राचे
अप्रतिम देखणे फोटो! समुद्राचे सगळे फोटो भन्नाट आहेत! प्रत्येक फोटोकरता छान माहिती दिलीत ते आवडलं.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटो आणि माहिती.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
बीचेसचे फोटो सुंदर. गंमतीची
बीचेसचे फोटो सुंदर. गंमतीची गोष्ट अशी कि ती सफेद, प्रिस्टिन वाळु बाहेरुन आणुन टाकलेली आहे. टुरिस्ट डेस्टिनेशन कसं डेव्हलप करावं याचं कॅन्कुन एक उत्तम उदाहरण आहे. टुलुमचा टर्कॉय्ज बीच जास्त सुंदर आहे...
मस्त फोटो.
मस्त फोटो.
लेख आणि फोटोज दोन्ही आवडले
लेख आणि फोटोज दोन्ही आवडले
सगळ्यांना मनापासून
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
@केदारः अजून थोडे फोटो टाकून थोडी जास्त माहिती नक्की देईन!
>>>
मेक्सिको चा व्हीसा ऑन अरायव्हल आहे का ? एकदा जायचे आहे.
>>>
@दिनेशः जर कोणताही US Visa किंवा ग्रीन कार्ड असेल तर मेक्सिको मध्ये भारतीय पासपोर्ट ला ऑन अरायव्हल विसा मिळतो, पण जर तसं नसेल तर भारतातूनच मेक्सिकोचा विसा काढावा लागतो. मी अजून एक गोष्ट बघितली ती म्हणजे कॅनडा मधून कॅनकून ला जाणारं बहुतांश ट्रॅफिक यु.एस. मधूनच जातं.
>>>
कॅन्कुन मधले 'ऑल इन्क्लुसिव्ह' रिसॉर्ट्स चांगले आहेत पण फूड अगदीच बेक्कार.
>>>
@सायो: आम्ही रिसॉर्ट मध्ये न राहता जुन्या कॅनकून मध्ये राहिलो होतो आणि तिकडेसुद्दा आसपासच्या रेस्टोरंट्स्नी निराशाच केली, ती इतकी की, आम्ही शेवटचे ३ दिवस चक्क बाजारतून भाजी आणून आमच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक केला!
मस्त. कोणती resorts प्रसिद्ध
मस्त.
कोणती resorts प्रसिद्ध आहेत तिथे, काही कल्पना?
सुनिधी, आम्ही इथे राहिलो
सुनिधी, आम्ही इथे राहिलो होतो. हॉटेल/ रिसॉर्ट भारी आहे एकदम पण जेवण बेक्कार. सकाळपासून बफे खाऊन वैताग येतो.
http://www.orbitz.com/hotel/Mexico/Riviera_Maya/Barcelo_Maya_Palace_Delu...
लेख छान आहे. आणि सुंदर फोटो.
लेख छान आहे. आणि सुंदर फोटो.
थँक्स सायो. tripadv वर पण
थँक्स सायो. tripadv वर पण असंच जाऊन पाहिले, बरेच दिसताहेत.
Pages