Submitted by गणेश पावले on 6 January, 2015 - 00:01
गुपित सारे गुपित राहुदे
नाते हे तुझे माझे
भीती वाटते दुनियेची आता
किती शिकारी प्रेमाचे ?
राहू असच हसत खेळत
रोज इशारे डोळ्यांचे
मनात मनातच खोलु सारे
असेच नजारे प्रेमाचे….
मस्त वाटत असाच जगणं
असंच भेटणं हे रोजचं
न सांगताच, न बोलताच
असं पाझरणं डोळयांच
विरह आपला असाच मांडू
न बोलताच मनात भांडू
बागडू, लाडीगोडी असंच गं….
तुझ्यासाठी रोज गाईन…
असंच गाण मनात गं….
गुपित सारे गुपित राहुदे…
रोज भेटू स्वप्नात गं…
. .
रोज भेटू स्वप्नात गं…
तुझा प्रेमवेडा… गणेश.
© कवी - गणेश पावले
९६१९९४३६३७
दिनांक - ०२/१/२०१५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा