१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
@ कोकणस्थ, << अहो संबोधतील
@ कोकणस्थ,
<< अहो संबोधतील म्हणा >>
म्हणजे नेमके किती जण 'अहो' संबोधतील सुशांत यांना? कमाल एकीनेच 'अहो' संबोधणे अपेक्षित असतेना आपल्या परंपरेनुसार? कि ही आणखी कुठली आधुनिक उथळता आहे?
एकीने एकाला "अहो" म्हणायचे ही
एकीने एकाला "अहो" म्हणायचे ही उथळता आहे,
एकाने एकीला "अहो" संबोधले, तर तो आधुनिकपणा ठरेल... असे आपले मला वाटते !
मला राहून राहून खूप गंमत
मला राहून राहून खूप गंमत वाटतेय.
आवाहन करूनही लोक अवांतर पोस्ट करण्याचे थांबवणे काही दिसत नाही. मी हा धागा सोडून देतेय.
धागा १००० गाठनार.
धागा १००० गाठनार.
मी हा धागा सोडून
मी हा धागा सोडून देतेय.
<<
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा बंद?
नियम क्र. ४ बघा हे आवाहन
नियम क्र. ४ बघा
हे आवाहन असते? की ब्ल्~ओक करणे?
(रच्याकने, bl~ok हे बराहाचे कीस्ट्रोक्स आहेत.)
मला या धाग्यातुन पारंपारीक
मला या धाग्यातुन पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून घ्यायचे आहे.
तिरुपती बालाजी ला प्राचिन काळापासुन कुमारिका, विवाहितस्त्री पुरुष लहान मुले सगळ्याचे मुंडन करतात ! या परंपरे मागे काय कारन असावे.?
मुंडन प्रथा का पडली व कुणी पाडली? तर्क संगत व धार्मिक कारण असणारे उत्तर हवे आहे.
तर्क संगत व धार्मिक >>
तर्क संगत व धार्मिक >>
३९९
३९९
४००
४००
सुरेख, जाऊ दे हो. धर्मात कसले
सुरेख, जाऊ दे हो. धर्मात कसले तार्कीक कारण शोधता. बौद्ध धर्मात नाही का भिख्खु मुंडन करतात. आता त्यामागे भले सर्व भौतिक सुखे त्यागण्याचे कारण असेल पण मुंडन न करता पण त्यागता येतातच की नाही?
सुरेख | 19 December, 2014 -
सुरेख | 19 December, 2014 - 09:45
मला या धाग्यातुन पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून घ्यायचे आहे.
तिरुपती बालाजी ला प्राचिन काळापासुन कुमारिका, विवाहितस्त्री पुरुष लहान मुले सगळ्याचे मुंडन करतात ! या परंपरे मागे काय कारन असावे.?
मुंडन प्रथा का पडली व कुणी पाडली? तर्क संगत व धार्मिक कारण असणारे उत्तर हवे आहे.
--->
याच्या मागे कसले शास्त्रीय कारण शोधताय ... अशा अनेक प्रथा आहेत ... काही लोजेक नाही ...
When Lord Balaji was hit on his head by a shepherd, a small portion of his scalp became bald. This is noticed by Neela Devi, a Gandharva princess. She feels "such an attractive face should not have a flaw". Immediately she cuts a portion of her hair and with her magical power she implants it on his scalp. Lord Balaji notices her sacrifice. As hair is a beautiful aspect of the female, he promises her that all his devotees who come to his abode should render their hair to him, and she would be the recipient of all the hair received. Hence it is believed that hair offered by the devotees is accepted by Neela Devi. The hill Neeladri, one among seven hills is named after her.
चंबू एकदम आधुनिक चर्चा करतोय
चंबू एकदम आधुनिक चर्चा करतोय आणि बाकीचे उथळ चर्चा का करत आहेत
बघा.. आमची संस्कृती .. हेअर
बघा.. आमची संस्कृती .. हेअर ट्रान्स्प्लान्टचा शोध नीलादेवीने लावला.
पण एक समजले नाही.
नीलादेवी आपले केस बालाजीच्या डोक्याला लावु शकत होती.
तर अजुन कुणाकडुन तरी ती स्वतःच्या डोक्याला केस लावुन घेऊ शकत होती की !
काउ | 19 December, 2014 -
काउ | 19 December, 2014 - 11:15 नवीन
बघा.. आमची संस्कृती .. हेअर ट्रान्स्प्लान्टचा शोध नीलादेवीने लावला.
पण एक समजले नाही.
नीलादेवी आपले केस बालाजीच्या डोक्याला लावु शकत होती.
तर अजुन कुणाकडुन तरी ती स्वतःच्या डोक्याला केस लावुन घेऊ शकत होती की !
--->
तुम्हाला मुद्दा कळला नाही ... स्वताहून देणे वेगळे आणि दुसर्याकडून मागून घेणे वेगळे ...
इब्लिस मी बै वाट बघतिय
इब्लिस
मी बै वाट बघतिय कधी हा धागा पाश्शे गाठतोय
१००+ नविन प्रतिसाद धागा पळतोय
१००+ नविन प्रतिसाद
धागा पळतोय
बेफि कधी येतेय तुमची समरी?
मी बै वाट बघतिय कधी हा धागा
मी बै वाट बघतिय कधी हा धागा पाश्शे गाठतोय
हे असं टार्गेट असू शकतं ? गंमतच आहे सगळी.
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा बंद?
अशी पोस्ट असू शकते ? इब्लीस तुमची पोस्ट नाही तर तुम्ही स्वतःच अवांतर आहात हे खेदाने मला म्हणावे लागेल. क्षमस्व !
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा बंद?
-->
अशक्य हसलो
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर तुम्ही स्वतःच अवांतर आहात हे खेदाने मला म्हणावे लागेल. क्षमस्व !
-->
500 झाले की डिक्लेअर करूया
500 झाले की डिक्लेअर करूया आणि ऑस्ट्रेलियाला बॅटींग देऊया.. उगाच सचिनसारखे रेकॉर्डसाठी खेळण्यात पॉईंट नाही..
ऋन्मेऽऽष | 19 December, 2014
ऋन्मेऽऽष | 19 December, 2014 - 13:51
500 झाले की डिक्लेअर करूया आणि ऑस्ट्रेलियाला बॅटींग देऊया.. उगाच सचिनसारखे रेकॉर्डसाठी खेळण्यात पॉईंट नाही..
--> हसायाचे का?
बंद होण्याआधी विणा सुरू; प पू
बंद होण्याआधी विणा सुरू; प पू आसारामजी महाराज हे त्यांच्या अनेक प्रवचनांमधून आणि वर्तनामधून समाजाला काही शिकविण्याचा प्रयत्न करतायेत (होते). त्यांचे सध्याचे वास्तव्यही त्यांची एक लिला मानली जाते. हो; काही अवांतर लोक त्याला जरी हसतात तरी त्यांनी एक समजुन घ्यावे की त्यांच्याकडील औषधाने बरे झालेले कित्येक लोक आहेत. त्यांच्या या कार्याची दखल सरकारने घ्यावी असे मला वाटते.
याबद्दल तुमचे मत ऐकायला आवडेल!
<<सुरेख, जाऊ दे हो. धर्मात
<<सुरेख, जाऊ दे हो. धर्मात कसले तार्कीक कारण शोधता. बौद्ध धर्मात नाही का भिख्खु मुंडन करतात. आता त्यामागे भले सर्व भौतिक सुखे त्यागण्याचे कारण असेल पण मुंडन न करता पण त्यागता येतातच की नाही?>>
हे कारन तर्क संगत वाटत आहे.ही संस्कृती बौद्ध कालिन विस्मृतित गेलेली श्रामणेर परंपरा असावी.जी आजही बौद्ध देषांमधे प्रचलित आहे.
सरकारनदखल घेउन सध्या त्याना
सरकारनदखल घेउन सध्या त्याना सर्कारी पाहुणचार सुरु आहे.
सुरेख शेवटी आपल्या पॉईंटाचा
सुरेख शेवटी आपल्या पॉईंटाचा मुद्दा बनवण्यात सक्सेसफुल ठरल्या आहेत.
अभिनंदन!
टण्या यांनी त्यांना मदतच केली आहे.
अभिनंदन!
आता जमनादास यांचे हे पुस्तक सुरेख यांच्या करिता.
http://www.ambedkar.org/Tirupati/Tirupati.pdf
ता क. मी वाचलेले नाही.
साती बरोबर ओळखलस . काल मी
साती बरोबर ओळखलस .
काल मी जमनादास यांचे हे वाचत होते आणी ते मनाला पटत होत.
मी मायबोलीवरचे धागे
मी मायबोलीवरचे धागे वाचण्यापासून वेळ मिळाल्यास वाचून बघेन.
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा
म्हणजे वीणा सुरू ऐवजी वीणा बंद?>>>
हा तर अवांतर गप्पाचा धागा
हा तर अवांतर गप्पाचा धागा झालेला आहे
( माझी पण त्यात भर)
४२०
४२०
Pages