आधुनिकता की उथळपणा ?

Submitted by वीणा सुरू on 15 December, 2014 - 10:16

१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.

सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).

आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.

जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.

आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?

हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.

थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .

या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाव-जिल्हा,शहरं-राज्य, देश-विदेश भरपुर भट्कंती केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ही गोष्ट खरी असावी.

गाव-जिल्हा,शहरं-राज्य, देश-विदेश भरपुर भट्कंती केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ही गोष्ट खरी असावी.
आणी हे ज्ञान स्वःतहा पुरते मर्यादित न ठेवता लोकांना वाटावे.असे विचार हा धागा वाचुन माझ्या मनात आले..

मला टेलेट्रान्सपोर्टेशन, टाईम मशिन इत्यादींच द्यान आहे आणि उद्या कोणी ते प्रत्यक्श्यात बनवल तर त्याचे सगळे श्रेय मलाच देण्यात याव. मी भारतिय असल्यामुळे त्याचे श्रेय मला न देण्याची शक्यता आहे म्हणुन इथे लिहुन ठेवते आहे. Happy

सुजा | 18 December, 2014 - 13:12
मला दाट संशय येतोय एकाच माणसाचे दोन /तीन/चार आयडी असल्याबद्दल स्मित
>>>>

माझ्या मते ऋन्मेऽऽष आणि डीविनिता हे एकाच व्यक्तीचे दोन ID आहेत.

म्हणजे आत्मा एकच.. आलटून पालटून एकेकाच्या शरीरात जाणे..जे पुर्वी काही ऋषी-मूनी करत. मी तर ऐकलेय (खरंतर रामायण-महाभारत मालिकांमधे प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहीलेय!) की पूर्वी ऋषी ध्यान मुद्रेत बसायचे अन तिन्ही लोकांत फिरू शकत असत. पृथ्वी आकाश पाताळ अंतरीक्ष कशाच्याच मर्यादा नव्हत्या त्यांना. कूठल्याही प्राण्याच्या शरीरात ते प्रवेश करू शकत असत. हरीणाच्या रूपात असणार्‍या ऋषीला बाण लागल्याची 'बातमी' सगळ्यांना माहीत असेनच. माझ्याकडे असणार्‍या सीडीज मधुन मी तसा पूरावा सादर करु शकतो. In short ... ते ज्ञान आपल्या कडे पूर्वी पासुन होते.. कालौघात ते विसरले गेले. पण आजही कोणत्यानकोणत्या रुपाने ते आपला पुसटसा काहोईना पण प्रभाव दाखवतातच.

होते म्हणजे काय होतेच...
हे मंगळयान वगैरे आता बोलतायत.... पुण्यनगरीचे एक विद्वान (स्वतःच्या) आत्म्यासकट मंगळावर जाऊन बहुदा त्याच आत्म्यासकट परत येऊन त्याचं वर्णन करणारी पुस्तकं सुद्धा छापून आलेत. (पुस्तक पुण्यातच छापलय) आहात कुठे???

माझ्या मते ऋन्मेऽऽष आणि डीविनिता हे एकाच व्यक्तीचे दोन ID आहेत.<<<< मला काही प्रॉब्लेम नाही, मी आपोआप फेमस होईन माबोवरील मोस्ट फेमस पोस्ट मेकर म्हणून!! ऋ ला चालतंय का ते बघा Wink

डीविनिता, मलाही काही प्रॉब्लेम नाही पण अंतिम निर्णय माबोकर देतील तोच Happy
माझे किती ड्युआय आहेत, मी कोणाचा ड्युआय आहे, वा आता तुम्ही आणि मी मिळून कोणाचे आहोत हे ठरवायचा पुर्ण हक्क मी त्यांनाच दिलाय.. Happy

पण बहुधा तुम्ही माझे नाही तर तुमचा अभिषेक यांचे ड्युआय म्हणून ओळखले जाल, ते तुम्हाला चालेल का ठरवा.. Wink

वेताळ म्हणजे काय? >>>>>>>>>> तुम्ही एलियन (दुसर्या ग्रहावरून आलेले) आहात काय???? तुम्हाला इतिहास तर ठाउक नाहीच आहे हे कळ्ल पण लहान मुलांच्या गोष्टीतला वेताळ पण ठाउक नाहीये........ Lol Lol Lol Lol Lol

मला एक प्रश्न विचारायचा आहे प्रेतात बसलेले वेताळ म्हणजे काय?
----- कृपया नियम क्र. ४ बघा.... उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही. Happy

>>>कृपया नियम क्र. ४ बघा.... उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.<<<

पण स्वतः मात्र उथळ प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थः

>>>तुम्ही प्रेतात बसलेले वेताळ आहात का?<<<

३००

Pages