१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
नरेश माने <,ती प्रथा अजुनही
नरेश माने
<,ती प्रथा अजुनही चालुच आहे त्याची चर्चा कशी करणार. ;)>>काळाच्या उदरात गडप होण्य़ाआधी माहित झाले तर बरे आहे म्ह्णुन हा प्रश्न विचारला.
तिरुपती बालाजी ला प्राचिन काळापासुन स्त्रि-पुरुष केश मुंडन करन्याची प्रथा आहे.त्यामागे काय कारन असावे.?
परमेश्वरा जरा काम करायला गेले
परमेश्वरा जरा काम करायला गेले नि हे काय!! धबधबा प्रतिसाद आले....
सुरेख, प्रत्येक गोश्तिचे कारन
सुरेख, प्रत्येक गोश्तिचे कारन शोदत बसु नये. काहि गोश्तिन्वर प्रश्न न विचार्ता विश्वस थेवावा. आपल्या आइबाबान्कदे आपन मी तुम्चेच अपत्य कशे मला डीएनए रिपोर्त द्या असा लकदा लावतो का? नै ना. तशेच देवाच्याबाबतित वायफल प्रश्न इचारु नये.
कुठे टंकतोस रे कोकणस्था एवढे
कुठे टंकतोस रे कोकणस्था एवढे शुद्ध तू? कोकाटे क्लासला गेलास की काय!
नाहि. मोकाटे क्लास
नाहि. मोकाटे क्लास
दुसर्याचे बाल घेतो म्हणुन
दुसर्याचे बाल घेतो म्हणुन बालाजी.
बालाजी लोकाना सांगतो ... बाल लाओ जी ! म्हणुन बालाजी
कोकणस्थ, मागे एका
कोकणस्थ,
मागे एका स्पर्धेनिमित्त लेख लिहून तो तुमच्याकडून कोणीतरी शुद्ध करवून घेतला होता ना हो?
काय ब्वॉ माणसं एक्केक! वर तुम्हालाच कृतघ्न म्हणतात.
तिरुपती बालाजी देव आहे
तिरुपती बालाजी देव आहे मान्य....
पण तिथ जाउन लोक केस का काढतात. पुढे त्या केसांच काय होत?
कोण म्हणालं कृतघ्न मला? ही
कोण म्हणालं कृतघ्न मला? ही लेटेस्ट डेव्हलपमेन्ट कुठली?
पुढे त्या केसांच काय होत?>>>
पुढे त्या केसांच काय होत?>>>:हहगलो:
उत्तर माहित नाही एवढ्च तायपल
उत्तर माहित नाही एवढ्च तायपल असत तरी चालल असत.
काउ मुळे तुम्हाला आयते उत्तर मिळाले की..
गेले आठ पंधरा दिवस आकांत
गेले आठ पंधरा दिवस आकांत चाललाय की कृतघ्न कृतघ्न असा!
डीविनिता का हसलात? खरच काय
डीविनिता का हसलात?
खरच काय करतात त्या केसांच तिरुपती देवस्थान?
त्या केसांचा लिलाव होतो.
त्या केसांचा लिलाव होतो. त्याचे विग्ज , गंगावण बनते. कागद बनवण्यासाठी पण त्याचा वापर होतो.
केस कापताना दुखत नाही, म्हणून देतात. शिवाय ते परत येतात.
रक्तदान करायची प्रथा असायला हवी होती तिथे.
ते दान केलेले केस पुढे नीट
ते दान केलेले केस पुढे नीट स्वच्छ करुन विग आणी गन्गावन करता वापरले जातात.
http://daily.bhaskar.com/news/belief-behind-donating-hair-at-balaji-1354...
अरे जरा गुगला की यावर. काही दिवसानी गुगल मोशाय आपल्या घरातल्या प्रश्नान्वर पण ईलाज सान्गतील, चावट कुठले.
अहो सुशांत बालाजी लोंढेच्या
अहो सुशांत बालाजी लोंढेच्या लोंढे भेटायला आलेल्यांच्या मागण्यांचे सॉर्टिंग करूनच इतका दमत असेल, केसांचे काय होत असेल अस असा कधी विचारच नाही केला, प्रश्न बघून हसायला आले.
अब्बाच्या बाब्बा. एकाच
अब्बाच्या बाब्बा. एकाच मिनीटात ( २१:३४) चार पोस्ट. या बया! असा विक्रम माबोवर आजतागायत झाला नसेल.:फिदी:
रश्मी काय अभ्यास आहे गं तुझा!
रश्मी काय अभ्यास आहे गं तुझा!
>>> शिवाय ते परत येतात.<<<
>>> शिवाय ते परत येतात.<<<
अहो सुशांत बालाजी>>>> विनीता,
अहो सुशांत बालाजी>>>>:हाहा: विनीता, प्रतीसादात स्वल्पविराम टाक की जरा.:फिदी:
तिरुपती बालाजी देव आहे
तिरुपती बालाजी देव आहे मान्य....
पण तिथ जाउन लोक केस का काढतात. पुढे त्या केसांच काय होत?+१११११११
कुणिही उत्तर द्यावे .अशुध्द टायप्ले तरी चालेल.
दिनेशदा खरतर कोणतीच असली
दिनेशदा खरतर कोणतीच असली प्रथा असु नये.
रक्त दान केल्यावर रक्तच्या तपासण्या करणे. हे येक वाढीव काम. चांगले रक्त नक्कीच वापरले जाईल पण इन्फेक्टेड रक्ताच काय करणार? ते कस व्यवस्थीत डिस्पोज करणार. दररोज टँकरभर तरी रक्त येईलच ना असल.
मीपण, सुशांत बालाजी लोंढे असे
मीपण, सुशांत बालाजी लोंढे असे वाचले.
(No subject)
:p
विनीता, माझा कसला अभ्यास ग.
विनीता, माझा कसला अभ्यास ग. गुगल बाबान्चा आशीर्वाद आहे मला.:खोखो:
अजीबात नाही. विनीता, माझे नातेवाईक दोन महिन्यापूर्वीच बालाजीला जाऊन आलेत. अतीशय सुत्रबद्ध नियोजन आहे. त्याना कुठलाच त्रास झाला नाही. उत्तम सोय होती.
धन्यवाद रश्मी हे गुगल काय असत
धन्यवाद रश्मी हे गुगल काय असत ते पण जरा विस्तारुन सांगाल का?
मुंडन प्रथा का पडली व कुणी
मुंडन प्रथा का पडली व कुणी पाडली?
<< दिनेश. | 19 December,
<< दिनेश. | 19 December, 2014 - 18:09 नवीन
मीपण, सुशांत बालाजी लोंढे असे वाचले. >>
एक विनोद आठवला. एका महिलेचं नाव आणि ती एक बातमी देते ते सारखंच असतं.
श्यामला तात्याविंचू चावला
आपल्याकडे मुंडन म्हणजे
आपल्याकडे मुंडन म्हणजे मृत्यूचे प्रतीक मानत असत. तसे करून मृताशी भावनिक एकात्मता साधली जात असे. ( लिंबू निट सांगू शकेल ) पण तिरुपतिला ते का वाहतात, याची कल्पना नाही. मी गेलो होतो पण मी केस नव्हते दिले. मला तो प्रकार बघायलाही आवडला नाही.
सुशांत बालाजी लोंढे >>
सुशांत बालाजी लोंढे >>
Pages