१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
चंबू चिमटा आवडला बरं का,
चंबू
चिमटा आवडला बरं का, व्यंगचित्रातला.
क्रिएटीव्ह आहात.
बाय द वे
वेताळ म्हणजे अवांतर का ? आणि ही परी कोण ?
अरेरे! एकाच वेळी एवढ्या
अरेरे! एकाच वेळी एवढ्या वेताळांचे वाडवडील मृत्यला प्राप्त झाले.
त्यांना नावे दिली आहेत
त्यांना नावे दिली आहेत
झाडावरची भूतं मस्त खेळत आहेत......त्या झाडाखालच्या भूतावर राज्य आहे असे वाटत आहे.
अवांतर भूत खेळायचे सोडून त्या परीला त्रास देतय का वाट दाखवत आहे ते कळत नाही.
अगं बाई ! ते भूत परीला त्रास
अगं बाई !
ते भूत परीला त्रास देत होतं तर.. मला आधी पंखच वाटले परीचे.
आता चंबूच सांगतील चित्राचा अर्थ.
ती परी आहे हे नीट पाहिल्यावर
ती परी आहे हे नीट पाहिल्यावर कळलं. आधी मला चुकून तो विक्रम वाटला होता (म्हणजे विक्रम वेताळ मधला)
धागा वार्ति घ्या ....
धागा वार्ति घ्या ....
चम्बु चित्र एकदम भारी आले
चम्बु चित्र एकदम भारी आले आहे....
मुग भजी खाउन सुधा ही तर्हा..
अरेरे रे रे
भारी चित्र. त्यातुन कदाचीत
भारी चित्र.
त्यातुन कदाचीत आलेले/ जेवणारे आत्मे आरपार जात असतील.>>
फक्त या कामासाठी त्यांना
फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही
--> +१.
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर
इब्लीस तुमची पोस्ट नाही तर तुम्ही स्वतःच अवांतर आहात हे खेदाने मला म्हणावे लागेल.<<<:हाहा:
मुग भजी काय, उडीद वडे काय,
मुग भजी काय, उडीद वडे काय, वेताळ-परी काय. आवरा रे.
(मीच धागा वर काढलाय वाटत :डोमा:)
आता काय आवरा!
आता काय आवरा!
घातलेला पसारा.
घातलेला पसारा.
चालुद्या
चालुद्या
अॅडमिन बूच लावत नाहीत
अॅडमिन बूच लावत नाहीत तोपर्यंत चालुद्या
>>>> आपल्याकडे मुंडन म्हणजे
>>>> आपल्याकडे मुंडन म्हणजे मृत्यूचे प्रतीक मानत असत. तसे करून मृताशी भावनिक एकात्मता साधली जात असे. ( लिंबू निट सांगू शकेल ) पण तिरुपतिला ते का वाहतात, याची कल्पना नाही. मी गेलो होतो पण मी केस नव्हते दिले. मला तो प्रकार बघायलाही आवडला नाही. <<<<
सुशांत यांनी एक उत्तर दिले आहे. ते ही बरोबर आहे.
मुळात स्वतःस आत्यंतिक प्रिय असलेले केस काढुन टाकून स्वतःस विद्रुप/कुरुप बनविण्यास मानसिक धैर्य लागते. बहुतांश वेळेस माणूस स्वतः कसा दिसतो याबद्दल सर्वात जास्त सजग असतो, त्या देहाचीच कोणती बाब स्वइच्छेने त्यागणे यातिल "त्यागाचे" रोपण मनात व्हावे हा हेतू.
या व्यतिरिक्त व्यावहारिक उपयोग वर सुशांत यांनी सांगितलाच आहे.
पूर्विचे काळी आत्तासारखे उठसुठ न्हाव्याकडे जाऊन डोई महिनोमाल भादरण्याचे फ्याड नव्हते, व पुरुष देखिल खान्द्यापर्यंत केस ठेवत असत. त्यांची निगा राखित. असे वाढवलेले निगा राखलेले केस एका झटक्यात काढून गोटा करणे हे सर्वान्नाच शक्य नाही.
अमिताभबच्चनच्या जमान्यात आम्ही हिप्पीकट म्हणजे कानावर केस येतिल असे ठेवायचो, त्याला अर्थातच पिताश्रींचा विरोध होता, व एका वेळेस त्यान्नी पुन्हा न्हाव्याकडे परत पाठवून नीट कटिंग करायला लावली तेव्हा त्या वयात परत न्हाव्याकडे जाताना अपमान की कशाने डोळ्यात पाणी उभे राहिले होते. पण त्याच प्रसंगामुळे मनावर संयम/ताबा मिळविण्याचाही धडा मिळाला त्याची आठवण झाली.
खूप पूर्वी पर्सिस खंबाटाने असेच काहीसे धैर्य दाखविले होते, अर्था धर्मप्रथा म्हणून नव्हे, तर परंपरेला छेद देणे वा काही सनसनाटी करणे असे उद्देश असतीलही, पण त्यामागे पराकोटिचे मानसिक धैर्य होते हे निर्विवाद.
रक्तदानाची सूचना चांगलीच आहे.
तरीही कापलेल्या केसांच्या मुळेही प्रचंड मोठा व्यवसाय व त्यावर अवलंबून उपजिविका असणारे आहेत. त्यामुळे हे नकोच, अन तेच हवे, असे आग्रह उपयोगाचे ठरणार नाहीत.
ह्या धाग्याची समरी लिहायचीच
ह्या धाग्याची समरी लिहायचीच राहिली
लिवा लवकर
लिवा लवकर
उथळपणा चालूच्चे अजून????
उथळपणा चालूच्चे अजून????
कारण उथळ पाण्याला खळखळाट फार.
कारण उथळ पाण्याला खळखळाट फार.:फिदी:
४७१
४७१
एकच व्यक्ती पाच ठिकाणी राहते
एकच व्यक्ती पाच ठिकाणी राहते हे झेपत नाही.
अवतारी स्त्री!
कठीणे!!!!
कठीणे!!!!
लिंबूटिंबूंनी लिंबूटिंबूंसाठी
लिंबूटिंबूंनी लिंबूटिंबूंसाठी चालवलेला लिंबूटिंबूंचा धागा
अवतार म्हणू नका, सेक्युलर
अवतार म्हणू नका, सेक्युलर लोकांच्या भावना दुखावतील. मग पी.के सारखा ठोके नावाचा सिनेमा निघेल.
आवरा रे हा पसारा. या सगळ्या
आवरा रे हा पसारा.
या सगळ्या काथ्याकुट वरुन हाती मात्र कहीच लागलेले नाही हे मात्र खरे आहे...
माफ करा पण हा धागा भरकटलाय
माफ करा पण हा धागा भरकटलाय असे मला आता खरेच वाटू लागलेय!
अजून शाहरुख नाही आला ना.
अजून शाहरुख नाही आला ना.
ह्यांचं काहीतरी नवीनच असतं!
ह्यांचं काहीतरी नवीनच असतं!
व्यवस्थित तर चाललीय चर्चा!
सगळी चांगली आधुनिक उथळ माणसे आहोत आपण एका ठिकाणी!
बेफि, अनुमोदन.
बेफि, अनुमोदन.
Pages