ड्रॅगनच्या देशात ०९ - जुने लिजीआंग (पृथ्वीवरचे नंदनवन) : शुहे व बैशा

Submitted by इस्पीकचा एक्का on 11 December, 2014 - 01:53

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

सहलीचा आठवा दिवस उजाडला. आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्टी बघायच्या आहेत असे गाइडने म्हटले होते त्यांमुळे उत्सुकता बरीच ताणली गेली होती. त्यामुळे जरा लवकरच उठून अंघोळ व न्याहारी आटपून तयार होतो न होतो तोच गाइड हजर. इटिनेररीप्रमाणे आज लिजीयांगाची उरलेली दोन उपनगरे पाहायची होती... शुहे आणि बैशा.

शुहे हे लिजीयांगच्या एका टोकाला असल्याने पायपीट वाचविण्यासाठी प्रथम चारचाकीने गावाला वळसा घालून मग शुहे मध्ये पायी प्रवेश केला. जोपर्यंत गाडीत होतो तोपर्यंत एका खेड्यापेक्षा काही खास वेगळे दिसत नव्हते. पण थोडेसे अंतर पायी गेल्यावर गावात शिरणाऱ्या पुलाजवळ आलो आणि शुहे आपले रूपरंग उघडे करू लागले.

.

.

आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसे शुहे आपल्या सौंदर्याचा एकेक पदर उलगडून दाखवू लागले.

हे शुहेमधले रस्ते

 .....................

.

.

.

या वरच्या दोन रस्त्यांच्या बाजूला जे भोकाभोकाचे खांब आहेत ते पूर्वी व्यापारी आपले घोडे बांधून ठेवायला वापरत असत. आता लोखंडी घोडे रस्त्यांच्या बाजूला उभे आहेत !

.

.

गावातला एक पूल

ही आहेत काही रेस्तराँची प्रवेशद्वारे

.

हमरस्त्याच्या बाजूचे एक रेस्तराँ

काही खाजगी घरे

.

.

एक छोटा मॉल

भाजीबाजार

अजून काही शब्दांच्या पकडीत न येणारे...

 .....................

.

.

परतीच्या रस्त्यात चीनमधला पहिला चिखलाने भरलेला रस्ता बघितला. फक्त ५० एक मीटर लांबीचा ! शिवाय गाडीत असल्याने निर्धास्त होतो.

काय गंमत आहे नाही कां? चीनमध्ये रस्त्यात चिखल दिसणे ही फोटो काढ्ण्याइतकी विशेष गोष्ट वाटली ! कारण अख्ख्या जुन्या लिजीयांगमध्ये रीपरीपणार्‍या पावसात दोन दिवस हिंडलो पण बुटांना अजिबात चिखल लागला नव्हता.

तेथून पुढे बैशा या लिजीयांगच्या तिसर्‍या उपनगरात गेलो. हे उपनगर प्राचीन काळी लिजीयांग प्रांताची राजधानी होते. तेथला एका वाडा त्यातील उमरावाने बनवून घेतलेल्या काहीशे वर्षे जुन्या भित्तिचित्रांमुळे प्रसिद्ध आहे. वाड्याचे प्रवेशद्वार व आवार छान होते पण काही काळापूर्वी लागलेल्या आगीत चित्रांचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय फ्लॅशने नुकसान होऊ नये म्हणून चित्रांचे फोटो काढण्यास मनाई होती.

पुढे एक छोटे खेडेगाव लागले.

ते नाशींच्या बाटिकासारख्या दिसणार्‍या कलेसाठी प्रसिद्ध आहे. त्या कलेचे काही नमुने

 .....................

.

जरा पुढे गेल्यावर पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांसाठी रेशमाचे भरतकाम करणार्‍या एका खानदानी कुटुंबाला भेट दिली. अनेक अप्रतिम रेशमी भरतकामाचे नमुने पाहायला मिळाले. सगळ्या कलाकृती काचेच्या फ्रेममध्ये असल्याने दिव्यांची प्रतिबिंबे फोटोत आली आहेत त्याबद्दल दिलगीर आहे.

 .....................

.

हे भिंतभर मोठे असलेले भरतकाम सगळ्या कुटुंबाने मिळून एकूण सहा महिने खपून बनवले आहे.

ही पुढची कलाकृती एकदम मन मोहून गेली. सर्वसाधारणपणे मी फिरताना खरेदी करत नाही. पण हे भरतकाम पाहून मोह आवरला नाही.

हे आवारातले ऑर्किड कॅमेर्‍याला फार आवडले.

येथे लिजीयांगची गावाची सफर संपली आणि लिजीयांग जवळच्या दोंगबा नावाच्या दरीत एक खास "Impression Lijiang" नावाचा शो बघायला निघालो. जागतिक कीर्तीच्या Zhang Yimou या चिनी दिग्दर्शकाने याचे आयोजन केले आहे. झांगने The Flowers of War, House of Flying Daggers, Raise the Red Lantern, इत्यादी आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या कार्यक्रमात लिजीयांगच्या १० वेगवेगळ्या जमातींतील ५०० पुरुष-स्त्रिया काम करतात आणि लिजीयांगच्या समाजजीवनाचे दर्शन घडवितात. या शोचे प्रचंड उघडे थिएटर (open air theater) दोगबा दरीत अश्या तर्‍हेने बांधले आहे की खुद्द जेड ड्रॅगन पर्वत याच्या मागच्या पडद्याचे काम करतो. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय या थिएटरच्या भव्यतेची कल्पना करणे कठीण आहे.

ही आहेत त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...

.

.

.

.

.

.

.

.

.

पुढचे आकर्षण होते Yunshanping on Jade Snow Mountain म्हणजे जेड पर्वतावरील स्प्रूस वृक्षांच्या जंगलामधील गवताचे मैदान (meadow). साधारणपणे ४५ मिनिटाच्या चारचाकी प्रवासानंतर आपण जेड स्नो पर्वताच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून केबल कार आपल्याला ३२४० मीटर उंचीवरील जंगलात नेते. तेथे धुके आणि तुरळक पावसामध्ये उंच स्प्रूस वृक्षांच्या जंगलात फिरत फिरत

आपण एकदम एका विस्तीर्ण गवताळ मैदानावर पोहोचतो.

हिरव्यागार मैदानावर चिमुकल्या पांढर्‍या-पिवळ्या फुलांचे शिंतोडे उडवलेले दिसत होते.

परतण्याचा विचार करत होतो तोच धो धो पावूस सुरू झाला त्यामुळे चालत परतण्याचा विचार सोडून सरळ सरकारी इलेक्ट्रिक बस पकडून आमच्या चारचाकीपर्यंत आलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत याक मंडळींचे दर्शन झाले.

आज रात्री Lishui Jinsha Singing & Dancing Show बघितला. हा लिजीयांगमधील नाशी व इतर जमातींच्या जीवनावर आणि त्याच्या लोककथांवर आधारीत संगीत व नृत्याचा फारच बहारदार कार्यक्रम होता. ही आहेत त्यातली काही क्षणचित्रे.

.


.

.

.

.

.

.

.

या पृथ्वीवरच्या नंदनवनातले दोन दिवस कसे भुरकन उडून गेले ते कळलेच नाही. उद्या निघायचे आहे खुद्द पृथ्वीवरचा स्वर्ग बघायला, तो आता अजून किती मनोहर असेल याचा विचार करताना केव्हा झोप आली ते कळलेच नाही.

(क्रमशः)

==============================================================================

ड्रॅगनच्या देशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

==============================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर फोटोज. डोळ्याचे पारणे फिटले.

डॉक्टर तुम्ही दिलगिरी व्यक्त केलीत ते मला आवडले नाही.:दिवा: एवढ्या सुंदर जागा, कलाकृती आमच्या साठी वेळात वेळ काढून शेअर करत आहात त्याबद्दल आम्ही आपले आभार मानले पाहिजेत.

लोखंडी घोडे हा शब्द खुप आवडला.

ऊफ्फ!!!! अप्रतिम.. इतक्या थोडक्यात इतक्या अप्रतिम जागेचं कौतुक कसं करू.. जस्ट अमेझ्ड!!!

सुन्दरता आणी चिन्यान्ची रसिकता ओसन्डुन वहातेय नुसती. चीन एवढे सुन्दर असेल अशी कधीच कल्पना केली नव्हती. डॉ. तुमच्या मुळे आज हे सर्व पहायला मिळतेय, खूप धन्यवाद तुम्हाला.

ती भरतकाम केलेल्या फोटोमधली स्त्री म्हणजे लावण्याचा अद्वितीय नमुना आहे.

रेशमी भरतकामाचे नमुने - केवळ अप्रतिम..

या शोचे प्रचंड उघडे थिएटर (open air theater) दोगबा दरीत अश्या तर्‍हेने बांधले आहे की खुद्द जेड ड्रॅगन पर्वत याच्या मागच्या पडद्याचे काम करतो. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय या थिएटरच्या भव्यतेची कल्पना करणे कठीण आहे.>>>> भव्य म्हणजे काय याची थोडीफार तरी कल्पना आली - ज्या कोणाला या थिएटरची कल्पना सुचली असेल त्याला सलामच ...

हे सगळे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद ... Happy

'टुमदार गाव' हा शब्दप्रयोग फक्त गोष्टीतच वाचला होता. तुमच्या या मालिकेमुळे तो प्रत्यक्ष बघायला मिळतोय.

सगळेच फोटो मस्त आहीत.

पण या शोचे प्रचंड उघडे थिएटर (open air theater) दोगबा दरीत अश्या तर्‍हेने बांधले आहे की खुद्द जेड ड्रॅगन पर्वत याच्या मागच्या पडद्याचे काम करतो.>>> हे फोटो तर एकसम खासम खास वाटले.