Submitted by वैवकु on 29 October, 2014 - 06:42
घडायला पाहिजे तसे हे घडलेले नाही
किंवा करायला हवेय ते जमलेले नाही
काय दिवे लावतात पाहू पिढ्या अता पुढच्या
कधीच ज्यांनी शुभंकरोती म्हटलेले नाही
चार दिवस सुट्ट्या होत्या त्या संपतही आल्या
कुठे जायचे हेच आपले ठरलेले नाही
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही
तुझा जसाही असेल व्ह्यू तू ठरव तुझे काही
मलातरी हे 'असेच' बघणे पटलेले नाही
असा राग अन असा अबोला टाळाटाळ अशी
तरी कसे काळीज कुणावर रुसलेले नाही
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कितीकाळची मनास आहे
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही
दोन्ही शेर आवडले!!!
धन्स हबा साहेब
धन्स हबा साहेब
Pages