Submitted by वैवकु on 29 October, 2014 - 06:42
घडायला पाहिजे तसे हे घडलेले नाही
किंवा करायला हवेय ते जमलेले नाही
काय दिवे लावतात पाहू पिढ्या अता पुढच्या
कधीच ज्यांनी शुभंकरोती म्हटलेले नाही
चार दिवस सुट्ट्या होत्या त्या संपतही आल्या
कुठे जायचे हेच आपले ठरलेले नाही
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही
तुझा जसाही असेल व्ह्यू तू ठरव तुझे काही
मलातरी हे 'असेच' बघणे पटलेले नाही
असा राग अन असा अबोला टाळाटाळ अशी
तरी कसे काळीज कुणावर रुसलेले नाही
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
सुंदर!!
सुंदर!!
काय दिवे लावतात पाहू पिढ्या
काय दिवे लावतात पाहू पिढ्या अता पुढच्या
कधीच ज्यांनी शुभंकरोती म्हटलेले नाही
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही >>>>>>>>>> हे जास्त आवडले आणि
तुझा जसाही असेल व्ह्यू तू ठरव तुझे काही >>>>> ही ओळ नाही आवडली तितकीशी
वा वा वा ! दिल खुश हुआ भाई !
वा वा वा !
दिल खुश हुआ भाई !
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
हा तर कहरच .
कमी जास्त पण सगळेच शेर आवडले .
कितीकाळची मनास आहे
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही
>> क्या बात ! खासकरून 'बिंब'..!
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही
तुझे शेर करताना इतका कस लागे ; बहुधा..
तुझे बिंब हृदयात नीटसे ठसलेले नाही
हे सर्वात छान वाटले. 'ठसलेले' अधिकच.
खूप खूप आभार सर्वांचे
खूप खूप आभार सर्वांचे
वा!! सुरेख.. सर्व शेर
वा!! सुरेख.. सर्व शेर सुरेख.
<<काय दिवे लावतात पाहू पिढ्या अता पुढच्या
कधीच ज्यांनी शुभंकरोती म्हटलेले नाही
चार दिवस सुट्ट्या होत्या त्या संपतही आल्या
कुठे जायचे हेच आपले ठरलेले नाही
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही>> मस्तच....
पण एक मला वाटल म्हणुन.आणि हा माझा स्वताचा व्ह्यु आहे..
<<तुझा जसाही असेल व्ह्यू तू ठरव तुझे काही >>
इथे व्ह्यु थोडस बोचतय.. एक सुदर आणि लयीत पाणि वाहत असताना एखादा दगड त्यातुन डोक वर काढतो.. तसा तो शब्द उटुन दिस्तोय.. एखादा मराठी शब्द बघा जमतोय का..
कितीकाळची मनास आहे
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही
चांगली द्विपदी आहे.
'कितीकाळची वनास आहे स्थितप्रज्ञता ही' असे एखाद्या प्रगल्भ कवीने लिहिले असते!
राज्याभाउ धन्स <<तुझा जसाही
राज्याभाउ धन्स
<<तुझा जसाही दृष्टिकोण तू ठरव तुझे काही>> असे वाचू शकता
आपले पुनश्च आभार आपल्या मुळे मला बदल सुचला आणि तो आधीपेक्षा माझ्यामलाच छान वाटत आहे . बदलाची नेमक्या ठिकाणची गरज नि जागा दाखवल्या बद्दल आभारी आहे .
आत्ममग्नजी(*चाल : पार्लेजी ) मला मनास असेच म्हणायचे होते आणि त्यावर मी ठाम आहे पुढेही असेन . जरा दुसर्याच्या नजरियाला आहे तसे स्वीकारायला शिका तुम्हाला गरज आहे त्याची !!
असो
वनास = प्रगल्भ कवीने वनास हे
वनास = प्रगल्भ कवीने
वनास हे शेंबड्या पोराने लिहिले असते. मनाला झाडाची उपमा दिलेली आहे. असो! सकाळी सकाळी मनोरंजन केल्याबद्दल आभार!
आणि बेफीजी ह्या आत्मन्मग्नाला
आणि बेफीजी ह्या आत्मन्मग्नाला हेही विचारा की ... अरे म्हातार्या ! वर वनास असे म्हणालास तर खालच्या ओळीतही एक बदल करावा लागेल तो ओळखून दाखव म्हणावं वैवकु तुला देवपूरी तंबाखूची १ पुडी फ्री देइल म्हणावं वर चुनाडबी तब्बल २ रु.ची तीही फ्री देइल म्हणावं :हाहा::
चार दिवस सुट्ट्या होत्या त्या
चार दिवस सुट्ट्या होत्या त्या संपतही आल्या
कुठे जायचे हेच आपले ठरलेले नाही<<< छान! प्रगल्भ समीक्षकांसाठी - सुट्टी = जन्म
वेळ येत नाही तोवरती हेच वाटते की
कुणाविना माझे काहीही अडलेले नाही<<< छान!
कितीकाळची मनास आहे स्थितप्रज्ञता ही
ह्या झाडाचे एक पानही हललेले नाही<<< वा वा
मनाला झाडाची उपमा दिलेली
मनाला झाडाची उपमा दिलेली आहे>>>
हा हा हा .... केवढा मोठा विनोद पहा
मग वरच्या ओळीत काय त्याची कोरोलरी लिहिलीय काय... वरती झाडाला मनाची आणि खाली मनाला झाडाची.....
तुमचा गुरूपौर्णिमा उत्सव कसा होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही :खिखि:
स्वयंघोषित न्यायाधीशांच्या
स्वयंघोषित न्यायाधीशांच्या गझला वाचायला मजा येणार आहे.
तुमचा गुरूपौर्णिमा
तुमचा गुरूपौर्णिमा उत्सव........<<< असूद्या आत्ममग्नजी स्वतःला स्थितप्रज्ञता हा शब्द गझलेत कसा काय वापरता आला नाही आजवर ह्याचा किती त्रागा करून घेणार आहात बरे ?
वरती झाडाला मनाची आणि खाली मनाला झाडाची << अहो महाशय झाड म्हणा की मन आणि वरच्या की खालच्या कोणत्याही ओळीत म्हणा सांगायचे आहे ते मनाबाबत आहे इतके आपल्याला कळले तरी पुरे ! (तेतरी कळते आहे की नै कय माहीत !!) असोच
आता भलत्यांच्याच रांगोळ्या
आता भलत्यांच्याच रांगोळ्या तीन नंबरमध्ये जातील, गझलेवर परत मारामार्या सुरू झाल्या म्हणून! सुरू केल्या कोणी ते कोणी बघणार नाही नेहमीप्रमाणेच
स्वयंघोषित न्यायाधीशांच्या
स्वयंघोषित न्यायाधीशांच्या गझला वाचायला मजा येणार आहे.<<<< वाट बघा सर्जी
आता हा म्हातारा घंटा गझल लिहिणार नाही माबोवर पर्यायीमुळे आपल्याला डच्चू मिळे हे ओळखून मागल्याबारीच त्याने पर्यायी देणे सोडले आहे मग प्रतिसादावर तहान भागवू लागल्यावर तेव्हाही डच्चू मिळाला म्हणून विक्षिप्त प्रतिसादही देणे बंद केले होते साहेबांनी आता कसेबसे सभ्य सोज्वळ प्रतिसादावरच भागवतील हे गझल टाकणार नाहीत
घ्या लिहून हवं तर माझ्या कडून
ह्या देवपूरकराना वैवकुशिवाय ओळखलाच तरी कुणी ???
स्वतःला स्थितप्रज्ञता हा शब्द
स्वतःला स्थितप्रज्ञता हा शब्द गझलेत कसा काय वापरता आला नाही आजवर ह्याचा किती त्रागा करून घेणार आहात बरे ?>>>
काय तो बालिश आनंद, म्हणे हा शब्द वापरला.... तुम्हाला सांगायला आला होता का तो शब्द मला गझलेत घ्या नाहीतर वाघांसारखी माझीही जमात नष्ट होऊन जाईल म्हणून
>>>स्वतःला स्थितप्रज्ञता हा
>>>स्वतःला स्थितप्रज्ञता हा शब्द गझलेत कसा काय वापरता आला नाही आजवर ह्याचा किती त्रागा करून घेणार आहात बरे<<<
वैवकु
वाघांसारखी माझीही जमात नष्ट
वाघांसारखी माझीही जमात नष्ट होऊन जाईल म्हणून <<
अछा तुमची खरी काळजी ही आहे होय?? अरेच्चा ..अहो मग अमिताबच्चनचे ऐका की कधीतरी गुजरातला गीर च्या अभयारण्यात जाऊन या तिथे आहेत म्हणे शेर नरेच (शेर म्हणजे सिंव्ह!! सिंव्ह !!बर्का )
वाघांसारखी माझीही जमात नष्ट
वाघांसारखी माझीही जमात नष्ट होऊन जाईल म्हणून <<
अछा तुमची खरी काळजी ही आहे होय?? अरेच्चा ..अहो मग अमिताबच्च्जनचे ऐका की कधीतरी गुजरातला गीर च्या अभयारण्यात जाऊन या तिथे आहेत म्हणे शेर बरेच (शेर म्हणजे सिंव्ह!! सिंव्ह !!बर्का )
आता रिटायरही झाले आहातच वेळ सत्कारणी लावा !!
एनीवे, बेफिकीर आणि त्यांची
एनीवे,
बेफिकीर आणि त्यांची शिष्यांची पिलावळ ह्यांच्या 'गुलमोहर-गझल' ह्या विभागातल्या सद्दीला जरासे डिवचले की केवढा गहजब हे लोक करतात हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेच.
मला वैयक्तिकरीत्या ह्या फालतूगिरीपेक्षा चांगले लेखन वाचण्यात रस आहे.
मला देवपूरकर समजता ह्यातच तुमचा उथळपणा दिसून आला आहे. मी स्वतः लिहित नाही. गझल तर दूरची बात पण म्हणून मला समजत नाही असे मानने मूर्खपणाचे लक्षण आहे.
>>>बेफिकीर आणि त्यांची
>>>बेफिकीर आणि त्यांची शिष्यांची पिलावळ ह्यांच्या 'गुलमोहर-गझल' ह्या विभागातल्या सद्दीला जरासे डिवचले की केवढा गहजब हे लोक करतात हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहेच.
मला वैयक्तिकरीत्या ह्या फालतूगिरीपेक्षा चांगले लेखन वाचण्यात रस आहे.
मला देवपूरकर समजता ह्यातच तुमचा उथळपणा दिसून आला आहे. मी स्वतः लिहित नाही. गझल तर दूरची बात पण म्हणून मला समजत नाही असे मानने मूर्खपणाचे लक्षण आहे.<<<
उर्वरीत नेटीय आयुष्यात लॉजिकली बोलत जा. वैवकु व माझ्यात गुरूशिष्याचे नाते आहे हा जावईशोध लावताना तुम्हाला शरम वाटलेली नाही. आमच्यात गझलमैत्रीशिवाय काहीही नाही व आमचे एकमेकांवरही प्रेम नाही, फक्त गझलेबाबत आहे. आम्ही इतरांच्या गझलेतील काही खटकले तर अतिशय नम्रपणे मते मांडतो. चु भु द्या घ्या, असे सुचले वगैरे मुद्दाम लिहितो. तुमच्यासारखे पांडित्यप्रदर्शन करत अल्वीबिल्वी नांवे फेकत फिरत नाही. आम्हाला डिवचले की आम्ही गहजब करतो हे इतरवेळी केव्हा झाले हे सिद्ध करून दाखवा, तुमच्या मोफत पांडित्य प्रदर्शनाला भीक घातली नाही म्हणून तुमचा दुराभिमान डिवचला गेला आहे. प्रगल्भता दुसर्याला शिकवण्यापूर्वी स्वतःच्या प्रतिसादात कशी येईल ते बघा. काव्यसौंदर्याच्या अनुषंगाने सुधारणा म्हणजे काय हे सोदाहरण सांगता येत नसेल तर जीभ उचलायची कशाला? चार जड शब्द फेकले की आपणही तथाकथित मान्यवरांच्या यादीत गणले जातो असल्या तुटपुंज्या समाधानावर जगणार्यांपैकी तुमचे आय डी! तुम्हाला देवपूरकर समजणे हा देवपूरकरांचा अपमान आहे. त्या माणसाने निदान कश्याही का असेनात गझला लिहिल्या आहेत. तुमच्यात 'आत्ममग्न' ह्या आय डीने चार ओळी प्रकाशित करण्याची हिम्मत नाही आणि ओरिजिनल आय डी ने आत्ममग्नांसारखे प्रतिसाद देण्याची हिम्मत नाही हे उघड दिसत आहे.
माझ्याकडून तुमचा अनुल्लेख होणार नाही. जेथे जेथे मला नडायला जाल तेथे तेथे मी माझी भूमिका रोखठोक मांडणारच. कारण फक्त एकच, गझलेवरील प्रेम! ते नसते तर तुमच्या प्रतिसादांकडे ढुंकूनही पाहिले नसते.
अजूनही योग्य त्या धाग्यावर 'काव्यसौंदर्याच्या अनुषंगाने सुधारणा' ह्याचे सोदाहरण स्पष्टीकरण (वकूब असल्यास व शक्य असल्यास) द्या, हेल्दी चर्चेला सगळेजण तयार आहेत इथे.
>>>मला वैयक्तिकरीत्या ह्या
>>>मला वैयक्तिकरीत्या ह्या फालतूगिरीपेक्षा चांगले लेखन वाचण्यात रस आहे.<<<
माझेही तेच म्हणणे असते, पण मधेच कोणी स्वयंघोषित जज्ज येऊन काव्यसौंदर्याच्या अनुषंगाने सुधारणा वगैरे शब्दबंबाळता दाखवून आशा पल्लवीत करतात की आता काहीतरी चांगले लेखन वाचायला मिळेल. नंतर फालतूगिरी करतील हे आधी समजले असते तर तोही मुद्दा ताणला नसता.
बाय द वे, तुम्ही कोण आहात हे
बाय द वे, तुम्ही कोण आहात हे मी तुमचा पहिला प्रतिसाद वाचला तेव्हाच ओळखलेले आहे. वैवकुंचा भ्रम राहू दिला कारण आपल्या मैत्रीची कधी ही अवस्था होईल हे त्यांना सोसूच शकले नसते. तुम्हीच काल त्यांना म्हणाल्याप्रमाणे ते एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत, म्हणून तुमचा बुरखा तसाच राहू दिला.
बाकी, उर्दूत एक शेर आहे ज्याचा अर्थ असा आहे की दुष्मनी करतानासुद्धा अशी कर की पुन्हा कधी दोस्ती झाली तर समोरासमोर आल्यावर शरम वाटू नये. (शेराची शब्दरचना ह्याक्षणी नेमकी आठवत नाही, कारण आम्ही पंडित नाही).
ह्या शेराबरहुकूम वागण्याची माझ्यावर कधीच वेळ आली नाही कारण मी जवळच्या मित्रांशी कधी दुष्मनी केलीच नाही. पण तुम्हाला ती करावीशी वाटली ह्यात माझ्यातील मैत्री ठेवण्याच्या क्षमतेचे अपयश आहे, तुमचा दोष नाही.
तुमचे खरे नांव येथे लिहून मी माझ्या मनातील आशा संपवू इच्छीत नाही की कदाचित तुम्हाला माझ्याबरोबरचे नाते इतके तोडायचे नसेलही!
शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
हा तो शेर बेफीजी
हा तो शेर बेफीजी .....
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जायें तो शर्मिंदा न हों।
~बशीर बद्र
.... दर्पोक्त्या केवळ!
दोस्ती, दुश्मनी ... गंमतच
दोस्ती, दुश्मनी ... गंमतच सगळी
हिंदी सिनेमा आहे की काय हा?
असो, तुमच्याच लेखनावर प्रेम पाजळायला माझ्याकडे मोकळा वेळ नाही. इतरही काही लिहिणारे आहेत मायबोलीवर!
सुधारणेचा प्रतिसाद ज्याच्या
सुधारणेचा प्रतिसाद ज्याच्या धाग्यावर लिहिलेला आहे त्याने त्याबाबत अवाक्षरही उच्चारलेले नाहीये त्यामुळे तुमच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा संबंध येतोच कुठे? तुम्ही कोण आहात त्या धागाकर्त्याचे पालक की मायबोलीचे मालक?
तेव्हा ही हुशारी जमलीच तर स्वतःच्या धाग्यांवर करत जा.
आणि जमेल तिथे आणि जमेल तेव्हा या नडायला.... मीही बघतोच!
Pages