शेन्गदाण्याच्या रंगीत गोळ्या
मला चॉकलेट्ची फार गोडी .. ओढ नाही. एकतर दात किडतात ह्याची सतत चिंता असते. आण दुसरे असे की, आजूबाजूला जे सतत दिसत राहते. ... आढळत राहते त्याची फार मौज उरत नाही. पण आज मेरी आमच्या ऑफीसमधे आली आणि तिने सगळ्यांना चित्रात दाखवले ते पाकिट दिले. त्यातील रंगीत गोल गोल गोळ्या बघून मला अकोल्याचे राधे नगर आठवले. तिथे एका मारवाड्याचे दुकान होते. आणि त्या दुकानात अगदी काठावरच रेलींग करुन काचेच्या बरण्यांमधे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या असतात. त्यातली एक गोळी शेंगदाण्याची असे. दिसायला ती डिट्टो वर जे चित्र डाकले आहे ना तशीच दिसायची. एक टप्पोरा शेंगदाणा त्याच्या आजूबाजूला साखरपीठीचा लेप लावलेला. मला ती गोळी फोडून तो शेगदाणा कुडकन दाताखाली घेऊन खायची फार मौज वाटायची. ते वय अगदी १० एक वर्षाचे असेल. तब्बल ४० वर्षांनी आज तशीच गोळी खायला मिळाली आणि ४ दशकांपुर्वीचा काळ झरझर पुढे सरकला.
केवढे काय काय साठलेले असते ना आपल्या मेंदूत. ऐरवी स्मरता स्मरत नाहीत काही गोष्टी आणि ऐरवी अवचित पुढ्यात येतात आपल्या रुपारंगात.
बी
ते वय अगदी १० एक वर्षाचे
ते वय अगदी १० एक वर्षाचे असेल. तब्बल ४० वर्षांनी आज तशीच गोळी खायला मिळाली आणि ४ दशकांपुर्वीचा काळ झरझर पुढे सरकला.॑ >>>>>>>>>>> आँ तुम्ही पन्नाशीचे आहात
.
तुमच्या प्रश्नांच्या कूवतीवरुन तुम्ही एकदम शाळा कॉलेज्यात जाणारे विद्यार्थी असाल असा समज होता सगळ्यांचा .
आता ग्रो अप तरी कसे म्हणावे तुम्हाला?
ह्या पिनट बटर एमॅंड एम
ह्या पिनट बटर एमॅंड एम सारख्या दिसतायत.
ह्या पिनट एमॅंड एम सारख्या
ह्या पिनट एमॅंड एम सारख्या वाटतायत.
मस्त दिसतायत शेंगदाण्याच्या
मस्त दिसतायत शेंगदाण्याच्या रंगीत गोळ्या! मी भारतात कधी खाल्ल्या नाहीत. इथे विमानात honey roasted peanuts देतात तेही मस्त लागतात.
ते वय अगदी १० एक वर्षाचे
ते वय अगदी १० एक वर्षाचे असेल. तब्बल ४० वर्षांनी आज तशीच गोळी खायला मिळाली आणि ४ दशकांपुर्वीचा काळ झरझर पुढे सरकला.॑ >>>>>>>>>>> आँ तुम्ही पन्नाशीचे आहात
+१
तुमच्या प्रश्नांच्या कूवतीवरुन तुम्ही एकदम शाळा कॉलेज्यात जाणारे विद्यार्थी असाल असा समज होता सगळ्यांचा .
>> इथे फक्त तुमच्या प्रोफाईलमधल्या फोटोवरुन असं म्हणेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंगीत जिरागोळ्या पण मस्त!
रंगीत जिरागोळ्या पण मस्त! आपल्या फेव्हरेट! अर्थात एकेकाळी ..
वाण्याच्या दुकानातील बरणीतल्या मोठाल्या रंगीत जेम्स आणि चॉकलेटच्या गोळ्या मात्र खूप आस लावायच्या हे खरे.
मला त्या दुधाच्या पांढर्या
मला त्या दुधाच्या पांढर्या गोळ्या आठवतात. मस्त....
बी भौ.... काय सांगुन
बी भौ....
काय सांगुन राह्य्ले....तुमी ५० चे आहात !!!!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अरे 'तुम्ही ५०चे आहात ' हा
अरे 'तुम्ही ५०चे आहात ' हा प्रश्न गौप्यस्फोट केल्यासारखा विचारणार्यांनो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ये राज को खुले हुवे बोहोत दिन हो गये