Submitted by मिल्या on 25 September, 2014 - 04:09
नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना
नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना
जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना
तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना
किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना
मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना
बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिया होऊन जगण्याचा वसा मी
बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना<<< सुंदर
जरासे मौन धरले तर तमाशा केवढा
जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना
तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना>>>> जबरी! हृदयास भिडते.
पहिला आणि शेवटचा खूप आवडले.
पहिला आणि शेवटचा खूप आवडले. बाकीचे थोडेसे कमी आवडले
सगळे शेर आवडले सगळे खयाल मस्त
सगळे शेर आवडले सगळे खयाल मस्त आहेत
संपूर्ण गझल आवडली
नदीला सागराची ओढ असली तर असू
नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना >>>>>वा !
नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना >>>>> वा वा !
जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना>>> क्या बात !
किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना >>>>> आह ! मस्त मस्त !!
बिया होऊन जगण्याचा वसा मी घेतला आहे
भले रुजणार कोठे ज्ञात नाही तर... नसू द्या ना>>>>> सुंदर !
असू द्या ना ...नसू द्या
असू द्या ना ...नसू द्या ना....छान का...र...
छान गझल
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रांनो
आवडली गझल.
आवडली गझल.
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना<<व्वाह !
जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना
मस्त .
गझल आवडली .
परत एकद धन्यवाद मित्रांनो
परत एकद धन्यवाद मित्रांनो
शेवटचे चार शेर आवडले
शेवटचे चार शेर आवडले
रीया आभार बेफी, सुप्रियाताई :
रीया आभार
बेफी, सुप्रियाताई : तुमचे विशेष आभार.. मी जिथे जिथे हि गझल प्रकशित केली आहे तिथे तिथे अगदी न चुकता तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल.. तुमच्या ह्या उत्सहाचे खरेच कौतुक वाटले.
मिलिंद, हे श्रेय तुमच्या
मिलिंद,
हे श्रेय तुमच्या गझलेचेच आहे. मनापासून दाद द्यावीशी वाटली की माणूस ती देतोच.
गझल आवडली !
गझल आवडली !
मस्त गझल, धन्यवाद
मस्त गझल, धन्यवाद