दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन

Submitted by दिनेश. on 12 September, 2014 - 05:13

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

अबु धाबीचे शेख झय्यद यांचे राहते घर सध्या संग्रहालय म्हणून जतन केलेले आहे. १९६६ पर्यंत त्यांचे वास्तव्य
या घरात होते. त्यांची राहणी साधी होती आणि हे घरही तसेच राखलेले आहे. त्या काळात अर्थातच एसी नव्हते.
पण या घरांची बांधणी अशी असे ( रुंद भिंती, प्रशस्त व्हरांडे ) कि त्यामूळे घरात उन्हाची फारशी झळ लागत नसे.

इथे नाममात्र शुल्क आहे ( ३ दिर्हॅम ) आत काही इतरत्र उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत पण बहुतांशी त्या
काळात वापरात असलेल्या वस्तू आहेत. सुरक्षेचे फार अवडंबर नाही.

१) हे बाहेरचे बुरुज मात्र मूळ घराचा भाग नव्हते.

२) इथून घराचा भाग सुरु होतो.

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०) परदेशी पाहुंण्यांच्या स्वागताची खोली

११) हा फोटो स्पष्ट नाही... हे खजूराचे वेगवेगळे प्रकार आहेत.

१२) तिथल्या हौशी कर्मचार्‍याने हे केलेले दिसतेय. अरेबिक आदरातिथ्यात मानाचे स्थान असलेल्या गहवा / काहवाचे घट्क वापरून केलेय हे. अगदी केशरही वापरलेय.

१३) घुपाटणे

१४) नाणी आणि त्यांच्या मोठ्या प्रतिकृती

१५) खजूराची पाने हाताळायला फार कठीण असतात, पण तिथे त्या पानापासून अश्या टोपल्या विणतात.

१६) उत्खननात सापडलेले मडके ( अशा अनेक वस्तू दुसर्‍या म्यूझियममधे आहेत, तिथेही जायचे आहे आपल्याला. )

१७) शेखसाहेब कनवाळू होते, त्यांना लहान मुलांची आवड होती. शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले.

१८) अमिराती कॉफीची कृती. कुठल्याही घरात गेल्यास या कॉफिनेच स्वागत होते. सोबत खजूर वा मिठाई असतेच. दोन्हीपैकी एक नुसते खाणे शक्यच नसते ( कॉफी कडू तर मिठाई अतिगोड ) तसेच ही कॉफी या नाजूक कपातून प्यावीच लागते. ( किमान दोन कप तरी ) तिसर्‍या कपापासून, तो कप किंचीत हलवून
नकार देता येतो.

१९)

२०) तिथल्या राज्यकर्त्यांची कारकिर्द.. ( बिन म्हणजे चा मुलगा आणि बिंत म्हणजे ची मुलगी )

२१) फक्त या पाण्यात शिरू नये अशी विनंती केली आहे, बाकी कुठेही जायला मनाई नाही.

२२)

२३)

२४) अरेबिक मधे संदूक असाच शब्द आहे.

२५)

२६)

२७) अश्या तव्यावर हातानेच पिठ पसरून एक पातळ डोसा टाईप प्रकार केला जातो.

२८) कॉफी व मसाले भाजण्यासाठी

२९) या साधनाने खजूराच्या झाडावर चढता येते. नारळाच्या झाडापेक्षा खजूराच्या झाडावर चढणे सोपे असते.

३०) पाहुण्यांना भेटायची जागा ( मजलीस )

३१) एक शाही पाहुणे पण आले होते नेमके त्याचवेळी Happy

३२) मोगरा फुलला.. अरेबिक लोकांना सुगंधाचे फार वेड असते. तिथल्या कडक उन्हाळ्यातही मोगरा, बकुळी
अगदी गुलाबही फुलवले जातात.

३३)

३४)

३५)

कितीही मोठ्या घरात राहो, अरबी माणूस खुलतो आणि रमतो तो अश्या तंबूमधेच.

३६)

३७) मस्कती डाळिंब फार नावाजले जाते.

३८)

३९)

४०)

४१) अल ऐन भागात भरपूर ओअ‍ॅसिस आहेत. आपला जसा समज असतो त्याप्रमाणे ओअ‍ॅसिस म्हणजे जलाशयच असे नाही. खजूराची लागवड हा मुख्य निकष. पाणी जमिनीखालचेही वापरलेले असू शकते.

४२) आतमधे असे दृष्य असते

४३) हवा तेवढा खजूर खाता येतो इथे..

४४)

पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की कुठल्या देशाचे म्हणायचे ते शाही पाहुणॅ? Happy

बाकी फोटो आणि माहिती मस्तच. एवढे मोठे घर बघून 'शेख झय्यद यांची राहणी साधी होती' हे विधान पटत नव्हते पण ते घर आतून बघितल्यावर पटले.

सर्व फोटो छान आहेत.
इथे महाराष्ट्रातही ह्या(वर फोटोतील) खजुराच्या झाडा सारखी अनेक झाडे पाहीलीत, पण त्यावर आलेले खजुर कधी पाहीले नाहीत.

माधव / दक्षे, जॉर्डनचे होते बहुतेक पाहुणे.. ( जरा शिष्ठच होते, पण फोटो काढू दिला ) तिथे त्याकाळात वापरात असलेल्या अनेक वस्तू आहेत, अगदी कंगव्यापासून. सर्व वस्तू हाताळता येतात त्यामूळे अश्या राजगृहात जे दडपण येते ते अजिबात नव्हते. अगदी एका घरात वावरतो आहोत असेच वाटत राहते.

विजय, आपल्याकडे खजूर क्वचितच लागतो. आणि एवढ्या प्रमाणातही लागत नाही. या बागांमधे खजूराची फार निगराणी ठेवतात. खजूरांच्या फुलांचे परागीभवन हाताने करावे लागते.

पण तरीही तिथे हवा तेवढा खजूर खायची मुभा आहे. पण आपणच ५/६ पेक्षा जास्त खाऊ शकत नाही. आम्ही भरपूर
गोळा करुनही आणला होता. आपण खजूराच्या बाजारात पण जाणार आहोत.

दुबईतील आणि अबु धाबीतील राजघराण्यातील लोकांच्या सध्याच्या महालापुढे हे घर अगदीच साधे आहे.
पण आजही एखाद्या अरबी घरात जायचा योग आला तर असेच स्वागत होते हे मात्र नक्की.. मी अनेकदा याचा
अनुभव घेतला आहे.

मस्त फोटो !!
प्रचि ३० मजलीस,पेक्षा प्रचि ३१ हा शाही पाहुण्यामुळे वेगळा दिसत आहे. Happy

फक्त या पाण्यात शिरू नये अशी विनंती केली आहे, बाकी कुठेही जायला मनाई नाही.

.>>>

आपल्याकडेही गणपते पुळे, भुशी डॅम येथे पाण्यात जाऊ नये असे आदेश दिलेले असतात पण हम चोडेगा नई जी....