दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460
दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475
दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501
दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520
अबु धाबीचे शेख झय्यद यांचे राहते घर सध्या संग्रहालय म्हणून जतन केलेले आहे. १९६६ पर्यंत त्यांचे वास्तव्य
या घरात होते. त्यांची राहणी साधी होती आणि हे घरही तसेच राखलेले आहे. त्या काळात अर्थातच एसी नव्हते.
पण या घरांची बांधणी अशी असे ( रुंद भिंती, प्रशस्त व्हरांडे ) कि त्यामूळे घरात उन्हाची फारशी झळ लागत नसे.
इथे नाममात्र शुल्क आहे ( ३ दिर्हॅम ) आत काही इतरत्र उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत पण बहुतांशी त्या
काळात वापरात असलेल्या वस्तू आहेत. सुरक्षेचे फार अवडंबर नाही.
१) हे बाहेरचे बुरुज मात्र मूळ घराचा भाग नव्हते.
२) इथून घराचा भाग सुरु होतो.
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०) परदेशी पाहुंण्यांच्या स्वागताची खोली
११) हा फोटो स्पष्ट नाही... हे खजूराचे वेगवेगळे प्रकार आहेत.
१२) तिथल्या हौशी कर्मचार्याने हे केलेले दिसतेय. अरेबिक आदरातिथ्यात मानाचे स्थान असलेल्या गहवा / काहवाचे घट्क वापरून केलेय हे. अगदी केशरही वापरलेय.
१३) घुपाटणे
१४) नाणी आणि त्यांच्या मोठ्या प्रतिकृती
१५) खजूराची पाने हाताळायला फार कठीण असतात, पण तिथे त्या पानापासून अश्या टोपल्या विणतात.
१६) उत्खननात सापडलेले मडके ( अशा अनेक वस्तू दुसर्या म्यूझियममधे आहेत, तिथेही जायचे आहे आपल्याला. )
१७) शेखसाहेब कनवाळू होते, त्यांना लहान मुलांची आवड होती. शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले.
१८) अमिराती कॉफीची कृती. कुठल्याही घरात गेल्यास या कॉफिनेच स्वागत होते. सोबत खजूर वा मिठाई असतेच. दोन्हीपैकी एक नुसते खाणे शक्यच नसते ( कॉफी कडू तर मिठाई अतिगोड ) तसेच ही कॉफी या नाजूक कपातून प्यावीच लागते. ( किमान दोन कप तरी ) तिसर्या कपापासून, तो कप किंचीत हलवून
नकार देता येतो.
१९)
२०) तिथल्या राज्यकर्त्यांची कारकिर्द.. ( बिन म्हणजे चा मुलगा आणि बिंत म्हणजे ची मुलगी )
२१) फक्त या पाण्यात शिरू नये अशी विनंती केली आहे, बाकी कुठेही जायला मनाई नाही.
२२)
२३)
२४) अरेबिक मधे संदूक असाच शब्द आहे.
२५)
२६)
२७) अश्या तव्यावर हातानेच पिठ पसरून एक पातळ डोसा टाईप प्रकार केला जातो.
२८) कॉफी व मसाले भाजण्यासाठी
२९) या साधनाने खजूराच्या झाडावर चढता येते. नारळाच्या झाडापेक्षा खजूराच्या झाडावर चढणे सोपे असते.
३०) पाहुण्यांना भेटायची जागा ( मजलीस )
३१) एक शाही पाहुणे पण आले होते नेमके त्याचवेळी
३२) मोगरा फुलला.. अरेबिक लोकांना सुगंधाचे फार वेड असते. तिथल्या कडक उन्हाळ्यातही मोगरा, बकुळी
अगदी गुलाबही फुलवले जातात.
३३)
३४)
३५)
कितीही मोठ्या घरात राहो, अरबी माणूस खुलतो आणि रमतो तो अश्या तंबूमधेच.
३६)
३७) मस्कती डाळिंब फार नावाजले जाते.
३८)
३९)
४०)
४१) अल ऐन भागात भरपूर ओअॅसिस आहेत. आपला जसा समज असतो त्याप्रमाणे ओअॅसिस म्हणजे जलाशयच असे नाही. खजूराची लागवड हा मुख्य निकष. पाणी जमिनीखालचेही वापरलेले असू शकते.
४२) आतमधे असे दृष्य असते
४३) हवा तेवढा खजूर खाता येतो इथे..
४४)
पुढे चालू...
नक्की कुठल्या देशाचे म्हणायचे
नक्की कुठल्या देशाचे म्हणायचे ते शाही पाहुणॅ?
बाकी फोटो आणि माहिती मस्तच. एवढे मोठे घर बघून 'शेख झय्यद यांची राहणी साधी होती' हे विधान पटत नव्हते पण ते घर आतून बघितल्यावर पटले.
दिनेश अप्रतिम फोटो. पॅलेस
दिनेश अप्रतिम फोटो.
पॅलेस एकदम स्वच्छ, सुबक आहे.
सर्व फोटो छान आहेत. इथे
सर्व फोटो छान आहेत.
इथे महाराष्ट्रातही ह्या(वर फोटोतील) खजुराच्या झाडा सारखी अनेक झाडे पाहीलीत, पण त्यावर आलेले खजुर कधी पाहीले नाहीत.
मस्त फोटोज, दिनेशदा
मस्त फोटोज, दिनेशदा
माधव / दक्षे, जॉर्डनचे होते
माधव / दक्षे, जॉर्डनचे होते बहुतेक पाहुणे.. ( जरा शिष्ठच होते, पण फोटो काढू दिला ) तिथे त्याकाळात वापरात असलेल्या अनेक वस्तू आहेत, अगदी कंगव्यापासून. सर्व वस्तू हाताळता येतात त्यामूळे अश्या राजगृहात जे दडपण येते ते अजिबात नव्हते. अगदी एका घरात वावरतो आहोत असेच वाटत राहते.
विजय, आपल्याकडे खजूर क्वचितच लागतो. आणि एवढ्या प्रमाणातही लागत नाही. या बागांमधे खजूराची फार निगराणी ठेवतात. खजूरांच्या फुलांचे परागीभवन हाताने करावे लागते.
पण तरीही तिथे हवा तेवढा खजूर खायची मुभा आहे. पण आपणच ५/६ पेक्षा जास्त खाऊ शकत नाही. आम्ही भरपूर
गोळा करुनही आणला होता. आपण खजूराच्या बाजारात पण जाणार आहोत.
मस्त फोटो !!
मस्त फोटो !!
एक्दम स्वच्छ सुंदर आणि शांत
एक्दम स्वच्छ सुंदर आणि शांत वाटतय घर
वॉव.. सुंदर्,सौम्य ,शांत आहे
वॉव.. सुंदर्,सौम्य ,शांत आहे जागा.. बाहेरच्या बुरुजांमुळे आलेला अॅनशंट टच आवडला..
भारिच फोटो दिनेशदा.... आगदि
भारिच फोटो दिनेशदा....
आगदि जावून आल्यासारखे वाटले....
छान वाटले. जावेसे वाटत आहे.
छान वाटले. जावेसे वाटत आहे. त्यात तुमच्या लेखन्शैलीचा ही हात आहे म्हणा.
दुबईतील आणि अबु धाबीतील
दुबईतील आणि अबु धाबीतील राजघराण्यातील लोकांच्या सध्याच्या महालापुढे हे घर अगदीच साधे आहे.
पण आजही एखाद्या अरबी घरात जायचा योग आला तर असेच स्वागत होते हे मात्र नक्की.. मी अनेकदा याचा
अनुभव घेतला आहे.
धन्यवाद माहीती दिल्याबद्दल.
धन्यवाद माहीती दिल्याबद्दल. :स्मित.
वाह, मस्तच फोटो - घर अगदी
वाह, मस्तच फोटो - घर अगदी साधे वाटतंय - पॅलेस वाटतंच नाही ...
मस्त फोटो !! प्रचि ३०
मस्त फोटो !!
प्रचि ३० मजलीस,पेक्षा प्रचि ३१ हा शाही पाहुण्यामुळे वेगळा दिसत आहे.
मज्जाय ब्वा
मज्जाय ब्वा
आभार दोस्तांनो, पुढे अजून
आभार दोस्तांनो, पुढे अजून बरेच बघायचे आहे आपल्याला.
कामिनी
फक्त या पाण्यात शिरू नये अशी
फक्त या पाण्यात शिरू नये अशी विनंती केली आहे, बाकी कुठेही जायला मनाई नाही.
.>>>
आपल्याकडेही गणपते पुळे, भुशी डॅम येथे पाण्यात जाऊ नये असे आदेश दिलेले असतात पण हम चोडेगा नई जी....
खुप सुरेख आणि कीती छान
खुप सुरेख आणि कीती छान राखलाय!
मस्त फोटो आहेत. अबुधाबी
मस्त फोटो आहेत. अबुधाबी दुबईला जाऊन असं काहीतरी बघायचं मनात आहेच
मस्त सहल आणि वर्णन ! दुबईचा
मस्त सहल आणि वर्णन ! दुबईचा विमानतळ पण बघण्यासारखा आहे.
शाही पाहुणे आणि शिष्ठ ? मस्त
शाही पाहुणे आणि शिष्ठ ?
मस्त सफर चाललेय ?