दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452
यावेळेस दुबईच्या सहलीत काही वेगळी ठिकाणे बघायची होती. आम्ही गेलो होतो त्या दिवसात रमदान ( हा खरा
उच्चार ) चालू होता. त्यानुसार काही बंधने होतीच. म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त सार्वजनिक ठिकाणी पाणी पिणे,
खाणे, धुम्रपान करणे वगैरे मना असते.
पण रमदानची बंधने प्रवाश्यांना लागू पडत नाहीत त्यामूळे विमानात व विमानतळावर काहिही बंधने नसतात.
तसेच अनेक सुपरमार्केट्स उघडी असतात. तिथे खाद्यपदार्थ विकत घेण्यावर बंधन नसते. काही हॉटेल्स देखील
उघडी असतात. तूम्ही रहात असलेल्या हॉटेलमधेही रुम सर्व्हीस देतात आणि एखादे रेस्टॉरंट उघडे असतेच.
दुबईला बहुतेक रेतीचे वाळवंट आहे. जसजसे आपण ओमान कडे जातो तसे डोंगराळ प्रदेश सुरु होतो. ओमानची
राजधानी असलेल्या मस्कतमधे तर डोंगरच डोंगर आहेत.
वाळवंटातले हे डोंगर उन्हाळ्यात दिवसा तापतात आणि रात्री उष्णता बाहेर टाकतात. त्यामूळे त्यांच्या सानिध्यात
उन्हाळ्यात २४ तास गरमच वातावरण असते. ( रेती त्यामानाने थंड असते रात्री )
पण या डोंगरांचे एक अनोखे सौंदर्य असते. तसेच त्यांच्या पोटात पाण्याचा साठाही असू शकतो. अश्या साठ्यांपासून जे झरे निघतात त्यांना फलाज म्हणतात. १२ महिने या पाटातून गोडे पाणी वहात असते.
ओमानमधली शेती ही याच पाण्यावर अवलंबून असते. पिण्यासाठी, जनावरांसाठी पण हेच पाणी वापरतात.
हे पाणी अगदी जपून वापरले जाते तसेच ते स्वच्छही राखले जाते. अगदी ओंजळीने हे पाणी पिता येते आणि
तसे ते प्यायचेही असते.
डोंगराच्या आधाराने काही नद्याही असतात. त्या बारमाही वहात नाहीत पण त्याच्या काही भागात नितळ
पाणी असते.
दुबईजवळच्या अश्या एका वादीकडे ( नदी ) म्हणजेच वादी हत्ता कडे आम्ही निघालो. वादीमधे पाणी नव्हते,
पण एक फलाज सापडला. त्यात पाणीही होते. पण नेमका त्या ठिकाणी माझ्या कॅमेरातली बॅटरी एक्झॉस्ट
झाली.. ( विवेकच्या फोनने काढलेत फोटो पण तो सध्या अभ्यासात बिझी आहे, त्याने पाठवले तर अवश्य
देईन ) तिथेच एक धरणही आहे आणि मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांटही आहे.
तिथे हेरीटेज व्हीलेज म्हणून एक जागा आहे. तिथे पुर्वीच्या काळातील एक गाव वसवले आहे. पण पुढे
अबु धाबीच्या राजघराण्याचे पुर्वीचे राहते घरच बघितले. तेही तसेच राखलेले आहे. त्याचे फोटो टाकेनच.
आमचा आजचा चालकही थोडा घुमा होता. त्याला रोजा होता हे खरे ( विशिष्ठ देशातला होता हेही खरे ) त्यामूळे
इकडे तिकडे जायला जरा नाखुष होता.. दुसर्या दिवशी आलेला बदर मात्र बोलघेवडा होता.. त्याच्याबद्दल पुढच्या
भागात लिहीन.
तर हे वादी हत्ता च्या वाटेवरचे काही फोटो.
( या वादी हत्ताला जाण्यासाठी आपण काही काळ ओमान मधून जातो. व्हीसा लागत नाही पण पासपोर्ट जवळ
ठेवावा लागतो. )
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३) वाळवंटात असे खजूराचे झाडही असते बरं का ! आणि तिथे हवा तेवढा खजूर खाण्याचा सरकारचाच आग्रह असतो.
तर या वाळवंटाला घाबरू नका... पुढच्या भागापासून आपण हिरवळ बघू..
मस्त फोटो
मस्त फोटो
सुंदर, खजुराचे झाड आहाहा!
सुंदर, खजुराचे झाड आहाहा!
छान! उन्हाच्या झळा फोटोतुन ही
छान!
उन्हाच्या झळा फोटोतुन ही डोळ्याला त्रास देतायत.
ती फोटोत दिसणारी झाडे हिरवीगार कोणत्या महीन्यात होतात.
विजय... पाऊस त्या भागात
विजय... पाऊस त्या भागात क्वचितच पडतो.. ( आम्ही गेलो होतो त्यावेळी दिवसाचे ४५ अंश से: तपमान होते तर रात्रीचे ३५ अंश से. ) हिरवेगार असे कधीच नसते. जिथे हिरवेगार असते ( ओअॅसिस ) तिथेच मानव वस्ती करून राहिला.. मुद्दाम हे फोटो आधी दिलेय. बहुतांशी तो देश असाच आहे. पण तरी तिथे जे नंदनवन फुलवले आहे ते आपण पुढच्या भागापासून बघणार आहोत.
आहाहा!!!!!!!!!!!!
आहाहा!!!!!!!!!!!!
दिनेशदा, हा भाग थोडासा उजाड,
दिनेशदा, हा भाग थोडासा उजाड, उदास वाट्ला.
तो देश बहुतांशी तसाच आहे रे..
तो देश बहुतांशी तसाच आहे रे.. फक्त शहरी भागात वस्ती आणि सुखसोयी आहेत.
या वाळवंटातही मी भरपूर भटकलो आहे. रात्रभर उघड्यावर राहिलो आहे.. ते अनुभव खरेच अनोखे होते.
मस्त फोटो नविन माहीती
मस्त फोटो
नविन माहीती मिळाली.
उन्हाच्या झळा फोटोत दिसतात. म्हणजे प्रत्यक्षात खुप गर्मी असणार.
looking very dry and hot!!
looking very dry and hot!!
वा छान. ते डोंगरातले गोड
वा छान. ते डोंगरातले गोड पाण्याचे झरे वाचून मस्त वाटलं.
प्रचि ११,१२ मस्त.
प्रचि ११,१२ मस्त.