मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140
मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152
मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186
मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225
मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261
मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325
मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311
मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater http://www.maayboli.com/node/50322
मॉरिशियस - भाग आठवा - गंगा तलाव http://www.maayboli.com/node/50344
मॉरिशियस - भाग नववा - शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel http://www.maayboli.com/node/50384
या शमारेल धबधब्याच्या जरा पुढे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. ही जागा सेव्हन कलर्ड अर्थ म्हणून ओळखतात. सात रंग म्हणजे अगदी इंद्रधनुष्याचे रंग नाहीत पण तरीही वेगवेगळे रंग आहेतच.
लोखंड आणि अल्यूमिनियमच्या संयुगांमुळे इथल्या मातीत हे रंग दिसतात.
ही जागा तशी उघड्यावरच आहे. या जागेच्या भोवती कठडा आहे. आम्ही गेलो होतो त्यावेळी संध्याकाळ होत
होती आणि त्या संधिप्रकाशात ते रंग वेगळेच दिसत होते.
निसर्गाची करणी तरी कशी.. ही माती अत्यंत निकस आहे. इथे गवताचे पाते देखील उगवू शकत नाही. पण तसे असते तर हे रंग आपल्याला दिसूही शकले नसते.
बघूया मला कितपत ते कॅमेरात पकडता आलेत ते !
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२२)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०) निळी मुंगी ?????
पुढच्या भागात समारोप.
सगळेच फोटो अदभुत... निळी
सगळेच फोटो अदभुत... निळी मुंगी कसली गोड आहे!
सायली, मुंगी नाही ती. त्या
सायली, मुंगी नाही ती. त्या झाडाचे फळ आणि कळी आहे... पण ती रचनाच अशी झालीय कि मुंगीच वाटतेय.
तिथले रंग बघून मी पण गंडलो
तिथले रंग बघून मी पण गंडलो खरा !
ते फोटो पाहुन मला अफगाणिस्तान
ते फोटो पाहुन मला अफगाणिस्तान मधल्या बुद्ध मुर्तीची आठवण येतेय.
अतिशय सुरेख.
अर्रेच्च्या ! फळ आणि कळी खरच
अर्रेच्च्या ! फळ आणि कळी खरच हुबेहुब मुंगी सारखीच दिसतेय!
भारीए ही सप्तरंगी माती ...
भारीए ही सप्तरंगी माती ...
निळी मुंगी - हा हा हा ...
तिसर्या फोटोमधे थोडासा गणपती
तिसर्या फोटोमधे थोडासा गणपती चा भास होतो आहे... लेण्याद्रि आठवला....
सर्वच फोटो उत्तम - नेहमीप्रमाणेच.....
मस्त आलेत फोटो. आमचं मिसलं
मस्त आलेत फोटो. आमचं मिसलं होतं ते आता बघायला मिळालं.
सुरेख !
सुरेख !
मस्त फोटो. नं २९ जास्त आवडला.
मस्त फोटो. नं २९ जास्त आवडला.
wow!!! सुंदर आहे सप्तरंगी..
wow!!! सुंदर आहे सप्तरंगी.. कित्येक मिलिअन वर्ष लागली असतील हे रूप बदलायला..
निळी मुंगी ही मस्त !!
सप्तरंगी माती, मस्त आलेत
सप्तरंगी माती, मस्त आलेत फोटो.
या मातीचा तेथे काय उपयोग करतात.
निळी मुंगी ही मस्त !!:स्मित:
मस्त...
मस्त...
आभार दोस्तांनो. धनवन्ती ..
आभार दोस्तांनो.
धनवन्ती .. मला पण आता दिसतोय.
मामी.. तूम्ही झू ला गेला होता का ? माझे ते राहिले.
कामिनी.. ती माती निकस आहे. पर्यटकांना चिमूट चिमूट भर टेस्ट ट्यूबमधे घालून विकतात. दुसरा काही उपयोग नाही. ( पण त्या ठिकाणी म्हणजे त्या मातीवर कुणाला पाय ठेवता येत नाही. तशी सूचना कुठेही लिहिलेली दिसली नाही तरी तो कठडा ओलांडून कुणी जात नव्हते. )
मस्त.
मस्त.
मस्त फोटो
मस्त फोटो
मी कधी जाणार काय माहीती हे
मी कधी जाणार काय माहीती
हे बघून अगदि कससच होतय .. speechless...
सुंदर!
सुंदर!
दिनेशदा, आमच्याबरोबर एक
दिनेशदा, आमच्याबरोबर एक बालकलाकार असल्यामुळे आम्ही यशस्वीपणे अॅक्वेरियम, क्रोकोडाईल पार्क आणि glass factory ला पण गेलो होतो.
ग्लास फॅक्टरीचे खूप फोटो
ग्लास फॅक्टरीचे खूप फोटो नाहीयेत. एक दोनच आहेत ते टाकते :
क्रोकोडाईल पार्क. भारी
क्रोकोडाईल पार्क. भारी सुरेख, दाट हिरव्या झाडीनं भरलेलं आणि टुमदार होतं हे. ते फिरताफिरता मस्त नेचर वॉक झाला. :
प्रवेशद्वार :
झोपा काढतायत :
गेटर किंडर गार्डन :
जायंट टॉर्टॉईजः
बालपणीचे जायंट टॉर्टॉईज :
अॅक्वेरियम देखिल अतिशय
अॅक्वेरियम देखिल अतिशय सुरेख :
सांताक्लॉ़ज :
पावडर-कुंकू चाललंय:
घरात जातोय की बाहेर येतोय?:
तू जा तुझ्या वाटेनं, मी जातो माझ्या वाटेनं (घरासकट):
कोरल :
मॉरिशसच्या समुद्रकिनार्यावर कोरल्सचीच बनलेली वाळू आहे. आणि कोरल्सचे अगणित तुकडेही वाळूत असतात. पायाला बोचत राहतात. मऊ, मुलायम वाळू निदान ल मेरिडियनच्या समुद्रकिनार्यावर नव्हती.
हे दगड नाहीयेत. वाळून स्वतःला लपवलेले दगडोबा मासे आहेत :
सी-टर्टल :
ग्लास फॅक्टरी ला जायला हवे
ग्लास फॅक्टरी ला जायला हवे होते मी... तिथे नळीने फुंकून वस्तू करतात ना ? मी तो प्रकार कधीच प्रत्यक्ष बघितला नाही.
या सप्तरंगी मातीजवळही कासवे होती. तेवढ्यावर समाधान मानले. केनयात राहून मगरी वगैरे प्राण्यांचा अतिपरीचय झाला.
चहाचे संग्रहालय पण बघण्यासारखे आहे असे वाचले.