मॉरिशियस - भाग दहावा - सप्तरंगी माती, Seven Colored Earth

Submitted by दिनेश. on 19 August, 2014 - 05:24

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325

मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी http://www.maayboli.com/node/50311

मॉरिशियस - भाग सातवा - निद्रीस्त ज्वालामुखी - Curepipe Volcano Crater http://www.maayboli.com/node/50322

मॉरिशियस - भाग आठवा - गंगा तलाव http://www.maayboli.com/node/50344

मॉरिशियस - भाग नववा - शमारेल धबधबा, Le Cascade de Chamarel http://www.maayboli.com/node/50384

या शमारेल धबधब्याच्या जरा पुढे एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. ही जागा सेव्हन कलर्ड अर्थ म्हणून ओळखतात. सात रंग म्हणजे अगदी इंद्रधनुष्याचे रंग नाहीत पण तरीही वेगवेगळे रंग आहेतच.
लोखंड आणि अल्यूमिनियमच्या संयुगांमुळे इथल्या मातीत हे रंग दिसतात.

ही जागा तशी उघड्यावरच आहे. या जागेच्या भोवती कठडा आहे. आम्ही गेलो होतो त्यावेळी संध्याकाळ होत
होती आणि त्या संधिप्रकाशात ते रंग वेगळेच दिसत होते.

निसर्गाची करणी तरी कशी.. ही माती अत्यंत निकस आहे. इथे गवताचे पाते देखील उगवू शकत नाही. पण तसे असते तर हे रंग आपल्याला दिसूही शकले नसते.

बघूया मला कितपत ते कॅमेरात पकडता आलेत ते !

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०) निळी मुंगी ?????

पुढच्या भागात समारोप.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

wow!!! सुंदर आहे सप्तरंगी.. कित्येक मिलिअन वर्ष लागली असतील हे रूप बदलायला..
निळी मुंगी ही मस्त !!

आभार दोस्तांनो.
धनवन्ती .. मला पण आता दिसतोय.
मामी.. तूम्ही झू ला गेला होता का ? माझे ते राहिले.
कामिनी.. ती माती निकस आहे. पर्यटकांना चिमूट चिमूट भर टेस्ट ट्यूबमधे घालून विकतात. दुसरा काही उपयोग नाही. ( पण त्या ठिकाणी म्हणजे त्या मातीवर कुणाला पाय ठेवता येत नाही. तशी सूचना कुठेही लिहिलेली दिसली नाही तरी तो कठडा ओलांडून कुणी जात नव्हते. )

दिनेशदा, आमच्याबरोबर एक बालकलाकार असल्यामुळे आम्ही यशस्वीपणे अ‍ॅक्वेरियम, क्रोकोडाईल पार्क आणि glass factory ला पण गेलो होतो. Happy

क्रोकोडाईल पार्क. भारी सुरेख, दाट हिरव्या झाडीनं भरलेलं आणि टुमदार होतं हे. ते फिरताफिरता मस्त नेचर वॉक झाला. :

प्रवेशद्वार :

झोपा काढतायत :

गेटर किंडर गार्डन :

जायंट टॉर्टॉईजः

बालपणीचे जायंट टॉर्टॉईज :

अ‍ॅक्वेरियम देखिल अतिशय सुरेख :

सांताक्लॉ़ज :

पावडर-कुंकू चाललंय:

घरात जातोय की बाहेर येतोय?:

तू जा तुझ्या वाटेनं, मी जातो माझ्या वाटेनं (घरासकट):

कोरल :

मॉरिशसच्या समुद्रकिनार्‍यावर कोरल्सचीच बनलेली वाळू आहे. आणि कोरल्सचे अगणित तुकडेही वाळूत असतात. पायाला बोचत राहतात. मऊ, मुलायम वाळू निदान ल मेरिडियनच्या समुद्रकिनार्‍यावर नव्हती.

हे दगड नाहीयेत. वाळून स्वतःला लपवलेले दगडोबा मासे आहेत :

सी-टर्टल :

ग्लास फॅक्टरी ला जायला हवे होते मी... तिथे नळीने फुंकून वस्तू करतात ना ? मी तो प्रकार कधीच प्रत्यक्ष बघितला नाही.
या सप्तरंगी मातीजवळही कासवे होती. तेवढ्यावर समाधान मानले. केनयात राहून मगरी वगैरे प्राण्यांचा अतिपरीचय झाला.

चहाचे संग्रहालय पण बघण्यासारखे आहे असे वाचले.