आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
सीमा, मग आता तुलाही कळतंय ना
सीमा, मग आता तुलाही कळतंय ना की तुझं वजन कमी आहे? मग इथे कोन आणि काय आणि कसे सल्ली देणार तुला?
माझ्या ऊंचिच्या मानाने माझे
माझ्या ऊंचिच्या मानाने माझे वजन ४८ पाहीजे ऊंची १५०+ सेमी आहे >> मग तर तुमच वजन वाढलेला चांगलच आहे ना ?
अहो तुम्हाला माहित नाही तुम्ही किती लकी आहात . ज्याच्याकडे नसत ना त्यालाच किंमत असते
मला पण घ्या या ग्रुपमधे. ३
मला पण घ्या या ग्रुपमधे. ३ महिन्यापूर्वी आणलेल्या ट्रेडमीलचा मुहूर्त अजुन करायचाय. आज किंवा उद्या सुरुवात करु. खाण्यापिण्यावर नियंत्रण आहे, म्हणजे तळणं वगैरे महिन्या दोन महिन्यातुन कधीतरी खाल्ले जाते.
कितिला घेतली ट्रेडमील ?
कितिला घेतली ट्रेडमील ?
व्यायाम करा........ म्हणुन
व्यायाम करा........ म्हणुन सांगावे लागते ..... यातच सगळ आले
अहो तुम्हाला माहित नाही
अहो तुम्हाला माहित नाही तुम्ही किती लकी आहात . ज्याच्याकडे नसत ना त्यालाच किंमत असते
>>>
अहो वजन वाडायचा रेट पण वाड्लाय म्हनुन...
प्रितीभुषण, ४००$ घेतली.
प्रितीभुषण, ४००$ घेतली. सेकंडहॅन्ड आहे पण.
मी पण. जिम १-२ दिवसात सुरू
मी पण. जिम १-२ दिवसात सुरू करणार आहे.
माझे पण नाव लिहा यादी
माझे पण नाव लिहा यादी मधे
१० किलो कमी करायचे आहेत.
६ महिन्या पर्यन्त रोज व्यायाम होता,
६ महिने गाडी पार घसरली आहे.
मी पण! मी योगा सुरू केले आहे.
मी पण! मी योगा सुरू केले आहे. ग्रुप मोटिवेशन फार इफेक्टिव आहे.
मी पण! रोज ४५ साधारण ४ किमी
मी पण! रोज ४५ साधारण ४ किमी चालणं. ४५ मि पोहण. हे निय मीत आहे पण वजन कमी होत नाहीये.. ...
गेले ३-४ महीने रोज ४०- ५०
गेले ३-४ महीने रोज ४०- ५० चालत होते. पावसाचे निमित्त झाले. ६ दिवस झाले काहीच व्यायाम केला नाही. सातत्याची गरज आहे हे समजते. पण............
१२ किलो कमी करायचे आहेत. माझे पण नाव लिहा यादी मधे.
मी पण या ग्रुप मध्ये. मला तर
मी पण या ग्रुप मध्ये.
मला तर किती वजन कमी करायचं हा विचार मी करतच नाही कारण कितीही केल तरी मी आदर्श वजन मी गाठू शकणार नाही .
मी पण आजपासून व्यायाम करणार
खाण्यावर कंट्रोल करणार
आत्ताच डबा खावून झाल्यावर राजगिरा लाडू खाल्ला.
माझ नाव नाही टाकल ग्रुपमधे!
माझ नाव नाही टाकल ग्रुपमधे! मला पण अॅडा की!
मी पण या ग्रुप मधे .. मला १०
मी पण या ग्रुप मधे .. मला १० किलो कमी करायचे आहे.
वजन कमी झाले हे धागा कर्ता
वजन कमी झाले हे धागा कर्ता कसा ओळखणार ?
मी पण...मला कमीत कमी १० किलो
मी पण...मला कमीत कमी १० किलो कमी करायचंय + डिलीवरी नंतर वाढलेला पोटाचा घेर पण.
लोकहो , ग्रुपची सुरूवात तर
लोकहो ,
ग्रुपची सुरूवात तर धडाक्यात झाली आहे , पण हा जोश असाच राहू द्या .
We will take it one day at a time .
सध्यातरी रोज वर लिहिलेल्या २ गोष्टी पाळायला सुरू करू . जर एखाद दिवस चुकला तर प्रामाणिकपणे ( ) इथे येऊन आज या या कारणाने जमले नाही असे लिहू .
हळूहळू आपण पुढच्या स्टेप्स घेत जाऊ .
अहो सीमा मला खरंच वाटलं की
अहो सीमा मला खरंच वाटलं की तुम्ही मस्करीत विचारताय म्हणुन मी असं उत्तर दिलं, आता ४३ हे काय मोठ्या माणसाचं वजन झालं का??
उदयन वजन कमी झाले हे धागा
उदयन
वजन कमी झाले हे धागा कर्ता कसा ओळखणार ? >>
मी किंवा इतर कुणीही ओळखायची गरजच काय आहे ?
हे फक्त सर्वानी एकत्र येऊन मोटीवेशनसाठी करायचे आहे . माझे बाबा सकाळी त्यांच्या मित्रांबरोबर फिरायला जातात , कधी कधी त्याना कंटाळा आलेला असतो , पण इतरांबरोबर जातातच , तसच काहीतरी
केदार मला पण अॅड कर
केदार मला पण अॅड कर गृपात.
मला टोटल साडेबारा किलो वजन कमी करायचं होतं. ३ महिन्यापुर्वी डाएट सुरू केलं. पैकी ४.५ किलो घटलं आहे. टारगेट उरलंय ८ किलो.
टाईम टेबल सिडेंट्री असल्याने मला व्यायामाला अजिबात वेळ मिळत नाही. माझी डाएटिशन वेलनोन आहे तिच्याकडे वजन कमी केल्यावर मेंटेन करण्याच्या टिप्स ही ती देते, मी अनेक लोक पाहिले आहेत ज्यांनी दोन दोन वर्षापुर्वी वजन कमी करूनही मेन्टेन्ड आहेत.
असो, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही असं कुणितरी लिहिलंय. लेट मी टेल यू. वजन कमी करणे ही एक अॅक्टिव्हिटी जर १०० अशी धरली तर ती सक्सेसफुल होण्याचा ८० भाग हा डाएट चा असतो आणि २० टक्के व्यायामाचा.
जीव खाउन व्यायाम केला पण अद्वातद्वा खाल्लं तर वजन कमी होणार नाही उलट रोज फक्त ४० मिनिटं चालण्याचा व्यायाम केला पण खाणं काटेकोर ठेवलं तर वजन नक्की कमी होतेच.
काही करा माझं वजन कमीच होत नाही असं म्हणतात त्यांच्या खाण्यात सतत काही ना काही येत असते म्हणून ते होत असतं. माणूस आहे म्हणजे मोह होणारच, पण तो प्लेटभर मोह चमच्याभरात भागवण्याची अशक्य कला आत्मसात केली की वजन नक्की कमी होते
सगळ्या वजन कमी करो ईच्छिणार्यांना शुभेच्छा (मला पण द्या की )
काही करा माझं वजन कमीच होत
काही करा माझं वजन कमीच होत नाही असं म्हणतात त्यांच्या खाण्यात सतत काही ना काही येत असते म्हणून ते होत असतं. माणूस आहे म्हणजे मोह होणारच, पण तो प्लेटभर मोह चमच्याभरात भागवण्याची अशक्य कला आत्मसात केली की वजन नक्की कमी होते स्मित >> +१०० .
"आजचा एक दिवस चालतय " हा सर्वात घातक डायलॉग आहे .
सगळ्या वजन कमी करो ईच्छिणार्यांना शुभेच्छा स्मित (मला पण द्या की ) >>
दक्षी +१. पटल.न दक्षे!
दक्षी +१.
पटल.न दक्षे!
आता ४३ हे काय मोठ्या माणसाचं
आता ४३ हे काय मोठ्या माणसाचं वजन झालं का??
>>>>
का?किति पाहीजे मोठ्या माणसाचं वजन ?
मला अॅड करा... आणि माझे कान
मला अॅड करा... आणि माझे कान उपटण्याचा सर्व सभासदांना पूर्ण हक्क आहे. अतिशय आळशी आणि खादाड गोडप्रेमी सदस्य
कमीत कमी ५० कीलो तरी हवं ना ,
कमीत कमी ५० कीलो तरी हवं ना , माझ्या बहीणीचं आधी होतं ४३, सारखी आजारी पडायची , एक ईंजेक्शन दिलं की चक्कर आलीच , आत्ता ५२ आहे ; व्यवस्थित आहे. चक्कर नाही की काही नाही.
https://www.google.co.in/sear
https://www.google.co.in/search?q=height+weight+chart&tbm=isch&tbo=u&sou... उंची नुसार किती वजन असावे ह्याचा चार्ट
काही दिवसापूर्वी मुक्तपीठ
काही दिवसापूर्वी मुक्तपीठ मध्ये त्या सायली पानसे शेल्लिकेरी ने डाएटबद्दल एक लेख लिहिला होता :रागः अतिशय संताप आला होता मला तो वाचून..
आपण सगळे दिसताना 'मापात' दिसलो तरिही आपल्यातल्या प्रत्येकाला डाएटची गरज आहे हे लोकांना पटतच नाही. काही मूर्ख विधाने
'तु मापात आहेस की तुला डाएट ची काय गरज?
काय रे किती बारिक झालास? जरा खात जा
हेच जाड असलं की जरा कमी खात जा :रागः
खाऊन खाऊन जाड होणं किंवा न खाउन बारिक होणं हे धादांत खोटं आहे.
डाएट म्हणजे कमी नव्हे तर 'योग्य खाणं' हे आधी मनावर ठसवणं अतिशय महत्वाचं आहे.
त्यामुळे डाएट का करतेस? कशाला करतेस असं कूणी बोललं तर त्यांच्यावर अणुल्लेखाचा बाँब टाका.
मला सांगा सुरूवात कशी करायची?
मला सांगा सुरूवात कशी करायची? चालण्याचा व्यायाम पावसामुळे गंडण्याची शक्यता जास्त. घरीच कुठली योगासनं करावीत? कमीत कमी किती वेळापासून सुरूवात करू?
खाण्यात काय काय घ्यावं? (सांभाळून घ्या बालवाडीतील सदस्याला ) आरंभशूर हा किताब फार पूर्वीच प्राप्त केल्याने भीती वाटतेय.
दक्षे +११११
डाएट कसं फॉलो करावं? काही टिप्स? कारण टाईम हा फॅक्टर माझ्यासाठी पण खूप मेजर ऑब्स्टॅकल आहे.. पुरेशी झोप घ्यावी ( ७ तास) अज्जिबातच वेळ मिळत नाही. तसंही कार्डिओ होतंच लिफ्ट वै. बंद असेल तर...
आत्ता ५२ आहे ; व्यवस्थित आहे.
आत्ता ५२ आहे ; व्यवस्थित आहे. चक्कर नाही की काही नाही.
>>>
नाय मी आजारी नाही पडत.डॉक ने प्रोटीनेक्स पावडर प्रिफर केली होति दुधाबरोबर घेतली २ वर्ष आता बंद...
Pages